दिल्लीत आता काय घडेल ? ( बदलुन )

Submitted by नितीनचंद्र on 8 December, 2013 - 23:44

दिल्लीचे बलाबल या प्रमाणे

एकुण जागा ७०

बहुमताला आवश्यक ३६

भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.

अपक्ष २

पर्याय उपलब्ध्द

१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.

२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )

३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.

५) काँग्रेस - भाजप किंवा आआप च्या पाठींव्यावर सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

६) अजुनही काही पर्याय

आपल्याला काय वाटते ? काय घडेल ?

वर लिहल्या प्रमाणे जसे चंद्र्शेखर यांचे सरकार चालले तसेही भारतीय राजकारणात घडु शकते. पण लगेचच निवडणुका हा पर्याय राजकारणी अवलंबत नाहीत. अल्पमतातल्या आणि बाहेरुन पाठींबा असलेल्या सरकार कडुन काही अपेक्षीत कामे करुन घेणारी एक लॉबी तेव्हा सक्रीय होते.

चर्चा करुयात. वितंडवात नको. अ‍ॅड्मीन चा हस्तक्षेप तर नकोच नको.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत हा पोलिसांचा मुद्दा कोणीच उचलला नव्हता. >>>>>> Uhoh

दिल्लीत आलेल्या सगळ्याच सरकार ने हा मुद्दा उचललेला होता.. मग तो भाजपा असो या काँग्रेस असो..
शीला दिक्षीत यांनी देखील हा मुद्दा ठेवलेला... परंतु सगळ्याच केंद्र सरकार ने तो फेटाळला होता..

केजरीवाल सारखा.............."तमाशा" केला नव्हता इतरांनी......एवढाच काय तो फरक आहे.....

'आप'ला लोकसभा निवडणुकीची घाई झालेली दिसते. त्यांना आता लक्ष वेधून घ्यायचंय. बॉलिवूडमध्ये जसे अभिनेत्री स्वतःकडे लक्ष वेधून घेऊ शकत नसेल, तर ती आयटम गर्ल बनते. त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष राजकारणातील आयटम गर्ल बनू पाहातोय, असे विधान करत प्रसिद्ध लेखक आणि 'आप'चे समर्थक चेतन भगत यांनी गेले दोन दिवस झालेल्या धरणे आंदोलनावर कडाडून टीका केली....

असेल पण इथे सामान्य माणसे पण भांडतात केजरिवालांची बाजु घेवुन (आता प्रमाण कमी आले आहे) त्यांची निराशा होऊ नये असे वाटते.

माकडाच्या हाती दिले कोलीत असा प्रकार आहे. केजरीवाल आणि कंपनीने भरपूर तमाशा करून घेतला पण लोक याला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर यांचा हिरमोड झाला आणि आंदोलन गुंडाळले. आपण मुख्यमंत्री आहोत याचे भान त्यांने ठेवावे. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आरोप करताना ते स्वताच घसरले. सडकछाप भाषेत त्यांचा उद्धार करून पोलिस हफ्ते पोचवतात वगैरे आरोप केले.रस्त्यावरून सरकारचे कामकाज चालवू, लोकांनी काम धंदे सोडून आमच्या या चमको आंदोलनाला पाठींबा (?) द्यायला या असे आवाहन केले, काय तर म्हणे २६ जाने. ला लाखो आंदोलक लोक जमतील, प्रजासत्ताक दिन उधळवू अश्या अर्थाची हास्यास्पद विधाने केली.
या आधी हे लोक शीला दीक्षित आदींवर आरोप करत सुटायचे आता सत्ता आलीय तर कारवाई करा ना.उलट हेच आता सांगतात कि त्यासाठी लागणारे पुरावे विरोधी पक्षाने द्यावेत. तुमच्या अधिकारात आहे तेवढी तर कारवाई करून दाखवा.जे तुमच्या अधिकारात येत नाही त्यासाठी लढा पण असले तमाशे करून लोकांना वेठीला का धरता.
. आपण बोलू ते खरे, आपण ठरवू ते तोरण आपल्या विरुद्ध कुणी बोलले कि ते सगळे चोर, गद्दार असली गुर्मी लवकर सोडली नाही तर लोक त्याना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.

आपचा काऊन्टडाऊन सुरू झालाय असे समजायला हरकत नाही. महाराष्ट्रात तर यांचे सगळे नेते नॉन मराठी / नॉन महाराष्ट्रीयन आहेत. त्याना टीव्हीच्या मराठी पॅनेल डिस्कशनमध्ये हिन्दीत बाजू मांडावी लागते .मयंक गांधी, श्रीवास्तव , दमानिया अत्यंत तुच्छतापूर्वक, अ‍ॅरोगन्ट भाषेत बोलत असतात. आप मधल्या लोकाना आपण इंटेलेक्च्यल असल्याचा भयंकर ताठा असल्याचे जाणवते. बहुधा यांचा मुख्यमंत्री झाला तर आपल्याला यांची हिन्दी भाषणे ऐकावी लागतील असे दिसते Happy

‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार

काश्मीरप्रश्नी बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेणारे आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रशांत भूषण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिक्षण संस्था चालविण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून घेतलेली १५ एकर जमीन भलत्याच कामासाठी वापरल्याचा ठपका भ्रष्टाचारविरोधी पथकाने भूषण यांच्यावर ठेवला असून ही जमीन जप्त करण्याची शिफारस सरकारला केली आहे.

पुन्हा घडामोड वेगाने घडत आहेत.

दिल्लीच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना पत्र लिहुन सिंगल लार्जेस्ट पार्टीला संधी द्यावी असे सुचवले आहे.

दरम्यान भाजप आमदारांची लोकसभेवर निवडुन गेल्यामुळे संख्या कमी झाली आहे.

अमित शहा आपल्या मुलाखतीत म्हणाले फोडा - फोडी करणार नाही एखादा मोठा गट आम्हाला येऊन मिळेल.

तरी सुध्दा बहुमत सिध्द करायला भाजपला पाच आमदार हवे आहेत.

काय घडेल ?

Pages