एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे.....खरं बाहेर आल्यानंतर या सीरियलमध्ये लगीनघाई होणार. आधी उ.का.च्या आजी.-आजोबांचं, आई-बाबांचं म~~~~ग उ.का आणि स्पृ.जो. चं लगीन.

काल धनाने घेतलेला उखाणा,' नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू..' एलदुगो मधलाच होता, राधाने घेतेलेला.

मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची खोटी आई त्याच्याच ऑफिसात काम करते. इशाचं ऑफिस पण वरच्या का खालच्या मजल्यावरच आहे ना? मग या दोघींने एकमेकिंना कधीच पाहिलं नाही? Uhoh

दक्षुतै, हेच मी आईला विचारलेलं.
इथे विचारायचं राहिलं Proud
आणि इशाच्या त्या मैत्रिणीला ही माहित आहे ना त्याची आई?

मला एक प्रश्न पडलाय. ती ओमची खोटी आई त्याच्याच ऑफिसात काम करते. इशाचं ऑफिस पण वरच्या का खालच्या मजल्यावरच आहे ना? मग या दोघींने एकमेकिंना कधीच पाहिलं नाही?>>>मला पन हाच प्रश्न पडलाय.

बाकी तो शेजारचा म्हातारा नको होता त्यात...त्याने वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आणि आता त्या शोभा खोटेला नवरा असल्यासारखा ऑर्डर्स सोडतोय. Angry

महाएपिसोड तर वाया घालवलाच आणि आपला पण एक तास वाया घालवला Sad मला एपिसोड चालु असताना १० वेळ तरी वाटलं होतं की हे सगळं स्वप्न असणार!

अ‍ॅम्ही अ‍ॅमच्या घॅरी जेवणॅअ‍ॅधी प्रॅथ्रॅना म्हणतो, तुम्ही काय करता? :रागः
दारू पितो.. तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा? गिळायला आयतं मिळालंय ते गिळ ना... नको तिथे संस्कार दाखवायची कसली हौस? तुझी प्रार्थना उंदिर पळवतात का ते एकदा प्रयोग करून पहा म्हणावं

स्पृहा फुल्ली गंडलेले आहे किंवा अति अ‍ॅक्टींग तरी करते.

बाकी परवाच्या एपिसोडात ओम्याच्या हातून फोन निसटून पडतो (ति बया तिकडे किंचाळल्यामुळे) तो सिन लई भारी होता... मी खुप हसले. Lol Rofl

दक्षिणा Proud अगदी अगदी. स्पृहाचा तो सीन आणि जनरलच ती वैताग नंबर एक.

मोहन जोशी आणि काके नटून थटून येतात तेव्हाही जाम हसायला आलं. आणि शुभांगी गोखले त्या आजोबांना पुस्तक देवून म्हणते, हे वाचा.. नाही म्हणजे सारखं बोलायची इच्छा होते, हे हातात असलं की बरं.. मस्त बोलली ती Proud

कालचा एपिसोड खरंच फुकट. उगीच हे महाएपिसोड थेरं ठेवतात जाहिरातींकरता.

तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा? +१
मागे पण एका एपिसोड मधे ओमच्या आईला घराला रंग लावून घ्या म्हणत होती. ते बघतील ना त्यांच्या घराला कधी रंग लावायचा, लावाय्चा का नाही, तू का सांगतियेस?

बाकी परवाच्या एपिसोडात ओम्याच्या हातून फोन निसटून पडतो (ति बया तिकडे किंचाळल्यामुळे) तो सिन लई भारी होता<<<< त्यानंतर तो ओम त्याच्या काकाला फोन करतो तो एक सीन मस्त होता.

स्पृहा दिवसेंदिवस सुधरण्याऐवजी बेकार होत चाललीये.एलग्दुगो मधे बरी होती असं वाटतंय आता.

अ‍ॅम्ही अ‍ॅमच्या घॅरी जेवणॅअ‍ॅधी प्रॅथ्रॅना म्हणतो, तुम्ही काय करता? :रागः
दारू पितो.. तुला काय करायच्यात नसत्या चांभार चौकशा?>>>>>>> Rofl Rofl दक्षिणेला जाम म्हणजे एक कणही आवडत नाही ना स्पृहा? Lol

पौर्णिमा, एक कणाच्या एक कणही आवडत नाही ती स्पृहा मला.
पुण्यात पुरूषोत्तम वगैरेच्या एका पर्वाला मी गेले होते. तो तरूणवर्ग असा काही भारावून गेलेला असतो तशी ती स्पृहा वाटते मला. टिनेजर.

स्पृहा फुल्ली गंडलेले आहे किंवा अति अ‍ॅक्टींग तरी करते.>>>+११

एक अक्खा तास घालवून कालचा एपिसोड पाहिला.... और आखिर में निकला क्या ...बाबाजी का ठुल्लू!!! Proud Proud

मला तर ती स्प्रुहा आज्जीब्बात्त नाह्ही आव्वड्डत्त......एकतर ती बुटकी आणि जाडी आहे...दुसरे ती डोक्यात जाईल इतक्या आगाउ पणे बोलते...कदाचीत ती पुणेरी आहे म्हणुन तिला तसे दाखवताहेत का कोण जाणे..पण मी कामानिमीत्त दोन तीन वेळच पुण्यात गेली आहे आणि काही लोकांशी इंटरॅक्ट पण केलय...पण मला काही पुणेकर खोचड असतात असे वाटले नाही....कदाचीत मी पण तशीच आहे म्हणुन असेल....पण असो....तीला जसं दाखवताहेत ते मुळ्ळीच बरं नाहीये......फार फार आगाउ आहे....वकील दाखवली आहे तेवढी मला स्मार्ट वाटत नाही.....तिच्या ऐवजी दुसरी कोणी अगदी प्रिया बापटही चाल्ली असती....
तीचा ड्रेस्सिंग सेन्स इत्का गबाळा का दाखवलाय???? काय ते कलर, काय ते ड्रेस....कॉर्पोरेट मधे काम करते ही बया ....अगदी ट्राउझर शर्ट नाही पण निदान साधे एलिगंट कुर्ता चुडिदार तरी दाखवा...मी जेव्हाही कुठला ही एपिसोड पाहते..ही लग्नाला चाल्ल्यासारखी......
दक्षिणा चा राग सार्थ आहे....माझे ही सेम मत.....\

उमेश कामत सारखी अभिनयातली उंची गाठायला तीला अजुन काही जास्त वर्ष जावी लागतील.......

अनिश्का, मलापण ती स्पृहा अजिबात आवडत नाही, उमेश नेहेमीच आवडतो पहिल्यापासून. अगपण स्पृहा पुण्याची नाहीये, मुंबईचीच आहे, बालमोहन किंवा छबिलदास ह्यापैकी एका शाळेत शिकलीय. (सिरीयलमध्ये पुण्याजवळील सासवडची दाखवली आहे, तू प्रत्यक्षातल्या स्पृहाबद्दल म्हणतेस की रोलमध्ये ते मला कळले नाही, अर्थात मला दोन्ही म्हणजे प्रत्यक्ष आणि रोल दोन्हीमध्ये स्पृहा नाही आवडली.), ड्रेसेसबद्दलपण तू बरोबर लिहिलेस.

Pages