[का.का.क] लेखकु

Submitted by चायवाला on 17 December, 2013 - 00:33

कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे

आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी

ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि

आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो

वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी

ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे

दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला

इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे

नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||

--------------------------------------------------------------------------------------------------------
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले.
ही काहीच्या काही कविता आहे. त्याच अर्थाने घ्यावी.
कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आले आमटीत पाणी वाढवायला Wink

माबोवरी लिहू, फेबुवरी पोस्टू
प्रतिसाद हे ओढू... लेखकु म्हणे Proud

कृपया पुढच्या पोष्टीत माझे आभार मानावेत. Proud

मला तर कविता पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन टाकावासा वाटतोय.
वाटते अशीच ही कविता तरंगत रहावी Proud Rofl

Pages