लहान मुलांसाठी नाश्त्याचे पदार्थ सुचवा

Submitted by तनू on 19 November, 2013 - 01:31

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याच्या नर्सरी ची वेळ सकाळी ९-११. मी पण ऑफिससाठी ९ वाजताच निघते. सकाळी जायच्या आधी त्याला जे काही भरवणार त्यावरच तो १२.३०-१ वाजेपर्यंत असतो. शाळेतून परत आल्यावर तो काही खात नाही. आता तरी मी त्याला शेवयाची खीर/उपमा, ओट्स, maggi हेच देते.

त्यामुळे मुलाला सकाळी भरवण्यासाठी पोटभरीचे आणि लवकर होतील असे पदार्थ सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद..
मुलीला कधी पटकन खाऊ द्यायची गरज असेल त्यावेळी देता यावी म्हणुन .. तांदुळ धुवुन सुकवुन भाजुन .. आणि मुग डाळ पण धुवुन सुकवुन भाजुन, त्याची एकत्रित पुड करुन ठेवली आहे.. कधी झोपायला लागली आहे आणि पटकन खायला द्यायच आहे त्यावेळी ती पुड पाण्यात मिक्स करुन , जीरे पुड, तुप घालुन थोडी उकड सारख्च करुन देतो .. आता रीतसर उकडी च्या कृतीने हेच पीठ वापरल तर कस लागेल???
प्रयत्न करते आणि काय झाल ते सांगते..

आनन्दी त्या पुडची उकड नकोस करु. त्या ऐवजी ती पुड शिजवताना त्यात थोडी धने जीरे पुड, भाज्यान्ची प्युरी किन्वा शिजवलेल्या भाज्या, हिन्ग, मीठ घालुन शिजवुन दे. गाजर, कोबी, पालकासारख्या भाज्या बर्‍या.

Pages