मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पळताना आपण फॉरेवर पळू शकतो असं वाटायला लागला
सध्याची प्रगती (?) बघता असं वाटायलाच फॉरेवर लागेल असं वाटतंय :p
पण प्रयत्न चालू आहेत.

अभिनंदन चमन. Happy
वैद्यबुवा नेक्स्ट चान्स मिळेलच.

मी अजुन खुप दुर आहे...
पण एक पाउल पुढे टाकलय हे ही नसे थोडके. Happy

धन्यवाद झकासराव, अजय.
कीप ईट अप. एक एक पाऊल टाकतच मॅरॅथॉन पळता येते. Happy

रुनी, नक्की भेट दे एका तरी मॅरॅथॉन ईवेंटला , छान मौहौल असतो.

धन्यवाद झकासराव, मानुषी, पराग, मधुरा आणि श्री!!
मानुषी ते पुस्तक नक्की बघेन.
चमन भारीच रे!! अभिनंदन!!
स्लोगन्स मस्तच!!
बुवा लवकर बरे व्हाल.

धन्यवाद झकासराव आणि प्रिति. आता पुष्कळ बरा आहे पाय. Happy

शुम्पी, ते पुस्तक वाचूनच मी परत रनिंग सुरु केलं. मस्त आहे पुस्तक. फक्त बेअरफूट रनिंग ला स्विच करणार असाल तर खुप विचारपुर्वक आणि सावकाश करा! मला सध्या होत असलेले त्रास खुप पटकन स्विच केल्यामुळे होत आहेत.

धन्यवाद प्रीति.
हो शूम्पी, बुवांनी सांगितलं होतं त्या पुस्तकाबद्दल, वाचायचं आहेच लवकरात लवकर.

वा भारी टाइम चमन... अभिनंदन.. Happy
तीन दिवस झाले अजून सुरु आहे.. सध्या ट्रेड्मिल आहे पण.. ह्ळूहळू बाहेर निघेन..

मी २०१० मधे पुण्यात झालेल्या मॅरेथॉनमधे ( वोडाफोन प्रायोजित एड्सविरोधी कार्यक्रमाचा भाग म्हणुन) ३.५ किमि पळाले होते. तेव्हाही सराव न करताच पळाले होते. पण जिम आणि अ‍ॅरोबिक्स नियमित केल्याने स्टॅमिना चांगला होता. कोणताही त्रास (पळताना किंवा नंतर सुद्धा) न होता अंतर पुर्ण केलं होतं. मग काही कारणाने सगळा व्यायाम बंद केल्यामुळे वजन थोडं वाढलं आहे. आता परत व्यायाम चालु करायची परवानगी आहे आणि नेमका तेव्हाच धागा वाचण्यात आला. इथल्या सगळ्या टीप्स वाचुन, परत सराव चालु करुन या वर्षीच्या मॅरेथॉनमधे भाग घेणार.

वैद्य, या धाग्यासाठी अनेकानेक धन्यवाद. खरंच स्फुर्ती मिळाली.

चमन, मस्त टीप्स आहेत. थँक्स.

सगळीच स्लोगन्स मजेदार आहेत.

मस्त रे चमन.
मनीमाऊ, नक्की घे आणि ईथे अपडेटस दे. मी आज ट्रेड्मील वर ३ मैल ४५ मिनीटात पळून्/चालून पूर्ण केले. ( पण दर ५ मिनीटानी चालायचा ब्रेक घ्यावा लागला. ) आय होप की २ अडीच महिन्यात सलग पळता येईल, ते सुद्धा बाहेर. ( ट्रेड्मील चं बाहेर पेक्षा सोप्म असतं नं?.
बरं मला सआंगा, तुम्ही सगळे डायरेक्ट पळायला सुरू करता का? ( थोडाफार वार्मअप करून? ) मी सध्यातरी चालत सुरुवात करते आणि मग पेस वाढवते. रेस च्या वेळेस कसे जमवावे?

मी वाचलय. खुपच प्रेरणादायी आहे. थोडी अतिश्योक्ती आहे पण काही काही रिजनींग अगदी पटतं. फक्त वर म्हंटल्याप्रमाणे बेअरफूट किंवा मिनीमलिस्ट स्टाईलकडे जाताना अत्यंत काळजीपुर्वक तसं करा!

वा वा मधुरा !! कीप ईट अप.
३ मैल म्हणजे आजिबात कमी नाही काही. धावणं-चालणं-धावणं-चालणं असे असले तरी त्याने काही फार फरक पडत नाही. कॅलरी बर्न थोडे कमी जास्त होतील ईतकंच. शरीर पूर्णवेळ मोशन मध्ये आणि हार्टरेट तुमच्या वय्-वजनाप्रमाणे असतो ना..मग झाले तर.

वार्मअपसाठी थोडं फार स्ट्रेचिंग, पुढे -मागे-साईड बेंडींग, स्क्वॅट्स, थोडं जंपिंग, स्पॉट जॉगिंग आणि मेन म्हणजे निगेटीव विचारांना दूर सारत डोक्यात पोझिटिव विचार भरून घेणे. Happy हे सगळं करायला ५ मिनिटे सुद्धा खूप झाली.

तुमची सुरूवातच आहे तर एक डायरी मेंटेन केलेली चांगली. त्यात आजची पंचेचाळीस मिनिटे कशी होती हे दोनेक मिनिटात लिहून काढा.

पहिले १ मैल ५ च्या स्पीडने पळाले- १२ मिनिटे
मग दम लागला ०.५ मैल चालले. - ८ मिनिटे
मग ०.५ मैल ५ च्या स्पीडने पळाले - ६ मिनिटे
मग दम लागला ०.५ मैल चालले. - ८ मिनिटे
--

असे लिहून काढा, तुम्हाला तुमच्या पळण्यात आणि थांबण्यात एक ट्रेंड दिसून येईल.
मग १ ल्या मैलानंतर दम लागणे हळूहळू १.२ मैलांपर्यंत ताणत न्या.
पुढचा ०.५ मैल चालल्यानंतर ०.५ मैल पळणं ०.७ मैलांवर न्या.
हळूहळू ०.१ मैल पुश करत राहिलं तरी तुम्ही महिन्याभरात ३ मैल सलग पळू शकाल ही गॅरंटी, नाहीतर मी बोर्ड घेऊन ऊभा राहतो 'रन मधुरा रन....यू हॅव ट्रेन्ड हार्डर दॅन (पुढे कुठल्या आयडीचं नाव लिहायचं ते सांगा) Proud

रस्त्यावर पळणं ट्रेडमील पेक्षा सोपं आणि अवघड दोन्ही असतं.. पण तो विचार सोडून द्या. पहिल्याने बाहेर पळणं थोडं अवघड जाईल पण २-३ प्रयत्नांनंतर सवय होऊन जाईल. Happy

धन्स रे. डायरीची आयडीया छान आहे. आजचं आठवत नाही, पण पळण्याचा वेग ४.५ आणि चालण्याचा ३.५ होता.
ऊद्यापासून लिहून ठेवते. आणि तुम्ही ऐवजी तूच बरयं. ते तुम्ही तुम्ही वाचून, मी अल्टर ईगोला घेऊन पळतीये असं वाटतं. Proud

हेल्लो रनर्स!
मी पण पळपुटी Happy आत्तापर्यंत १ 5k २ 10k आणि १ हाफ मॅरॅथॉन पळाले आहे. हे सगळं वाचून परत या वर्षी पण एक 10k पळेन म्हणतेय पण मिनिमलिस्टिक शुज मधे.

वैद्यबुवा -- या विषयीचे अनुभव सांगाल का? हळुहळु म्हणजे नक्की कसे स्विच करावे? मी सध्या माझे मिनिमलिस्टिक शुज नॉर्मल सगळ्या workouts ना वापरतेय, ट्रेड्मिलवर १मैल पळून पण बघितले, रस्त्यावर पळायच्या आधी अजुन काय काळजी घ्यावी?

रुनी, मिनिमलिस्ट म्हणजे मिनिमम सपोर्ट असलेले शूज. थोडक्यात तळव्यांना जाड जाड फोम नाही की साईडला टणक आवरणं वगैरे काहीच नाही. vibram गूगल करशील तर लगेच लक्षात येइल रुनी. Happy

सानुली, तुम्ही बॉर्न टू रन वाचलय की नाही माहित नाही. वाचलं नसेल तरी एकंदरित सध्या मिनिमलिस्टचं वारं आहे पण स्विच करण्याच्या ट्रान्जिशन बद्दल फार रिसर्च किंवा मटेरियल नाहीये.
सुरवात करताना अगदी सावकाश करायला हवी. नॉर्मल शूज नंतर तुम्ही जेव्हा मिनिमलला स्विच करता तेव्हा तुमचा फूटस्ट्राईक एकदम बदलतो. पायाखाली जास्त कुशन नसल्यामुळे अर्थातच आपण अलगद पायाच्या चवड्यांवर पळायला लागतो. हील अगदी ओझरती जमिनीला टेकते आणि आपण लगेच पाय उचलतो. अचानक चवड्यावर पळायला लागलं की कधी नव्हे ते आपले काव्स (पोट्र्या) एकदम कार्यरत होतात, त्याच बरोबरीनी एकिलिस टेंडनवर पण जोर वाढतो.
चवड्यावर लॅंड होऊन पळायची पद्धत किंवा त्याचे मेकॅनिक्स जरी अगदी योग्य असले तरी "सवय" हा खुप मोठा मुद्दा आहे.
सवय नसल्यामुळे एकिलिस दुखावला जातो. एकिलिसचे दुखणे खुप ताप दायक आहे.
पळण्याचे माईल्स अगदी सावकाश वाढवा असं माझं मत आहे. आठवड्याला १०% हे प्रचलित आहे आणि योग्य ही वाटतं. उदाहरण, एका आठवड्यात तुम्ही ओवरॉल ४ मैल पळालात तर पुढच्या आठवड्यात ४.४ मैल पळा.
बॉडीला जमेल तितका वेळ द्या अ‍ॅडजस्ट व्हायला. पळ्ण्याच्या इंजुरिंचे असं आहे की अचानक काहीतरी दुखायला लागतं आणि लक्ष न दिल्यास प्रत्येक पावलानिशी वाढतं.

ओह ते vibram का, टो वाले शूज, ते माहीत आहेत की मला. त्याला मिनिमलिस्ट शूज म्हणतात हे मात्र माहित नव्हते. मी पळत नाही (चालते) तरीही मला ते किती दिवसांपासून घ्यायचे आहेत.

मी मॅरॅथॉन रनर नाही, पण रोजच्या वापराला - म्हणजे पाऊण तास चालणे/पळणे असा व्यायाम, जवळच्या जवळ चालत्/फिरायला जाणे, बाजारहाटाला जाणे वगैरे साठी मिनिमलिस्ट शूज वापरायला लागले तेव्हा फार फरक नाही जाणवला. दुकानदाराने जरा घाबरवलं होतं - हळूहळू सवय करा, रोज आधी एकच तास वापरा वगैरे. पण दुसर्‍या दिवशीपासून रग्गड वापरायला सुरूवात केली - ऑफिस/लॅब मध्ये आठ तास घालून वावरणे इ. आणि काही त्रास झाला नाही. आपल्याला भारतात अनवाणी वावरायची सवय असते म्हणून की काय न कळे. पण हे अर्थात चालणे वगैरे लाईट व्यायाम आणि रोजच्या वावरासाठी. मॅरॅथॉन ट्रेनिन्ग साठी योग्य प्रिकॉशन घेतलेली बरी. बुवांनी वर सांगितलंच आहे.

रूनी, मिनिमलिस्ट म्हणजे फक्त पाच टोजवालेच/व्हायब्रम असं नाही Happy साधे, म्हणजे नेहमीसारखे दिसणारे शूज सुद्धा मिनिमलिस्ट सपोर्ट मध्ये मिळतात. तुला रिकंमेडेशन हवं असेल तर देईन.

पण हे अर्थात चालणे वगैरे लाईट व्यायाम आणि रोजच्या वावरासाठी>>>> +१
खरच खुप फरक आहे.
चालताना, उभं राहताना एकिलिस वगैरे वर इतका जोर पडत नाही. पळताना डायनॅमिक खुप बदलतं.

आय कॅन इमॅजिन! मला आधीपासून सवय होती म्हणुन पळायला सुरूवात केली तेव्हा काही त्रास झाला नाही. पण पळणेही २-अडीच मैलच आहे.

सानुली सही आहेस तू.
स्वीच वर जास्ती रिसर्च उपलब्ध नैये, पण सुरुवातच करायची असेल तर विब्रम घ्यावे का? माझ्या विश लिस्ट वर कधीपासून पहिल्या नंबरवर आहेत ते :).
शिवाय माझ्या वाचनात आहे की नेहमीचे चीप शुज खास रनर्स साठी असलेल्या महागड्या ट्रेनर्स पेक्शा लेस ईंजूरी प्रोन आहेत. ख खो दे जा.

व्हायब्रमही महागच आहेत! मिनिमलिस्ट बनायला जावं तरी महागात पडतं Sad Happy 'लेस इस मोअर' च्या किमती का 'मोअर' असतात कुणास ठाऊक.

Pages