24 - मालिका

Submitted by उदयन.. on 7 October, 2013 - 05:44

नविन मालिका - २४

अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे

जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....

सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...

दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत

आता पर्यंतचे कथानक:-

जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...

जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...

घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...

पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...

भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी Wink ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...

अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...

-----------------

आता पुढे............

सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....

-----------------------

फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे............. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा पहिल्यांदा किरण आवडली. हुषार आणि मॅचुअर वाटली Happy

पूजाने बालाला का मारले? म्हणजे त्याला जिवंत पकडणे कीती महत्वाचे होते हे तिच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला समजले नाही? बर त्याने काही तिच्यावर अनपेक्षीत हल्ला वगेरेही केला नव्हता की गडबडून जाऊन तीने त्याला मारावे.

नताशा, तिच्यावर या संपूर्ण घटनेचा प्रचंड मानसिक ताण येतो. एक तर आपला बॉयफ्रेंड टेररिस्ट आहे, शिवाय तो आपल्याच बॉसला मारणार आणि त्यासाठी आपला वापर करून घेतोय हे सर्व मिळून वर तीच व्यक्ती आपल्याला आय कव्ह यु आणि लग्नाबद्दल बोलतेय हे ऐकून तिचा एक प्रकारे नर्व्हस ब्रेकडाऊन होतो असं दाखवलंय... (आणि ते शक्य आहे. म्हणूनच एजंट लोकांना मानसिकरीत्या काहीही सहन करता येईल याचे प्रशिक्षण दिलेले असते)

त्या वीर सिंग राठोडची स्टोरी काय भलतीकडेच निघाली की काय!!!

वीर सिंग राठोड कोण आहे?? जय सिंग म्हणायचय का? की नवा कुणी आलाय?? मी अर्‍याच दिवसात बघितली नाही २४.

त्या अ‍ॅकॅडमीतल्या कर्नलचे केस चांगले वाढले होते. कॅपमधून खाली व्यवस्थित डोकावत होते . तिथे दुर्लक्ष झालेलं दिसलं.

दुसरं म्हणजे एक साधा वीज खात्यात काम करणारा माणूस एटियुच्या बॉसला चकवून त्याच्या हातातली बॅग खेचून त्याच्यापेक्षा जास्त वेगानं पळून मालिकेत पाच मिनिटांचा पाठलाग दाखवण्याइतपत स्किलफुल असेल हे जरा पचायला कठीणच आहे हां.

अनिल कपुर दिवस रात्र न बघता डोळ्यावर गॉगल्स बाळगून असतो हे जरा अतिच नाही का? आणि एटियुच्या चीफला दाढी गुळगुळीत असल्याचं बंधन वगैरे नाही हा प्रश्न विचारावा का? Proud

मामी ते सेफ हाऊस सुद्धा एक मजेशीर प्रकरण होते. तो नकूल जेव्हा किरण आणि त्रिशाला घेऊन निघतो तेव्हा सरळ चालत्या गाडीने मेन गेट उडवतो आणि बाहेर पडतो.

सेफ हाऊसचे मेन गेट इतके तकलादू? साधे लाकडी???

पण जाऊदे. ही मालीका सध्या सगळ्यात आवडीची आहे.

तो बागेत पळून जायचा सीन अगदीच बंडल झाला. संपूर्णपणे डायरेक्टरची चूक.

वीर सिंगची स्टोरी काहीही असो, तो टेररिस्टपासून वाचतोय त्या निमित्ताने Happy

आदित्या भावी पंतप्रधान असतो ना ? मग सरकारी यंत्रणा , एटियु सगळे त्याच्या आदेशावर चालले आहे. निवडून यायची गरजच काय जर असे अनभिषिक्त सम्राट पद मिळत असेल तर !
असो. पण मालिका बघायला आवडतेय.

रावी, तो ऑलरेडी खासदार म्हणून निवडून आलाय. शिवाय पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. त्याचा बाबा, आजी, आणि काका देखील राजकारणीच होते. त्यामुळे त्या फॅमिलीची सरकारी यंत्रणांवर आधीपासून् पकड आहे.

ती पूजाचं काम करणारी मुलगी डीडीएलजे मधली आहे ना? तिचे ड्रेसेस फार बोअर घेतलेत पण. कार्पोरेट लूक अज्जिब्बात जमला नाही तिचा.

ती पूजाचं काम करणारी मुलगी डीडीएलजे मधली आहे ना? तिचे ड्रेसेस फार बोअर घेतलेत पण. कार्पोरेट लूक अज्जिब्बात जमला नाही तिचा. >> + १.

सेफ हाऊसचे मेन गेट इतके तकलादू? साधे लाकडी??? >>> + १

असो. तरीही वेगळी आणि सुसह्य कथा आणि मालिका आहे याचाच आनंद आहे. उत्कंठा छान वाढवत नेत आहेत.

ओ येस्स. पहिल्या एपिसोडमधे त्याचा फोन आलेला असतो त्रिशाला बर्थडे विश करण्यासाठी. आता त्याची एन्ट्री झाली का. कोणे अ‍ॅक्टर??

सास बहुंच्या सिरिअल्स पेक्षा तरी कितीतरी पटीने सुसह्य आणि तर्कशुध्द पध्दतीने दाखवत आहे

थोडा चेंज बरा आहे हा

वरील अभिप्राय वाचून एकुणात मालिका मूळ इंग्रजी '24' प्रमाणे वेगवान आहे असं दिसतंय.... मूळ मालिकेप्रमाणे २४ एपिसोड्स मध्ये संपणार असेल तर सोन्याहून पिवळं....ही मालिका 'हिट' ठरली तर पुन्हा लिमिटेड भाग असलेल्या दर्जेदार मालिकांची लाट येईल अशी आशा वाटते. खरंच तसं झालं तर अनिल कपूरला आगाऊ शतशः धन्यवाद !

नमस्कार, २४ मालीका २४ एपिसोड्स पेक्शा जास्त चाल्णार नाही.. एकन्दर या मालीकेने टीपीकल सासु सून यान्च्या पेक्शा काही तरी वेगळ दाखवून audience ला दिलासा दिला आहे...

शनिवारच्या भागात काय झाले?प्लीज सांगा ना कोणीतरी. माझा मिस झाला तो भाग!

त्या टुकार सासु सुनांच्या सीरेलीचे अपडेट वर अपडेट टाकतात लोक. नी इथे कुणी अपडेट देइना. बघणार्‍यांनो द्या की अपडेट्स.

सस्मित, बर्‍याच घडामोडी झाल्यात.

बाला हॉस्पिटलमधे सर्जरीमधे आहे. पूजाला दिल्लीला पाठवलंय किरण आणि त्रिशाला एटीयुमधे घेऊन येतात. जयला त्यांच्यावर हल्ला झालेलं माहितच नाही. जय एका लीडचा पाठलाग करत करत एका एम एस ईबीच्या पॉवर स्टेशनवर काम करणार्‍या माणसाला पैसे द्यायला बाला बनून जातो. पण तिथे त्या माणसाच्या हे लक्षात येतं आणी तो पळून जातो. जयला एवढंच समजलं की तो सात वाजून वीस मिनिटांनी कुठलातरी एक पुलाचा पॉवर सप्लाय बंद करणार असतो. यामधे जयची बॅकप टीम त्याला एका नॅशनल पार्कमधल्या ब्रिजचा पत्ता देते. त्थे गेल्यावर तो ब्रिज म्हणजे एक अंडरग्राऊंड हाय सीक्य्रीटी प्रीझन असल्याचं जयला समजतं. जय त्याच्या चीफकडून कैदी कोण आहेत वगैरे माहिती विचारतो. तो अधिकारी माहिती देत नाही, म्हणून जय आदित्य संघानियाकडून क्लीअरन्स मिळवतो. या फोनदरम्यान तो आदित्यला सांगतो की या सर्वांमागे त्याच्याच आतल्या गोटातलं कुणीतरी सामिल आहे. रॅलीमधले घडलेल्या प्रसंगामुळे नैना सिंगानिया पृथ्वीवर संशय घेत आहे.

या प्रीझनमधले कैदी एल्टीएफचे दोन छोटेसे नेते आहेत, तरी त्यांना सोडवायला राजा आणी त्याची पूर्ण टीम का आली आहे हे माहित नाही.

मला वाटतय की किशोर कदम ऑर्डर्ली नसून त्यांचा प्रमुख असावा, म्हणून त्यांना सोडवायला राजा आणी त्याची पूर्ण टीम आली आहे

मला वाटतय की किशोर कदम ऑर्डर्ली नसून त्यांचा प्रमुख असावा, म्हणून त्यांना सोडवायला राजा आणी त्याची पूर्ण टीम आली आहे>> करेक्ट, किशोर कदम खुद्द रविन्द्रनच असावा असा माझा कयास आहे.

याच सर्प्राईज एन्ट्रीबद्दल मी बोलत होते, पण लोकांनी लक्षच दिलं नाही Proud असो. राजाचं काम करणारा अभिनेताही चांगला आहे.

रात्रीचे ८ वाजले सिरियलीत Happy आता चारच तास राहिले, म्हणजे दोन शुक्र-शनि. होपफुली मिस होणार नाहीत.

याच सर्प्राईज एन्ट्रीबद्दल मी बोलत होते, पण लोकांनी लक्षच दिलं नाही <<< ओहो. माझा नेमका तोच सीन चुकला होता. तो रविंद्रन असावा असा माझा अंदाज.

बाकी, स्क्रीप्टरायटरचं कौतुक. प्रत्यक्ष लाईफ आणि फिक्शन यांचं बेमालूम मिश्रण केलंय. एलेटीएफ, त्यांनी मारलेला पंतप्रधान, त्याची फॅमिली, रविण्द्रन, त्याचा मुलगा सगळं कोलाज परफेक्ट करत आणलंय.

पृथ्वीवर संशय घेत आहेत म्हणजे तो नक्किच निर्दोष असणार. प्रत्येक भागाच्या शेवटी उत्सुकता वाढवतात. किशोर कदमच रविन्द्रन असणार. मस्त चाललीय मालिका.

माझा संशय दिव्यावर आहे. दिव्याचा नवरा ऑलरेडी इन्वॉल्व्ड आहे तेव्हापासून जास्तच!!

Pages