नविन मालिका - २४
अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे
जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....
सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...
दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत
आता पर्यंतचे कथानक:-
जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...
जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...
घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...
पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...
भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...
अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...
-----------------
आता पुढे............
सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....
-----------------------
फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे.............
ओरीजिनलची शेम टू शेम कॉपी आहे
ओरीजिनलची शेम टू शेम कॉपी आहे का? गांधी घराण्याच्या ऐवजी काय होतं ओरीजिनलमध्ये?>>>>>
फक्त लेखक आणि format सेम आहे. कथा भारतीय काँटेक्स्ट मधे आहे. कॉपी नाही.
२४ भागातच का संपवायचीय मालिका ?>>>>>>ही संपुर्ण कथा १ दिवसात/२४ तासात घडते..त्यामुळे १ तासाचा १ भाग धरुन २४ तासातच संपवायचीय..(बर आहे ना. ते "चार दिवस सासुचे" सारखे कधी संपणार याची वाट बघायला नको )
फक्त शुक्रवार्-शनिवारी रात्री १० वाजता ही दाखवली जाते>>>आणि शनिवारी दुपारी १ वा, शुक्रवारचा भाग आणि रविवारी दुपारी १-२:३० दोन्ही भाग बॅक टु बॅक दाखवतात.(कलर्स एच डी वर)
तसेच रात्री १२ वा. पण दाखवतात.
उदयन, प्लीज अपडेट्स दे ना या
उदयन,
प्लीज अपडेट्स दे ना या दोन एपिसोड्स मध्ये काय झाले त्याचे?
माझे मिस झालेत हे भाग.
काल पाहिले पहिले दोन
काल पाहिले पहिले दोन एपिसोड्स.. जवळ जवळ ९८ % जशीच्या तशी आहे.. अगदी ऑफिसचा ले आऊट वगैरे ही सेम आहे... संवादसुद्धा तसेच वाटतात.. मंदिरा बेदीची हेअर स्टाईल सुद्धा तशीच आहे..
हा सिझन पहाणार नाही बहुतेक पुढे.. कारण इंग्लिश थोड्याच दिवसांपूर्वीच पाहिलाय...
इथे गांधी घराणं तर तिकडे राष्ट्राध्यक्षांची निवडणूक वगैरे होतं.. इथे भावी पंतप्रधानांवरच आरोप तर तिकडे त्यांच्या मुलावर आरोप होता..
अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी
अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे. >>>>>> मी इथुन पुढे पाहिलच नाहिये. अपडेट्स द्या रे कोणीतरी मी बरच मिसल आहे.
काही गोष्टी रंजक तर काही
काही गोष्टी रंजक तर काही अतर्क्य वाटू लागल्या आहेत. अनिता राज, भाप्र आणि भाप्रची बहीण ही पात्रं खूप बोअर आहेत. एकच गोष्ट खूप चिवडल्यासारखी वाटल्याने हे तिघं दिसले कि मालिकेचा वेग मंदावतो. अर्थात हे चालायचंच..
ही सीरिअल बघत नाही का कोणी?
ही सीरिअल बघत नाही का कोणी? बरेच दिवस अपडेट नाही.
मी मधेच बघितली. अजिंक्य देव
मी मधेच बघितली. अजिंक्य देव एक्दम शत्रुपक्षात दिसला. त्याचा संदर्भ लागला नाही. बाकी अतिशय वेगवान आहे. आवडते बघायला.
सिरीयल छान चालली होती, आता
सिरीयल छान चालली होती, आता फिल्मी आणि प्रेडीक्टेबल होतेय. अनिल कपूर पुन्हा आवडायला लागला आहे. कॅरेक्टर्स छान दाखवली आहेत. प्रत्येक जण आपापल्या रोल साठी परफेक्ट आहे.
वेळेमुळे बघता येत नाही, रीपीट
वेळेमुळे बघता येत नाही, रीपीट पण नाही, त्यामुळे अपडेट विचारत आहे.
परवाच्या एपिसोडमधे काही
परवाच्या एपिसोडमधे काही गोष्टी खटकल्या.
पीएम ची प्रेस सेक्रेटरी ज्याच्याबरोबर अफेअर करते त्याचं नाव ऐकूनसुद्धा तिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही का? तो बिनधास्त आपलं नाव चेंज न करता फिरत असतो, तिच्याच हॉटेलमधे राहत असतो हे सुरक्षा एजन्सीच्या लक्षात येत नाही का? त्रिशाला इतके दिवस "ती" बाई निकिता आहे हे माहितच नसत??? आणि निकिताला ऑर्डर तिथेच राहून काम करायचे असताना ती चक्क्क उठून एटीयुला निघून येते?
कथानक आता बर्यापैकी माहित झालंय. सुरूवातीला "याकुब" मेन लीडर असल्याने ज्या देशावर संशय होता, तिथून कथेचा फोकस श्रीलंकेवर नेताना घेतलेले प्रसंग आणि व्यक्तीरेखा आवडल्या. पुढे काय होइल ते बघणे...
आदित्य सिंघानियाच्या घरातलं राजकारण आणी दिव्या सिंघानियाची व्यक्तीरेखा मला आवडली. मेघा सिंघानियाचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे? अफलातून काम आहे तिचं. रीमाइइन्ड्स मी ऑफ..........................
त्रिशाला इतके दिवस "ती" बाई
त्रिशाला इतके दिवस "ती" बाई निकिता आहे हे माहितच नसत? >>> माहित असतं पण ती तिला मुद्दाम क्न्फ्रन्ट करते. तिची रीअॅक्शन बघायला.
मला टिस्का चोप्राचा अभिनय झेपत नाहीये. तिच्या चेहर्यावर तेच ते भाव असतात - प्रसंग कोणताही असो. बाकी सगळे चांगले आहेत. सूद आणि तो एटीयुतला जयचा बॉस की कोण तो थेट प्रत्यक्षातून सेटवर आणल्यासारखे दिसतात.
बाकी त्या सेफ हाऊसमध्ये किरण राठोडकरता मुद्दामहून शॉर्टस का बरं घालण्याकरता आणल्या असणार ? किती मूर्खपणा आहे तो.
मेघा सिंघानियाचं काम करणारी
मेघा सिंघानियाचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे? अफलातून काम आहे तिचं. >>> ती बरेचदा क्राईम पेट्रोलमध्ये असते.
मला ती किरण नाही आवडत. फारच
मला ती किरण नाही आवडत. फारच पोरकट वाटते.
ती बरेचदा क्राईम पेट्रोलमध्ये
ती बरेचदा क्राईम पेट्रोलमध्ये असते.> इंग्लिश विंग्लिश मधे होती ना ती? श्रीदेवी ची बहिण.सुजाता कुमार.
मला ती किरण नाही आवडत. फारच पोरकट वाटते. > ती पोरकटच दाखवली आहे.
ती बरेचदा क्राईम पेट्रोलमध्ये
ती बरेचदा क्राईम पेट्रोलमध्ये असते.> इंग्लिश विंग्लिश मधे होती ना ती? श्रीदेवी ची बहिण.सुजाता कुमार.<<< ओके, गोरी तेरे गाव मे मधे तिने इम्रान खानच्या आईचं काम मस्त केलंय.
किरणला शॉर्ट्स दिलेले पाहून खरंच गंमत वाटली. एका एटीयु चीफच्या मुलीने कसं वागावं याची अजिबात अज्क्कल नाही तिला.
माहित असतं पण ती तिला मुद्दाम क्न्फ्रन्ट करते. तिची रीअॅक्शन बघायला.>>> ती वेळ आहे का? आधी काय ते माहिती द्या आणि मग ये तेरा पती मेरा पती है खेळत बसा....
किरण च्या मैत्रिणीचं काय
किरण च्या मैत्रिणीचं काय झालं? आणि अजिंक्य देव कोण असतो ?
किरण च्या मैत्रिणीचं काय
किरण च्या मैत्रिणीचं काय झालं? आणि अजिंक्य देव कोण असतो ? >>> तिला अजिण्म्क्य देव हॉस्पिटलमधे ठार करतो. अजिंक्य देव टेररिस्ट असतो आणि त्रिशाला मी मैत्रीणीचा बाप आहे असं खोटंच सांगून तिच्यासोबत राहतो. आणि नंतर त्रिशाला किडनॅप करतो. मागच्या एपिसोडमधे त्याला पण मारलं जातं.
छान वाटते ही मालिका! @रावी --
छान वाटते ही मालिका! @रावी -- किरणच्या मैत्रिणीला अजिंक्य देव मारतो हॉस्पीटल मधे..तो याकुब चाच माणूस असतो फ॑क्त त्रिशा(टिस्का चोप्रा) समोर किरणच्या मैत्रिणीचे वडील म्हणून आलेला असतो.
त्रिशा आणि किरण चा रोल संपला
त्रिशा आणि किरण चा रोल संपला का?
बहुधा हो... शेवटी तो अस्सासीन
बहुधा हो... शेवटी तो अस्सासीन फोन वर कन्फर्म करताना दाखवलाय की... पुढे बघू काय दिसतंय ते तरीही थोडी प्रिडिक्टेबल वाटतेय...
किरणची मैत्रीण जान्हवी,
किरणची मैत्रीण जान्हवी, अजिंक्य देव मारतो तिला. अजिंक्यला बघून ती विचारते, अंकल- मेरे पापा कहा है, तर तो लगेच तिला गळा दाबून मारतो. जान्हवी बहुतेक त्याला ओळखत असावी. अजिंक्य देवचे नाव साउथ-इंडिअन दाखवलेय (विसरले आता).
मी एकही भाग चुकवला नाही
मी एकही भाग चुकवला नाही अद्याप.
चांगली चाललीये सिरीअल.. पण फोकस एकदम बदलला आहे दुपारी १२ वाजेनंतर. (म्हणजे याकूब मेल्यानंतर.) स्टोरी बरीचशी मद्रास कॅफेशी मिळतीजुळती वाटली.
एटीयु चे ऑफिस आणि संपूर्ण स्टाफ अतिशय विश्वसनीय वाटतात. अभिलाषा अगदी जिवंत केलीये शबाना आझमीने. हॅट्स ऑफ. बाकी मिहिर, तेज, जिया, निकिता, सूद सगळेच चपखल आहेत. अनिल कपूरनेही सुरेख अभिनय केलाय.
एकंदर टीव्हीवर जे काही चाललेले असते, त्या मानाने ही मालिका बरीच उजवी आहे.
ज्ञानेश +१ बाकी सास बहु अन
ज्ञानेश +१
बाकी सास बहु अन तिसर्या गोष्टिंपेक्षा बरीच छान आहे.
ज्ञानेश +१
ज्ञानेश +१
मला पण आवडली आहे. छान घेतली
मला पण आवडली आहे. छान घेतली आहे. अनिल कपूर producer आहे . अजिंक्य देव चा भाऊ अभिनव/अभिनय देव director आहे.
अजिंक्य देवचे नाव साउथ-इंडिअन
अजिंक्य देवचे नाव साउथ-इंडिअन दाखवलेय (विसरले आता).>>कार्तीकेय.
मला मंदिरा बेदीची बॉडी लँग्वेज फार आवडते. तिच्या अभिनयापेक्षा कधीकधी ती सरस असते. शबाना आझमीचं काम पण आवडलं. सूद आणी भार्गव अभिनेते वाटतच नाहीत, परफेक्ट आहेत ते.
आमच्याकडे आजूबाजूला इतके दिवस मालिकेचे गुण्गान चालू होते, आता शिव्या देत आहेत
मला मंदिरा बेदीची बॉडी
मला मंदिरा बेदीची बॉडी लँग्वेज फार आवडते. तिच्या अभिनयापेक्षा कधीकधी ती सरस असते. शबाना आझमीचं काम पण आवडलं. सूद आणी भार्गव अभिनेते वाटतच नाहीत, परफेक्ट आहेत ते. >>> येस नंदिनी
मंदिरा बेदी यात खरोखर मस्तच
मंदिरा बेदी यात खरोखर मस्तच वाटते. मला आधी नाही आवडायची ती. एकदा मुंबई-बंगळूर फ्लाईट मधे होती, अक्षरशः हाडाचा सापळा वाटत होती. मी कलीग ला चक्क विचारले ही ही मंदीरा बेदीच आहे ना. २४ मधे ती अभिनय करते असे वाटतच नाही.
मस्त चालू आहे सिरियल. आम्हीही
मस्त चालू आहे सिरियल. आम्हीही एकही भाग चुकवला नाहीये. ज्यांचा काही कारणाने भाग चुकला, तर दुसरे दिवशी रिपिट असतो, दुपारी १ वाजता.
शबाना आलीही अन गेलीही. त्या रोलसाठी तिलाच का घेतलं हे कळतं. लोक छाप सोडतात ती अशी!
अजून एक सरप्राईज एन्ट्री बाकी आहे. तुम्ही नीट बघितलात का तो भाग जिथे रविन्द्रनचा अड्डा राठोड उध्वस्त करतो यावर ठरेल सरप्राईज आहे की नाही ते
सिरियलचे एपिसोड वेबवर पण
सिरियलचे एपिसोड वेबवर पण होते, पण आता नवीन एपिसोड दिसत नाही आहेत.
बाकी, सिरियलचा वेग झकास आहे, मुख्य म्हणजे इतर सिरियल प्रमाणे दळण नाही.
Pages