Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर अपडेट्स! जान्हवी
सुंदर अपडेट्स!
जान्हवी आतापर्यंत (लग्न होईपर्यंत ) दबावाखाली होती. पण आता मात्र ती ठामपणे निर्णय घेवू लागली, हे तिच्या आईला जेव्हा एका विशिष्ट टोनमधे नकार दिला तेव्हाच लक्षात आले. म्हणजे ती आता मामा आणि आईला सासरपासून लांबच ठेवणार. हे नक्की.
दिलीपकुमार आणि मधुबाला हं
दिलीपकुमार आणि मधुबाला
हं मामा आले आपल्या आवडी कड़े
हो प्रज्ञा१२३. मलाही ते
हो प्रज्ञा१२३. मलाही ते जाणवले
अगं पोरींनो..... या
अगं पोरींनो..... या निमित्ताने तिची आठवण करावीशी वाटली.... त्या दोघांचे लग्न झाले असते तर ती अधिक समाधानाने वैवाहिक आयुष्य जगू शकली असती..... मुंबई कोर्टात त्याने तर स्पष्टच प्रेमाची कबुली दिली होती. ते प्रकरण असेच हवेत विरले एके दिवशी....कायमचेच.
मामा दिवाळी चि सुट्टि
मामा दिवाळी चि सुट्टि सपलि,पेन्डिग राहिलेले सर्व अपडेट्स वाचलै.खुप छान,
काल श्री तीला ड्रेस देतो तर
काल श्री तीला ड्रेस देतो तर ती म्हणते की घरच्यांना / आईआजीला चालेल का? चांगला सलवार्-कमीज तर आहे. न चालायला काय झाले? लग्न झाले म्हणून काय कोणी रोज साडी नेसतं का? दिवाळीत ठीक आहे पण एरवी?
नाहितर काय नताशा. मी मागे
नाहितर काय नताशा. मी मागे माझ्या एका पोस्टीत म्हणाले होते की एकजात सगळ्या मालिकांमधुन असच दाखवतात. लग्नाआधी ड्रेस घालणारी मुलगी लग्नानंतर साड्यांमध्ये दाखवतात आणि ड्रेस घालण्याचा प्रसंग असा काही दाखवतात जस काही त्या मुलीने या आधी अंगाला ड्रेस लावलेला पण नसतो. या मालिकेबाबत मी प्रार्थना करत होते की त्यांनी जान्हवीला अस दाखवु नये पण माझा अपेक्षाभंग झाला.
श्री अगदी सर्व टिपिकल
श्री अगदी सर्व टिपिकल परंपरांना फाटा देणारा नवरा ठरतोय.
राहुल डोंगरे दिसतोय तरी
राहुल डोंगरे दिसतोय तरी चांगला.>>>>
तो मामा एकदा बरोबर म्हणतो
तो मामा एकदा बरोबर म्हणतो जावई चांगले आहेत जरा शानपट्टी करतात.
गुरुवार दि.७ नोव्हेंबर २०१३ :
गुरुवार दि.७ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ दिवाळीचे सावट अजून कुणाच्याच डोक्यावरून नव्हे तर अंगावरील कपड्यातूनही गेलेले नाही. जान्हवी तर त्या खास सणाच्या साड्यांमध्ये अत्यंत अवघडलेली दिसून येतेच शिवाय साडीमुळे तिच्या नेहमीच्या नैसर्गिक हालचालीवर पडलेल्या मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. आजच्या भागाची सुरुवात बहिणीने भावाला ओवाळण्यापासून सुरू झाली. घरी फक्त हे दोघे बहीणभाऊ आणि वडील....तरीही शुभ आणि पवित्र वातावरणाने त्या खोलीत रंग भरला. भावाने ओवाळणी टाकल्याचे बहीण आनंदाने पाहात आहे तोच "येऊ का आम्ही?" अशी आनंददायी पुकार देत शरयू, सरस्वती आणि श्री आत प्रवेश करतात. श्री च्या येण्याची अपेक्षा असतेच जान्हवीला पण या दोन सासवांना पाहून तिला आश्चर्याचा जितका धक्का बसतो तितकाच आनंदाचाही. आपल्या घरी ही मंडळी आल्याचे पाहून ती आणि पिंट्या भारावून जातातच शिवाय सदाशिवरावांनाही समाधान लाभते.
"गोकुळ" वर नित्याचे काम सुरू होते त्यावेळी सासू नर्मदाबाई आणि शरयू याना जान्हवी चहा करून आणते. चहावरून मग या तिघीत हसतखेळत हलक्याफुलक्या गप्पा सुरू होतात आणि मग एक असा आवाज काढते तर दुसरी दुसरा...ज्यात चहाचे उपयोग व दुरुपयोग....यावर चर्चा...मग जान्हवीला विचारणे की बरोबर कोण व चुकीचा कोण...? जान्हवीने या दोन्ही सासवांना आता आपल्या हसर्या स्वभावाने चांगलेच काबीज केले असल्याने तीही आता त्यांच्यासमवेत त्याच आवाजात बोलते, हसते....आणि घरातील वातावरण प्रसन्न करते.... नेमक्या त्याचवेळी बेबीआत्या तिथे प्रवेश करते आणि या तिघींवर संतापाने ओरडते, "काय दंगा चालविला आहे तुम्ही ? आपल्या घरी अशा आवाजात बोलतात का ?" यावर नर्मदासासूबाई बेबीआत्याला "वन्स...अहो चहावरून बोलत आहोत आम्ही..." असे बोलल्यावर मग तर बेबीआत्या आपली नजर जान्हवीकडे रोखून धरते आणि टोमणा मारते, "पण असं बोलत राहायला हे घर म्हणजे काही चाळ नाही..." या फणकार्यानिशी ती तिथून पाय आपटत निघून जाते. जान्हवीला हा अपमान असह्य होतो आणि ती आपल्या खोलीकडे रडत निघून जाते. या खेपेला मात्र नर्मदाबाईंना बेबीआत्याने काही जादाचाच आगाऊपणा केला हे जाणवते आणि त्या बेबीआत्याच्या खोलीत जातात...योग्य त्या खालच्या स्वरात आपली नाराजीही प्रकट करतात आणि हकनाक जान्हवीला बोल लावल्याबद्दल आपल्याला वाईट वाटल्याचे सांगतात; पण बेबीआत्या जणू काही आपले चुकलेच नाही असा पवित्रा घेते आणि या घरात माझ्या आईला जो काही त्रास होत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार जान्हवी हीच आहे असे स्पष्टपणे जाहीरही करते.
इकडे जान्हवीच्या रुममध्ये शरयू येते आणि तिला आपल्या जवळ घेऊन बेबीआत्याचे बोलणे मनावर घेऊ नकोस असे विनविते. त्यांचा स्वभाव असाच मोकळा असून आज बोलल्या तर उद्या त्याना समजते की आपण चूक केली आहे. जान्हवीदेखील आपण ती बोलल्याचे मनावर घेतले नसल्याचे सांगते. जान्हवीचा स्थिती पाहून कळवळलेली शरयू तिला आपल्या जवळ घेते आणि मुलीसारखीच माया करते.
आता या सार्या अवघड स्थितीवर उपाय एकच म्हणजे आईआजीला बोलते करून त्याना घरच्या नित्याच्या व्यवहारात मुख्य व्यक्ती म्हणून भाग घ्यायला सांगणे. यासाठी या स्त्रिया आणि जान्हवी श्री च्या टेबलभोवती चर्चा करीत आहेत....आणि श्री काहीतरी निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे.
मस्त अपडेटस, हल्ली मी नाही
मस्त अपडेटस, हल्ली मी नाही बघत मामा ही सिरियल, खास तुमचे अपडेटस वाचायला येते.
अन्जू.... तुम्हा काही
अन्जू....
तुम्हा काही प्रेक्षकांचा मालिकेबाबत बदललेला कल मी समजू शकतो, कारण कथानकातील नाविन्य कमी होत चालले आहे की काय अशी साधार भीती वाटत आहे....शिवाय जान्हवीतील 'तरुणी' लुप्त होऊन ती आता 'संसारी स्त्री' झाल्याने तिच्यातील अवखळपणा लोपला आहे असे दिसत आहे. या वा अन्य कारणाने तुमचा मालिकेतील रस कमी होत असेल तर ते मी समजू शकतो. तरीही सोमवारपासून कथानकात बदल झाल्याचे जाणवेल अशी चिन्हे दिसत आहेत....त्यावेळी मात्र मालिका आवर्जुन पाहिली जाईल असा मला विश्वास वाटतो.
मामा, त्या जान्हवीच्या
मामा, त्या जान्हवीच्या सासरच्या घराचे कथानक slow वाटतेय, माहेरी मामा आणि आई नसल्याने मला बघायचे होते पण सासरी जान्हवी त्या एकेका सासूचे प्रॉब्लेम सोडवताना दाखवेल तेव्हा कथानक वेग घेईल. माहेरी एकवेळ आई परत आली तरी चालेल तो मामा नको यायला पार डोक्यात जातो.
मामा इथे सध्या फक्त
मामा इथे सध्या फक्त वाचण्यासारखे आहे (ते म्हणजे तुमचे अपडेट्स) लिहिण्यासारखे काहीच नाही.
श्री जान्हवीची प्रेमळ नोकझोक हाच एक सुसह्य भाग.
Slow आहे पण तरी बोअर होत
Slow आहे पण तरी बोअर होत नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी छान दाखवल्या आहेत. पुढे देखील अशीच हलकी फुलकी सिरीयल राहू दे! उगीच काहीही वाईट दाखवू नका!
रच्याकाने, जी नवीन सिरीयल सुरू होत्येय ती पण love story च वाटत्येय! Love stories चा overdose होणारे अशाने! काहीतरी वेगळं दाखवा प्लीज!
काल प्रोमोज मधे दाखवलं,
काल प्रोमोज मधे दाखवलं, जान्हवी परत ऑफीसला जायचं म्हणते तर आईचा आणि मावशीचा चेहेरा काय पडलाय, ती काहीतरी अभद्र बोलल्यासारखं.
मामाही फसवणार आहे शशीकला बाईंना त्या कुठल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत.
छान अपडेट्स !
छान अपडेट्स !
माहेरी एकवेळ आई परत आली तरी
माहेरी एकवेळ आई परत आली तरी चालेल तो मामा नको यायला पार डोक्यात जातो.>>>>> +१००००
मामा इथे सध्या फक्त
मामा इथे सध्या फक्त वाचण्यासारखे आहे (ते म्हणजे तुमचे अपडेट्स) स्मित लिहिण्यासारखे काहीच नाही.
श्री जान्हवीची प्रेमळ नोकझोक हाच एक सुसह्य भाग.>>>>>+१०००००००
काल प्रोमोज मधे दाखवलं,
काल प्रोमोज मधे दाखवलं, जान्हवी परत ऑफीसला जायचं म्हणते तर आईचा आणि मावशीचा चेहेरा काय पडलाय, ती काहीतरी अभद्र बोलल्यासारखं. >>> अवघड आहे.. म्हणजे तेच दळणं .. पहिल्यांदा चहा करताना पण समजावलं होत ना त्यांना.. कधी मोठ्ठ्या होणार या आया!!
सून म्हणून घरी आलेल्या मुलीने
सून म्हणून घरी आलेल्या मुलीने "उठा, रांधा, वाढा, उष्टी काढा आणि आवरा...." इतकेच केले पाहिजे ही जी हजार वर्षांची परंपरा सांप्रत या महाराष्ट्र देशी मनी वसली आहे ती आज देशाचे यान मंगळावर गेले आहे तरी संपुष्टात येत नाही आणि मला वाटत होते की किमान टेलिव्हिजनच्या मालिकांतून तरी असला विचार पुसला जाईल, पण तसे होत नसल्याचे प्रोमोज मधून चित्र दिसते आहे, ते खरोखरी दुर्दैवी आहे. श्री ने जान्हवीला हसतखेळत परवानगी दिली आहे नोकरी करण्याची....शिवाय "आई आजीने स्वतः नोकरी करूनच गोखले गृहउद्योगाची इतकी उभारणी केली आहे..." अशीही पुस्ती जोडली होती.... त्यामुळे जान्हवी खुलली.
आता नोकरी प्रश्नावरून आई आणि मावशी चेहरा टाकतात म्हणजे या बायकाही परंपरेचे दळण दळत बसणार की काय ? तिकडे ती बेबीआत्या जान्हवीला पिळायची संधी पाहात आहेच...तिच्याही हाती कोलित येईलच.
http://marathi.yahoo.com/%E0%
http://marathi.yahoo.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%...
शुक्रवार दि, ८ नोव्हेंबर २०१३
शुक्रवार दि, ८ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ जान्हवीची आता मला प्रचंड दया येऊ लागली आहे. बिचारीने प्रेमविवाह करून गोखल्यांची सून बनली म्हणजे फार मोठा गुन्हा केला की काय असेच वाटू लागले आहे. पोरखेळ चालला आहे नुसता. आजच्या भागाची सुरुवात झाली ती पिंटू रात्रीच्या अंधारात एका बहुतांशी रिकाम्या रस्त्याने घाईघाईने जाताना मनिष पाहतो, त्याला कळत नाही पिंट्या कुठे चालला आहे. तो त्याला थांबवितो, चौकशी करतो, पण पिंट्या सुरुवातीला खोटे हसून उत्तर देतो आणि मनिष जास्तच हट्ट करू लागल्यावर त्याच्यावरच 'तुझा काय संबंध नाही....मला अडवू नकोस..." असे डाफरतो व तिथून निघून जातो....त्याचे जाणे आणि वागणे ही कुठल्या तरी रहस्याची नांदीच असावी.
"गोकुळ" मध्ये नेहमीप्रमाणे श्री जेवायला बसला आहे आणि आया त्याला त्या जुनाट कंटाळा येऊ शकणार्या 'खा की रे...आणखी घे ना...एक पोळी घे...भाजी वाढ ना त्याला..." अशा मंत्रघोषाचा परिपाठ चालू ठेवीत तर आहेतच; पण आता जान्हवीची रसद आली आहे...आणि तीही नवर्याला मर्यादेत का होईना पण आग्रह करीत आहे. जेवत असतानाच आईआजीच्या एकांतपणाचा विषय निघतो आणि ह्या स्त्रीया श्री ला आता तू अंतिम निर्णय घे....आजीना जाऊन भेट असे सांगतात.....नंतर बेडरूममध्ये जान्हवीदेखील हेच सांगते... श्री त्याला कबुली देतो.
सकाळी मग त्यानुसार ह्या सार्या बाया आणि जान्हवी मुख्य हॉलमध्ये थांबतात....तर श्री आजीच्या खोलीत जातो...दार बंद....आणि पाच सासवांची अंदाजाची बॅटिंग चालू....बडबड...बडबड...वैताग येणारी बडबड त्यातही बेबीआत्या आणि मोठी आई यांची जान्हवीच्या दिशेने दहशतीची गोलंदाजी चालूच. ती बिचारी या सर्वांना सांगते...."मनी वाईट काही धरू नका. श्री नक्की आजीना घेऊन बाहेर येईल..." श्री आणि आजी एकदाचे समोरासमोर आलेले दाखविले गेले....परत तोच मुद्दा....आजी म्हणतात, "मी तुझ्या मर्जीने तुझे लग्न लावून दिले, आता मी एकांत पत्करला आहे तर तो मला घेऊ दे..." मग श्री चा बालहट्ट...जितके दिवस तुला एकांत मिळाला तो पुरेसा आहे....आता बाहेर ये, सर्वांच्यात मिसळ आणि मार्गदर्शन करत राहा....नाही म्हटलेस तर मी परत तुझे पाय धरणार... यावर आजीचे खोटेखोटे रागावणे...श्री चे हसणे....सारा काही बालिश प्रकारच चालू होता....पण एकदाची आजीबाई खोली सोडून सार्या बायकांच्यात आल्या.... तीन सुना, एक मुलगी आणि एक पाहुणी मावशी याना त्यानी जवळ घेतले, गोडगोड बोलल्या....पण परवापरवा आलेली लाडक्या नातवाची बायको समोर उभी आहे तर तिला ना जवळ बोलाविले ना हाक मारली....जान्हवी गप्पच.
उद्याही तिचे नोकरीवर जाणे आणि पंजाबी ड्रेस घालणे यावरून वादावादी होणार अशी चिन्हे आहेत.
मामा, मी आजीशी बोलून श्री
मामा, मी आजीशी बोलून श्री त्यांना बाहेर आणतो ते बघितले.
जान्हवीला पंजाबी ड्रेस घालायला देण्याबाबत खूप चर्चा करण्यात काय अर्थ आहे, तिला जरूर घालायला दयावा, ती परमिशन मागतेय यातच मोठेपणा आहे कारण प्रत्यक्ष जीवनात गेली २०-२२वर्षे सर्रास ड्रेसेस घालतात बहुतेकजणी कारण ते नोकरीसाठी जो प्रवास करायचा असतो त्यासाठी सोयीचे असतात.
मालिकेत मात्र लग्न झाल्यावर साडीतच दाखवतात बऱ्याच वेळा (काही अपवाद आहेत).
सध्या बोअर होत चालली आहे ही
सध्या बोअर होत चालली आहे ही मालिका...पण श्री आणि जान्हवी साठी पाहिली जात आहे....
ड्रेससाठी जान्हवी परवानगी
ड्रेससाठी जान्हवी परवानगी मागत असलेली पाहून हसावे की रडावे ते कळले नाही
आचरट पणा आहे नुसता
आता जान्हवी श्वास घेऊ का असे विचारेल अशी शक्यता वाटुन गेली
आपल्याला खरंच ड्रेस साठी
आपल्याला खरंच ड्रेस साठी परवानगी मागणे वैगरे वेडेपणा वाटू शकतो.. पण काही घरांमध्ये "ड्रेस नको, पण रुसवा/नाराजी आवर" अशी स्थिती पाहिली आहे. जान्हवी ताकदेखील फुंकून पिणार असं दिसत<य...
बायदवे, खरा शब्द जान्हवी आहे
बायदवे, खरा शब्द जान्हवी आहे की जाह्नवी... ?? मी "जाह्नवी" बरोबर असं ऐकलय, पण इकडे शिरेलित तर सगळीकडे जान्हवीच आहे.
गोगो.... संस्कृत रुपात
गोगो....
संस्कृत रुपात जाह्नवी साजेसे दिसते, पण सीरिअल कथानकात तिच्या नावाचे स्पेलिंग Janhavi असे केले गेले असल्याने उच्चार आणि लिखाणात सरसकट "जान्हवी" असे म्हटले जाते आणि तेच सादरीकरण स्वीकारले गेले आहे. जाह्नवीचे स्पेलिंग मात्र "Jahnavi" असे करावे लागले असते....
हृदयनाथ आणि र्हदयनाथ असे आणखीन् एक रुप तुमच्या पाहाण्यात/वाचनात आले असेल....या नावाचे स्पेलिंग Hridayanath आणि Rhidaynath असे केल्याचे आढळेल.
Pages