मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
गाओ, अर्थात गाणे ओळखा!.
तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.
बक्षिसं तर आहेतच अर्थात.....
तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!
- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी
**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.
**********************************************************************************************************
सर्व भाग घेणार्यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!
गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.
कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).
कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.
बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.
आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)
आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
२६: मानो तो मैं गंगा माँ हूँ,
२६:
मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी
जो स्वर्ग ने दी धरती को, मैं हूँ प्यार की वही निशानी
>>> नाही झिलमिल.
योगिता, ते कोडं सोडवलं गेलं आहे.
कोडं क्र. ३५ के (शवराव) 'आजा'
कोडं क्र. ३५
के (शवराव) 'आजा' तेरी याद आई
कोडं क्र. ३५ श्रद्धानं
कोडं क्र. ३५ श्रद्धानं सोडवल्याबद्दल तिला :
आणि केक.
कोडं क्र. ३५ : मामी -->
कोडं क्र. ३५ : मामी --> श्रद्धा
केशवराव आणि भास्करराव या आपल्या दोन्ही आजोबांवर पिंकीचं भारी प्रेम. दोन्ही आजोबाही तिचे खूप लाड करत. योगायोगानं त्या दोघांचे वाढदिवसही पिंकीच्या वाढदिवसाच्या दिवशी होते. त्यामुळे त्यांचा आनंद त्रिगुणीत व्हायचा. तिघेही मिळून त्या दिवशी एकत्र केक कापत आणि वाढदिवस साजरा करत.
पण या वर्षी पिंकीच्या वाढदिवसाच्या महिनाभर आधीच केशवरावांनी आपली इहलोकाची यात्रा अचानक आटोपती घेतली. पिंकी अतिशय दु:खात होती.
तरीही दरवर्षीप्रमाणे नातीचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून भास्करराव केक वगैरे घेऊन आले. नेहमीच्या परंपरेत खंड पडू नये म्हणून त्यांनी केशवरावांचा फोटो शेजारच्या खुर्चीत ठेवला. त्यांनी आणि पिंकीनं सुरी घेऊन केक कापण्यास सुरवात केली मात्र ...... पिंकी ढसढसा रडू लागली आणि गाणं म्हणू लागली......
क्लू :
१. याला खरंतर क्लूची गरज नाही. नाव आणि नातं.
उत्तर :
के आजा तेरी याद आयी
(के = केशवराव, आजा = आजोबा)
चरस (१९७६)
http://en.wikipedia.org/wiki/Charas_(film)
http://www.youtube.com/watch?v=zcEqXCn4bic
श्रद्धा _/\_
श्रद्धा _/\_
२६ ओ तौबा तौबा क्या होगा होता
२६ ओ तौबा तौबा क्या होगा होता है जो हो जाने दो
आनेवाला आएगा जानेवाला जाएगा तुम न मानो तो जाने दो
वावा... मानो या ना मानो..
वावा...
मानो या ना मानो.. सहीच!
कोडं क्र २६ सोडवण्याचा मान
कोडं क्र २६ सोडवण्याचा मान पटकावला आहे भरत मयेकरांनी. आणि त्याबद्द्ल त्यांना मिळत आहे :
आणि साईबाबांची विभुती
कोडं क्र. २६ : स्वप्ना_ राज
कोडं क्र. २६ : स्वप्ना_ राज --> भरत मयेकर
'पक्या, लेका, हीच जागा सापडली होय तुला आपल्या पिकनिकसाठी. आयला, रामसे बंधुंच्या सिनेमाला परफेक्ट लोकेशन आहे अगदी.' जमिनीवर पडलेली फळकुटं बाजूला करत मोहित करवादला.
'बस काय आता? काही झालं की तुम्ही लोक पक्याच्या नावाने शंख करा. हटके लोकेशन पाहिजे म्हणून तुम्हीच बोम्बलत होता ना? घ्या आता हटके लोकेशन. तुम्ही साले एव्हढे भेदरट असाल हे मला काय माहीत?'
'भेदरट कोणाला म्हणतो रे? मी कोणाच्या बापाला नाही घाबरत.' चेतनने इन्सल्ट अगदी 'पर्सनली' घेतला.
'चेत्या, चिडू नकोस ना यार. ए, चला रे. उगाच राडा करू नका. मला जाम भूक लागलेय. सगळं साफ करून आधी जेवायला बसू.' तपनने सामोपचाराने घेतलं.
मग मात्र चौघं त्या पडक्या घराची जागा साफ करायच्या मागे लागले. आता जेवायला बसणार तेव्हढ्यात एक माणूस तुटलेल्या दारातून अचानक आत आला.
'कोण तुम्ही? कशाला आलाय इथे? निघून जा इथून.' त्याचं बोलणं ऐकून सगळे दचकले.
'सॉरी, तुमच्या मालकीचं घर आहे का हे काका? आम्ही परवानगी काढली नाही. माफ करा' मोहित म्हणाला.
'माझ्या मालकीचं? होतं कधीकाळी. पण त्याला आता फार वर्ष झाली पोरा.' तो माणूस उदास चेहेर्याने म्हणाला.
'आम्ही पिकनिकला आलो होतो. आजची रात्र काढून उद्या सकाळी परत जाऊ म्हणतोय. पक्याने खडा टाकून पाहिला. हे घर कोणाच्या मालकीचं असेल असं त्याला वाटलंच नव्हतं.
'रात्री इथे रहाणार तुम्ही पोरं? नाही नाही. जेवण करा आणि इथून बाहेर पडा. सूर्यास्त व्हायच्या आधी इथनं जा. दूर जा.'
'पण का? इथे चोराबिराची भीती आहे का? आमच्याकडे चोरण्यासारखं काही नाही काका' मोहित पुन्हा म्हणाला.
'चोर? अरे ते परवडले...' थोडा वेळ तो माणूस शून्यात पहात राहिला आणि मग एकदम भानावर येत म्हणाला 'नाही नाही. सूर्यास्त झाला की तो येणारच.'
'तो? कोण तो?' चेतनची एव्हाना टरकायला लागली होती. मनातल्या मनात त्याने पक्याला शिव्यांची लाखोली वाहिली.
'तो येईल. आणि तुमच्यातल्या एकाला आपल्यासोबत नेईल.' तो माणूस आता स्वत:शीच बोलत होता जणू.
'असा कसा नेईल? मोगलाई आहे काय? आम्ही काय बघत बसणार असं वाटलं तुम्हाला?' तपनने वैतागून विचारलं. समोर जेवण वाढलंय आणि हा माणूस सुखाने जेवायला देत नाहिये म्हणजे काय. आणि हे बाकीचे मूर्ख त्याला प्रश्न विचारत बसलेत.
'तो सगळ्यांनाच दिसणार नाही. त्याला ज्याला न्यायचंय त्यालाच तो दिसणार' तो माणूस गूढपणे म्हणाला.
आता चेतनची खात्री पटली की हा माणूस भूताबद्द्ल बोलतोय. 'पक्या, साल्या, काय आफत आणलीस ही उगाच. तरी म्हणत होतो प्रतापगडावर जाऊ या. तिथे चार माणूसयोनीतले जीव दिसले असते.'
'ए गप् ए चेत्या, भूत-बीत काही नसतं. एव्हढे गड फिरलोय मी. हा माणूस टोप्या घालतोय आणि तुम्ही ऐकताय. ओ काका, तुम्हाला काही खायचंय का? तर ह्या इथे. नाहीतर मुकाट रस्ता धरा कसे. तो कोण यायचाय ना तो येऊ देत, बघू आम्ही काय करायचं ते.' पक्या निर्वाणीचं बोलला.
'मला वाटलंच होतं की तुम्ही शहरी लोक ह्यावर विश्वास ठेवणार नाही. भोगा आपल्या कर्माची फळं' असं म्हणत तो माणूस वळला आणि पायऱ्या उतरून निघून गेला. एक-दोन मिनिटानंतर दुरून मात्र एका गाण्याची लकेर ऐकू आली. कोणतं असेल ते गाणं?
क्लू:
१. एक सुपरडुपर स्टार आणि दाक्षिणात्य हिरॉईन
२. या सिनेमादरम्यान त्यांचं अफेअर सुरू होतं.
३. पूर्वी दूरदर्शनवर एक अतर्क्य घटनांवर आधारीत एक कार्यक्रम होता. त्याच्या शीर्षकातील एक शब्द या गाण्यात आहे. (सिरीयल : मानो या ना मानो)
उत्तर:
तौबा तौबा क्या होगा, होना है जो
वो होगा, होता है जो हो जाने दो,
आनेवाला आयेगा, जानेवाला जायेगा,
तुम ना मानो तो जाने दो
मिस्टर नटवरलाल (१९७९)
http://en.wikipedia.org/wiki/Mr._Natwarlal
http://www.youtube.com/watch?v=f4o_ol6z2Sc
आणि साईबाबांची विभुती >>>>>
आणि साईबाबांची विभुती >>>>>:हहगलो:
मामी, आदर्श संयोजन कसे असते
मामी, आदर्श संयोजन कसे असते त्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल _______/\_______
मॅरॅथॉनमध्ये तुम्हीही स्पर्धकांबरोबर आणि मागेपुढे धावून धावून दमला असाल. किती मैल पळालात?
कोड्यांबद्दल स्वप्ना, जिप्सी, माधव यांचेही आभार.
बक्षीसांसाठी जिप्सीचे विशेष आभार.
माझ्यासाठी काही कोडी ठेवल्याबद्दल श्रद्धा यांचे आभार.
अजून एक राहिलंय. इतक्यात दम
अजून एक राहिलंय. इतक्यात दम टाकू नका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्यासाठी काही कोडी
माझ्यासाठी काही कोडी ठेवल्याबद्दल श्रद्धा यांचे आभार.<<<<<
बाकी पोस्टला +१.
शेवटच्याला क्लू द्याच आता मामी.
दिलाय तो क्लूच आहे.
दिलाय तो क्लूच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र ४५ उनसे मिली नजर के
कोडं क्र ४५
उनसे मिली नजर के मेरे होश उड गये
हे आहे का?
क्लू मध्ये एक महत्त्वाचा शब्द
क्लू मध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे.
तुम्ही सगळेच ग्रेट
तुम्ही सगळेच ग्रेट आहत..
एकतरी याव पामाराला..पण नाही...
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच गाणं आहे.
नाही. जपानशी संबंधित सिनेमा
नाही. जपानशी संबंधित सिनेमा ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र ४५: अखियों से कर गया
कोडं क्र ४५:
अखियों से कर गया अजीब इशारे
कोइ मतवाला आया मेरे द्वारे
लव इन टोकियो
??
कोई मतवाला आया मेरे द्वारे
कोई मतवाला आया मेरे द्वारे
सायोनारा (२) वादा निभाऊंगी
सायोनारा (२) वादा निभाऊंगी सायोनारा
इठलाती और बलखाती कल फिर आऊंगी सायोनारा आहे का ?
कोडं क्र. ४५ सोडवलं आहे इश्श
कोडं क्र. ४५ सोडवलं आहे इश्श यांनी. त्याबद्द्ल त्यांना मिळत आहे :
आणि नेत्रांजन.
कोडं क्र ४५ : माधव -->
कोडं क्र ४५ : माधव --> इश्श
रेखा चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची निवडणूक जिंकली. सर्वात कमी वयाची मुख्यमंत्री होती ती. तिने सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी अमित देशपांडे तिच्याकडे तक्रार घेऊन आला.
"मॅडम, अभिनंदन! बर्याच काळानंतर तुमच्या सारखी सुसंकृत व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. माझे मत सार्थकी लागले म्हणायचे. एक तक्रार आहे. आमच्या गावाभोवती गर्द रान आहे त्यात खूप दुर्मीळ झाडे आहेत. पण हे बिल्डर्स लोक नवीन इमारती बांधण्या करता बेसुमार जंगल तोड करत आहेत. तुम्ही प्लीज काही तरी करा ते रान वाचवायला"
पण रेखाचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. ती त्याच्या काळ्याभोर डोळ्यात केंव्हाच हरवून गेली होती. तिने नुसताच यांत्रीकपणे त्याला होकार दिला आणि अमीत निघून गेला. रेखाने पुढचे सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ती फक्त अमितचाच विचार करत बसून राहिली. अचानक कार्यक्रम रद्द केल्याने तिची काळजी वाचून तिचे सचीव तिच्या कार्यालयात आले - तिची चौकशी करायला. त्यांच्या चौकशीला तिने गाण्यातूनच उत्तर दिले.
उत्तरः
कोई मतवाला आया मेरे द्वारे
अखियोंसे कर गया अजब इशारे
लव इन टोकियो (१९६६)
http://en.wikipedia.org/wiki/Love_in_Tokyo
http://www.youtube.com/watch?v=N3BOEAmC1pY
क्लू :
१. हे कमॉन ...... याला तर अजिबातच क्लूची गरज नाहीये असं माझं मत आहे.
२. जपानशी संबंधित सिनेमा.
संपली का पण कोडी? हाप
संपली का पण कोडी? हाप सेंच्युरी तरी करायची की वो!!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असो. पण खूप मजा आली.
धन्यवाद मामी मजा आली.
धन्यवाद मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा आली.
मामी, भाग ७ कधी?
मामी, भाग ७ कधी?
हा भाग इथेच संपेल. मामी, भाग
हा भाग इथेच संपेल.
मामी, भाग ७ कधी? >>> थोड्या वेळाने सातवा भाग काढते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेडर अपडेट केलं आहे.
हेडर अपडेट केलं आहे.
हायला मी १६ कोडी सोडवली??????
हायला मी १६ कोडी सोडवली??????
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages