24 - मालिका

Submitted by उदयन.. on 7 October, 2013 - 05:44

नविन मालिका - २४

अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे

जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....

सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...

दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत

आता पर्यंतचे कथानक:-

जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...

जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...

घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...

पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...

भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी Wink ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...

अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...

-----------------

आता पुढे............

सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....

-----------------------

फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे............. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्य म्हणजे No One Killed Jessica मधला Jessica चा Boyfriend आहे.
काही काही Action sequence वगळता मालिका भारी आवडली.
सध्या TV वर जे काही सुरू आहे, त्यापेक्षा निश्चितच खुप उजवी आहे ही मालिका !

>>आता पुढचा सिसन लवकर येईल २४चा अशी आशा करुया<< +१

त्यात कदाचित तेज आपणहून माघार घेईल, जय आणि निकी चा लग्न होउन, त्यान्चे problem सुरू होतील.
त्याचा फायदा शत्रू घेतील. Happy

शेवटी बायकोपर्यंत जय पोचतो असे दाखवायला हवे होते, कर्तव्य बजावताना familyला जरा कमी महत्व दिले हे मुलाच्या मनात राहिले, तो स्वतः लष्करात असूनही त्याला वडिलांचे वागणे पटले नाही.>>>

ह्यामुळे मुलाचा राग आला आणि जयची खूप दया आली. बिचारा एवढी तडतड करूनही हरल्यासारखा वाटला Sad

दिव्याला तर पीएम हो म्हणत होतेच की.
मला तिचं लॉजिक कळालं नाही.
तिला लोकांचा सपोर्ट नाहिये आदित्य इतका म्हणुन का?

शनिवारी बाहेर गेलो होतो त्यामुळे पाहु नाही शकलो.
काहिसे ओपन एन्ड होतेच म्हणा.
पण सिरियल म्हणुन झेपेबल असं काही कधी आपल्या टिव्हीवर येइल असं वाटलं नव्हतं. Happy

बा द वे, अशा जॉनर मध्ये "वेन्सडे" चा डायरेक्टर / स्क्रिप्ट रायटर अजुन खतरा, जबरा, क्रिस्प, वेगवान अधिक बांधीव सिरियल देवु शकेल अस वाटतं.

दिव्याला तर पीएम हो म्हणत होतेच की.
मला तिचं लॉजिक कळालं नाही.<<< लिहू का?

दिव्याचे कॅरेक्टर पहिल्यापासून बघत यायला हवं यासाठी. सोबत नैना आणी आदित्यचंअपण.
आदित्य नुकता फॉरेनवरून शिक्षण घेऊन आलाय, आणि आल्यावर याच निवडणुकीमधे जिंकल्यावर लगेचच पीएम बनतोय. मागे आदित्यच्या वडलांचा झालेला खून पाहता त्यांच्या पार्टीला सहानुभूतीची लाट मिळालेली आहे. दिव्याचं लग्न तिच्या मर्जीविरूद्ध झालेलं आहे ती घटस्फोट घेऊ शकत नाही, कारण लोक काय म्हणतील याचीच चिंता आहे (तिच्या आईला!!!). निवडणुकीदरम्यान ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करते आणि त्याचा काहीतरी परिणाम होऊन ती परत आई बनू शकत नाही असा झालाय.

आदित्य तिला "माझ्यापेक्षा तूच पीएम बनायला लायक आहे" हे म्हणतो. म्हणतो. प्रत्यक्षत तिला पीएम होणार का म्हणूनपण कुणी विचारत नाही. नैना सिंघानियाचा आवडता आदित्य आहे. तिच्या सगळ्या महत्त्वाकांक्षा त्याच्याचभोवती केंद्रित झाल्या आहेत. प्रत्यक्षात आदित्य खूप naive आहे. राजकारण त्याला खरंच जमत नाही. त्याउलाट दिव्या परफेक्ट राजकारणी आहे. मेघा सिंघानियाला ती ब्लॅकेमल करते. शिवाय तिचं एकंदर व्यक्तीमत्त्व पण तिने "गरीब बिच्चारी सोशिक" असंच लोकांपुढे ठेवलय. निवडणूकीदरम्यान प्रचंड काम करूनदेखील आपण पीएम न होता आदित्य पीएम होणार म्हणून ती हा कट रचते. सोबत तिचा "गूड फॉर नथिंग" अशी इमेज असलेला नवरा तिला यामधे मदत करतो. पण तो आता खरं सांगेल म्हणून ती त्याला गोळ्या घालते. आणि इथून पुढे तिचं खरं स्वरूप लक्षात येत जातं.

शेवटच्या भागात काही वेळ संशयाचा काटा नैना सिंघानियाकडे वळवायचा प्रयत्न होता का? तिनेच ती तडकाफडकी प्रेस कॉन्फर्न्स आयोजित केली. दिव्यासारखेच तिचेही लक्ष मोबाईलकडे वळत होते.

आता मला एक सांगा : प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य वक्त्याचे स्वागत टाळ्या वाजवून केले जाते का?

शेवटच्या भागात काही वेळ संशयाचा काटा नैना सिंघानियाकडे वळवायचा प्रयत्न होता का? << शेवटच्या दोन भागात तसा प्रयत्न होता.

प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य वक्त्याचे स्वागत टाळ्या वाजवून केले जाते का?>>> बर्‍याचदा. राजकीय नेता असेल,. खूप मोठी व्यक्ती असेल तर नक्कीच.

पण तो आता खरं सांगेल म्हणून ती त्याला गोळ्या घालते. आणि इथून पुढे तिचं खरं स्वरूप लक्षात येत जातं>>> ती त्याला गोळ्या घालते तेव्हाच तिचा जास्त संशय आलेला.

बा द वे, अनिता राजची व्यक्तीरेखा डोक्यात जाणारी होती.
विशेषतः , आदित्य सिंघानिया मृत डिक्लेअर केलं त्यावेळच्या त्या दोघाचा संवाद पटला नाही.
तिच्या म्हणण्ञात जास्त लॉजिक वाटलं नाही.

बा द वे, एटिओ च्या ऑफिस मधुन कोण सामिल असतं?
काहितरी माहिती बाहेर गेलेली असते. ते कोणामुळे?
ते ही मंदिराच्या कॉम्प वरुन. (सुरवातीच्या काही भागात)
माझे काही भाग हुकल्याने लिन्क लागत नाही ती अशी.. Happy

'जिया' नाव होते तिचे. तिनेही आत्महत्या केली.
एकंदर बरेच बळी गेलेत या मालिकेत. Happy

@मयेकर-
आता मला एक सांगा : प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य वक्त्याचे स्वागत टाळ्या वाजवून केले जाते का?
आदित्य सिंघानियावर नुकताच खुनी हल्ला झालेला आहे, त्याच्या मृत्युची अफवा पसरली आहे, आणि अशात तो सुरक्षीत व्यासपीठावर येतांना दिसतो आहे.
या परिस्थितीचा विचार केला तर 'टाळ्या वाजवून स्वागत' अशक्य नाही.

चला. मस्त झाली मालिका.

जय असातसा नसून एटीयूचा चीफ आहे. त्याच्या या हुद्द्याचा, त्याच्यावर असलेल्या जबाबदारीचा मान कुटुंबाकडून मात्र राखला गेला नाही याचे वाईट वाटले. मुलांचं एकवेळ ठीक आहे. पण त्रिशाने बायको म्हणून त्याला काहीच सपोर्ट केला नाही. सारखे, तू कुठे आहेस आणि कधी येतोयेस?

ओपन एन्डेड शेवट मुद्दाम करतात. जेव्हा पुढचा सीझन येईल तेव्हा या शेवटापासून पुढे धागे जुळवत नेतात.

पुढच्या सिझन मधे बहुदा........... मुलगा त्याच्या पासुन दुरावनार

प्रेस कॉन्फरन्स शक्यतो बॅन्क्वेट हॉल मधे वैगरे व्हायला हवी ना? >> नॉट नेसेसरी. अशी आयत्या वे़ळची प्रेस कॉन्फरन्स ओपन जागेमधे देखील केली जाते. त्यात या न्युजसाठी आलेला मीडीया पाहता बॅक्वेट हॉल छोटा पडला असता म्हणून कदाचित बाहेर घेतली असावी.

पण त्रिशाने बायको म्हणून त्याला काहीच सपोर्ट केला नाही. सारखे, तू कुठे आहेस आणि कधी येतोयेस?<<< +१./

त्या दोघीजणी गॅरेजमधे असतात तेव्हा ती शांत डोक्याने निर्णय वगैरे घेताना दाखवली आहे पण सेफ हाऊसमधे आल्यावर निकिताना वाट्टेल तसे प्रश्न विचारून तिला तिथून जायला भाग पाडणं वगैरे अजिबात पटलं नाही. आपण जितक्या अडचणीत आहोत त्याहून जास्त मोठ्या अडचणीमधे आपला नवरा आहे हे तिने कधीच समजून घेताना दाखवलेलं नाही. सतत निकिता आणी जयवरून टोचून बोलणं (हे खूप आधीच्या भागात होतं) पण आवडलं नाही. त्यामानाने निकिता खूप प्रोफेशनल आणि कामाला महत्त्व देणारी वाटली. मंदिराबेदीने ते कामपण सुंदर केलंय. तिची एकंदर देहबोली आणि स्क्रीनवरचा वावर खूप सहज आणि "एटीयु एजंट" सारखा वाटला. तिच्या इतकं दुसरं कुणीही एजंट इतकं सहज काम करताना दिसला नाही (अनिल कपूर सोडल्यास) . तेज तर एकदम टोटल मिस्कास्ट वाटत होता. त्या कोरलेल्या भुवया तर इतक्या विचित्र दिसत होत्या.

जिया का?? ओक्के.
तीच जय ला सांगते की इन्फॉ मन्दीराच्या कॉम्प वरुन गेलीये.

प्लॉट मस्त होता.
उत्कन्ठावर्धक.. Happy

जयच्या मुलाचे मिलिटरीमधे असूनही वडीलांना समजून न घेण्याचे पटले नाही कारण तिथे शिकवतातचना की देशाला पहीले महत्व द्यायचे त्यामानाने मुलीला थोडी समज आल्यासारखी वाटले, पहिल्यांदा तीपण नाही समजून घेत.

काही साईट्स वर शोचे टी आर पी चांगले आहे असे आलेय.. काही साईट्स वर शो चे टी आर पी चांगले नाही असे आलेय. खरे काय? पुढचा सीझन असेल की नाही सांगता येत नाही. व्हायला हवा.

मी सगळे भाग रेकॉर्ड करून मालिका संपायला आली की रोज एकदोन असे पाहणार आहे. तोपर्यंत हा धागा मला दिसायला नको.

Pages