गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर, झकासराव.

अशा तर्‍हेने आपले पहिले विजेते आहेत - झकासराव. त्यांना बक्षिस म्हणून मिळत आहे :

आणि मिलन सुपारी ची दोन पाकिटं (ही का ते ओळखा)

कोडं क्र. २ : स्वप्ना_राज --> झकासराव

टायटन च्या शोरूम मध्ये मित्राची आतुरतेने वाट बघत असलेली तरुणी काय गाणं म्हणेल?

उत्तर:

घडी घडी मोरा दिल धडके
हाय धडके, क्युं धडके

मधुमती (१९५८)
http://en.wikipedia.org/wiki/Madhumati
http://www.youtube.com/watch?v=D04wWITpWaY

कोडं १ :

एक राधा एक मीरा, दोनोंने श्यामको चाहा
अंतर क्या दोनोंकी चाह मे बोलो
एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी

शाब्बास केश्वे. बरोबर उत्तर.

कोडे क्र. १ च्या विजेत्या आहेत के अश्विनी.

त्यांना बक्षिस म्हणून मिळत आहे :

आणि एक फूटपट्टी (का ते ओळखा.)

कोडं क्र. १ : जिप्सी --> अश्विनी के

उत्तर :

इक राधा इक मीरा दोनो ने श्याम को चाहा
अंतर क्या दोनो के चाह मै बोलो
एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी

राम तेरी गंगा मैली (१९८५)
http://en.wikipedia.org/wiki/Ram_Teri_Ganga_Maili
http://www.youtube.com/watch?v=tcuWwBKWy0U

के अश्विनीने उत्तर लिहुन पण मला लिन्क नाही लागलेली.
हे एलियनच गाणं असेल म्हणुन मी ते सोडुन दुसरं कोडं घेतलं. Proud

धन्यवाद मामी.

सकाळी सकाळी मी किती मठ्ठ आहे असं फीलिंग आणल्याबद्दल निषेध Proud

त्या अगम्य आकड्यांतून जर असं काही गाणं कुणाला दिसणार असेल तर साष्टांग!!

अरे वा वा! मस्त आहे बक्षिस Happy धन्यवाद.

अर्रे, ते n म्हणजे नोड आणि u म्हणजे यूजर. त्या आकड्यांवरुन ते नोड्स आणि युजर शोधलं तर लगेच कळलं.

फुटपट्टीच्या ऐवजी टेप द्यायचीस ना>> पण भजी सोडुन फुटपट्टी कशाला बघायची म्हणतो मी.. Proud

पहिल्या कोड्याची काळी चौकट आणि आशूचं उत्तर यांचा संबंधच नाही कळून र्‍हायला मला...
मामी कोडं नं एक डिकोड कसं करायचं??
त्या अगम्य आकड्यांतून जर असं काही गाणं कुणाला दिसणार असेल तर साष्टांग!!

>>>> मायबोलीवर पडिक असणार्‍यांनाही या कोड्यात कसले नंबर आहेत ते कळू नये याचा णिषेद! Happy

नाही गं केश्वे. मीरा आणि राधातलं अंतर मोजायला दिलेय ती.

तू कांदाभजी खाऊन परत इथे मॅरॅथॉन धावायला ये की वजन वाढणार नाही.

कोडं क्र. ५ -
<काहीतरी काहीतरी> धडकनोंतक तुम्हारी नजर है ... .... <काहीतरी काहीतरी> अलग है ओ रसिया रे.....<काहीतरी काहीतरी> आज है

.... असं काहीतरी वाटतंय.....

अशी स्पर्धा आहे होय! मग झाले माझे कल्याण.:अरेरे::फिदी: मला गाणी भरपूर माहीत आहेत, पण कोडे सोडवता येणार नाह्ही ना.

असो स्पर्धकाना शुभेच्छा आणी विजेत्यान्चे अभिनन्दन.

कोडं क्र. ६

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा, (प्रधानजी चावट आहेत)
नंदलाला,
नंदलाला रेऽऽ

श्रमातेला गाणं ओळखायला बंदी नाही तर मलाच काय म्हणून?

५. ओ पवनवेग से उडनेवाले घोडे
तुझपे सवार है जो
मेरा सुहाग है वो
रखियो रे आज उनकी लाज हो

Pages