'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
हे हे.....खरं बाहेर आल्यानंतर
हे हे.....खरं बाहेर आल्यानंतर या सीरियलमध्ये लगीनघाई होणार. आधी उ.का.च्या आजी.-आजोबांचं, आई-बाबांचं म~~~~ग उ.का आणि स्पृ.जो. चं लगीन.
काल धनाने घेतलेला उखाणा,'
काल धनाने घेतलेला उखाणा,' नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू..' एलदुगो मधलाच होता, राधाने घेतेलेला.
मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची
मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची खोटी आई त्याच्याच ऑफिसात काम करते. इशाचं ऑफिस पण वरच्या का खालच्या मजल्यावरच आहे ना? मग या दोघींने एकमेकिंना कधीच पाहिलं नाही?
दक्षुतै, हेच मी आईला
दक्षुतै, हेच मी आईला विचारलेलं.
इथे विचारायचं राहिलं
आणि इशाच्या त्या मैत्रिणीला ही माहित आहे ना त्याची आई?
मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची
मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची खोटी आई त्याच्याच ऑफिसात काम करते. इशाचं ऑफिस पण वरच्या का खालच्या मजल्यावरच आहे ना? मग या दोघींने एकमेकिंना कधीच पाहिलं नाही?>>>मला पन हाच प्रश्न पडलाय.
ती स्पृहाची आई काय अशी डोळे,
ती स्पृहाची आई काय अशी डोळे, भुवया विस्फारुन बोलत असते>>>>>>+१
lonavala episode chi link
lonavala episode chi link kuthe milel?
पहील्या एकदोन भागातली पॉरवर्ड
पहील्या एकदोन भागातली पॉरवर्ड असलेली स्पृहा चक्क उंदराला घाबरते? पटत नाही. की उंदराच्या बहाण्याने उंउंउं.....
बघायला गेल तर आता माझा या
बघायला गेल तर आता माझा या मालिकेतला इंटरेस्ट संपत चालला आहे. पण तरीही पाहते.
बाकी तो शेजारचा म्हातारा नको
बाकी तो शेजारचा म्हातारा नको होता त्यात...त्याने वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आणि आता त्या शोभा खोटेला नवरा असल्यासारखा ऑर्डर्स सोडतोय.
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली जामच बोर आहे +१
कालचा महाएपिसोड वाया घालवला.
कालचा महाएपिसोड वाया घालवला. खरंच सगळं सत्य काय ते सांगायला काय बिघडलं होतं!
प्रज्ञा९ +अनलिमिटेड १
प्रज्ञा९ +अनलिमिटेड १
सत्य सांगितल ना ईशाला?
सत्य सांगितल ना ईशाला?
महाएपिसोड तर वाया घालवलाच आणि
महाएपिसोड तर वाया घालवलाच आणि आपला पण एक तास वाया घालवला मला एपिसोड चालु असताना १० वेळ तरी वाटलं होतं की हे सगळं स्वप्न असणार!
ए हो. पार अॅन्टीक्लायमॅक्स.
ए हो. पार अॅन्टीक्लायमॅक्स. जाम चिडचिड झाली
अॅम्ही अॅमच्या घॅरी
अॅम्ही अॅमच्या घॅरी जेवणॅअॅधी प्रॅथ्रॅना म्हणतो, तुम्ही काय करता? :रागः
दारू पितो.. तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा? गिळायला आयतं मिळालंय ते गिळ ना... नको तिथे संस्कार दाखवायची कसली हौस? तुझी प्रार्थना उंदिर पळवतात का ते एकदा प्रयोग करून पहा म्हणावं
स्पृहा फुल्ली गंडलेले आहे किंवा अति अॅक्टींग तरी करते.
बाकी परवाच्या एपिसोडात ओम्याच्या हातून फोन निसटून पडतो (ति बया तिकडे किंचाळल्यामुळे) तो सिन लई भारी होता... मी खुप हसले.
दक्षिणा अगदी अगदी. स्पृहाचा
दक्षिणा अगदी अगदी. स्पृहाचा तो सीन आणि जनरलच ती वैताग नंबर एक.
मोहन जोशी आणि काके नटून थटून येतात तेव्हाही जाम हसायला आलं. आणि शुभांगी गोखले त्या आजोबांना पुस्तक देवून म्हणते, हे वाचा.. नाही म्हणजे सारखं बोलायची इच्छा होते, हे हातात असलं की बरं.. मस्त बोलली ती
कालचा एपिसोड खरंच फुकट. उगीच हे महाएपिसोड थेरं ठेवतात जाहिरातींकरता.
तुला काय करायच्यात नसत्या
तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा? +१
मागे पण एका एपिसोड मधे ओमच्या आईला घराला रंग लावून घ्या म्हणत होती. ते बघतील ना त्यांच्या घराला कधी रंग लावायचा, लावाय्चा का नाही, तू का सांगतियेस?
दक्षिणा
दक्षिणा
बाकी परवाच्या एपिसोडात
बाकी परवाच्या एपिसोडात ओम्याच्या हातून फोन निसटून पडतो (ति बया तिकडे किंचाळल्यामुळे) तो सिन लई भारी होता<<<< त्यानंतर तो ओम त्याच्या काकाला फोन करतो तो एक सीन मस्त होता.
स्पृहा दिवसेंदिवस सुधरण्याऐवजी बेकार होत चाललीये.एलग्दुगो मधे बरी होती असं वाटतंय आता.
अॅम्ही अॅमच्या घॅरी
अॅम्ही अॅमच्या घॅरी जेवणॅअॅधी प्रॅथ्रॅना म्हणतो, तुम्ही काय करता? :रागः
दारू पितो.. तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा?>>>>>>> दक्षिणेला जाम म्हणजे एक कणही आवडत नाही ना स्पृहा?
पौर्णिमा, एक कणाच्या एक कणही
पौर्णिमा, एक कणाच्या एक कणही आवडत नाही ती स्पृहा मला.
पुण्यात पुरूषोत्तम वगैरेच्या एका पर्वाला मी गेले होते. तो तरूणवर्ग असा काही भारावून गेलेला असतो तशी ती स्पृहा वाटते मला. टिनेजर.
स्पृहा फुल्ली गंडलेले आहे
स्पृहा फुल्ली गंडलेले आहे किंवा अति अॅक्टींग तरी करते.>>>+११
एक अक्खा तास घालवून कालचा एपिसोड पाहिला.... और आखिर में निकला क्या ...बाबाजी का ठुल्लू!!!
दक्षिणा बरं झाल महाएपिसोड
दक्षिणा
बरं झाल महाएपिसोड चुकला ते
चला नाही बघितला ते बरे झाले.
चला नाही बघितला ते बरे झाले. केबलवर प्रेमाची गोष्ट बघितला. रविवार सफल झाला.
मला तर ती स्प्रुहा
मला तर ती स्प्रुहा आज्जीब्बात्त नाह्ही आव्वड्डत्त......एकतर ती बुटकी आणि जाडी आहे...दुसरे ती डोक्यात जाईल इतक्या आगाउ पणे बोलते...कदाचीत ती पुणेरी आहे म्हणुन तिला तसे दाखवताहेत का कोण जाणे..पण मी कामानिमीत्त दोन तीन वेळच पुण्यात गेली आहे आणि काही लोकांशी इंटरॅक्ट पण केलय...पण मला काही पुणेकर खोचड असतात असे वाटले नाही....कदाचीत मी पण तशीच आहे म्हणुन असेल....पण असो....तीला जसं दाखवताहेत ते मुळ्ळीच बरं नाहीये......फार फार आगाउ आहे....वकील दाखवली आहे तेवढी मला स्मार्ट वाटत नाही.....तिच्या ऐवजी दुसरी कोणी अगदी प्रिया बापटही चाल्ली असती....
तीचा ड्रेस्सिंग सेन्स इत्का गबाळा का दाखवलाय???? काय ते कलर, काय ते ड्रेस....कॉर्पोरेट मधे काम करते ही बया ....अगदी ट्राउझर शर्ट नाही पण निदान साधे एलिगंट कुर्ता चुडिदार तरी दाखवा...मी जेव्हाही कुठला ही एपिसोड पाहते..ही लग्नाला चाल्ल्यासारखी......
दक्षिणा चा राग सार्थ आहे....माझे ही सेम मत.....\
उमेश कामत सारखी अभिनयातली उंची गाठायला तीला अजुन काही जास्त वर्ष जावी लागतील.......
सत्याची कबुली स्वप्नात होती
सत्याची कबुली स्वप्नात होती की काय ? मी मूड आला तर सुरुवातीची पाचेक मिनिटं बघते ही मालिका. तीही अधूनमधून.
अनिश्का, मलापण ती स्पृहा
अनिश्का, मलापण ती स्पृहा अजिबात आवडत नाही, उमेश नेहेमीच आवडतो पहिल्यापासून. अगपण स्पृहा पुण्याची नाहीये, मुंबईचीच आहे, बालमोहन किंवा छबिलदास ह्यापैकी एका शाळेत शिकलीय. (सिरीयलमध्ये पुण्याजवळील सासवडची दाखवली आहे, तू प्रत्यक्षातल्या स्पृहाबद्दल म्हणतेस की रोलमध्ये ते मला कळले नाही, अर्थात मला दोन्ही म्हणजे प्रत्यक्ष आणि रोल दोन्हीमध्ये स्पृहा नाही आवडली.), ड्रेसेसबद्दलपण तू बरोबर लिहिलेस.
अनिश्का
अनिश्का
Pages