'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
(No subject)
भाउकाका.. हे सगळ्या
भाउकाका.. हे सगळ्या मालिकेच्या सगळ्या सिनिअर कलाकारांना लागु होईल
मी फक्त उका साठी बघतेय ..
भाऊ काका मोहन अगाशे आणि
भाऊ काका
मोहन अगाशे आणि मोहन जोशी...
कालचा भाग 'आवरा' होता! भाऊ,
कालचा भाग 'आवरा' होता! भाऊ, अगदी परफेक्ट
मोहन आगाशे, मोहन जोशी,
मोहन आगाशे, मोहन जोशी, शुभांगी गोखले, शुभा खोटे .. कुणीही गायब होवू शकते मधुनच. मालिका ठिकठाकच आहे. ए ल दु गो च्या जवळपाससुद्धा नाही.
पण फक्त आणि फक्त उ का साठी बघते
<< कुणीही गायब होवू शकते
<< कुणीही गायब होवू शकते मधुनच >> खरंय. जसं 'दुर्वा' मधून विनय आपटे, ' राधाही...'मधून तुषार दळवी ....... ......... !!! मालिका लेखकांच्या क्रिएटिव्हीटीला प्रचंड वाव !!!!!
शुभा खोटे पण जरा बोरच
शुभा खोटे पण जरा बोरच
शुभा खोटेच काय, उ का,
शुभा खोटेच काय, उ का, स्पृहाची मैत्रिण आणि थोड्याफार प्रमाणात स्पृहा सोडले तर एकजात सगळे बोअर करतात. एकूण कथाच गंडलेली आहे. वाट्टेल ते चालले आहे. उ का च्या घराची धर्मशाळा झालेली आहे.
<< शुभा खोटे पण जरा बोरच >>
<< शुभा खोटे पण जरा बोरच >>
भाऊकाका
भाऊकाका
ती अनिता दाते इशा ची मैत्रिण
ती अनिता दाते इशा ची मैत्रिण आहे ना...ती राणी मुखर्जी च्या अय्या मधे राणीच्या मैत्रिणीच्या भुमिकेत पाहिली होती...ती तिथे का आणि कशी गेली हे कळ्ळ नाही......पण यात तिला पाहिली तेव्हा ती बरी दिसते हे समजलं...बाकी तिला त्या एलदुगोतल्या राधा सारखे ड्रेस का दिलेत???
इशा चा वॉर्ड्रोब बंडल......अगदी तिच्या त्या निळ्या पिवळ्या नाईट ड्रेस पासुन....
इशा चा वॉर्ड्रोब बंडल..+१
इशा चा वॉर्ड्रोब बंडल..+१
सुरुवातीला कंटाळवाणी वाटलेली
सुरुवातीला कंटाळवाणी वाटलेली ही मालिका आता आवडू लागली आहे. कालच एपिसोड तर भन्नाट होता. उमेश कामत त्याच्या नावाला साजेसा अभिनय करतोय पण आधी आवडणारी स्पृहा ह्या मालिकेत मात्र अगदीच सुमार वाटतेय. तिच्यापेक्षा तिची रुममेट मस्त अभिनय करतेय.
ओमच्या घरात latest add झालेली मेंबर आहे ती अभिनेत्री कोण आहे? आधी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटतेय.
पण निव्वळ प्रपोज करणं या
पण निव्वळ प्रपोज करणं या गोष्टीसाठी अख्खे दोन एपिसोडस वाया.
आधीच्या एपिसोडात स्पृहाबाईंनी विविध पद्धतिने लाजून दाखवले आणि काल उमेश कामतने आपण किती बावळट याचे अनेक पुरावे. शेवटच्या ४-२ मिनिटात प्रपोजल उरकले. आज पासून प्रेमकहाणी सुरू.
गंगेत घोडं न्हायलं
गंगेत घोडं न्हायलं एकदाचं!!!!
कस्लं काय? अजून बरीच घोंगडी
कस्लं काय? अजून बरीच घोंगडी आहेत.
काल उका लई म्हणजे लईच आवडला.
काल उका लई म्हणजे लईच आवडला. काश स्प्रुहाके जगह पे मय होती
उमेश कामत गोऽड आहे स्पृहा
उमेश कामत गोऽड आहे
स्पृहा खरंतर मस्तच अभिनय करते. या सिरियलीत का कोण जाणे तिची छाप पडत नाहीये. किंवा उकासमोर ती फिकी पडते आहे तिची हेअरस्टाईल मात्र सही आहे. मस्त दिसतोय तिला तो कट आणि ती कॅरीही छान करतेय.
सस्मित +१. बाकी सिरिअलला
सस्मित +१.
बाकी सिरिअलला काहीही अर्थ नाहीये.
स्पृहा चा मेक अप हेवी का आहे?
स्पृहा चा मेक अप हेवी का आहे?
तिची हेअरस्टाईल मात्र सही
तिची हेअरस्टाईल मात्र सही आहे. मस्त दिसतोय तिला तो कट >>++१११
मी ही सिरियल बघत नाही. सहजच
मी ही सिरियल बघत नाही. सहजच एक भाग बघितला मध्ये. उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे ? तिने बालकलाकार म्हणून काम केलंय का आधी ? का कुणास ठाऊक, 'गोट्या' मालिकेतली सुमाच आठवली तिला पाहून
उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं
उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे ?>>>>>> माहित नाही.
उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं
उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे ?>>>तिने मि. तेंडुलकर मध्ये कामवालीची भूमिका केली होती.
फायनली मालिका "सजन रे.." च्या
फायनली मालिका "सजन रे.." च्या मार्गाला लागली म्हणायची..
उकाच्या ( खोट्या ) बहिणीचं काम करणारी अभिनेत्री कोण आहे ?
>> ती "पितृऋण"च्या प्रिमिअरला शो ला पण दिसली होती.
आला आला, इथेही गोडाचा शिरा..
आला आला, इथेही गोडाचा शिरा..
एलतिगोचे कपडेपट
एलतिगोचे कपडेपट सांभाळणार्याला/रिला सलाम आहे. काय कपडे आहहा
आला आला, इथेही गोडाचा शिरा..
आला आला, इथेही गोडाचा शिरा.. >> सध्या पेटंट आहे वाटतं झी कडे शिर्याचं
एलतिगोचे कपडेपट
एलतिगोचे कपडेपट सांभाळणार्याला/रिला सलाम आहे. काय कपडे आहहा >> +१
त्या ईशाला तर एकच जांभळी सलवार दिली आहे.. कुठली सापडेल ती कमीज त्याच सलवार वर
त्या खोट्या प्लम्प बहिणीला ही
त्या खोट्या प्लम्प बहिणीला ही अगदी विचित्र कपडे दिलेत
त्यातल्या त्याक उकाचे कपडे काय ते बरे आहेत. किंवा तो दिसतो चांगला म्हणून त्याला ते चांगले दिसतात.
मला एक प्रश्न पडतो. हे सगळे याच्या घरी राहतात... त्यांचं खाणं पिणं, घर खर्च, याची खर्चिक विभागणी आणि काष्टिक विभागणी ते कशी करत असतील? आणि उकाचं घर त्याचं स्वतःचं आहे का? यावरून एखाद्या शिरेलित कधीच भांण्णं दाखवली नाहित. ती कशे काय?
एकत्र कुटूम्बात तर हा मुद्दा मेन असतो भाण्णाचा.
Pages