..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया, अभ्यास करायाला लागा. प्ले बॅक सुरू व्हायच्या आधीच्या काळातली अशोककुमार, काननबाला, देविकारानी यांच्या गाण्यांवर कोडी येणार आहेत.....लवकरच.....

आणखी कोडी येऊ द्या लोक्स.
आत्ता इथे येउन बघतेय तर सगली कोडी सुटलेली आहेत.

ओहो....पार्टी पुन्हा सुरु झालेली दिसतेय. आपुन भी आयेगा विकेन्डपे मैदानमे. Proud बच्चे लोग हो जाओ तैय्यार......

०७/०१० : नेत्रा तशी एक सर्वसाधारण मुलगी. रूपाने, बुद्धीनेही. शाळेत असताना सगळ्यांचा असतो तसा तिचा प्रसादवर क्रश होता. प्रसाद अर्थातच स्कॉलर बिलर. त्याला काही पत्ता नाही.
नेत्रा के मनके बात मन में ही रह गयी| पुढे ऑप्टोमेट्रीत बी एससी करून ती एका आयकेअर चेन सेंटरमध्ये रुजू झाली. रोजचे रूटिन सुरू झाले. एखादे वर्ष झाले असेल आणि एका दिवशी चक्क प्रसाद तिला डोळ्यांचा नंबर काढायला आलेला दिसला. आपली शाळेच्या वेळपासूनची ओळख दाखवावी एवढेही धारिष्ट्य तिच्यात नव्हते. स्कॉलर लोकांच्या मानाने त्याला चष्मा लागायला उशीरच झाला असे म्हणत ती त्याच्या रीडिंग टेस्ट घेत होती. पण मनातल्या मनात एक गाणे म्हणत होती. कोणते?

मी पण प्रयत्न करून बघतो लोक्स ..

०७/०१० -

किताबे बहोतसी पढी होगी तुमने मगर कोई चहरा क्या तुमने पढा है - चित्रपट बाजीगर??

०७/१२:
मानसी आणि मयुरेश दोघांच लग्न झाल. सासर, माहेर एकाच गावात आणि मानसी आई-वडिलांची एकुलती एक असल्याने त्यांचा तिच्यावर आणि तिचा त्यांच्यावर विशेष जीव. मानसीच्या आईला श्वसनाचा त्रास असल्याने मानसीला आईची नेहमीच काळजी वाटत असे. असच एके दिवशी ऑफिसात असताना मयुरेशला फोन आला की तुमच्या सासुबाईंना श्वासाचा त्रास व्हायला लागल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केल आहे.... मयुरेशचे सासरे कामनिमित्त गावाला गेल्याने त्या घरी एकट्याच होत्या आणि शेजार्‍यांनी त्यांना हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केल... मानसीला आधी कळवल तर ती टेंन्शन घेईल म्हणुन मयुरेशला, मानसीला घेउन येण्यास सांगितल... ते दोघे दवाखान्यात आले तेव्हा डॉक्टर मानसीच्या आईवर उपचार करत होते. मानसी श्वास रोखुन बसली होती.... थोड्या वेळाने डॉक्टरांनी बाहेर येउन सांगितल की मानसीची आई आता आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा मानसीच्या जीवात जीव आला.

आता या सिच्युएशनला अनुसरुन आपली अवस्था मयुरेशला सांगताना मानसी कोणत गाण म्हणेल?

मी आर्या, बरोब्बर

०७/०१० : नेत्रा तशी एक सर्वसाधारण मुलगी. रूपाने, बुद्धीनेही. शाळेत असताना सगळ्यांचा असतो तसा तिचा प्रसादवर क्रश होता. प्रसाद अर्थातच स्कॉलर बिलर. त्याला काही पत्ता नाही.
नेत्रा के मनके बात मन में ही रह गयी| पुढे ऑप्टोमेट्रीत बी एससी करून ती एका आयकेअर चेन सेंटरमध्ये रुजू झाली. रोजचे रूटिन सुरू झाले. एखादे वर्ष झाले असेल आणि एका दिवशी चक्क प्रसाद तिला डोळ्यांचा नंबर काढायला आलेला दिसला. आपली शाळेच्या वेळपासूनची ओळख दाखवावी एवढेही धारिष्ट्य तिच्यात नव्हते. स्कॉलर लोकांच्या मानाने त्याला चष्मा लागायला उशीरच झाला असे म्हणत ती त्याच्या रीडिंग टेस्ट घेत होती. पण मनातल्या मनात एक गाणे म्हणत होती. कोणते?

उत्तर : एबीसीडी छोडो नैनों से नैना जोडो

तुम्हाला एक भुना भुट्टा

माझी बहुतेक कोडी PG rating ची आहेत. घाबरु नका. ह्याचा अर्थ गोल्डन एरातली गाणी माहित असलेल्यांना येतील.

कोडं ०७/१४:

इच्छाधारी नागाने एकदाच तिच्याकडे पाहिलं. 'मेरी मौतका बदला लेना' तो कसाबसा म्हणाला आणि त्याने प्राण सोडला.
इच्छाधारी नागिणीने त्याच्याकडे पाहिलं. तो गेलाय ह्यावर तिचा विश्वासच बसेना. पण तिने इच्छाधारी नागांवरचे अनेक हिंदी चित्रपट पाहिले होते. त्यामुळे आपला नवरा मेलाय आणि आता आपल्याला त्याच्या डोळ्यात त्याच्या मारेकऱ्याची तस्वीर पहायला हवी हे ती जाणून होती. डोळ्याचा मस्करा खराब होणार नाही इतपतच रडून तिने काजळ पसरणार नाही ह्याची काळजी घेत डोळे पुसले. आणि नवऱ्याच्या डोळ्यात पाहिलं.
पण त्याच्या डोळ्यात तिने जे पाहिलं त्याने तिच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. त्याच्या डोळ्यात छबी होती ती एका रुबाबदार तरुणाची - उंचापुरा, सावळाच पण तजेलदार कांतीचा, अतिशय देखणा. नागीण मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पहात राहिली. एव्हढा देखणा तरुण अख्ख्या इच्छाधारी नाग जमातीत मण्याच्या उजेडात शोधूनदेखील सापडला नसता.

तो कोण आहे, कुठे असतो ह्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. पण त्याला शोधणं तिला भाग होतं. कारण बदला-बिदला सगळं विसरून ती त्याच्यावर लट्टू झाली होती.
अनेक हिंदी चित्रपट पाहिले असल्याने ह्या सिचुएशनला साजेसं गाणं तिला लगेच मिळालं. तुम्हाला मिळतंय का बघा बरं.

कोडं ०७/१५:

"I don't understand these people. They say the deal is on but are not willing to sign the agreement without Mr. Jiang being present here.' Naomi Brooks said in frustration.
'Have you told them that Mr. Jiang has vested all the necessary powers in you?' her associate Sam asked quietly.

'Of course I did Sammy. This is not the first time I am making a deal on behalf of Mr. Jiang in a foreign country. You know that' Naomi started pacing the room.
Sam kept quiet. He knew better than to interrupt Naomi again. Best to let her think through all this, he thought.

'I think we need to inform Mr. Jiang. I don't want to sit here cooling my heals' Naomi said as she reached for the phone, only to find that the line was dead.
'You got to be kidding me. Sophie? Sophie?'

Sophie, her personal secretary, came running into the room.
'Sophie? What's wrong with our phone network?' Naomi demanded at once.
'Madam, I was on my way to inform you. There is a major outage. I was just speaking to the utilities people. The lines will be down for at least a week now.'

'What? This cannot be. How are we going to contact Mr. Jiang now?'
'I am sorry madam.'
'You can go Sophie. Just talk to those people again and see if the process can be speeded up' Naomi said. When Sophie left, she turned to Sam 'What now?'.

'You can always try sending a letter.' he suggested.
Naomi looked at him in astonishment for a few seconds. Then she must have realized that there was really no other way out.
'You are right Sammy. Let me write to him and tell him that we have a deal but no agreement unless he comes down himself'.

Naomi आणि मिस्टर जियांग दोघांना हिंदी येत असतं तर तिने पत्राची सुरुवात कोणत्या गाण्याने केली असती?

कोडं ०७/१३:

सुब्रतो रायच्या लग्नात त्याच्या बायकोने उखाणा घेताना कुठलं गाणं म्हटलं असेल?

उत्तरः
हमे तुम मिल गये हमदम सहारा हो तो ऐसा हो
जिधर देखूँ उधर तुम हो नज़ारा हो तो ऐसा हो

मी_आर्या, तुला जपानची ऑल एक्सपेन्स पेड हॉलिडे ट्रीप बक्षीस Happy

कोडं ०७/१६:

'अरं बाबा, किती येळा समजावून सांगायाचं तुला. नदीपल्याडल्या त्या वाड्यात जायाचं नाय.'
'पण का आजोबा? असं काय आहे तिथं? मला तिथे फोटो काढायचे आहेत.' अनिलने विचारलं
'झपाटलेला वाडा हाय त्यो'
'काहीही काय आजोबा. असं भूत-बीत काही नसतं'
'शहरातून चार बुकं शिकून आलास मंजी फार अकल आली व्हय रं पोरा तुला. ह्ये डोस्क्यावरले क्येस असंच नाय पांढरं झालेलं. चार-चार बाप्ये बघितलेत म्या स्वत:च्या डोल्यानी. तिथं जाऊन आले नी पार कामातून गेले. असल्या गोष्टींच्या वाटंला जाऊ नये बाबा. ऐक माजं म्हातार्याचं.'
'बरं नाही जात. पण मला सगळं डीटेलवार सांगा बघू. कोणाचं भूत वगैरे. मला मायबोलीवर 'अमानवीय' च्या धाग्यावर टाकता येईल तो किस्सा'
'कसला धागा?'
'जाऊ द्यात ते. तुम्ही मला किस्सा सांगा बघू.'
'अरं कसला किस्सा लेकरा. मोठं नांदतं कुटुंब व्हतं. कसल्याश्या साथीत एकामागनं एक सगळे गेले. तवापास्नं वाडा ओस पडला. कुनीबी जात नव्हतं तिथं. एकदा कुंभाराचा तुक्या गेला. आचरटच ल्हानपनापासनं. काही करू नगो म्हनलं की करायचं. बापानं दाताच्या कन्या केल्या पन गेला येकटा तिथं. म्हनं मी हाळी घालून बगतो ''कुनी हाय कां इथं? असला तर या म्होरं'. नशिब त्याचं, दुसरं काय? परत आला तवा येड्यासारकं करत हुता. आमी वळखलं की हा सांगाती कोनला तरी घिऊन आलाय. आन वर गानं म्हनत हुता.'
'गाणं म्हणत होता? कुठलं?' अनिलने आश्चर्याने विचारलं.
'अरं पोरा, तो नवता म्हनत. त्ये भूत गात हुतं'
'भूत गात होतं? पण कुठलं गाणं आजोबा?'

आजोबांनी ते गाणं सांगितलं तेव्हा ते आपली टांग खेचताहेत की काय अशी अनिलला शंका आली. कोणतं गाणं असेल ते?

Pages