..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०७/१७:

अजी दिलपर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई
नजरे मिली क्या किसी से कि हालत बदल बदल गई

मि अँड मिसेस ५५

अरे देवा, जिप्सी घरी जा. आर्या यांनी महत्त्वाचा शब्द ओळखला म्हटले ना.>>>>>मी कुठे त्यानंतर उत्तर दिलंय. Sad

चित्रपट : मि & मिसेस ५५ आहे का?

.

०७/०१७ आजकाल बर्‍याच नव्या नव्या उपचार पद्धती उदयास येत आहेत हे तुम्हाला माहीतच असेल. तर अशाच एका तथाकथित शास्त्रज्ञाने हिप्नॉटिझम अर्थात स्ंमोहनाद्वारे हृदयविकारावर उपचार करण्याचा दावा केला. सुरुवातीला येणार्‍या रुग्णांना नाममात्र दरात उपचार द्यायचे ठरवले. पंचावन्न वर्षांच्या वसंतरावांना स्वस्तात मिळणार्‍या कोणत्याही गोष्टीचा मोह पडायचा. योगायोगाने त्यांनाही ब्लॉकेजेस डिटेक्ट झालेच होते. तेव्हापासून ते फारच अस्वस्थ होते. त्यांनी हे उपचार आजमवायचे ठरवले. उपचार काय? तर एक आकर्षक, अत्यंत सुंदर डोळ्यांची , भेदक नजरेची तरुणी पेशंटच्या डोळ्याला डोळे भिडवून बसायची.. त्याचे वेळी अमिताभ बच्चन टाइप आवाजात पेशंटला संमोहित करणार्‍या सूचना व मंद्र संगीत जोडीला मंद प्रकाश. पहिल्याच सेशननंतर वसंतरावांना आपण फिरून यौवनात आल्यासारखे वाटू लागले. सेशन संपवून घरी आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीला त्यांनी गाण्यातच उत्तर दिले. कोणत्या?

उत्तर : अजी दिल पे हुआ ऐसा जादू तबीयत मचल मचल गयी
नजरें मिली क्या किसी से के हालत बदल बदल गयी

चित्रपट : मि. & मिसेस. 55 .
नायक : गुरुदत्त = वसंतकुमार शिवशंकर पदुकोण

श्रद्धांना मेरवानचे डझनभर मावा केक

गुरुदत्त = वसंतकुमार शिवशंकर पदुकोण>>>>>अरे देवा Happy नशिब अमिताभच्या नावाचा एकच चित्रपट शोधला (एक नजर). तरी म्हटल मयेकरांच्या कोड्यात नायकाचा थेट उल्लेख कसा? Happy Happy

०७/१८
आली संक्रांत सूर्याच्या वाड्यावरनं
जाई मिरवत .......घोड्यावरनं
अहो लाडीने सांगते गोडीनं सांगते मनात भाव हाय भोळा
तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला

मला १०१% खात्री होती हे गाणं भरतच ओळखणार. Happy

भरत यांना बाजरीची, तीळ लावलेली गरमागरम भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी. Happy

०७/१८
आली संक्रांत इश्काच्या घोड्यावरन
जाई मिरवत सूर्याच्या वाड्यावरन
अहो लाडीने सांगते गोडीनं सांगते मनात भाव हाय भोळा
माझ्या मनात भाव हाय भोळा
हे रे जीssssss
अहो तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला
तिळगुळ घ्या गोड बोला

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!

०७/०१६:
जरा सामने तो आओ छलिये, चुप चुप छलनेमे क्या राज है,
यु छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है.

किंवा

सामने ये कौन आया दिलमे हुई हलचल, देखके बस एकही झलक हो गये हम पागल

अरे जरा ओळीने लावा की चित्रे.............. सुर्य इथे वाडा तिथे ....... Sad

नविन लोकांनी ओळखायचे कसे

अरे जरा ओळीने लावा की चित्रे.............. सुर्य इथे वाडा तिथे ....... >>>>>आणि त्याच्याबरोबर गाण्याच्या ओळीपण देतो की, नविन लोकांना ओळखायला सोप्प जाईल मग. Proud

कोडं ०७/१५:

"I don't understand these people. They say the deal is on but are not willing to sign the agreement without Mr. Jiang being present here.' Naomi Brooks said in frustration.
'Have you told them that Mr. Jiang has vested all the necessary powers in you?' her associate Sam asked quietly.

'Of course I did Sammy. This is not the first time I am making a deal on behalf of Mr. Jiang in a foreign country. You know that' Naomi started pacing the room.
Sam kept quiet. He knew better than to interrupt Naomi again. Best to let her think through all this, he thought.

'I think we need to inform Mr. Jiang. I don't want to sit here cooling my heals' Naomi said as she reached for the phone, only to find that the line was dead.
'You got to be kidding me. Sophie? Sophie?'

Sophie, her personal secretary, came running into the room.
'Sophie? What's wrong with our phone network?' Naomi demanded at once.
'Madam, I was on my way to inform you. There is a major outage. I was just speaking to the utilities people. The lines will be down for at least a week now.'

'What? This cannot be. How are we going to contact Mr. Jiang now?'
'I am sorry madam.'
'You can go Sophie. Just talk to those people again and see if the process can be speeded up' Naomi said. When Sophie left, she turned to Sam 'What now?'.

'You can always try sending a letter.' he suggested.
Naomi looked at him in astonishment for a few seconds. Then she must have realized that there was really no other way out.
'You are right Sammy. Let me write to him and tell him that we have a deal but no agreement unless he comes down himself'.

Naomi आणि मिस्टर जियांग दोघांना हिंदी येत असतं तर तिने पत्राची सुरुवात कोणत्या गाण्याने केली असती?

उत्तर: अफसाना लिख रही हु दिल-ए-बेकरार का
आखोमे रंग भरके तेरे इंतजारका

दिल-ए-बेकरार -> deal-e-bekraar -> deal without agreement

कोडं ०७/१६:

'अरं बाबा, किती येळा समजावून सांगायाचं तुला. नदीपल्याडल्या त्या वाड्यात जायाचं नाय.'
'पण का आजोबा? असं काय आहे तिथं? मला तिथे फोटो काढायचे आहेत.' अनिलने विचारलं
'झपाटलेला वाडा हाय त्यो'
'काहीही काय आजोबा. असं भूत-बीत काही नसतं'
'शहरातून चार बुकं शिकून आलास मंजी फार अकल आली व्हय रं पोरा तुला. ह्ये डोस्क्यावरले क्येस असंच नाय पांढरं झालेलं. चार-चार बाप्ये बघितलेत म्या स्वत:च्या डोल्यानी. तिथं जाऊन आले नी पार कामातून गेले. असल्या गोष्टींच्या वाटंला जाऊ नये बाबा. ऐक माजं म्हातार्याचं.'
'बरं नाही जात. पण मला सगळं डीटेलवार सांगा बघू. कोणाचं भूत वगैरे. मला मायबोलीवर 'अमानवीय' च्या धाग्यावर टाकता येईल तो किस्सा'
'कसला धागा?'
'जाऊ द्यात ते. तुम्ही मला किस्सा सांगा बघू.'
'अरं कसला किस्सा लेकरा. मोठं नांदतं कुटुंब व्हतं. कसल्याश्या साथीत एकामागनं एक सगळे गेले. तवापास्नं वाडा ओस पडला. कुनीबी जात नव्हतं तिथं. एकदा कुंभाराचा तुक्या गेला. आचरटच ल्हानपनापासनं. काही करू नगो म्हनलं की करायचं. बापानं दाताच्या कन्या केल्या पन गेला येकटा तिथं. म्हनं मी हाळी घालून बगतो ''कुनी हाय कां इथं? असला तर या म्होरं'. नशिब त्याचं, दुसरं काय? परत आला तवा येड्यासारकं करत हुता. आमी वळखलं की हा सांगाती कोनला तरी घिऊन आलाय. आन वर गानं म्हनत हुता.'
'गाणं म्हणत होता? कुठलं?' अनिलने आश्चर्याने विचारलं.
'अरं पोरा, तो नवता म्हनत. त्ये भूत गात हुतं'
'भूत गात होतं? पण कुठलं गाणं आजोबा?'

आजोबांनी ते गाणं सांगितलं तेव्हा ते आपली टांग खेचताहेत की काय अशी अनिलला शंका आली. कोणतं गाणं असेल ते?

उत्तर: देख लो आवाज देकर साथ अपने पाओगे
आओगे तनहा मगर तनहा नही तुम जाओगे

को़डे क्र.: ७/१९

जिथून उच्च दाबाचा वीजप्रवाह वाहत असेल तिथे सहसा 'खतरा' असं लिहिलेलं असतं. किंवा कवटी आणि हाडांचं चित्र असतं. पण आलोक नाथच्या घराबाहेर वीजपुरवठ्याची सोय होती त्यावर चक्क एक गाणं लिहिलं होतं. ओळखा ते गाणं.

क्लू: बच्चे कंपनी, हे तुम्हाला यायला हवं.

को़डे क्र.: ७/२०

बाजारात फोटो काढण्याऐवजी मायबोलीकर जिप्सी एक गाणं गुणगुणत काहीतरी शोधत फिरत होता. ओळखा ते गाणं.

उदयन नाही. जिप्सी मायबोलीवर कशासाठी प्रसिध्द आहे? त्याच्याशी संबंधित एक गोष्ट हरवली आहे त्याची.

नाही माधव. आणखी एक क्लू....हिन्दी चित्रपटात फेमस बाजार कोणता आहे? आता यायला हवं हं.

Pages