नविन मालिका - २४
अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे
जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....
सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...
दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत
आता पर्यंतचे कथानक:-
जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...
जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...
घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...
पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...
भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...
अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...
-----------------
आता पुढे............
सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....
-----------------------
फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे.............
Mona, tyani paise vadhavun
Mona, tyani paise vadhavun magitale mhanun tyacha role tithech sampavanyat aala asanar.
अनिल कपूर आणी त्याच्या team
अनिल कपूर आणी त्याच्या team ने खूप छान रीत्या हाताळ्ली आहे, 24 मालीका जशी च्या तशी कॉपी न करता इंडियन 24 चे वेगळे रूप सादर केले आहे, त्या बद्दल त्यांचे अभिनंदन
आता फक्त २ च तास राहिलेत.
आता फक्त २ च तास राहिलेत. म्हणजे २ एपिसोडच.
शेवटाकडे छान नेत आणलिये.
आता दोनच एपिसोड राहिलेत, खूप
आता दोनच एपिसोड राहिलेत, खूप सुंदर रंगली मालिका. काल त्या रवीन्द्रनने, त्याला मदत करणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या मुलीचा किती सहजपणे खून केला, अंगावर काटा आला.
भारतीय टीव्हीमध्ये अशीच आता कमी एपिसोड असणाऱ्या सिरीयलची लाट येऊदे, मग रटाळपणा कमी होईल आणि पूर्वीचे दिवस परत येतील.
मी २२ वा भाग मिस केला. क्या
मी २२ वा भाग मिस केला.
क्या हुवा इस शनीवार?
काल त्या रवीन्द्रनने, त्याला
काल त्या रवीन्द्रनने, त्याला मदत करणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या मुलीचा किती सहजपणे खून केला, अंगावर काटा आला.+१
या वेळच्या एपिसोडेमधे जय राठोड आणि त्याच्या मुलालाही किड्नॅप केलयं एलटीफच्या लोकांनी.
शुक्रवार, शनिवार काय
शुक्रवार, शनिवार काय झालं??
हायलाइट्स द्या रे,.
काल त्या रवीन्द्रनने, त्याला
काल त्या रवीन्द्रनने, त्याला मदत करणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या मुलीचा किती सहजपणे खून केला, अंगावर काटा आला.+१
शेवटच्या भागात जर दिव्याचा
शेवटच्या भागात जर दिव्याचा नवरा कंटाळुन स्वतःच आदित्य वर हमला करतो आणि त्याला ठार करतो त्याला हमला करताना पृथ्वी मधे येतो आणि त्याचा देखील बळी जातो .आणि जयसिंग राठोड दिव्याच्या नवर्यावर गोळीबार करुन त्याला देखील ठार करतो.....
दुसर्य दिवशी.......... नैना दिव्याला पंतप्रधान म्हणुन घोषीत करते......... आणि दिव्या... कपटी हसते स्मित>> पुढच्या भागात हे असंच काहीसं व्हायची शक्यता निर्माण झाली आहे!
अपडेट्स देणं अवघड आहे. एका वेळी अनेक गोष्टी घडतात या मालिकेत.
@ झकासराव, शुक्रवार आणि
@ झकासराव, शुक्रवार आणि शनिवार अपडेट्स -- जय सिंग चा मुलगा वीर अतिरेक्यांच्या ताब्यात येतो. जय ला ओलीस ठेवून बाला ला सोडण्याची मागणी केली जाते. सूद सुरुवातीला या गोष्टीला नकार देतो पण नंतर आदीत्य सिंघानियाच्या हस्तक्षेपानंतर मान्यता देतो. तत्पूर्वी जय सुटकेचा एक निष्फळ प्रयत्न करतो. अतिरेकी अर्थातच बाला ला ताब्यात घेतात पण जयला सोडत नाहीत. ए.टी.यु. कडून आदीत्य सिंघानियाला दिव्याचा नवरा विक्रांत गद्दार असल्याची माहिती पुरवण्यात येते. आदीत्य विक्रांतला जरा घोळात घेऊन त्याच्या मोबाईल मधुन एक नंबर मिळवून तो ए.टी.यु. ला देतो. तो नंबर रविंद्रनचा असावा या निष्कर्षाप्रत ए.टी.यु. टीम येते. जयची बायको त्रिशा मृत्युशी झुंज देते आहे.
रविंद्रन जयला सिंघानियाच्या हॉटेल कडे जायला सांगतो. जयचा मुलगा वीर त्याच्या ताब्यात असल्याने जय हे मान्य करतो.
यातल शुक्रवारी काय अन शनिवारी काय झालं ते मात्र सॉर्ट आउट करता आल नाही. अजून काही राहील असेल तर सांगा प्लीज.
हम सही
हम सही थे...........
ज्ञानेश.............कट कर आता अनिल ला मारायचा
LTF चा अतिरेकी राजाचे काम
LTF चा अतिरेकी राजाचे काम करणार कोण आहे? मस्त काम करतो तो.
आदित्यच्या म्रुत्युची बातमी
आदित्यच्या म्रुत्युची बातमी फेक असेल. LTF ची दिशाभूल करण्यासाठी.
नियती >+१
नियती >+१
मागच्या शुक- शनीवारच्या
मागच्या शुक- शनीवारच्या भागातले काही प्रसंग पटले नाहीत. 'तो' कैदी म्हणजे रविंद्रन आहे हे आपल्या सारखे सर्वसामान्य लोकं पण एका फटक्यात ओळखत असताना तिथे एटीयूमधले सगळे फायली ओपन होईपर्यंत वाट पहात होते. बरं फाईल ओपन झाल्यावर कळलं की बाबा तो रविंद्रन आहे तर जयला पुन्हा ती फाईल पाठवण्यात का बरं टीपी करायचा? आँ??? डायरेक्ट फोनवरून सांगता येत नाही की ही महत्त्वाची बातमी??? त्या रिमोट एरीयात ती फाईल गेली पण बरी.
शिवाय, गिल जयला त्या जंगलात एकट्याला सोडून एटीयूत परत का गेला हे कळलं नाही. येरझार्या घालण्यातच त्याचा वेळ नाही का जात?
एटीयूतल्या फोनांच्या बाबतीत देखिल याचा फोन त्याच्या टेबलावर देण्यात आणि जाऊन घेण्यात अतिच वेळ वाया घालवतात बुवा.
अतिरेकी राजाचे काम करणारा
अतिरेकी राजाचे काम करणारा मलापण आवडला, सहज-सुंदर अभिनय करतो. साउथचा कलाकार असेल फेमस असलेला, असे वाटते, नंदिनी सांगू शकतील.
एका वेळी अनेक गोष्टी घडतात या
एका वेळी अनेक गोष्टी घडतात या मालिकेत.<<< हो एकदम वेगात चालली आहे मालिका. मजा येते आहे बघायला.
मामी आता तु सुरु केले आहेस तर ...
मला नेहमी प्रश्न पडतो, एटीयु च्या ऑफिस मधे सगळे ओपन एरीया मधेच कसे काम करतात. इतके सिक्रेट कामं चालु असतात की एकमेकांवर विश्वास ठेवणं ही कठीन असत. ईन्ग्लिश २४ मधे पण असच आहे वाटत (आठवत नाही).
सगळेच वेगवेगळ्या सीक्रेट
सगळेच वेगवेगळ्या सीक्रेट कामांवर काम करत असल्यामुळे ओपन सीक्रेट एरिया असेल ती
मला तर गिलवरही डाऊट येतो. उसका चेहराही वैसा है
आदित्यच्या म्रुत्युची बातमी फेक असेल. LTF ची दिशाभूल करण्यासाठी.>> पण त्यांना तेच हवे आहे. आदित्यची हत्या.
त्यांना आदित्यला मारायचे
त्यांना आदित्यला मारायचे नसते. रविन्द्रनला सोडवायचे असते आणि जयला मारयचे असते (बहुतेक बदला घेण्यासाआठी). रविन्द्रनला कुठे ठेवले आहे त्या जागेची माहीती देण्याच्या बदल्यात विक्रांत आदित्यला मारायला सांगतो असे मला वाटतं.
एक संभाव्य हत्या टाळताना
एक संभाव्य हत्या टाळताना बाकीचे किती लोक मारले जात आहेत . जय राठोड च्या फॅमिलीबद्दल असलेला माणुसकीचा अँगल बाकीच्या एजंट्स बाबतीत अगदी दिसत नाही.
रविन्द्रनला सोडवायचे असते आणि
रविन्द्रनला सोडवायचे असते आणि जयला मारयचे असते (बहुतेक बदला घेण्यासाआठी)>> एकट्या जय राठोडला मारू शकले असते बाला मिळाल्यानंतर.
आदित्यच्या वडिलांनी ऑपरेशन त्रिशूलचे आदेश दिले म्हणून त्यांना मारतात ते. ऑप. त्रिशूल ज्याने एक्झिक्यूट केलं त्या राठोडकरवी आदित्यला मारायचा प्लॅन असतो- एक प्रकारचा पोअॅटिक जस्टिस? विक्रांतची मागणी फक्त आदित्यला मारणं अशी असेल. राठोडकरवीच मारणं हा सूडाचा भाग एलटीएफचा.
हि मालिका ऑनलाईन बघता येईल का
हि मालिका ऑनलाईन बघता येईल का ? असल्यास कृपया लिंक (इथे किंवा विपूत) द्या.
राठोडकरवीच मारणं हा सूडाचा
राठोडकरवीच मारणं हा सूडाचा भाग एलटीएफचा.>>> बरोबर
कालचा एपिसोड पाहून कारस्थान
कालचा एपिसोड पाहून कारस्थान रचणारी सूत्रधार दिव्या असू शकते ह्या शंकेला दुजोरा मिळाला.
आदित्य सिंघानिया का घाई करतो पृथ्वीला फोन करायची?
आदित्य सिंघानिया का घाई करतो
आदित्य सिंघानिया का घाई करतो पृथ्वीला फोन करायची?>> कारण पृथ्वी राजिनामा पाठवतो म्हणून त्याला मनवण्यासाठी.
दिव्याच!!!!
जयने रविन्द्रनच्या दहा वर्षाच्या मुलाला सूर्याला मारलेले असते म्हणून त्याचा बदला त्यांना त्याची फॅमिली मारून घ्ययाचा असतो यासाठी आदित्यच्या वडलांनी ऑप त्रिशूलचे आदेश दिलेले असल्याने आता आदित्य सिंघानियला मारून "खानदान खतम" करायचे असते. शिवाय काल दाखवलेला पैशाचा अॅंगल पण महत्त्वचा आहे. आदित्य कुठल्याही परिस्थितीत हा फंड रीलीज करणार नाही. पण जर दिव्या पीएम झाली तरे...... शिवाय तिच्या हाताखाली ही एलटीएफची प्रायव्हेट आर्मी पण कायम राहील असा तिचा प्प्लान असेल.
आज सिझन फिनाले!!!!!!
खरोखर उत्कंठावर्धक आहे
खरोखर उत्कंठावर्धक आहे मालिका. आज शेवट !
उदयनचे सर्व अंदाज चुकले. अनिल कपूर वाचला.
दिव्या सूत्रधार असावी असे एकंदर दिसते. पण पृथ्वी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण आधी एका भागात आदित्यने तिला 'तूच पीएम हो' म्हणून सुचवले आहे, आणि तिने नकार दिला आहे. एवढ्या साध्याभोळ्या भावाला शर्यतीतून हटवण्यासाठी त्याचा खून करण्याची गरज तिला पडावी, असे वाटत नाही, लॉजिकली. आदित्यला मिळालेली सुरक्षाव्यवस्था अगदीच ढिसाळ दाखवली आहे. तो विक्रांत किती सहजपणे त्या सुरक्षा अधिकार्याची गन हिसकावतो. शिवाय जयसिंग राठोड मोबाईल बॉम्ब घेऊन आदित्यपर्यंत पोचतो, तरी कोणाला कळू शकत नाही. त्याची 'सुरक्षा तपासणी' म्हणजे तर विनोदच होता. मॉलच्या सुरक्षा तपासणीपेक्षा अधिक काहीही केले नाही त्यांनी. (इथे आमच्या खोब्रागडेबाईंना स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून स्ट्रीप सर्चला सामोरे जावे लागते. ;)) झेड प्लस सिक्युरिटी अशी असते का?
असो.
आजचा भाग नक्की बघा सगळ्यांनी. बरेच उलगडे व्हायचे आहेत.
मला तर वाटते त्या मोबाईल मधेच
मला तर वाटते त्या मोबाईल मधेच बॉम्ब असेल. जो फोन जय आदित्य ला देतो. (कालचा भाग पुर्ण नाही बघता आल सो नो अपडेट )
ओह..
ओह..
^^^ म्हणजे तुम्ही जय आदित्यला
^^^
म्हणजे तुम्ही जय आदित्यला फोन देईपर्यंत एपिसोड पाहिला, आणि बॉम्ब फुटतांना नाही पाहिला?
हो नंदिनी, मनवण्यासाठी हे
हो नंदिनी, मनवण्यासाठी हे कळलं., पण अनायसे बातमी लपवून ठेवलीच आहे त्याच्यापासून, तर कशाला रिस्क घ्यायची? तो ह्यात सामील नाही हे अजुन नक्की कुठे झालय?
Pages