नविन मालिका - २४
अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे
जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....
सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...
दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत
आता पर्यंतचे कथानक:-
जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...
जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...
घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...
पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...
भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...
अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...
-----------------
आता पुढे............
सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....
-----------------------
फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे.............
मी काल चा बघितला नाही फुटकळ
मी काल चा बघितला नाही
फुटकळ धुम ३ बघायला गेलेलो.....आता पश्च्याताप होत आहे
नाही, जय ने आदित्य ला फोन
नाही, जय ने आदित्य ला फोन दिला हे पण मी कमिन्ग अप मधे पाहिल.
कालचा एपिसोड भन्नाट होता. आज
कालचा एपिसोड भन्नाट होता. आज ही मालिका संपणार. फारच फास्ट मुव्हिंग आणि ग्रीपिंग ंमालिका.
आज घरचा भेदी कोण ते कळणार. मला दिव्या सिंघानियाच असावी असं वाटतंय.
तिच्या मुलाचा, नवर्याचा त्याग कुठल्याशा कारणासाठीच असावा.
पॄथ्वी निर्दोष असावा, नाहीतर त्याने पार्टीतून राजीनामा दिला नसता.
मी पण काल चा बघितला नाही. आज
मी पण काल चा बघितला नाही. आज दुपारी बघीन आणि रात्री शेवटचा भाग
पण दिव्याच वाटते आहे.
मी युट्युब वर अथवा........
मी युट्युब वर अथवा........ त्यांच्या साईट वर बघेल
मस्तच ........ शेवट पर्यंत
मस्तच ........ शेवट पर्यंत उत्सुक्ता कशी ताणायची याचे अतिशय उत्तम उदाहरण ......अगदी शेवटचा एपिसोड पर्यंत ताणली गेली आहे.........
ज्याने पण स्क्रिप्ट लिहिले आहे.........अतिशय जबरदस्त लिहिले आहे..........
बरं एक सांगा, जय आदित्यला फोन
बरं एक सांगा, जय आदित्यला फोन देतो. त्या फोनमधे बॉम्ब असतो. तो बॉम्ब फुटून आदित्य सिंघानिया मेला असं रविन्द्रनला मीडीयामार्फत कळवतात. मग लगेच दहा पंधरा मिनीटात जय त्याला फोन करून सांगतो की आदित्य मेला वगैरे. मग रविन्द्रनला हा संशय का येत नाही की ज्या बॉम्बमुळे आदित्य मेला, त्याच बॉम्बच्या आजूबाजूला असलेला जय सिंग राठोड हातीपायी धड कसा? किमान काहीतरी इंज्युरी त्याला व्हायला हवी होती की नाही? बॉम्ब चांगला खिडकीतून आगीचे लो़ळ बाहेर येण्याइतका ताकदीचा होता.
अजून एक थीअरी: एलटीएफने आदित्यच्या वडलांना मारलेलं असतं, कदाचित नैना सिंघानिया तेव्हदेखील एल्टीएफबरोबर सामिल असू शकेल. कालच्या एपिसोडमधे ती जे काही बडबडली ते ऐकून संशयाची सुई तिच्याकडे पण फिरतेय.
क्या होता है देखेंगे आज रातको दस बजे हम लोग!!!!!
बॉम्ब चांगला खिडकीतून आगीचे
बॉम्ब चांगला खिडकीतून आगीचे लो़ळ बाहेर येण्याइतका ताकदीचा होता.>>>>>>>> बहुतेक बॉम्ब इतक्या ताकदीचा नव्हता..:अओ: कारण ज्या ठिकाणी जय फेकतो तो..इथे पडदे फर्निचर वगैरे जास्त होते आणि त्याला आग लागते म्हणुन आगिचा लोळ बाहेर पसरतो...
बहुतेक... जास्त माहीती नाही कारण मी नेटवर बघितला आज .. क्लिअर नव्हता
खूप दिवसांनी एवढी सुंदर,
खूप दिवसांनी एवढी सुंदर, ओघवती मालिका बघायला मिळाली. विक्रांत सांगत असतो आदित्यला कि तू समजतोस त्यापेक्षा खूप मोठा गेम आहे, तेव्हा दिव्या त्याला मारते म्हणजे दिव्या असण्याची शक्यता जास्त आहे. राजाची भूमिका केलेला नट कोण आहे? खूप सुंदर काम केले त्याने.
दिव्यावर मला जेव्हापासून
दिव्यावर मला जेव्हापासून विक्रांत इन्वॉल्व्ह आहे हे समजलय तेव्हापासून संशय आहे. तरीही... मी नैनाला आणि पृथ्वीला क्लीन चीट देऊ शकत नाहीये, गेल्या काही एपिसोडपासून. कालच्या एपिसोडपासून नैनावर जास्त संशय आहे मला.
@नंदिनी- मग रविन्द्रनला हा
@नंदिनी-
मग रविन्द्रनला हा संशय का येत नाही की ज्या बॉम्बमुळे आदित्य मेला, त्याच बॉम्बच्या आजूबाजूला असलेला जय सिंग राठोड हातीपायी धड कसा?
त्याला अशी शंका येते ना. तो जयला विचारतोसुद्धा- मांजरीला नऊ जन्म असतात, तुला नक्की किती आहेत?
आधी त्यांना असेच वाटते की दोघे मेलेत. त्यामुळे जयचा मुलगा रडतो वगैरे. आणि जयचा फोन आल्यावर ते दचकतात, जयचा मुलगा सुस्कारा सोडतो...
मी काय म्हणतोय......हा
मी काय म्हणतोय......हा पब्लिसिटी स्टंट आहे आदित्याचा.... तोच स्वतःवर हमले करुन घेतोय आनि एकेक सदस्याला कमी करत जातोय...
त्याला अशी शंका येते ना. तो
त्याला अशी शंका येते ना. तो जयला विचारतोसुद्धा- मांजरीला नऊ जन्म असतात, तुला नक्की किती आहेत? <<< अच्चा, मग नेमका मी तो डायलॉग मिस केला. या सीरीजसाठी जरा इकडे तिकडे पाहिलं की काहीतरी मिस होतं.
किशोर कदमचे काल टॉपक्लास आहे. पक्का तमिळी वाटतो तो. राजाचे काम करणारा कोणतरी बंगाली अॅक्टर आहे. नाव विसरले, पण त्याचंही काम आधीच्या एपिसोडपासून जबरदस्त आहे.
राजाचे काम करणारा बंगाली आहे
राजाचे काम करणारा बंगाली आहे का? ओके, मला वाटले साउथ इंडियन असेल म्हणून नंदिनी तुम्हाला कदाचित माहिती असेल? जयचा आवाज ऐकून किशोर कदमला धक्का बसतो आणि तो मांजरीचा डायलॉग म्हणतो.
आपण प्रमुख सूत्रधाराच्या जवळ जाऊनपण confuse आहोत शेवटपर्यंत, हेच मालिकेचे यश आहे.
राजाची भूमिका केलेला नट कोण
राजाची भूमिका केलेला नट कोण आहे? >>>
दिब्येंदु भट्टाचार्य.
प्राची धन्यवाद. सुंदर काम
प्राची धन्यवाद. सुंदर काम केले आहे दिब्येंदू याने.
रविन्द्रन आणि बाला, बालाच्या
रविन्द्रन आणि बाला, बालाच्या मृत्युआधी तामिळमधे काहीतरी बोलतात. आणखीही काही वेळा तामिळ संवाद आले आहेत. ते समजले नाहीत. असे संवाद सुरू असतांना हिंदी किंवा इंग्रजीत सबटायटल्स दाखवायला हवे होते, असे वाटते.
ज्ञानेश, मेरे अल्पमतीनुसार.
ज्ञानेश, मेरे अल्पमतीनुसार. रविन्द्रन बालाला "धीर धर. सगळं व्यवस्थित होइल; चिंता करू नकोस" असे सांगतो. बाला काय बोलला तेच मला ऐकू आलं नाही. पण सब टायटल्स द्यायला हवे होते. मागे राहुल खन्ना पण अचानक असा तमिळमधे बोलतो तेव्हापण नक्की काय बोलतो तेच समजले नव्हते. अर्थ समजणे लांब राहिले!!!
होना तमिळ संवाद ज्यांना तमिळ
होना तमिळ संवाद ज्यांना तमिळ येते त्यांनाच समजणार बाकीच्यांना नाही हे गृहीत धरून त्यांनी हिंदी किंवा इंग्रजी सबटायटल्स द्यायला हवी होती. मला फक्त पो पो असे किशोर कदम म्हणाला होता मागे तेच समजले.
दिव्या आहे
दिव्या आहे
मेरा शक सही निकला...
मेरा शक सही निकला...
दिव्याच!!!
येस दिव्याच. ती विक्रांतला
येस दिव्याच. ती विक्रांतला मारते तेव्हाच confirm होते तरी उत्कंठा होती. शेवटी बायकोपर्यंत जय पोचतो असे दाखवायला हवे होते, कर्तव्य बजावताना familyला जरा कमी महत्व दिले हे मुलाच्या मनात राहिले, तो स्वतः लष्करात असूनही त्याला वडिलांचे वागणे पटले नाही.
अन्जु >>+१
अन्जु >>+१
संपली मालिका. शेवटी
संपली मालिका.
शेवटी अनेकांच्या अंदाजानुसार दिव्याच मास्टरमाईंड ठरली. दिव्यापर्यंत पोहोचण्याची कामगिरी एटीएसकडून फार चाणाक्षपणे पार पाडली गेली. विशेषतः गच्चीवरच्या स्नायपरला जयने संपवले, तो सीक्वेन्स मला फार आवडला. काही किरकोळ मुद्दे सोडले तर एकूण मालिका आणि विशेषतः तिचा शेवट अतिशय नेटका आहे.
काही मुद्दे-
# एकीकडे चालणारे भावनिक नाट्य आणि दुसरीकडे अॅक्शन, सस्पेन्स यांचा तोल उत्तम साधला आहे. कुठेही बटबटीतपणा येऊ देण्याचे टाळले आहे.
# सिंघानिया परिवारात सगळे उत्तम अभिनेते आहेत. दिव्याला अटक झाल्यानंतर शेवटी आदित्यने नि:शब्दपणे एक सीन दिला, तो उच्च आहे. शब्दात काहीही न बोलता त्याचा चेहरा आणि डोळे बरेच बोलतात. आवडले.
# त्रिशाबद्दल दिग्दर्शकाने ठोस काही सांगीतलेले दिसत नाही.. काहीसा ओपन एंडेड शेवट आहे. म्हणजे मॉनिटरवर फ्लॅट लाईन आलेली दिसली, पण डॉक्टर अजून प्रयत्न करत आहेत, आणि जय अजून रस्त्यात आहे. पुढे काय झाले याचा निर्णय प्रेक्षकांवर सोडलेला दिसतो.
# किरणचा तो किडनॅपर मित्र (रोहन?) का पळून जातो याचा उलगडा झाला नाही.
एक आटोपशीर, नेमके कथानक असलेली, उत्तम अभिनेत्यांनी मनापासून साकारलेल्या भूमिकांनी सजलेली आणि दीर्घकाळ लक्षात राहिल अशी मालिका पाहण्याचे समाधान फार क्वचित लाभते. या मालिकेने नि:संशय तो आनंद दिला. धन्यवाद- कलर्स आणि अनिल कपूर !
किरणच्या मित्राबद्दलपण
किरणच्या मित्राबद्दलपण दाखवायला हवे होते.
विशेषतः गच्चीवरच्या स्नायपरला
विशेषतः गच्चीवरच्या स्नायपरला जयने संपवले, तो सीक्वेन्स मला फार आवडला. <<< खूप दिवसांनी एखादी हिंदी मालिका पाहताना "अरे काय भारी सुचलं याला" असं वाटलं हा सिन बघताना.
आदित्य आणि दिव्या सिंघानियाचं काम करणारे दोघंही खूप आवडले. सर्वात शेवटचा संवाद दिव्याने जितका खाल्ला, तितकाच आदित्यने कमीत कमी संवादात खाल्ला.
दिव्या जेव्हा मेघा सिंघानियाला ब्लॅकमेल करायला जाते तेव्हापासूनच ती पक्की राजकारणी असल्याचं समजतं. तो एक सीन सगळ्यात ग्रेट होता.
अतिशय उत्कंठावर्धक, सुंदर
अतिशय उत्कंठावर्धक, सुंदर अभिनय करणारे कलाकार, अशी हि मालिका संपली. मलापण तो तिसरा फोन जो घेईल तो मारेकरी असेल, हे जय म्हणाला ते एकदम एक्सायटिंग वाटले, शेवटपर्यंत ह्या मालिकेने गुंगवून ठेवले, काश अशाच कमी एपिसोड असणाऱ्या, इंटरेस्टिंग मालिका आल्या तर टीव्हीचे सुवर्णयुग येईल.
शेवटी बायकोपर्यंत जय पोचतो
शेवटी बायकोपर्यंत जय पोचतो असे दाखवायला हवे होते..+१
दिव्याच खरं रूप कळल्यावरही नैना सिन्घानियाला काही धक्का बसलेला, वाईट वाटलेलं वगैरे दिसलं नाही.
किती मख्खं चेहरा होता तिचा. मला वाटल ती पण सामील आहे का काय?
शेवटी आदित्यला ती दिव्याला पकडू नकोस सांगते ते पण लोक काय म्हणतील म्हणून फक्त, आई म्हणून नाही.
मला काही नाही आवडला शेवट
मला काही नाही आवडला शेवट
शेवटी अगदी बॉलीवूडपट झाला
२३ व्या एपिसोडचा शेवट मालिकेचा सर्वोच्च बिंदू होता .
अनेक कड्या जुळत नाहीत .
अवांतर : एवढ्यासाठी मी रोलिंगबाईना मानतो . गुंतागुंत निर्माण करणे सोपे असते , पण शेवटी ती उलगडणे महाकठीण
24च्या original versions मधे
24च्या original versions मधे पण असेच ओपन एंड्स आहेत. पुढचा सिझन येई पर्यंत उत्कंठा असते काय होणार अता ह्याची. ह्या मालिकेचं आणखीन एक युनिकनेस म्हणजे मूळ कथेला फॉलो करत पण इतकं सुंदर भारतीयकरण केलं की सगळे सिक्रेट्स माहीत असूनही नवीन धक्के बसत होते.
इंग्लिश वर्षन मध्ये पण बावरची (जय) बायको शेवटी मरते ते खूप लोकांना आवडले नव्हते. त्या बद्दल मालिकेच्या डायरेक्टरने डी.वी.डीच्या डायरेक्टर्स कट मध्ये स्पष्टीकरणही दिले होते. त्याने तीन वेगळे एन्ड्स शूट केले होते म्हणे त्यात हा एंड पूर्ण टीमला जास्त लॉजिकल वाटला होता.
आता पुढचा सिसन लवकर येईल २४चा अशी आशा करुया.
Pages