स्वयंपाकघरातील फुलं

Submitted by मामी on 20 November, 2013 - 23:12

मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.

आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......

त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?

गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.

केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.

माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता. Happy

याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Jaswandchya fulachya pakalya pani ukalun gas band Karun ghalun zakun thevayche. Thodya velane panyat pakalyancha chan rang utarato.Hyalach hibiscus tea mhanatat.Asa chaha bp kami karato mhane.

दगडफुलाबद्दल मला हे काहीच माहीत नव्हतं Happy
बाकी फुलं खायची या कल्पनेने कसं तरी होतंय मला
गुलाबाची फुलं ठिकेत एकवेळ Uhoh
कोणी तरी रेसीपी टाका ना एखादी मस्तशी

कामवालीने 'सेजन के फूल की सब्जी करते है' असे सांगितले.
जरा शोधले तर 'सेजन का फूल' म्हणजे शेवग्याचे फूल असावे असे वाटते.
लेकीच्या पुस्तकात एका धड्यात महाराष्ट्रात 'सहजन फ्लॉवर ची भजी' खातात असे लिहिले आहे. 'हे कुठले फूल?' असे तिने विचारले होते आणि मी तेव्हाही शोधायचा प्रयत्न केला होता. तेही 'शेवग्याचे फूल' असावे असे वाटते. नक्की माहिती नाही.

तरलादलालच्या साइटवर 'स्वांजना दे फूल'ची रायता, भाजी यांच्या पाकृ आहेत. तेही शेवग्याचे फूलच असावेसे वाटते.
अजून कोणाला काही माहिती असल्यास सांगावे.

बिट्टी म्हणजेच यलो ओलिएंडर (yellow oleander) ना ? मग हे देखील वाचा - हे अतिशय विषारी झाड आहे.
ही खालील माहिती विकीपीडियावरुन ....

Thevetia peruviana contains a milky sap containing a compound called thevetin that is used as a heart stimulant but in its natural form is extremely poisonous, as are all parts of the plants, especially the seeds.

flat,550x550,075,f.u2.jpg

कुठलेही फूल खाण्याआधी खात्री करा की हे माणसाला विषारी नाही ना ??

http://www.treehugger.com/green-food/42-flowers-you-can-eat.html या साईटवर सुरुवातीलाच ही माहिती/सूचना दिलेली आहे ती कृपया लक्षात ठेवा........

Eating Flowers Safely
So. As lovely as eating flowers can be, it can also be a little … deadly! Not to scare you off or anything. Follow these tips for eating flowers safely:

Eat flowers you know to be consumable — if you are uncertain, consult a reference book on edible flowers and plants.

Eat flowers you have grown yourself, or know to be safe for consumption. Flowers from the florist or nursery have probably been treated with pesticides or other chemicals.

Do not eat roadside flowers or those picked in public parks. Both may have been treated with pesticide or herbicide, and roadside flowers may be polluted by car exhaust.

Eat only the petals, and remove pistils and stamens before eating.

If you suffer from allergies, introduce edible flowers gradually, as they may exacerbate allergies.

To keep flowers fresh, place them on moist paper towels and refrigerate in an airtight container. Some will last up to 10 days this way. Ice water can revitalize limp flowers.

हादगा म्हणजे शेवगा नाही मामी. मागच्याच आठवड्यात केली होती हादग्याच्या फुलांची भाजी. खुप सुंदर लागते. Happy

ही बघा हादग्याची फुलं.
hadga.jpg

मंजूडी,
पाळीत काही जणींना जास्त त्रास होतो. त्यावर औषध म्हणून जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो. माझ्या सासुबाईंमुळे मला ते माहिती झाले. तुम्हाला कोणत्या रंगाचा त्रास आहे तसे लाल की पांढर्‍या रंगाचे जास्वंदफुल खायचे ते ठरवावे. तसे प्रमाण विशेष नाही. त्रास असेल तर रोज सकाळी अनाशापोटी दोन-तीन फुलं गाईच्या साजूक तुपात तळायची आणि खाऊन घ्यायची. खरंच गुणकारी आहे हे फुल. फरक नक्की पडतोच.

आम्ही लहानपणी जास्वंदीच्या कळीतले दाणेदार परागकण खायचो. कडू मेंदीच्या फुलाला चोखले की थेंबभर मध मिळतो. पण जरा जपून चुकुन त्याचा देठ जिभेला लागला तर तोंड खुप कडू होते.

गुढीपाडव्याला आंध्रामध्ये कैरीचे सरबत करतात, त्यात कडूलिंबाची फुले टाकतात.

मागे दिनेशदांनी दगडीफुल, फुलांपासुन केलेले सुगंधी पाणी असे लेख लिहीले होते. शोधायला हवेत.

आपण जे उंबराचे फळ खातो, ते देखील फुलच असते. Happy यावर देखील दिनेशदांनी लेख लिहिला होता.

अक्कलकरे हे पण एक फुलच आहे.. ते खातात किंवा मसाला म्हणुन पण वापरतात..
ज्यांना बोलायचा त्रास आहे किंवा जिभ जड आहे त्यांना पण देतात हे खाण्यासाठी..

http://en.wikipedia.org/wiki/Acmella_oleracea

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/72/Spilanthes-closeup-la...

नंदिनी , काय गं? उंबराचं फळ???
मुळात सुंदरस अंजिर असताना उंबर खावच का म्हणते मी Proud
लहानपणी एक उंबर उघडुन पाहिलेलं यात खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप सार्‍या आळ्या आणि आळोबा होते तेंव्हा पासुन उंबराला राम राम!

मामी
गाईच्या दुधाचे तूप बनवायची आमची पद्धत सांगते.
पिशवीच्या दुधाचे विरजण शक्य नाही. कारण त्याच्यावर साय येत नाही. आम्ही पांजरापोळचं किंवा जमेल तेव्हा रतिबाचं दूध घेतो. विरजण फ्रिजमध्ये ठेवतो. सायीला दह्याचं विरजण लावतो. दूध दोनदा तापवतो. सकाळी दूध तापवलं की संध्याकाळी साय काढतो. संध्याकाळी तापवलं की सकाळी साय काढतो. दूधाला फ्रिजमध्ये जाड साय येते. ती साय विरजणाच्या भांड्यात टाकतो. विरजण एकदा लावलं की त्यात पुन्हा चमचा घालत नाही की हलवत नाही. पुरेसं जमा झालं की ते विरजण मिक्सरमधून काढतो. काढलं की त्यात बर्फाच्या एक दोन क्युब्ज टाकतो. लगेच लोणी जमा होतं. ते कढवतो. तूप झालं की त्याचा खमंग वास सुटतो. बेरी थोडीशी तपकिरी दिसायल लागली की समजायचं तूप झालं म्हणून.
विशेष अवघड नाही काही. एवढं करायचं नसेल तर सरळ विकतचं तूप वापरलं तरी चालतं.

हादग्याची फुले खातात. हे झाड आपण माहीम निसर्ग उद्यानात बघितले होते.
चिंचेचा फुलोरा चिंगूर पण खातात. त्याचे वरण करतात. मोहाची फुले खातात ( मस्त लागतात ) भाकरीच्या पिठात त्याची भर घालतात. ( त्याची दारू पण करतात म्हणे. )
लाल जास्वंदीची फुलेही खाता येतात. त्यांचे सरबत करता येते. जाई वर्गातील व शेवंती वर्गातील एका फुलांचा
चहा मिळतो ( चायनामधे ). भारंगीची फुले खातात.
धायटीची फुले खातात. गोड लागतात. या फुलांच्या सहाय्याने द्राक्षासव बनवतात. नागकेशराचे केशर मसाल्यात वापरतात.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली वगैरे फुलेच आहेत.

ते गाणे नाही का माहीत ?

सब गये बाजार, मेरा बुढ्ढा भी चला गया
सब तो लाये फुल, बुढ्ढा गोभी लेके आ गया Happy

सेजन म्हणजेच सहजन म्हणजेच सामान्य माणूस. पाने, फुले, शेंग व मूळही ज्या झाडाचे खाता येते त्या शेवग्याला हा शब्द वापरतात. त्याची शेती न करता ती झाडे बांधावर लावावी, असा संकेत होता. म्हणजे येणार्‍या जाणार्‍या सर्वांना ते फुकटात उपलब्ध होईल.

गुलाबकळी हा मिठाईत वापरायचा प्रकार आहे. मुंबईला मस्जिद बंदरला मिळू शकेल. खास गावठी गुलाबाच्या मुक्या कळ्या खुडून वाळवलेल्या असतात. त्यांचा रंग व वास कायम असतो.

मामी
गाईच्या दुधाचे तूप बनवायची आमची पद्धत सांगते.
पिशवीच्या दुधाचे विरजण शक्य नाही. कारण त्याच्यावर साय येत नाही. आम्ही पांजरापोळचं किंवा जमेल तेव्हा रतिबाचं दूध घेतो. विरजण फ्रिजमध्ये ठेवतो. सायीला दह्याचं विरजण लावतो. दूध दोनदा तापवतो. सकाळी दूध तापवलं की संध्याकाळी साय काढतो. संध्याकाळी तापवलं की सकाळी साय काढतो. दूधाला फ्रिजमध्ये जाड साय येते. ती साय विरजणाच्या भांड्यात टाकतो. विरजण एकदा लावलं की त्यात पुन्हा चमचा घालत नाही की हलवत नाही. पुरेसं जमा झालं की ते विरजण मिक्सरमधून काढतो. काढलं की त्यात बर्फाच्या एक दोन क्युब्ज टाकतो. लगेच लोणी जमा होतं. ते कढवतो. तूप झालं की त्याचा खमंग वास सुटतो. बेरी थोडीशी तपकिरी दिसायल लागली की समजायचं तूप झालं म्हणून.
विशेष अवघड नाही काही. एवढं करायचं नसेल तर सरळ विकतचं तूप वापरलं तरी चालतं.

>>>> हाय राम! Lol

सॉरी मयुरा त्या वाक्याला हा इथला संदर्भ होता. Happy

मला ते स्वंयपाक घरातील मुलं असेच वाटले...
म्हटलं आता पाकृ मध्ये त्यांच्यावर काय लेख पाडलाय म्हणत उघडला...

मधूमालती चोखलीय... एखादाच कण मिळतो तो गोड असतो...

ज्वास्वंदीची रीमेडी फेमस होती घरात... ओटीपोटात दुखत असेल तर ...
पण मामी म्हणतात तसे... इथे शिखंडी गाई पासून सूरुवात करायची लक्षणं आहेत.
(पण तिथे शिखंडी म्हणजे नक्की काय हे विचारायचे आहे.. ) विचारून येते. Wink

दिनेशदा, धन्स. एकदम ढीगभर नविन फुलं सांगितलीत येऊन. Happy

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली वगैरे फुलेच आहेत. >>>> अतिपरिचयात अवज्ञा.

लवंगा पण कळ्याच असतात आणि कांद्याच्या कळ्या ( त्यांना पोवाडे म्हणतात ) खातात. पण सध्या या बाजारात येत नाहीत.

Pages