लहान मुलांसाठी नाश्त्याचे पदार्थ सुचवा

Submitted by तनू on 19 November, 2013 - 01:31

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याच्या नर्सरी ची वेळ सकाळी ९-११. मी पण ऑफिससाठी ९ वाजताच निघते. सकाळी जायच्या आधी त्याला जे काही भरवणार त्यावरच तो १२.३०-१ वाजेपर्यंत असतो. शाळेतून परत आल्यावर तो काही खात नाही. आता तरी मी त्याला शेवयाची खीर/उपमा, ओट्स, maggi हेच देते.

त्यामुळे मुलाला सकाळी भरवण्यासाठी पोटभरीचे आणि लवकर होतील असे पदार्थ सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मऊभात/ वरणभात
निरनिराळ्या भाज्यांचे पराठे+लोणी/ चटणी/ सॉस
जॅम/ तुपसाखर पोळीचा रोल, आवडत असेल तर तूप आणि लसूण चटणी/ कढीपत्त्याच्या चटणीचा रोल पोळीभाजीचा रोल सगळ्यात बेस्ट
घावन/ धिरडी/ थालिपीठ
डोसे/ उत्तप्पा/ इडली
आप्पे
ब्रेड बटर जॅम/ चटणी/ सॉस/ चीजस्लाईस
शिरा, सांजा, उपमा, पोहे, खिचडी, उकड, मोकळ भाजणी
शेवयांचा उपमा
रव्याची खीर
निरनिराळ्या भाज्यांचे पॅटीस/ कटलेट

..

विविध पालेभाज्या निवडल्या की त्या मिक्सरमधून काढायच्या आणि थोडं पाणि घालायचं. ते पुर्ण हिरवंगार मिश्रण कणिकेत ओतून त्यात जिरा पावडर, मीठ, असं सामान घालून थेट मळून पोळी टाईप करायचं तूप लावून सोबत सॉस द्यायचं. बीटाचा पण असा पराठा करू शकतो.

बारीक दलीयाचा गोड किंवा तूप-जिरे आणि मिरपूड,लसूण, वेगवेगळ्या भाज्या (चालत असल्यास तिखट) घातलेला शिरा.

केळं, चिक्कू, सफरचंद यांसारखी फळे नाश्त्यात देता येतील. केळ्याने पोट भरते बर्‍यापैकी. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून मीठ-मिरपूड लावून देता येतील.

इडलीचे अनेक प्रकार : रवा इडली, ओट्स इडली, वर्‍याच्या तांदळाची इडली, कांचीपुरम इडली, नेहमीची इडली, भाज्या घालून इडली, शेवईची इडली, इडली फ्राय (सोबत चटणी, सॉस, सांबार, लोणी, तूप, दही, चीज स्प्रेड इ. पैकी हवे ते)

नाचणीची / रव्याची / तांदळाची / दलियाची/ मूगडाळीची / शेवयांची खीर / पायसम् / गाजराची खीर .... आणखी कोणत्या खिरी माहिती असल्यास...

भोपळ्याचे घारगे

फ्रेंच टोस्ट, बेसन टोस्ट, बनाना ब्रेड. ब्रेडचा उपमा.

वेगवेगळे पौष्टिक लाडू (कणकेचा / डाळ्याचा / बेसनाचा / रव्याचा / सातूचा / अळीवाचा / नाचणीचा / तिळाचा / दाण्याचा / राजगिर्‍याचा लाडू इ.इ. सीझनप्रमाणे) पोळीचा लाडू/ चुरमा किंवा गूळ-तूप-पोळी / मुरांबा - साखरांबा-अननसांबा पोळी. रवा-रोटी. रुमझुम.

आंब्याचा / अननसाचा / सत्यनारायणाचा / कणकेचा शिरा. गुळाचा शिरा.

http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/256

http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/288

माझा अनुभवावरुन सान्गते ३ yr olds ना तुम्ही जे खाता breakfast ला तेच त्याला द्या ani keep it simple. e.g.

  • boiled egg (तूप लाऊन)/ओमलेट + दूध - २ times a week
  • रात्रीची dry भाजी (spinach, broccoli, kobi,etc) + थोडा cheese पोळीत घालून तव्यावर roll/quesadilla...वेळ असेल तर भाजी stuff करुन लाटू ही शकता. + दूध
  • शीरा/ गाजर मटार उपमा/ नाचणीच सत्व/ टोमाटो ओमलेट/ multi grain धिरडी + दूध

मी सकाळी ५.०५ ला घर सोडते त्यामुळे हे पदार्थ (except ओमलेट) आदल्या रात्रीच बनवून ठेवते...मी आधी gym गाठते मग तिथेच तयारहून पुधे ६.३० ला office ला पोचते तर माझ्या पोटात पण आग पड्लेली अस्ते आणि हाच breakfast मी ही खाते. नवरा मुलीला breakfast गरम करुन घालतो. या सगळ्याला थोड pre-planning ani prepping लागत.

कधीतरी माझ routine/cycle गन्डते आणि त्या दिवशी आम्ही oatmeal + दूध खातो.

लहान मुलांना ओट्स देऊ नये. शक्यतो कॉर्नफ्लेक्स सुद्धा देउ नये. बर्‍याच कॉर्नफ्लेक्समध्ये सोडा असतो

रश्मीला अनुमोदन. मॅगी ऐवजी डाळढोकळी / वरणफळं दे. मस्त पोटभरू. वरणात पोळीचे तुकडे घालण्याऐवजी, ज्वारीच्या शेवया (बनवून ठेवायच्या, कडक उन्हात सुकवून किंवा विकत मिळतात- पुण्यात तर नक्कीच) घालून - काहीतरी वेगळं.

ज्वारीच्या रव्याचा उपमा, थोड्या भाज्या घालून.

अंडे खात असाल तर ब्रेडऐवजी पोळीला अंड्यात बुडवून फ्रेंच टोस्ट्सारखं. किंवा शिजलेल्या पोळीचे तुकडे करून ते अंड्यात व्हिस्क थोडा टोमेटो सॉस घालून करून त्याचं ऑम्लेट. मस्त फुगतं मुलांना आवडतं केक सारखं वाटतं.

सर्वाना धन्स
आधी मॅगी बन्द करा>> अगं रश्मी मॅगी कधी तरीच देते, २ आठवड्यातून एकदा.
वल्लरी ओट्स न देण्याच कारण काय? इथे मायबोलीवर वाचूनच मी ते आणले आहेत.
आणि BS सकाळी ५ ला निघून पण सर्व एवढ व्यवस्थित करतेस म्हणजे मी जर जास्तच आळशी आहे असा मला आता वाटायला लागलय

ओट्स मोठ्यांनी खुशाल खावं, नव्हे खावच, कोलेस्टेरॉल कमी करतं , वजन कमी करतं आणि ह्याच कारणासाठी मुलांना देऊ नये.. - माझ्या मुलाचं वजन दोन आठवड्यात एक किलो उतरलं होतं. का उतरलं ह्याचा विचार करता करता लक्शात आलं बाबा जे खातो ते मी खाणार ह्या नादात तो दोन आठवडे दूध ओट्स खात होता. मग डॉ. नी झापलं मस्त..

अवंतीका मुलगा शाळेतुन आल्यावर काहीच का खात नाही? म्हणजे तो तू दिलेल्या नाश्त्यावरच रहातो? तू नोकरी करतेस म्हणजे तो पाळणाघरात आहे की घरात तुझे सासु सासरे त्याला बघतात्?:अओ: सॉरी अवांतर प्रश्नाबद्दल. मग तो काय जेवतो? जरा पूर्ण वेळापत्रक लिही की.

माझ्या मुलांना मी शाळेत जाण्या आधी नाश्ता म्हणून उकडलेले १ अंडे व दूध, पोहे +कपभर दूध ( प्रत्येक पदार्थाबरोबर दूध देतेच), सांजा/ उपमा, पोळी तुप असे आलटुन पालटुन देते. मुलांचा डबे खाण्याचा आनंदच आहे. बाकी त्यांना डोसे, इडल्या हे आवडत नाही. गोड पण आवडत नाहीच. फक्त दुधाबरोबर बिस्कीटे खातात.

आल्यावर जेवतांना वरण/ आमटी भात, कुठलीही पालेभाजी किंवा फळभाजी व सॅलेड असे जेवणात असते. मधून मधून फळे, चिवडा वगैरे असते.

दक्षिणा तू वर जे पराठे लिहीलेस ना तसेच मी करते. काही वेळेस त्यात मिक्सरमध्ये प्युरी करतांना टॉमेटो, लसुण, कोथिंबीर पण टाकते. कोबी पण घालते. मिर्चीचा एखादा बारीक तुकडा टाकला तरी चव येते.

अवंतीका तुझे आणि माझे schedule अगदी सेम आहे.... Happy पण माझा मुलगा डबा न संपवताच घरी येतो. आल्यानंतर जेवतो.. असो...
कणकेचे साजुक तुपाचे लाडू , रव्याचा डोसा, पालक / बीट पुरी, फळे, पोळीभाजी रोल्स असही तु देऊ शकतेस...

>>लहान मुलांना ओट्स देऊ नये.
अख्खे ओट्स (whole grain) पचायला जड जाऊ शकतात. पण ओटमील सिरियल द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे अपचन, कॉन्स्टिपेशन होत नसेल किंवा अ‍ॅलर्जी नसेल अवश्य द्यावं असं लहान मुलांचे डॉक्टर सांगतात.

इथे लहान मुलांसाठी ओट्स वापरून केलेल्या पदार्थांच्या काही कृती सापडतील.

माझा अनुभवावरुन सान्गते ३ yr olds ना तुम्ही जे खाता breakfast ला तेच त्याला द्या ani keep it simple>>> बरोबर. सुनिधी साडेतीन वर्षाची आहे, आणि आमच्याकडे तिचे आणि माझे खाणे सेम असते. वेगळे तिच्यासाठी काही बनवत नाही. आमचेच जेवण आम्ही कमी तिखट आणी मसालेदार बनवतो. म्हणजे तिला सर्व खाता येते.

सुनिधीला मी सकाळी उठल्यावर वरण भात किंवा खाऊ देते. शाळेला जाताना कपभर दूध. शाळेत्मधे पोळीचा रोल. दुपारी घरी आल्यावर भात-भाजी-पोळी कोशिंबीर. संध्याकाळी दूध आणि फळं . पप्पा घरी आल्यावर त्याच्यासोबत फळं किंवा दुसरा एखादा खाऊ. रात्री जेवायला परत दुपारसारखेच भात आमटी पोळी भाजी वगैरे. सर्व जेवण तिच्या हाताने ती खाते. भरवायला गेलं तर तिला तो प्रचंड अपमान वगैरे वाटतो. जेवायला बसताना तिचं ताट वाटी चमचा घेऊन जेवायला बसते. जेवण झालं की नेऊन घासायला ठेवते. (खरंतर घासूनच ठेवायची तिची इच्छा असते पण आम्ही करू देत नाही. Proud )

खाऊमधे इडली, दोसा, उपमा, शिरा, थालिपीठ, बेसनाचे लाडू, तांदळाची उकड, धिरडी, उकडलेली अंडी, पॅन केक, घरी बनवलेला केक, रूमझुम, पोहे, पॅटीस, भाज्यांचे कटलेट, पराठे, सॅन्डविच, खिचडी इत्यादि सर्व प्रकार आलटून पालटून करत रहायचे. अगदीच ऐश करायची असेल तर कॉर्न फ्लेक्स, पॉप कॉर्न वगैरे विकतचं खाणं.

मी तिला चॉकोलेट, बिस्कीटे देत नाही. बिस्कीटांमधे दिलीतरी पार्लेजी आणि मारीची. शाळेची व्हॅन येइपर्यंतच्या वेळामधे तिला बदाम पिस्ता देते एखाद दुसरा.

रश्मी. क्रेडिट गोज टू हर फादर. त्याने काही सवयी इतक्या चांगल्या शिकवल्यात की मला जास्त त्रास होत नाही. Happy

पोषकता या दृष्टीने खालील पदार्थ द्यायला सोपे पडावेतः

उकडलेले अंडे
चीज सँडविच
एक केळे, एक सफरचंद, एक चिक्कू ह्या सर्वांच्या फोडी मिक्स करून (चाट मसाला इत्यादी)
भाकरी / पोळी (असेही ऐकले आहे की हे दोन पदार्थ तर म्हणे शिळेच अधिक पोषक असतात, माहीत नाही)
(सालासकट) उकडलेला बटाटा (तिखट मीठ वगैरे) (सी व्हिटॅमीन रिच प्लस पोटभरीचे)

चव या दृष्टीने खालील पदार्थ द्यायला सोपे प्लस पोषकही ठरावेतः

कडधान्ये + टोमॅटो फोडी + तिखट, मीठ, मसाले
टोफूचे काहीतरी (पनीर माखनवालाच्या ग्रेव्हीचा तयार मसाला अश्या वेळी मदतीला धावतो)
ऑम्लेट
मसाला भाकरी + लोणी (मसाला भाकरी = भाकरीच्या पिठातच तिखट, मीठ, हळद, मसाले वगैरे)

अ‍ॅक्च्युअली, कोणत्याही प्रदेशात त्या त्या प्रदेशात त्या त्या ऋतूला मिळणारे पदार्थ हे नैसर्गीकरीत्या उत्तम ठरतात. पण वेळ कमी पडत असल्यास ते करता येत नाहीत.

तसे पाहिले तर थालिपीठ (सिरियसली केले तर) अतिशय पौष्टिक ठरते. (दही / लोणी या सोबत)

अगदीच वेळ नसेल तर चक्कः

१. फळ + ३ च्सकल्या (विथ दही / लोणी) + एक बेसनाचा लाडू (किंवा डिंक / आळीव / नाचणी)

पूर्वी एक 'सत्व' म्हणून आम्हा मुलांना दिले जायचे. सत्तूचे पीठ + दूध + साखर असे मिश्रण असायचे ते!

चु भु द्या घ्या

उत्तम पोस्ट नंदिनी. शाब्बास सुनिधी Happy

>>>>लहान मुलांना ओट्स देऊ नये.
अख्खे ओट्स (whole grain) पचायला जड जाऊ शकतात. पण ओटमील सिरियल द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे अपचन, कॉन्स्टिपेशन होत नसेल किंवा अ‍ॅलर्जी नसेल अवश्य द्यावं असं लहान मुलांचे डॉक्टर सांगतात.>> +१

>> अख्खे ओट्स (whole grain) पचायला जड जाऊ शकतात. पण ओटमील सिरियल द्यायला काही हरकत नाही.
+१

<< बी एस तुम्ही थोर आहात. स्पेशल कौतूक.>> अमा & Saee thanks Happy आयुष्यात घर-संसार, health and fitness, नोकरी, आणि personal interests/hobbies सगळ एकत्र जोपसण्यासाठी माझी कायम fight चालू आसते but I enjoy everything I do.

Pages