लहान मुलांसाठी नाश्त्याचे पदार्थ सुचवा

Submitted by तनू on 19 November, 2013 - 01:31

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याच्या नर्सरी ची वेळ सकाळी ९-११. मी पण ऑफिससाठी ९ वाजताच निघते. सकाळी जायच्या आधी त्याला जे काही भरवणार त्यावरच तो १२.३०-१ वाजेपर्यंत असतो. शाळेतून परत आल्यावर तो काही खात नाही. आता तरी मी त्याला शेवयाची खीर/उपमा, ओट्स, maggi हेच देते.

त्यामुळे मुलाला सकाळी भरवण्यासाठी पोटभरीचे आणि लवकर होतील असे पदार्थ सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अथर्व आहे ३ वर्षाचा पण अन्न चावून खाणे त्याने आता सुरु केल आहे, ४-५ महिन्यांपासून. आधी तो फक्त सरळ गिळता येतील असेच पदार्थ खायचा. अजूनहि तो शाळेतून आल्यावर आजीकडून जेवणाच्या वेळी वरण चपाती किवा दुध चपाती खातो, बारीक कुस्करून (न चावता).
रात्री माझ्याबरोबर जेवताना मात्र तो नीट जेवतो, चपाती + भाजी नीट चावून खातो, आणि वरण भात.
आणि सकाळी आधीच त्याची किरकिर चालू असते शाळेत जायच्या आधी आणि मला पण घाई असते ऑफिससाठी निघायची, म्हणून मी त्याला बहुतेक वेळा खीर/उपमा असेच भरवते, कि चावण्यामध्ये त्याचा वेळ आणि माझी एनर्जी त्याला ओरडण्यात वाया जाऊ नये. आणि अजुन रडारड होउ नये.

म्हणून मी हा बाफ चालू केला होता, वर सर्वांनी सुचवलेले पदार्थ हि छानच आहेत, आता लगेच नाही तर १ वर्षानंतर तरी मला उपयोगात येतील, त्याचा चावून खाण्याचा वेग थोडा वाढल्यानंतर.

अवंतिका -

तुझा मुलगा तुझ्यासोबत जेवताना चावून खातो पण साबा सोबत खात नाही का त्या त्याला देत नाहीत? का त्या देतात पण हाच आळशी पणा करतो, (कारण माहित आहे, आजी काही मागे लागणार नाही)

तू सकाळी त्याला उपमा खीर देतेस हे एकदम चांगले, पण तेसुद्धा चावून खायला पाहिजे. कोणताही घास तोंडात चांगलाच फिरला पाहीजे, त्यात लाळ मिक्स होऊन अन्नाचे पचन चांगले होण्यासाठी हे महत्वाचे. नाहीतर अन्न पचन व्यवस्थित होत नाही, न चावता खायची सवय पुढे तशीच राहून त्रास दायक होऊ शकते. मुलांच्या तोंडाला त्यामुळे वास येऊ शकतो. लाळ तयार होण्याची क्रिया कमी होते तोंड कोरडे पडते, त्याने तोंडात अल्सर होऊ शकतात तोंडाला वास येऊ शकतो.
मला असे एका डॉक्टर आजीने सांगितले होते की जेवण प्यावे आणि पाणी खावे ह्याचा अर्थ असा की कोणतेही अन्न चावून इतके बारीक करावे की त्याचा पातळ रस होईल आणि तो पिता येईल आणि पाणीदेखील खावे ह्याचा अर्थ पाणीदेखील तोंडात घोळवून घोळवून त्यात लाळ मिक्स करून खावे. (ह्याचकरता एका जागी बसून भांड्याने / पेल्याने / ग्लासने पाणी प्यावे, बाटली उंचावून तोडात पाणी सोडून घटाघटा पिऊ नये. )

चावून खाण्याचा वेग वाढण्याची वाट पाहू नकोस, जर जमणार असेल तर चावण्यासारखे पदार्थ दे, जितक्या लवकर तितके चांगले.

वल्लरी +१

खरच इकडे लक्षच गेले नव्हते. अवंतीका त्याने चावले नाही तर हिरड्या आणी दातांची नीट वाढ कशी होणार? पचनावर पण प्रॉब्लेम होईल. त्याला गाजर, काकडी असे खायला लाव. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी लोणी किंवा थोडे तुप लावुन खायला दे म्हणजे हिरड्यांना व्यायाम मिळेल. सासुबाईंना लक्ष ठेवायला सांग.

मधल्या वेळाकरता चुरमुरे+ भाजलेले शेंगदाणे + पंढरपुरी डाळ्या ( चिवड्यात घालतात त्या) असे एकत्र खायला दे. ( साबा देतील ) नुसतेच मऊ पदार्थ देऊन काय होणार? तो येता जाता खाईल तर अंगातही भरेल.

त्या देतात पण हाच आळशी पणा करतो, (कारण माहित आहे, आजी काही मागे लागणार नाही)>> हेच बरोबर आहे.

१-२ दिवस त्यांनी दिली होती चपाती + भाजी, पण मग हा पठ्या, roj जेवढ जेवतो त्याच्या अर्ध्यापेक्षा हि कमी खायला लागला, मग शेवटी आम्ही दुपारी आजीकडे असताना चपाती मऊ करूनच सुरु ठेवलं, आणि रात्री मग नीट जेवतो, त्याला माहित आहे, आई कडून काही सूट मिळणार नाहीये ते.

जेवू दे अर्धवट जेवतो तर. हळू हळू गाडी येते रूळावर. कोणाच्या पोटासाठी जेवतात ही मुलं स्वत:च्या का आपल्या. आणि असं अज्जिब्बात म्हणायचं नाही, लहान आहे तो काय कळतं त्याला, सगळं कळतं ह्यांना ... अर्धवट जेवल्यावर परत भूक लागते ना तेव्हा तेच द्यायचं. (नो मर्सी) एकदा कळलं ना की अर्धवट जेवलो तरी हेच मिळतं, हट्ट केले तरी हेच मिळतं, मग सरळ होतात (आर्मी स्टाईल)

जर शहाण्यासारखं पोट भरून जेवला तर मग त्याला त्याच्या आवडीचं काहीतरी खायला द्यायचं.कधीतरी. म्हणजे खीर वगैरे, तेव्हा सांगायचं अवेळी देते आहे कारण तुला आवडते. आणि आता तू सगळं खातोस ना म्हणून एखादे दिवस हेसुद्धा खायला हरकत नाही.

एक लिहायचे राहिले:

गेले काही दिवस आम्ही एक प्रयोग सुरू ठेवला आहे. (अर्थात, हे लहान मुलांसाठी खास वगैरे नाही, पण हे मुलांना आवडू शकेलही).

सकाळी भात खाण्याची कल्पना बहुतेकांना आवडणार नाही कदाचित!

पण आम्ही विविध भाज्या, ड्राय फ्रूट्स, मसाल्याचे पदार्थ असे घालून एक प्रकारचा भात करतो. (जो मी चक्क तीन तीन बोल्स खाऊही शकतो). अश्या भातातून बर्‍यापैकी काळ पोटाला आधार मिळतो हा स्वानुभव!

हा अतिशय फ्लेवर्ड असा राईस पांढरा, पिवळा वा भाज्यांनुसार हिरवा वगैरे दिसू शकतो. यात शेंगा, कॉर्न, पनीर चालत असल्यास, बटाटा, कांदा, टोमॅटो, काजू, बदाम, बेदाणे, लवंगा, तमालपत्र हे सगळे घालून फारच उत्तम टेस्ट मिळते.

अर्थातच, असा भात रात्रीच्या वेळी तर अख्ख्या जेवणालाही पर्याय ठरू शकतो. पण सकाळीही घाईघाईत सहज जमण्यासारखा असतो व आम्ही गेले काही दिवस तसा अधूनमधून करत आहोत म्हणून येथे लिहिले फक्त!

(मांसाहारींनी बॉईल्ड एग्ज घालावीत इत्यादी)

बेफि - तोपासु. असा मस्त भात असेल तर मी तिन्ही त्रिकाळ खायला तयार आहे. फक्त सकाळी कशाला? आणी मुलांना पण नक्की आवदेल.

वल्लरीला अनुमोदन. जेवण प्यावे आणि पाणी खावे एकदम पटलं.

बेफि, बरोबर आहे तुमचा पण कयास. लहान मुलांना आवडतात भाताचे प्रकार. (मोठ्यांनाही खरंतर, पण फारच थोड्या लोकांना मनसोक्त खाण्याचा चॉईस असतो.. :-() आमच्या घरात सकाळी भात प्रिय आहे म्हणुन दुजोरा दिला. तुम्ही लिहिलेत तसे अनेक प्रकार होतात. नाश्त्याला भात खाल्याने पोट शांत रहातं बराच वेळ, तहान तहानही फार होत नाही. आयांना करायला आणि पोरांना खायला सोपं. कोकणातले लोक नाही का मऊ भातावर दुपारपर्यंत कामं उपसतात.

त्या देतात पण हाच आळशी पणा करतो, (कारण माहित आहे, आजी काही मागे लागणार नाही)>> हेच बरोबर आहे. >>>
हा problem generic अहे.
चपाती + भाजी चा घास दही / आम्टी मधे थोड mix करुन द्यायला सांग मधे-मधे पाण्याचे घोट. फार कोरड झाल तर मुलं खायला त्रास देतात.

बाळांचा खाऊ असा एक बीबी आहे ,दिनेश. यांनी लिहिलेला तो पहा.
त्याखेरीज निरनिराळे पोळे(डोसे/धिरडे) देत जा.उडीदडाळ वाढीसाठी चांगली असते.

बसमधल्या डब्ब्यात देण्यासाठी थोडे खाऊचे प्रकार सुचवा.

खरंतर शाळा ते घर हे अंतर फक्त १५ मिनीटांचं आहे.
जाताना किंवा येताना त्याला बसमध्ये भुक लागलेली नसते. पण सगळे मित्र-मैत्रिणी काही ना काही खाऊ घेवून येतात. चॉकलेट /टॉफीज्/चिप्स /कुरकुरे/बिस्किट्स/ चिजबॉल्स किंवा तसले इतर स्नॅक्सचे पाकिटं इ. पदार्थांचे पॅक किंवा डब्ब्यात घालून आणतात. ते बघून आम्हालापण काही ना काही हवं असतं. हे पदार्थ मी डब्ब्यात देणार नाही हे सांगून झालंय आणि ते त्याला मान्य पण आहे. पण मग तू दुसरं काहीतरी दे असा सध्या घोषा लावलाय. (किमान दुपारी येतानासाठी तरी बसमध्ये खायला खाऊ दे असं म्हणतोय तो)
मला तरी फळं (पण आख्खे देवून उपयोग नाही कारण ते सगळ्यांना वाटायचे पण असते), सलाड, मखाणे, शेंगदाण्याचे लाडू (दुसरे कोणतेही आवडत नाहीत) इतकेच पर्याय सुचत आहे.

>> सकाळी भिजवलेले बदाम+ मनुका, एक उकडलेलं अंड / थोडेसे चॉकोज + सफरचंद/ पराठा आणि एक कप दुध खाऊनच >> बापरे, एवढं सकाळी खाऊन जातो म्हणजे गुणी आहे की.

सायो अंडं /चॉकोज + सफरचंद पराठा या तिन्हीपैकी एक पदार्थ + दुध + ५-६ बदाम -किसमिस.

त्याला या वर्षाच्या सुरवातीला अ‍ॅसिडीटीचा त्रास झाला होता. त्यावेळी तो फक्त दुध आणि बदाम-किसमिस खायचा. शाळेत जेवण झालं की याला उलटी व्हायची. डॉक्टरना विचारल्यावर दुध प्यायच्या आधी काहीतरी सॉलीड खायला द्या म्हणून सांगितलं होतं. मग हळू हळू थोडं थोडं करत खायला सुरवात केली त्याने.
नाही खाल्लं तर उलटी होवू शकते हे डॉ. नी सांगितलेलं लक्षात आहे आणि आता सवय झाली.
एप्रिलपासून सकाळी ७ ला शाळा असेल त्यावेळी परत बदलामूळे सवय लावायला त्रास होईलच. Happy

भाजलेले दाणे, इतर नट्स, रेझिन्स, संत्र्याच्या फोडी सुट्ट्या केलेल्या, क्रॅकर्स, चॉकोज, फुटाणे, द्राक्ष, मखाणे, पॉपकॉर्न्स.

कुरमुरे थोडासा भडंग मसाला घालून परतून, वेगवेगळ्या लाह्या कधी थोडा काटे हलवा मिसळून , तिळाच्या / खोबर्‍याच्या वड्या छोटे छोटे तुकडे करुन , ड्राय फ्रूटसमधे जर्दाळू + काजू + मखाणे असं मिक्स करुन

इथे लिहिल्यावर लक्षात आलं की कांट्या हलवो ही कोकणी फ्रेज आहे . तिळगूळ करतात तसेच काजू, कलिंगडाच्या बिया, भोपळ्याच्या बिया अशा बरेच वेगवेगळे प्रकार घालून हलवा करतात संक्रातीच्या दिवसात. भाताच्या लाह्या + असा हलवा असे मिक्स करुन देता येईल

अरे हो तिथे किती छान जर्दाळू आणि सुकवलेली अंजीर मिळतात. त्याला आवडत असतील तर ते देऊ शकतेस. काळे मनुके. खडीसाखर आणि खोबर्‍याचे पातळ काप.

Steamed sprouts, roasted / salted peanuts, chikki, revadi, gazak, futaaney, dry bhel, sliced carrot/raddish, rajgira biscuits, baked chips/ khaare shankarpaley??? Grapes, berries, cherry tomato etc small sized fruits.
You can also give pravasi chivda or baked chivda / lahyancha chivda. Bhadang. Baked bobbies.etc.

एग व्हाईट चा अर्धा भाग + त्यात चीज स्लाईसचा एक मावू शकेल असा भाग + त्यावर एक टोमॅटोचा काप + सॉस!

हे सगळे मी माझ्या मुलाला देते डब्यात … बघा वाचून मदत होईल तुम्हाला

१. रात्री बटाटा उकडून घेता येतो सकाळी बटाट्याचा पराठा आणि दही द्यायचे
२. पालक, छोटा आल्याचा तुकडा एक मिरची आणि एक टोमेटो उकळत्या पाण्यातून काढून मिक्सर मधून बारीक करायचे आणि त्यात पीठ, जीर पुड आणि मीठ घालून मळून ठेवून द्यायचे फ्रीज मध्ये दुसरे दिवशी सकाळी मस्त हिरव्या हिरव्या पालक पुरया तळून काढाव्यात … शेंगदाणा दही किंवा डाळीच्या चटणी सोबत डबा भरून द्यावा
३. अगदी याच पद्धतीने बीट घालून पुऱ्या कराव्यात. मस्त लाल-गुलाबी रंगाच्या पुऱ्या आकर्षक वाटतात मुलांना.
४. रात्री दही घुसळून त्यात रवा भिजवून ठेवावा … सकाळी या भिजलेल्या रव्याचे डोसे, इडली, उत्तपम किंवा अप्पे अगदी काहीही करता येतात.
५. सकाळी अर्धा कप रवा, त्यात एक बटाटा धुऊन किसायचा, एक छोटा कांदा, टोमेटो सगळं किसून घालायचं (किसून घातलं कि मुलांना वेगळं काढून ठेवायला मार्ग उरत नाही खावेच लागते) यात फटाफट मीठ, मसाला घालून डोस्या सारखे तव्यावर बनवायचे …. चविष्ट आणि झटपट बनणारा पदार्थ आहे.
६. एक अंड, दोन चमचे साखर, ४ चमचे मैदा, थोड दुध घालून फेटून घ्यायचं नोंस्टिक वर बटर लावून त्यावर हे ओतायचं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं…मुलांचा आवडता Pancake तयार. अंडी खात नसतील तर विना अंड कोको पावडर घालून हि करता येते.
७. सोया चंक भिजवून ते कुठल्याही कुठल्याही उसळीत, भातात घालून तयार करावे.
८. कोणतेही मोड आलेले कडधान्य म्हणजे चवळी, चणे, मटकी किंवा मग सारे एकत्र एका वाफेवर कुकरमधून काढावे (कोरडेच) त्यात काकडी, कांदा, टोमेटो, कोथिम्बिर बारीक चिरून घालावी चाट मसाला आवडत असल्यास जरा तिखट भुरभुरावे वरून डाळिंबाचे भरपूर दाणे आणि मक्याचा गोड आंबट चिवडा किंवा शेव घालून मुलांना डब्यात किंवा असेच खायला द्यावे …. (अप्रतिम चवीची आणि पोष्टिक भेळ तयार होते हि मोठ्यांनाही खायला खूप आवडते)
९. भाज्या एकत्र करून (कोबी,फ्लोवर, गाजर, वाटाणा, सगळे बारीक चिरून आणि बटाटा उकडून कुस्करून घ्यावा) त्यात चाट मसाला वगैरे घालून तयार ठेवावे. एका भांड्यात मैदा=कॉर्णफ्लोर घट्टसर भिजवून घ्यावे. ब्रेडवर भाज्यांचे मिश्रण नित बसवून त्यावर चमच्याने मैदा मिश्रण पसरवून टाकावे (एकाच बाजूने) आणि नंतर ते गरम तेलात ब्रेड चा भाग खाली राहील असे सोडावे आणि पळीने वर तेल लोटावे मिश्रण नित बसलाय अस वाटल कि ब्रेड भाज्यांच्या बाजूने पालटवून खरपूस तळून घ्यावे, हाही प्रकार सांगायला वेळ लागला तरी साहित्य तयार असल्यास चटकन बनतो.
१०. चीज पराठा + दही

आनन्दी त्याकरता तान्दळाचे पीठ थोड्या पाण्यात कालवुन घे. तेलात हिन्ग, मोहरी, जीरे आणी कढीपत्त्याची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात ते कालवलेले पीठ वरुन हळु हळु ओत. घालतानाच एकीकडे ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाही. न.न्तर त्याला एक वाफ दे. मग झाकण काढुन त्यात चवीला मीठ आणी साखर घाल. परत वाफ दे. मग उतरवुन त्यावर थोडे कच्चे तेल आणी चिरलेली कोथिम्बीर घाल. उकड तयार.

मुलगा/ मुलगी हिरवी मिर्ची खात असेल तर फोडणीत टाकु शकतेस

Pages