मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजिगीषु - अभिनंदन आणि धन्यवाद.
सुहास्य, रूनी, ज्ञाती, मृण्मयी, बस्के, शशांक, झकासराव, चैत्राली अनेकानेक धन्यवाद Happy
लिहायचा प्रयत्न नक्की करतो. अत्यंत भार्री अनुभव असतो...

हर्पेन.. अभिनंदन. ! नाही जमलं यायला त्या दिवशी मी पुण्यात नव्हतो..

विजिगीषु .. भार्री !! खूप अभिनंदन.. मी तुला कालच सांगणार होतो की ह्या बाफवर लिही म्हणून.. जरा डिटेल वृत्तांत लिही इथे किंवा धागा काढून... आर्जे पण पळणार होता ना?

पुण्यातल्या लोकहो,
१ डिसेंबरला पुणे मॅराथॉन आहे.. तर आपण सगळे मिळून पळायचं का ? फिनीश लाईलला गटग करता येईल.. Happy

सर्वांना धन्यवाद. रूनी, Lol ID असा काढलाय की बस!

पराग,

आर्जे पळणार होता पण नंतर त्याने पाय/गुडघा दुखायला लागल्यावर रद्द केले. पुढच्या वेळी.

असो. वेळ मिळेल तसं लिहेन म्हटल्याप्रमाणे सुरू करतो.

रेसच्या वेळी फोनवर 'रनमीटर' अ‍ॅप सुरू होते. कल्पना येण्याकरता काही स्नॅपशॉट्स.

चढ आणि उतार -

कोर्स मॅप -

पेस, एलवेशन ग्राफ्स -

पराग,
मी तुला म्हणालो की त्यांनी कोर्स बदलला, बहुतेक नाही. सुरवातीला असाच बघितल्याचा आठवतोय.

पार्श्वभूमी:

"मॅरेथॉन पळायची असेल तर मीच पैसे द्यायचे? नाही नाही! शक्य नाही. अरे, मला पैसे द्या मग कितीही पळतो Happy तेवढ्यात गिटारकरता एकतरी पेडल... "

"मॅरेथॉन काय आत्तासुद्धा पळेन, किरकोळ आहे" हे वाक्य सकाळी सहापासून ते रात्री अकरापर्यंत केव्हाही!

"मॅरेथॉन केल्याशिवाय मी पळतोच आहे की..."

"मला चालत/पळत करायची नाही"

वगैरे वगैरे ...

गेल्या काही वर्षांपासून मी असे युक्तिवाद करत अ‍ॅक्च्युअल रेसमध्ये भाग घेऊन मॅरेथॉन पळणं लांबणीवर टाकत होतो. तशी पळायची सवय खूप वर्षांपासून आहे. दर आठवड्यात एकदा-दोनदा ४-५ मैल पळायला सुरवात केल्यापासून आजवर घरी ट्रेडमिलवर १०४३ मैल आणि त्याच्या तिप्पट बाहेर, म्हणजे एकूण ४०००+ मैल, अगदीच वाईट अनुभव नाही. त्यामुळे आत्मविश्वास होता पण ऐकण्यार्याला 'वल्गना' वाटणे साहजिक होते. जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सगळा आत्मविश्वास फुकट होता. त्यामुळे मी 'बघाच' हे मनात ठेवले!

तीन वर्षांपूर्वी पराग आणि आर्जेनं हीच हाफ केली होती त्यावेळीच मीपण केली असती पण त्यावेळी मी acid reflux नं भयंकर आजारी होतो. तरीही नक्कीच करू शकलो असतो पण वरचे माईंडब्लॉक्स आड येत होते. शारीरिक होती पण मानसिक तयारीचा बट्ट्याबोळ होता. तरीही नेहमीप्रमाणे पळायचोच. It was hellish experience. Reflux कमी व्हायला २०१२ उजाडलं.

प्रत्येक आठवड्यात एकदा-दोनदा ६-७ मैल पळणं व्हायचं मात्र २०१३ च्या जानेवारीपासून १० मैल पळायला सुरवात केली. १० मात्र (बाहेर ट्रेल्स आणि वॉकवेजवर खूप शॉक्स बसतात त्यामुळे) घरीच! सराव करायला Spring रद्द कारण पॉलन अ‍ॅलर्जीज. या जुलैपासून गंभीरपणे १३.१ च्या दृष्टीने पळायला सुरवात केली, ते नंतर ...

मुख्य म्हणजे 'रेस झाली तरीही पळणं संपणार नाही, थांबणार नाही... इट्स गॉटबी वे ऑफ लाईफ' हा विचार पक्का होता, आहे.

मस्तं लिहिलंय, राहुल.

>>'रेस झाली तरीही पळणं संपणार नाही, थांबणार नाही... इट्स गॉटबी वे ऑफ लाईफ' हा विचार पक्का होता, आहे.
हे भारी आहे!

>> बाहेर ट्रेल्स आणि वॉकवेजवर खूप शॉक्स बसतात त्यामुळे घरीच!
पण शेवटी मॅरथॉनतर बाहेर पळावी लागते. त्याची सवय कशी करतात?

मायबोलीकरांचे लेख आणि अशा पोस्टी बघितल्या की चेव येतो. पण लवकरंच 'अपने बस की बात नाही. चुपचाप चाला किंवा फार तर जॉगिंग करा' अशी नकारघंटा वाजते.

सिंडी, थँक्स.

मृण्मयी,

बाहेर पळावेच लागले. Happy मी १० मैलाची सुरवात घरी केली कारण बाहेर पॉलन... शिवाय माहित असते अमुक अंतर, अमुक वेग आणि आपण वाढवू तसे इन्क्लाईन. अंतर पूर्ण करता येते. मग बाहेर काँक्रिटवर गुडघ्यांची वाट लावून सहनशक्ती तपासायची. ईजा न होऊ देणे आणि जास्तीत जास्त सहनीय(?) यातना Happy यातला सुवर्णमध्य गाठायचा. सुदैवाने ईजा न होता १३.१२ मैलांपर्यंत मजल मारण्याइतपत तयारी सुरू ठेवता आली.

मी , रविवारी सुरवात केली पळायला. अमनोरा मधे प्रशान्ती कॅन्सर केअर फाउन्डेशन तर्फे आयोजीत ३,५,१०,१५ किमी . पहिल्यांदाच भाग घेतला. कुठेही न थांबता (जिथे दमले तिथे चालले पण थांबले नाही) ५ किमी साठी ४० मि. लागली . पण फारच मस्त वाटल. Happy
इथे सगळे रथी महारथी आहेत , माझ्या ४० मिनीटाना हसू नका. Wink

आज पहिल्यांदाच दुबई मॅरेथॉनच्या १० के विभागातल्या रेसमध्ये भाग घेतला. खूपच मस्त अनुभव होता. फुल मॅरेथॉन, १० के व ३के ची फन रेस असे विभाग होते.

यावर्षीचा रूट हा ड्रीम रूट होता. बुर्ज-अल-अरब (तेच ते होडीच्या शिडाच्या आकारचं हॉटेल) ते पाम जुमेरा या मधल्या रस्त्यावर असणार होती यावर्षी मॅरेथॉन.

३ दिवस आधीपासून रन नंबर्स मिळायला सुरुवात झाली. रन नंबर्स बरोबरच आदिदासचा टी-शर्ट, एनर्जी बार व एनर्जी ड्रिंकही दिलं. सुपर्ब आयोजन. सगळीकडे व्यवस्थित किलोमीटर्सचे बोर्ड होते. पाणी वगैरेही होतंच. नंतर मेडल मिळालं त्यात पाण्याची बाटली, ज्युस व एनर्जी बार आहेच.

१० किमी धावायला १ तास ६ मिनीटे व ४३ सेकंद लागले. प्रॅक्टीसच्या वेळेपेक्षा २ मिनीटे वेळ कमी लागला.

मी १९ जानेवारी रोजी, मुंबई येथे झालेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉन मधे पुर्ण मॅरॅथॉन विभागात (अंतर -४२.१९५ किमी) भाग घेतला, मला स्पर्धा पुर्ण करायला लागलेला वेळ होता (गन टाईम) ५ तास ३५ मिनिटे. (बिब टाईम - ५ तास २९ मिनिटे ५४ सेकंद)

उत्कृष्ट आयोजनाचा आदर्श नमुना बघायला मिळाला.

mazya 9 ani 4 varshacya mulila ani mulala 5 k run karayche ahe kase start karache ?yabaddal margdarshan have ahe.

मिनिमलिस्ट शूज घालून (आधी चार -सहा महिने आठवड्यातून दोन तीन वेळा ७-८ मैल पर्यंतच्या सरावासाठी हेच शूज वापरत होतो) हाफ मॅरेथॉन पळालो आणि टाचांची प्रहचहंड वाट लागली. सरावादरम्यान पावलं थोडी दुखायची पण दोन दिवस ब्रेक घेतल्यावर बरीही व्हायची. आता तर दोन आठवडे झाले हाफ मॅरेथॉन पळून पण अजून पुन्हा एक मिनिटभरही पळता येत नाहीये. टाचांपेक्षाही टाचा आणि घोट्याच्या मधला भाग प्रचंड दुखतोय पळतांना. तयारी निशी पळायला जावं आणि वेदनेमुळे पाच मिनिटात परत फिरावं अशी वैतागवाडी झालीये.

कुणाला काही अनुभव आहे का अश्या प्रकारच्या दुखापतीबद्दल?

मिनिमलिस्ट शूज घालून >>> म्हणजे ते विब्रम वगैरे असतात तसे का? पुढे बोटं वाले ? मला ते बघुनच confortable वाटले नव्हते !

चमन - मी काही (म्हणजे २-३) महिन्यांपुर्वीच अनवाणी पळायला सुरुवात केली होती, पण आपल्याकडचे रस्ते आणि त्यावर पडलेल्या / टाकलेल्या वस्तु यामुळे मिनीमलीस्टिक जोडे (वर पराग म्हणतोय तसे व्हिब्रम पुढे बोटवाले नव्हे) वापरणे चालू केले. मी डिकॅथलॉनचा न्युफील नामक ब्रँड आहे ते जोडे वापरतोय. त्याचा तळ अगदी सपाट आहे. कुशन नावाचा प्रकार अजीबात नाही. स्नग्-फीट आहे. त्या जोड्यातली तळजीभ (Inner sole) काढली असता तर अगदी अनवाणी धावल्यासारखे वाटते.

मलाही सुरुवातीस प्रामुख्याने पोटर्‍या दुखणे, टाचे मागच्या नसा (पोटर्‍या जिथे टाचेला मिळतात तो भाग) दुखणे (यालाच तुम्ही टाचा आणि घोट्याच्या मधला भाग म्हणताय का?)
पण सगळ्यात जास्त त्रास शीन म्हणजे नडग्या दुखण्याचा झाला.

असेच प्रकार माझ्याबरोबरच्या इतरही धावकांना झाले होते. रेग्युलर बूट ते मिनिमलीस्टिक बूट हा प्रवास अत्यंत सावकाश करावा नाहीतर / तरीही वेगळ्या स्नायुंचा वापर होत असल्याने दुखापती ह्या होतातच.

संभाव्य कारणे / उपाय

सुरुवातीपासूनच नेहेमीचे जोडे घालून पळताना जो वेग होता त्याच वेगाने पळणे - मिनिमलीस्टिक बूट वापरायला चालू केल्यानंतर पहिले काही दिवस वेग अगदी कमी हवा. (जे खूप कंटाळवाणे वाटू शकते)
पावलांमधील अंतर जास्त असणे (Stride)- अंतर कमी हवे
पळून झाल्यावर व्यवस्थित स्ट्रेचिंग न करणे- पळण्याच्या आधी आणि नंतर, स्ट्रेचिंग रिलिजसली करणे
रिकव्हरीला वेळ न देणे- पुरेशी विश्रांती घेणे, रोज पळत असाल तर एक दिवसा-आड पळणे, पळून झाल्यावर दुखणार्‍या भागावर आईस पॅक लावला असता रिकव्हरी लवकर होते. शिवाय मी रात्री झोपण्यापुर्वी 'मुरिवेण्णा' नामक आयुर्वेदिक तेल वापरून दुखरा भाग चोळायचो.
क्रॉस ट्रेनिंगचा खूप उपयोग होतो. तुमच्या बाबतीत देखिल पोहोण्याने उपयोग होईलसे वाटते.

अर्थात मी स्वतः हे सगळे अगदी नियमितपणे करू शकलो नाही / आळसापोटी केले नाही. त्यामुळे थोडीफार दुखणी खुपणी चालूच आहेत पण.......

मी २५ मे ला झालेली शिवाजी अर्ध मॅरॅथॉन स्पर्धा उपरोक्त जोडे (कोणत्याही स्पर्धेत प्रथमच) घालून २ तास ६ मिनिटात पुर्ण केली. ही माझी सर्वोत्तम वे़ळ आहे.

त्यानंतर कालच्या रवीवारी १ जून ला स्प्रिंट अंतराची ट्रायथलॉन स्पर्धा (नक्की वेळ माहित नाही पण दोन तासांच्या आत) पुर्ण केली.

तर सांगायचा मुद्दा आपणही वरील काही मुद्दे लक्षात घेतल्यास करू शकाल. (मला जाणीव आहे की मी जे लिहिलय ते सगळ्यांना माहित असलेले आहे त्यात नवीन काही नाही पण आपण (म्हणजे मी तरी) शत्-प्रतिशत अंमलबजावणी मधे मार खातो)

इतके(सारे) बोलून मी आपले निवेदन संपवतो.... Happy

हर्पेन.. मग इतकं सगळं दुखणं, खुपणं उपाय वगैरे करावे लागत असतील तर त्या मिनिमलिस्टीक शुजचा नक्की उपयोग काय ? लाँग टर्म फायदे आहेत का ?

जोक्स अपार्ट, अनवाणी / मिनिमलीस्टिक बूट विरुध्द मोठमोठ्या कंपन्यांनी खास पळण्यासाठी तयार केलेले बूट ह्या विषयावर दोन्ही बाजूने बोलणारी दिग्गज माणसे आहेत.

माझे विचारशील तर 'आपण जात्याच अनवाणी चाला/पळायला डिझाईन केलेले प्राणी आहोत', तर मग बुट हवेत कशाला म्हणून मी अनवाणी पळू लागलो.

तू जे म्हणत होतास त्या प्रकारच्या बूटांबाबत ही एक रोचक बातमी
http://www.vox.com/2014/5/9/5695290/science-american-legal-system-confir...

हर्पेन खूप खूप धन्यवाद माहितीबद्दल. तुमच्या माहितीमुळे मला बहूतेक कळाले आहे की माझा नक्की काय प्रॉब्लेम आहे.
पहिल्याने हे आहेत माझे शूज
http://www.irunfar.com/2010/11/new-balance-minimus-trail-review.html

मी मागचे दीडवर्ष हे शूज ट्रेल्सवर चिक्कार म्हणजे एकावेळी १६-१८ मैलांपर्यंतही वापरले आहेत पण तेव्हा आजिबात एवढा मोठा प्रॉब्लेम झाला नाही. मिनिमस वापरूनही माझी थोडीतरी हील स्ट्राईक होतेच(कुछ आदते Proud ) आणि मागच्या दीड महिन्यात मी सातत्याने रोडवर पळतो आहे आणि तिथेच घात झाला बहूतेक. मी ट्रेल रनिंग शूज रोडवर वापरले.

पराग

माझे शूज एकदम फुटग्लव सारखे 'असून नसल्यासारखेही' नाहीत आणि रेग्युलर रनिंग शूज सारखे पॅडेडही नाहीत. (ज्यामुळे तुम्हाला हील स्ट्राईक करावाच लागतो.) म्हणून बहूतेक त्यांना 'मिनिमस' म्हणतात

माझ्यासाठी तरी खूप फरक आहे मिनिमलिस्ट शूज आणि रेग्युलर रनिंग शूज घालून पळण्यात. रेग्युलर शूजमध्ये मिडफुट टू हील ड्रॉप जास्त - त्यामुळे हील स्ट्राईक - त्यामुळे पायाच्या पूर्ण मसल्स मध्ये पळतांना शॉक्स - त्यामुळे मसल सोरनेस आणि हे चालू राहिल्यास ईंजुरीची शक्यता जास्त.
हाफ मॅरेथॉन रेग्युलर रनिंग शूज घालून पळतांना मला पायांना जास्त फटिग येतो जो पुढचे ४-५ दिवस नक्कीच राहतो आणि आठवड्याभरानंतर पुन्हा पळणे सुरू केल्यानंतरही पाय त्रास देतात. ह्याऊलट मिनिमसने घालून मी १६ मैल धावल्यानंतरही पुन्हा दोन दिवसातच ट्रेलवर ४-६ मैल आरामात पळू शकतो. म्हणून कंटिन्यूटि टिकवण्यासाठी माझ्यासाठी मिनिमस शिवाय पर्याय नाही.

रेग्युलर रनिंग शूज हील स्ट्राईकनंतर शॉक्स वरती थाईज पर्यंत पोचवतात जो पायाचा सर्वात मोठा मसल आहे. पळतांना ह्या मोठ्या मसलमध्ये जास्त लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होते जे (जे पळतांना मसल्स फायबर्सना फाडत राहते) आणि तुम्हाला लवकर क्रॅम्प्स आणि सोअरनेस देते व थांबायला भाग पाडते. अश्या ब्रोकन मसल फायबर्स्मुळे थाईजसारख्या मोठ्या सोअर मसलला रिकवर व्हायलाही खूप वेळ लागतो.

ह्याऊलट मिनिमसमध्ये मिडफुट टू हील ड्रॉप कमी अस्ल्याने मिडफुट आणि फ्रंटफुट स्ट्राईक होतो. (मिनिमस वापरायला सुरुवात केल्यानंतर थोडा अश्या स्ट्राईकसाठी शू आपल्याला मदत करतोच पण आपल्यालाही शक्य तितके हे जमवून आणायला लागते, आणि मग सवय होते) मिडफुट आणि फ्रंटफुट स्ट्राईक करतांना आपल्या पावलांच्या हाडांमधले जॉईंट्स त्यांची रचना आणि बारके मसल बराचसा शॉक अ‍ॅबसॉर्ब करतात. ह्या पद्ध्तीच्या पळण्यामध्ये थाय मसलपेक्षाही काल्व मसलचा जास्त ऊपयोग होतो जो तुलनेने लहान पण स्ट्रॉंग मसल आहे. पर्यायाने धावतांना कमी लॅक्टिक अ‍ॅसिड आणि कमी सोअरनेस जे तुम्हाला जास्त अंतर कापायला अतिमहत्वाचे आहे.

पाच सहा मैलांच्या रनमध्ये रेग्युलर आणि मिनिमस फार काही फरक पडत नाही. तसेच प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बर्‍याच जणांना १३ मैलातही रेग्युलर रनिंग शूज वापरून काही नुकसान होणार नाही. पण जे केवळ प्रॅक्टिस करून आपले अंतर वाढवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना निस्चितच खूप फरक पडतो.

चमन, डीटेल प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! Happy
अजूनही वाचेन आता नेटवर..

पण मग तुला ह्या वेळेला काय झालं..? नवीन बुटांचा त्रास वगैरे का?
म्हणजे इतके फायदे असूनही त्रास कश्यामुळे होतो आहे.. ? हर्पेननेही लिहिलं आहे कारण..

Pages