मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले
लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
लोकसत्तेतील बातमी.
महालक्ष्मी सरस २०१४ > जाणे
महालक्ष्मी सरस २०१४ > जाणे झाले तर उपाशी पोटी जा.. गेल्यावर कळेलच..
बाकी इकडचे भारताच्या कोपर्याकोपर्यातून आलेले स्टॉल्स बघण्यात मजा येते..
मी आले जाऊन महालक्ष्मी सरस
मी आले जाऊन महालक्ष्मी सरस २०१४ ला. तिथल्या स्टॉलवाल्यांच्या परवानगीने फोटु काढलेत थोडे.
मी काहीही खरेदी केली नाही. मी फक्त खाण्यासाठीच गेले होते. १० नंबरच्या शुद्ध शाकाहारी स्टॉलवर पुरणाचा मांडा, कटाची आमटी व हुरड्याचं थालिपीठ, पिठलं, ठेचा खाल्ला. ठेचा खाऊन जीभ हुळहुळल्यावर दिल्लीच्या कुल्फीच्या स्टॉलवर कुल्फी खाल्ली. मत्स्याहारींची मजाच मजा आहे तिथे. बहुतेक स्टॉल्सवर तव्यावर मासे लावलेले दिसत होते. एका स्टॉलवर मोठ्ठी वीतभर खेकडा ठेवलेला होता एका डिशमध्ये. ७ नंबर स्टॉलवर मैत्रिणीने प्लेन मांडे आणि वर्हाडी चिकन की मटण खाल्लं. अफलातून होतं म्हणाली. तिचंही त्या चिकन/मटण ने तोंड पोळल्यावर तिनेही कुल्फी खाल्ली. पुरणाचा मांडा करतानाचा त्या सुगरणीच्या परवानगीने एक व्हिडिओ पण केलाय. इथे कसा अपलोड करायचा माहित नाही.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
एवढा मोठा पुरणाचा मांडा तिने
एवढा मोठा पुरणाचा मांडा तिने २ मिनिटांत केला. मी करायला गेले तर हवेत हातावर फिरवतो मोठा करताना खालीच पडेल फाटून. व्हिडिओ कसा टाकायचा इथे?
कधीपर्यंत आहे हे प्रदर्शन?
कधीपर्यंत आहे हे प्रदर्शन? आणि कुठे आहे?
२६ जानेवारीपर्यंत बांद्रा
२६ जानेवारीपर्यंत बांद्रा रेक्लमेशनला.
७ नंबर स्टॉलवर मैत्रिणीने
७ नंबर स्टॉलवर मैत्रिणीने प्लेन मांडे आणि वर्हाडी चिकन की मटण खाल्लं. अफलातून होतं म्हणाली. >>> मी ही खाल्लंय ते ७ नंबरच्या स्टॉलवर. मटण आणि चिकन दोन्ही मस्त होतं. दोन्हीला वेगवेगळी चव होती.
मी बाकी खरेदी काही केली नाही. पण बर्याच स्टॉल्सवरून हातसडीचे इंद्राणी, आंबेमोहोर, जिरेसाळ असे तांदूळ घेतले. फार मस्त चव. आपण लहानपणी खायचे तसे गुरगुटे भात होतात.
२६ जानेवारीपर्यंत बांद्रा
२६ जानेवारीपर्यंत बांद्रा रेक्लमेशनला. >>> लीलावती हॉस्पिटल जवळच्या मैदानावर.
अश्विनी तू मासे खाल्लेस :
अश्विनी तू मासे खाल्लेस : आश्वर्यचकित झालेली बाहुली :
मी नाही गं खाल्ले. मी फक्त
मी नाही गं खाल्ले. मी फक्त फोटो काढला त्या स्टॉलवाल्यांना विचारुन.
(No subject)
मी गेले होते मागच्या शनिवारी.
मी गेले होते मागच्या शनिवारी. पण ह्यावे़ळी काही खरेदी केली नाही. मागच्या वर्षीच्या मानाने हया वेळी दुकानांत व्हरायटी कमी दिसली. सगळ्या स्टॉल्सवर तेच मसाले, आंबा सरबत, कोकम सिरप, खाजा. मागच्या वर्षी एक मस्त हलवा घेतला होता तो स्टॉल ह्यावेळी द्सिला नाही. मागच्या वर्षी बेळगावचा कुंदा सुध्दा मिळाला होता. केरळच्या एका स्टॉलवर हलवा होता तो अगदी बदामी हलव्यासारखा लागत होता. बहुतेक आत असलेल्या ड्राय फ्रूटस्ची किंमत वसूल करायला २८० किंमत होती. कॉस्मेटिक ज्वेलरीमध्ये काहीही खास वेगळं नव्हतं. एके ठिकाणी लसणाचे पापड मिळाले ते मात्र मस्त आहेत.
ह्या वेळी फूड कोर्ट स्वच्छ होतं. मागच्या वर्षी फार घाण होती तिथे. आम्ही कोल्हापुरी थाळी घेतली. ठीक वाटलं जेवण. पांढरा रस्सा काही मला आवडला नाही. राजस्थानी स्टॉलवर मूगडाळीचा हलवा घेतला तो ठीकठाक होता. फक्त चुरमा लाडू मस्त होते. पण आमच्या समोर एका कपलला त्याने थाली दिली त्यात सगळ्या भाज्याआमट्यांचे रस्से एकमेकात मिक्स झाले होते. आणि वरून डावलाभर तूप ओतलंन त्याने
माझी तरी ह्यावेळी फार निराशा झाली
२६ जानेवारी, सकाळी ८:३०, मरीन
२६ जानेवारी, सकाळी ८:३०, मरीन ड्राईव्ह
पहिला महासंचालन सोहळा
आकर्षक चित्ररथ दर्शन, भूदल पोलिस ह्यांची मोटरसायकलींवरील प्रात्यक्षिके, व्हिंटेज कार रॅली, संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांचा प्रत्यक्ष सहभाग, महाराष्ट्रीय युध्दकलांची प्रात्यक्षिके
वरळी फेस्टिव्हल २०१४ - २४ ते
वरळी फेस्टिव्हल २०१४ - २४ ते २६ जानेवारी अधिक माहिती http://www.rwitc.com/viewArticles.php?id=1560
राजस्थानी स्टॉलवर मूगडाळीचा
राजस्थानी स्टॉलवर मूगडाळीचा हलवा घेतला तो ठीकठाक होता. >>> मी ती राजस्थानी थाळी घरी पार्सल करून आणली. मला मूगडाळ हलवा आवडला गं. चूरमा लाडू उलट इतके काही हे नाही वाटले.
मामी, भगत ताराचंदचा मूगडाळीचा
मामी, भगत ताराचंदचा मूगडाळीचा हलवा खाल्लाय ग मी. म्हणून बाकी कुठलाच हलवा गोड लागत नाही
असं आहे का? खिलव ना एकदा.
असं आहे का? खिलव ना एकदा.
कुठे मिळेल?
मामी, मी मालाडला इन ऑर्बिट
मामी, मी मालाडला इन ऑर्बिट मध्ये खाल्लाय ग. बाकी http://www.bhagattarachand.com/website/restaurant/restaurant_home.html
धन्स स्वप्ना.
धन्स स्वप्ना.
मी भोपाळमध्ये एका हिंवाळी
मी भोपाळमध्ये एका हिंवाळी रात्री हमरस्त्यात मिठाईच्या दुकानासमोर उभे राहून खाल्लाय. त्याची रेसिपी पाहिल्यावर मुंबईत खायचे धारिष्ट्य होत नव्हते. पण आताची हवा मूंगदाल हलव्यासाठी बेस्ट आहे.
के अश्वे मस्त फोटो टाकलेस
के अश्वे मस्त फोटो टाकलेस
मुंगदाल हलवा म्हणजे मुगाचा
मुंगदाल हलवा म्हणजे मुगाचा शिरा ना?
हो. उत्तरेत शिर्यालाच हलवा
हो. उत्तरेत शिर्यालाच हलवा म्हणतात. अधिक योग्य म्हणजे हलुआ.
सिंडे, तुला माहितच असणार की.
मस्त फोटो, आशू... पदार्थांची
मस्त फोटो, आशू... पदार्थांची वर्णनं ऐकूनच तोंपासु..
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे २५ जानेवारीपासून रोपवाटिका उद्यानकला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. हा विकेंड कार्यक्रम असून जानेवारी ते जुलै असा ६ महिने चालणार आहे. नावनोंदणीसाठी बहि:शाल शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, आरोग्य केंद्र इमारत, दुसरा मजला, विद्यानगरी येथे अथवा २६५३०२६६, २६५४३०११ येथे संपर्क साधावा.
जनसेवा समिती, विलेपार्ले, या
जनसेवा समिती, विलेपार्ले, या संस्थेच्या वतीने २५ आणि २६ जानेवारीला अपरिचीत दुर्गांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या कार्यकत्यांना रायगडावर मिळालेल्या दुर्मिळ वस्तूही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. हे प्रदर्शन गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), विलेपार्ले पूर्व येथे सकाळी १०:३० ते रात्री ८:३० पर्यात खुले असेल.
मराठी भाषा दिनाच्या
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पार्ले पंचम आणि मराठी अभ्यास केन्द्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २३ फेब्रुवारीला 'धावा मराठीसाठी' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क वरुन सकाळी ७ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. १२ ते १५, १६ ते ६० आणि त्यापुढे ज्येष्ठ नागरिक असे ३ गट आहेत. अधिक माहितीसाठी dhavamarathisathi@gmail.com वर संपर्क करावा.
आम्हाला उत्तरेचं काही माहिती
आम्हाला उत्तरेचं काही माहिती नाही, आम्ही नाही तिथले
जोक्स अपार्ट, मला माहिती आहे पण मयेकरांची पोस्ट वाचल्यावर मला ते नक्की कुठल्या मुंगदाल हलव्याबद्दल बोलताहेत असा प्रश्न पडला.
सिं ...
सिं ...
काळाघोडा महोत्सवास आजपासून
काळाघोडा महोत्सवास आजपासून सुरुवात
http://www.loksatta.com/vruthanta-news/kala-ghoda-arts-festival-starts-from-today-360794/
Pages