..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंगो, भरत आणि कविता!!!! Happy

०७/०२८
तुम जाओ कहीं तुमको इख्तियार
हम जाये कहाँ सजना
हमने तो
किया हैं प्यार

मुँह देखते हर इल्ज़ाम पर
ऐसे तो हम नहीं थे मगर
बदल ही गयी जब तुम्हारी नज़रProud
जो चाहे कहो दिलदार
हमने तो किया हैं प्यार

माना तुम्हे नहीं ऐतबार
झूठा सही दिल-ए-बेक़रार
कहाँ फेंक दे दर्द की यादगार
अपना तो यही संसार
हमने तो किया हैं प्यार

गाणं दुसर्‍या प्रयत्नात ओळखल्याबद्दल भरत आणि कविता यांना अर्धी अर्धी वाटी शिर्खुमा Happy

अरे असली कसली गाणी रे.............>>>>अरे, इतकं सुंदर गाणं माहित नाही? कुणीतरी युट्युबची लिंक इथे द्या रे. सध्या एक्सेस नाही. Happy

गायिका: लता मंगेशकर
चित्रपट: मेरे हमदम मेरे दोस्त Proud

को़डे क्र.: ७/२२:

TLC channel वर हेअर ऑइलची जाहिरात करताना डाबरने कोणतं गाणं वापरलं?

उत्तर: मै प्यार का राही हु तेरी झुल्फ के साये मे कुछ देर ठहर जाऊ

ह्या बीबीवर जे मायबोलीकर येतात त्यांना एक नम्र विनंती आहे. एखादं गाणं, विशेषतः गोल्डन एरातलं, ऐकलं-पाहिलं नसेल तर वेळ मिळेल तेव्हा युट्युबवर शोधून नक्की पहा व ऐका. खात्री आहे की ह्यातली बरीचशी गाणी तुम्हाला आवडतील.

ह्या बीबीवर जे मायबोलीकर येतात त्यांना एक नम्र विनंती आहे. एखादं गाणं, विशेषतः गोल्डन एरातलं, ऐकलं-पाहिलं नसेल तर वेळ मिळेल तेव्हा युट्युबवर शोधून नक्की पहा व ऐका. खात्री आहे की ह्यातली बरीचशी गाणी तुम्हाला आवडतील.>>>>स्वप्ना, +१ Happy

चलो, मी आता २ तास एका मिटिंगमध्ये आहे. तोपर्यंत कोडी सुटतील अशी अपेक्षा Proud जिंकलेल्यांना बक्षिसे आल्यावर देईन.

कोडी सुटली नाहीतर आल्यावर क्लु देईन. Happy

बिंगो स्निग्धा Happy

कोडे क्र: ०७/२९
सैंया ले गयी जिया तेरी पहली नजर
कैसा जादू किया तुने मोपेजादूगर

स्निग्धाला गरमागरम दाल खिचडी साजुक तुप आणि मसाला पापडसहित. Happy Wink

सह्हिए आर्या Happy
०७/३०:
कौन आया कि निगाहों में चमक जाग उठी
दिल के सोए हुए तारों में खनक जाग उठी

आर्याला किलोभर सातारी कंदी पेढे Happy

Pages