दिल्लीचे बलाबल या प्रमाणे
एकुण जागा ७०
बहुमताला आवश्यक ३६
भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.
अपक्ष २
पर्याय उपलब्ध्द
१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.
२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )
३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )
४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.
५) काँग्रेस - भाजप किंवा आआप च्या पाठींव्यावर सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )
६) अजुनही काही पर्याय
आपल्याला काय वाटते ? काय घडेल ?
वर लिहल्या प्रमाणे जसे चंद्र्शेखर यांचे सरकार चालले तसेही भारतीय राजकारणात घडु शकते. पण लगेचच निवडणुका हा पर्याय राजकारणी अवलंबत नाहीत. अल्पमतातल्या आणि बाहेरुन पाठींबा असलेल्या सरकार कडुन काही अपेक्षीत कामे करुन घेणारी एक लॉबी तेव्हा सक्रीय होते.
चर्चा करुयात. वितंडवात नको. अॅड्मीन चा हस्तक्षेप तर नकोच नको.
अल्पना, मला तुमचा पहिला पॅरा
अल्पना, मला तुमचा पहिला पॅरा आणि दुसर्याची सुरुवात पटली व तेवढ्यावरच हा प्रतिसाद लिहीत आहे. खरेच एके ठिकाणी नंदिनी व मी म्हणालो तसे भाजपने आपला पाठिंबा द्यावा, ती एक गेमही ठरेलच, ते वेगळे.
प्रामाणिकपणे असे वाटत आहे की
प्रामाणिकपणे असे वाटत आहे की जर दिल्लीत भाजप किंवा आप ने सरकार स्थापायचे प्रयत्न केले नाहीत आणि निवडणुका पुन्हा घ्यायची वेळ आली तर पब्लिक सरळ काँग्रेसला मते देऊन मोकळे होईल. >>.
नाही उलट लोक म्हणत आहेत आप चे उमेदवार निवडून येतिल की नाही या भितीने त्यांना मत दिलं नव्हतं. परत मतदान झालं तर आप लाच निवडून देवू. काँग्रेसचा मुस्लिम वोटर पण फेरनिवडणूकांमध्ये आप च्या बाजूने जाईल असं वाटतंय.
नाही उलट लोक म्हणत आहेत आप चे
नाही उलट लोक म्हणत आहेत आप चे उमेदवार निवडून येतिल की नाही या भितीने त्यांना मत दिलं नव्हतं. परत मतदान झालं तर आप लाच निवडून देवू. काँग्रेसचा मुस्लिम वोटर पण फेरनिवडणूकांमध्ये आप च्या बाजूने जाईल असं वाटतंय.<<< ओके
खरेच एके ठिकाणी नंदिनी व मी
खरेच एके ठिकाणी नंदिनी व मी म्हणालो तसे भाजपने आपला पाठिंबा द्यावा, ती एक गेमही ठरेलच, ते वेगळे. >>> हा ही एक ऑप्शन आहे.
मला खरं तर भाजपाबद्दल दिल्ली बाबतित वाईट वाटतंय. महागाई आणि भ्रष्टाचारामूळे सध्या काँग्रेस विरोधी मत होतं बर्यापैकी. अगदी त्यांनी (शीला दिक्षित सरकारने) इथे दिल्लीत भरपूर विकासकामं केली असली तरीही काँग्रेसला फेवरेबल वातावरण नक्कीच नव्हतं. भाजपाने कामही खूप केलं होतं. २०१२ च्या एमसीडी एलेक्शन्स मध्ये भाजपाचंच राज्य आलं ना तिन्ही झोनमध्ये मनपात. पण आम आदमी पार्टी अचानक आली आणि यांचं नुकसान करुन गेली.
होय हे अगदी खर आहे. आआप नसता
होय हे अगदी खर आहे. आआप नसता तर भाजपला निर्विवाद बहुमत नक्की मिळाले असते.
ऐनवेळी येऊन फार काहीही न करता यश, श्रेय घेऊन जाणार्या लोकांचा फार राग येत आहे.
<<<होय हे अगदी खर आहे. आआप
<<<होय हे अगदी खर आहे. आआप नसता तर भाजपला निर्विवाद बहुमत नक्की मिळाले असते.
ऐनवेळी येऊन फार काहीही न करता यश, श्रेय घेऊन जाणार्या लोकांचा फार राग येत आहे.>>>
बाकीच्यांनी गेल्या ५० वर्षांत अपेक्षित काही केले नाही म्हणून तर आआप आली.
ऐनवेळी येऊन फार काहीही न करता
ऐनवेळी येऊन फार काहीही न करता यश, श्रेय घेऊन जाणार्या लोकांचा फार राग येत आहे. >> मला राग -बिग येत नाहीये अजिबात. भाजपा ऐवजी मतदारांनी आपला निवडलं कारण त्यांच्या मते त्यांना बेटर चॉइस मिळाला. याचाच अर्थ आप नसताना जर भाजपाला निवडलं असतं लोकांनी तर ते बहूतेक दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानेच.
अल्पना अनुमोदन तुझी वरची
अल्पना अनुमोदन तुझी वरची पोस्ट एकदम मस्तच.
कॉंग्रेसने गाशा गुंडाळावाच आता.
अल्पनाचा एक विचार मला पटला
अल्पनाचा एक विचार मला पटला आणि महत्वाचा वाटला की आआपा चे उमेदवार निवडून येतील की नाही, या भितिपोटी मतदारांनी भाजपा ला मतं टाकली आता जर निवडनूक झाली तर आआपा ला बहुमत नक्कीच मिळेल अर्थात आपले हे तर्क आहेत, असंच होईल असं काही नाही.
-दिलीप बिरुटे
अर्थात आपले हे तर्क आहेत,
अर्थात आपले हे तर्क आहेत, असंच होईल असं काही नाही. >>> हो हे तर्कच. ऐनवेळी पाच-सहा महिन्यांमध्ये अजून काय काय बदल घडतिल कोण जाणे.
कालपासून आजुबाजुला /बाजारात बर्याच जणांशी रिझल्टबद्दल बोलणं होतंय. कामवाल्या बाया, जमादार, भाजीवाला, पार्लमधल्या मुली, हेअरड्रेसर, किराणा दुकानदार वगैरेंशी. यातल्या बहूतांशी लोकांनी आप ला यावेळी मत दिलं नव्हतं (काँग्रेस ला दिलेले जास्त होते.. लॉयल ) पण आप ला मिळालेल्या यशामूळे ते खुश होते. पुढच्या वेळी झाडुलाच देणार मत म्हणत होते.
निवडणुका म्हणजे एक अत्यंत
निवडणुका म्हणजे एक अत्यंत खर्चिक काम आहे. आप ला आम आदमीची इतकी चिंता असेल तर त्यांनी आम आदमीच्या खिशाला चाट लावणारी अजून एक निवडणूक टाळावी.
अजून एक भीती म्हणजे लोक निराश होऊन पुन्हा काँग्रेसकडे वळले तर काय? एखादे नव्याने लावलेले रोपटे फळे, फुले येण्याआधीच पाण्याअभावी मरून जावे असे आपचे व्हायला नको.
Arvind Kejriwal has clearly
Arvind Kejriwal has clearly ruled out supporting either the BJP or the Congress in Delhi, but his senior party colleague Prashant Bhushan today told NDTV that the Aam Aadmi Party can consider issue-based support to the BJP if it meets certain conditions. Mr Bhushan also said this was his view which had not yet been discussed in the party but that it was something his party could consider. He says the BJP should agree to - in writing - about passing the Jan Lokpal Bill on December 29 and setting up jan sabhas as promised by AAP in its election manifesto.
हं. आप सोबत लोकांची अवस्था धरलं तर चावतंय अशी होणार आहे. पाठिंबा घेतला तर आणखी एक जयललिता प्रकरण होणार असे दिसते. (मग उदयन ला परत बघा सरकार २०च दिवसं टिकलं अशी संधी पण मिळेल. )
>>होय हे अगदी खर आहे. आआप
>>होय हे अगदी खर आहे. आआप नसता तर भाजपला निर्विवाद बहुमत नक्की मिळाले असते. <<
"मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर" अशी काहीसी अवस्था भाजपाची दिल्लीत झालेली आहे…
आआपा तर "पांचो उंगली घी मे और सर कढाई मे" या परिस्थितीत आहे कारण बहुमत नसल्याने सरकार स्थापण्याची घटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर नाही आणि सरकार स्थापायचे नाही म्हणजे जाहीरनाम्यात केलेली अवाजवी आश्वासनं पाळायची डायरेक्ट नैतिक जबाबदारीही नाहि.
आआपाला खरोखर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू हा आत्मविश्वास असेल आणि जनतेचा पैसा वाचवायचा (फेर निवडणुका टाळुन) असेल तर त्यांनी भाजपा किंवा कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवावे.
हे बघा आप चे काय चालले
हे बघा आप चे काय चालले आहे
'आप'च्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विरोधात पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
इंटरेस्टिंग चर्चा. सर्वजण नीट
इंटरेस्टिंग चर्चा. सर्वजण नीट चर्चा करत आहात त्याबद्दल थँक्स, नाहीतर इतर काही अशा धाग्यांवर वेडेपणा चाललेला असायचा, म्हणुन वाचावेसे वाटायचे नाही.
असो, लक्ष व उत्सुकता आहे काय होणार त्यावर.
फेर निवडणुकांच्या खर्चाबाबत
फेर निवडणुकांच्या खर्चाबाबत सकाळी एन डी टी व्ही च्या चर्चवर आआप चे नेते म्हणाले की सरकारला एका निवडणुकीत १०० कोटी रुपये खर्च आला तरी जर सरकार अस्थीर असेल आणि जर एका वर्षाच दिल्ली राज्य सरकारच चाळीस हजार कोटीच असेल तर त्यात भ्रष्टाचार झाला तर जे नुकसान होईल त्यापेक्षा हे १०० कोटी कमीच असतील.
prathamach asa zalay ki
prathamach asa zalay ki konihi sarkar sthapane sathi utsuk nahiye. bahutek nivadnuka parat hotil ani tashya tya zalya tar aap la sandhi milel, karan atta suddha 3-4 jaganvar tyanche umedvar padale te atyant alpa farakane padale ahet
फेर निवडणुकीतहि निर्णायक
फेर निवडणुकीतहि निर्णायक बहुमत मिळालं नाहि तर आआपाला बहुमत मिळेपर्यंत निवडणुका घेत रहाणार का?
आज आपला मिळालेली मतं ही
आज आपला मिळालेली मतं ही महागाई व काँग्रेस वरील राग याचा परिणाम होय. आप बद्दल विश्वास वाटला म्हणून नव्हे तर काँग्रेस बद्दल पराकोटीच्या संतापातून काँग्रेस विरोधी मतदान झाले. आप हवा यापेक्षा 'काँग्रेस नको' ही भावना त्यामागे होती. थोडक्यात, नकार मुल्यावर झालेले हे मतदान होते. पण फेरमतदान झालेच तर मधे किमान सहा महिन्याचा काळ लोटेल. तोवर राग व संताप ओसरलेला असेल. मधल्या काळात काँग्रेसही काही चाली खेळणार, काम करणार. त्याचा एकुण परिणाम म्हणून हा रोस अजुन कमी होईल. आणि काही प्रमाणात का असेना पण मतदान काँग्रेसकडे फिरण्याची शक्यता वाढेल...!
कारण राग ओसरल्यावर होणारे मतदान हे नकार मुल्यावर नसेल.
आजचे मतदान हे रागाच्या भारातले असून "अमूक एक नको" या मानसिकतेतून झाले. सहा महिन्यानी मतदान झाल्यास परिस्थिती वेगळी असेल. दोन निवडणूकांमध्ये हा महत्वाचा फरक असेल.
आम आदमी पार्टीच्या
आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न
(१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का?
(२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत?
(३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे?
(४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे?
(५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार?
(६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा?
(७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?
(८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत?
(९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले?
(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का?
(११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का?
(१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण?
(१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे.
(१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का?
(१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय?
(१६) सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांनी अतिरिक्त पगार परत केला. त्यांनी बेकायदेशीररित्या जास्त पगार ढापला नव्हता तर त्यांनी तो जास्तीचा पगार परत का केला?
(१७) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे
या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असुनही दिली नाहीस तर तुझ्याच डोक्याची --- --- ---
चर्चा जरा भरकटत चालली आहे अस
चर्चा जरा भरकटत चालली आहे अस दिसतय. मुळ मुद्यावर येऊयात.
गप्पिष्ठ, १६ नं. -- सरकारी
गप्पिष्ठ, १६ नं. -- सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता >>> एक शंका -- जास्त पगार म्हणजे काय? नोकरी कुठलीही असो. पगार हा ठरलेलाच असतो ना? जास्त मिळतात त्याला बोनस, वरकमाई, टेबलाखालूनचे इ. इ. म्हणतात ना? आणि अर्थातच ते बिनहिशोबी असतात त्यामुळे परत मागण्याचा वा परत करण्याचा प्रश्न निर्माण व्हायलाच नको.
वरील प्रश्न वाचण्याआधीच केजरीवालांची बरखा दत्त यांनी घेतलेली मुलाखत पाहिली. स्वतःलाच "मेरी औकात ही क्या है?" इ. बोलणारा हा माणूस नम्र न वाटता याच्या टोपीखाली बरंच काही दडलं आहे अशी शंकाच जास्त आली. मलाच नव्हे तर सध्याच्या भारताच्या राजकारणातली फारशी माहिती नसलेल्या माझ्या नवर्याला पण. त्यामुळे त्यांचे यश हे "बिगीनर्स लक" वाटते.
माझ्या एका बी जे पी समर्थक
माझ्या एका बी जे पी समर्थक मित्राची केजरीवाल बद्दल ची कॉमेण्ट .... कोंग्रेस च शिंकं तुटल अन या बोक्याच फावल !! मला दोन मांजर , माकड व लोण्याच्या गोळ्याची गोष्ट आठवली. पण दिल्लीतला तराजू जरा वेगळाच निघाला.
बीजेपी आणि कॉग्रेस ने एकत्र
बीजेपी आणि कॉग्रेस ने एकत्र येऊन सरकार स्थापावे आणि आआप ने विरोधी पक्ष बनावे!
काँग्रेस विनाट आपापा ला
काँग्रेस विनाट आपापा ला समर्थन देत आहे, आआपाची गोची होत आहे. सत्ता स्थापना करावी की निवडणूकीला सामोरं जावं. सत्तातरांचा खेळ मोठा गमतीदार होणार आहे, आपण पाहात राहू.
-दिलीपा बिरुटे
आप चे आमदार कोली यांनी पराभूत
आप चे आमदार कोली यांनी पराभूत काँग्रेस आमदाराच्या घरात दारूच्या बाटल्या फेकल्या
आआपाला सर्मथन द्यायला
आआपाला सर्मथन द्यायला काँग्रेसने अजुनही मन बनवल नाही,
काँग्रेस मधिल काही वरिष्ठ नेत्यांनी पक्ष श्रेष्ठीच मन ह्या साठी वळवु अस सांगीतलय.
आआप काही कोणाच्याही पाठीब्यहीवर सत्त्येत येणास तयार नाही, कोणीही काहीही म्हणो आआप ने
जनतेला दिलेला कौल पाळायच ठरवल आहे. १०० कोटी फेर निवडणुकीत गेले तरीही चालतील.
ह्या तिढ्याने बर्याच गोष्टी समोर आल्यात.
१. बिजेपी सत्ता बनवायला तयार नाही. घोडाबाजार करण्यास ईच्छुक नाही.
२. काँग्रेस आआपला सर्मथन देण्यास तयार नाही.
३ आआप सर्मथन घेण्यास तयार नाही.
४. आता फेर निवडणुकीत काय होणार याची काळजी काँग्रेस व बिजेपीला सतावणारच.
५. जनते समोर सर्वच पार्टी आपापल्या प्रतिमा डागाळू नये याची काळजी घेताना दिसताहेत.
आआप च्या निवड णुक रिंगणात उ तरल्याने ह्या सर्व गोष्टी घडल्यात हे मान्य करायला कोणाची
हरकत असु नये.
२. काँग्रेस आआपला सर्मथन
२. काँग्रेस आआपला सर्मथन देण्यास तयार नाही.??
<<
आप सत्तेच्या कात्रीत
(11-12-2013 : 01:34:35)
दिल्लीतील त्रांगडे : काँग्रेसची बिनशर्त पाठिंब्याची तयारी
भाजप आणि आप दोघे ही आता सरकार
भाजप आणि आप दोघे ही आता सरकार बनवणार नाही....
एक तर दोघांनी अवाजवी आश्वासन दिली आहेत ती त्यांना बिल्कुल पुर्ण करता येणार नाही तसेच.. ६ महिन्यावर लोकसभेच्या महत्वाच्या निवडनुका आहेत .. त्यामुळे ६ महिन्यात अवाजवी आश्वासने पुर्ण करता आली नाहीत तर भाजपा आणि आप दोघांना भारी जाणार आहे...... त्यामुळे लोकसभेची निवडणुका झाल्यानंतर मग निवडणुका झाल्या तर तेव्हा जर का परत बहुमत मिळाले नाही तर भाजपा अणि आप दोघे एकत्र येतील..मग ती अवाजवी आश्वासने पुर्ण नाही झाली तरी जनतेला विचारते कोण ? ...
जर केंद्रात भाजपाची सरकार आली आणि दिल्लीत आप ला बहुमत मिळाले .. तर अवाजवी आश्वासन पुर्ण झाल्या नाहीत तर आप त्याचे खापर केंद्राच्या सरकार वर फोडणार....केंद्राने यांव केले त्यांव केले त्यामुळे आम्हाला हे हे करता आले नाही......
तसेच केंद्रात भाजपा व्यक्तिरिक्त सरकार आले .....आणि दिल्लीत भाजपाचे ...तेव्हा सुध्दा हेच करणार आहे..
कारण आजकाल फॅशनच झाली आहे......काही झाले तर राज्याच्या सरकार वर नाही केंद्राच्या सरकार वर खापर फोडायचे......स्वतः नाममात्र राहायचे...हे भाजपाचे धोरणच आहे आधी पासुन.. चांगले केले की आमच्या सरकार ने केले....वाईट झाले की केंद्राने निधी अपुरा दिला दुजभाव करते ...असे बोंबलायचे......
विकास झाला तो काय राज्याच्या पैश्यातुन झाला का ? केंद्राने सुद्धा मदत केलेली होतीच ना,,,,,,,
कमी झाला तर पैसा दिला नाही केंद्राने म्हणुन बोंबा मारायच्या.. ? म्हणजे केंद्राने मदत केली तरच तुम्ही विकास करु शकलात ना हेच सिद्ध होते......
Pages