कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे
आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि
आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो
वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी
ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे
दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला
इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे
नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||
--------------------------------------------------------------------------------------------------------
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले.
ही काहीच्या काही कविता आहे. त्याच अर्थाने घ्यावी.
कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद वैवकु
धन्यवाद वैवकु
मी आले आमटीत पाणी वाढवायला
मी आले आमटीत पाणी वाढवायला
माबोवरी लिहू, फेबुवरी पोस्टू
प्रतिसाद हे ओढू... लेखकु म्हणे
कृपया पुढच्या पोष्टीत माझे आभार मानावेत.
दक्षिणा, तुमचेही आभार
दक्षिणा, तुमचेही आभार
दक्षिणा यांचे आभार
दक्षिणा यांचे आभार मानल्याबद्दल गपिष्ठ यांचे धन्यवाद
(No subject)
आता हे सार उलगडुन सांगु
आता हे सार उलगडुन सांगु पाहे
गप्पिष्ट का बा समाधिस्थ राहे
हे हे
हे हे
मस्त रे. मी कविता वाचलीय, आता
मस्त रे.
मी कविता वाचलीय, आता आभारप्रदर्शन होऊन जौदे.
का कोणास ठाऊक, आज या काव्यावर
का कोणास ठाऊक, आज या काव्यावर पुन्हा एक अभिप्राय द्यावासा वाटला.
मला तर कविता पुन्हा पुन्हा
मला तर कविता पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन टाकावासा वाटतोय.
वाटते अशीच ही कविता तरंगत रहावी
मुक्तेश्वर, बेफिकीर, वर्षा_म,
मुक्तेश्वर, बेफिकीर, वर्षा_म, दक्षिणा या नवीन प्रतिसादकांचे पुन्हा (पुन्हा, पुन्हा) आभार
धागा वर आणल्याबद्दल आणी कविता
धागा वर आणल्याबद्दल आणी कविता वाचता आली त्यासाठी सन्बन्धीताचे आभार.:फिदी:
धागा वर आल्याबद्दल धाग्याचेच
धागा वर आल्याबद्दल धाग्याचेच आभार
भारीये
भारीये
हो, भारीच्चे. धागा परत वर
हो, भारीच्चे. धागा परत वर आणते.:फिदी:
Pages