मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
गाओ, अर्थात गाणे ओळखा!.
तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.
बक्षिसं तर आहेतच अर्थात.....
तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!
- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी
**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.
**********************************************************************************************************
सर्व भाग घेणार्यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!
गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.
कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).
कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.
बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.
आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)
आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
कोडं क्र. ३३ सोडवल्याबद्दल
कोडं क्र. ३३ सोडवल्याबद्दल श्रद्धाला हे बक्षिस :
आणि एक घागर.
कोडं क्र. ३३ : जिप्सी -->
कोडं क्र. ३३ : जिप्सी --> श्रद्धा
अ_ _
_ _ न_
जी
_ _
_म__
_ न _
_ नी
_ _
म_ _
ल_
_ग
_
उत्तर :
अबके सावनमें जी डरे
रिमझिम तनपे पानी गिरे
मनमें लगे आगसी
जैसे को तैसा (१९७३)
http://en.wikipedia.org/wiki/Jaise_Ko_Taisa
http://www.youtube.com/watch?v=qkVFya13Fzg
२३: हुस्न वाले तेरा जवाब
२३:
हुस्न वाले तेरा जवाब नहीं
कोई तुझसा नहीं हज़ारों में
मेरे मेहबूब ?
मेरे मेहबूब ?
करेक्ट झिलमिल! कोडं क्र. २३
करेक्ट झिलमिल!
कोडं क्र. २३ सोडवल्याबद्दल झिलमिलला हे बक्षिस :
आणि स्टँप-पॅड
कोडं क्र. २३ : स्वप्ना_राज
कोडं क्र. २३ : स्वप्ना_राज --> झिलमिल
'उह ला ला ला' Computer डिव्हिजनच्या वर्गात कधी नव्हे ती "हलचल" झाली. कारणच तसं होतं - वर्गात नवी आलेली मुलगी सोनया. लांबसडक काळेभोर केस, टपोरे डोळे, हसताना गालांवर पडणाऱ्या खळ्या. तमाम मुलांची विकेट कधीच पडली होती - Computer च नव्हे तर Electronics, Electrical, Civil, Telecommunications, Production आणि Mechanical सगळ्याच डिव्हिजनमधली मुलं काही ना काही कारण काढून तिच्याशी बोलायला बघू लागली. अश्यात एक दिवस कॉलेजच्या canteen मध्ये मुलींची गप्पांची मैफल रंगली. कसा कोण जाणे पण विषय येऊन थांबला तो कॉलेजमधला सगळ्यात handsome मुलगा कोण ह्यावर. हिच्या मते हा, तिच्या मते तो असं करत करत ५ नावांची shortlist झाली.
'ए, एक आयडीया आहे. सगळ्या कॉलेजमधल्या मुलींचं मत घेऊ यात की ह्यावर.' संध्या म्हणाली. आणि सगळ्यांनी तिचं म्हणणं उचलून धरलं. बघता बघता ही बातमी कॉलेजभर पसरली. shortlist च्या photocopies निघाल्या. Atrium मध्ये मतदान सुरु झालं. ही बातमी मुलांच्यात पसरायला वेळ लागला नाही. canteen मध्ये बसून कोण जिंकणार ह्यावर पैजा लागायला लागल्या. एव्हढ्यात कोणीतरी बातमी आणली - सोनयाने आपलं मत दिलंच नाहीये. बाजूला बसून नुसती बघतेय.
झालं! shortlist मध्ये ज्यांची नावं होती ते पाचही जण हवालदिल झाले. सोनयाचं मत तर महत्त्वाचं. धीरज उठला. ही स्पर्धा आपणच जिंकणार हा विश्वास त्याला होता. तो Atrium मध्ये गेला तेव्हा खरंच सोनया एका बाजूला बसून सगळी मजा पहात होती. त्याने shortlist ची एक रिकामी photocopy उचलली आणि सोनयाजवळ जाऊन एका हिंदी गाण्याची पहिली ओळ म्हटली. ओळखा बरं कुठली.
क्लू :
१: ६० च्या दशकाच्या सुरुवातीचा चित्रपट
२: ह्यात एक नव्हे तर २-२ कुमार आहेत.
३. सुंदर सोनियानं काही उत्तर लिहिलं नाही.
उत्तर:
हुस्नवाले तेरा जवाब नही
घराना (१९६१)
http://en.wikipedia.org/wiki/Gharana_%281961_film%29
http://www.youtube.com/watch?v=1Pn81ApIsfs
देवा! काय लॉजिक?! हा माझा
देवा! काय लॉजिक?! हा माझा चहाचा कप नाही हेच खरं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नवी कोडी आली आहेत ....
नवी कोडी आली आहेत ....
देवा! काय लॉजिक?! हा माझा
देवा! काय लॉजिक?! हा माझा चहाचा कप नाही हेच खरं.
>>> ट्राय करत रहा बाई. लवकरच तुमचंही सरळ लॉजिक चांगलंच ट्विस्टेड होईल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
३८. आलं आलं आलं!! जब दिल ही
३८. आलं आलं आलं!!
जब दिल ही टूट गया
हम GK क्या करेंगे?
३९. बदन पे सितारे लपेटे हुए?
३९: बदन पे सितारे लपेटे हुए ओ
३९:
बदन पे सितारे लपेटे हुए
ओ जान-ए-तम्न्ना किधर जा रहि हो
येस्स. गुड जॉब बाई!!! कोडं
येस्स. गुड जॉब बाई!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ३८ सोडवल्याबद्दल स्वाती_आंबोळे यांना हे बक्षिस :
आणि दोरीच्या उड्या ( किंवा उड्यांची दोरी)
कोडं क्र. ३९ चं उत्तर बरोबर
कोडं क्र. ३९ चं उत्तर बरोबर दिल्याबद्दल स्वाती_आंबोळे आणि झिलमिल दोघींनाही हे बक्षिस :
आणि एक एक चमचमत्या टिकल्यांचं पाकिट.
कोडं क्र. ३८ : मामी -->
कोडं क्र. ३८ : मामी --> स्वाती_आंबोळे
डेरीको ब्रायनचा क्विझ प्रोग्रॅम खूप हिट झाला होता. त्यानेही त्या प्रोग्रॅमकरता प्रचंड मेहनत घेतली होती. प्रोग्रॅमचा व्याप इतका वाढला होता की शेवटी त्यानं तो सगळा पसारा एक नविन बंगला बांधून त्यात हलवला. त्या बंगल्यातच एक कायमचा भव्य सेटही त्यानं उभारून घेतला होता. तो बंगला म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. म्हणूनच तर सदैव मेंदुला खुराक निर्माण करणार्या डेरीकोनं बंगल्याचं नाव मात्र ठेवलं होतं - My Heart.
पण हाय रे दैवा! एक दिवस मुसळधार पावसात तो बंगला खचलाच. खचला कसला कोसळलाच. या आपत्तीचा डेरीकोच्या मनावर फार आघात झाला. त्याने क्विझ प्रोग्रॅम बंदच करून टाकला आणि कोणी त्याला इतका चांगला चालणारा प्रोग्रॅम बंद का केला असं विचारलं तर तो त्यांना प्रतिप्रश्न करत असे .....
उत्तर :
जब दिल ही टूट गया
हम GK क्या करेंगे?
शहाजहान (१९४६)
http://www.imdb.com/title/tt0038931/
http://www.youtube.com/watch?v=nQQPV-DtY3s
कोडं क्र. ३९ : स्वप्ना_राज
कोडं क्र. ३९ : स्वप्ना_राज --> स्वाती_आंबोळे आणि झिलमिल
Fashion week मध्ये प्रत्येक मॉडेल ramp walk करायला आली की तिच्या ड्रेसशी सुसंगत असं हिंदी गाणं वाजवलं जात होतं. Swarovski Crystals लावलेली साडी नेसून एक मॉडेल आली तेव्हा कुठलं गाणं वाजलं असेल?
उत्तर:
बदन पे सितारे लपेटे हुये
ओ जाने तमन्ना किधर जा रही हो
प्रिन्स (१९६९)
http://en.wikipedia.org/wiki/Prince_%281969_film%29
http://www.youtube.com/watch?v=j0xCJFicSjg
कोडं क्र. ३७ सुन्या सुन्या
कोडं क्र. ३७
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत मी गात आहे
कोडं क्र. ३७ सोडवल्याबद्दल
कोडं क्र. ३७ सोडवल्याबद्दल श्रद्धाला :
आणि झांजा.
कोडं क्र. ३७ : जिप्सी -->
कोडं क्र. ३७ : जिप्सी --> श्रद्धा
उत्तर :
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांदरात आहे
उंबरठा (१९८२)
http://en.wikipedia.org/wiki/Umbartha
http://www.youtube.com/watch?v=-VkzoYNp3GI
सर्व कोडी वर टाकली आहेत. आता
सर्व कोडी वर टाकली आहेत. आता मी झोपायला जाते. उत्तरं देऊन ठेवा.
कोडं क्र. ४३ ये शाम मस्तानी
कोडं क्र. ४३
ये शाम मस्तानी मदहोश किए जाय
मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिये जाय
४४:
सोलह बरस की बाली उमर को सलाम
ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम
४४: सोलह बरस की बाली उमर को
४४:
सोलह बरस की बाली उमर को सलाम
ऐ प्यार तेरी पहली नज़र को सलाम
४१: ये चांद सा रोशन चेहरा,
४१:
ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
४२ : हमने तुमको प्यार किया है
४२ :
हमने तुमको प्यार किया है जितना
कौन (WHO) करेगा इतना?
४५: उनसे मिली॑ नज़र के मेरे
४५:
उनसे मिली॑ नज़र के मेरे होश उड गए?
४५ : येह आंखे देखकर हम सारी
४५ : येह आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है पण होउ शकते.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अमित देशपांडे असल्यामूळे येह काली काली आंखे, येह गोरे गोरे गाल लावायचे का ?
२८: रोते हुए आते हैं सब,
२८:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा
वो मुक़द्दर का सिकन्दर जानेमन कहलाएगा
?
सुप्रभात मंडळी! कोडं
सुप्रभात मंडळी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ४३ सोडवलं आहे श्रध्दानं. बक्षिसांचा स्टॉक घेऊन जिप्सीभाऊ लवकरच येतील तोवर दम धरा.
कोडं क्र ४३ : जिप्सी -->
कोडं क्र ४३ : जिप्सी --> श्रद्धा
उत्तर :
ये शाम मस्तानी मदहोश किये जाए
मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए
कटी पतंग (१९७०)
http://en.wikipedia.org/wiki/Kati_Patang
http://www.youtube.com/watch?v=_sZg4EUB3IM
कोडं क्र ४४ करता बक्षिस
कोडं क्र ४४ करता बक्षिस विभागून देण्यात येत आहे - श्रद्धा आणि झिलमिलला.
कोडं क्र ४४ : जिप्सी -->
कोडं क्र ४४ : जिप्सी --> श्रद्धा आणि झिलमिल
उत्तरः
सोलह बरस कि बाली उमर को सलाम
ए प्यार तेरी पहली नजर को सलाम
एक दुजे के लिए (१९८१)
http://en.wikipedia.org/wiki/Ek_Duuje_Ke_Liye
http://www.youtube.com/watch?v=322FOeeonf4
Pages