पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)
नमस्कार मंडळी !
झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.
मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.
कृती अगदी सोप्पी विनासायास आणि कुठेही सहज मिळणाऱ्या साहित्यात हा आकाश कंदिल बनवता येण्यासारखा आहे. ना कटकट तेही झटपट. आपला आकाशकंदिल चायना मेड पेक्षा होममेड आणि हँडमेड असेल तर आनंद द्विगुणित नक्कीच होईल हो ना ?
चला तर बघुया कसा बनवलाय आकाश कंदिल.
साहित्य काय काय आहे ? रंगित कागद, कात्री, गम आणि स्टेपलर. झालंच तर न वापरात्या सीडीज आणि एक सोनेरी लेस बास इतकच.
फोटोत दाखवल्या प्रमाणे कोणत्याही ब्राईट कलरचा एक मोठा थोडासा जाड पेपर. मी ९ इंच बाय १६ इंच आकाराचा पेपर कापून त्याला गोल स्टेपल करून सिलेंडर बनवला. हा मुख्य पेपर जर जाड असेल तर त्यावर हवी ती नक्षी कोरून कापून घ्या म्हणजे प्रकाश बाहेर पडल्यावर सुंदर दिसेल.
आपल्या आवडीप्रमाणे रंगितपेपर्स ६ बाय ६ चे चौकोन कापून घेतले. नागमोड्या कात्रीने पेपरच्या किनारींना नक्षी तयार केली. आणि त्रिकोणात दुमडून पिन लाऊन टाकली. मग हे असे बनवलेले त्रिकोण त्या गोलाकार सिलेंडर वर इंद्रधनुशी मिळतेजुळते जवळ जवळ ठेऊन चिकटवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडती रंगसंगती घ्या.
नंतर सिलेंडर च्या वरच्या आणि खालच्या किनारीला लेस लावली आणी दुसरा एक रंगीत पेपर कापून खाली झिरमिळ्या चिकटवल्या. आकाशकंदिल वर लावण्या पुर्वी त्यात लाईट बल्ब लाऊन सिलेंड्रिकल शेप च्या वरच्या बाजूला झाकणासारखी सीडी लावल्यास सीडी च्या चकचकीत पणा मुळे जास्त प्रकाश परावर्तीत होईल.
झाला इंद्रधनुशी आकाश कंदिल तय्यार. आहे की नाही खरच सोप्पा ?
शुभ दिपावली !
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो !
संपदा
शुभ दिपावली ! मस्त आणि सोप्पा
शुभ दिपावली !
मस्त आणि सोप्पा प्रकार आहे की !
डॅफो फार सुंदर झालाय
डॅफो फार सुंदर झालाय आकाशकंदिल. तुझ्या हातात जादु आहे.
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
डॅफो, झकासच आहे तुझा
डॅफो, झकासच आहे तुझा आकाशकंदिल!
शुभ दिवाळी!
मस्त ! शुभदिपावली
मस्त !
शुभदिपावली
एकदम देखणा झालाय. आवडला.
एकदम देखणा झालाय. आवडला.
खुप मस्त. दिवाळीच्या
खुप मस्त. दिवाळीच्या शुभेच्छा.
अतिशय सुरेख ....
अतिशय सुरेख ....
सुरेख झालाय.. दिवाळीच्या
सुरेख झालाय.. दिवाळीच्या शुभेच्छा!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सुंदर...
सुंदर...
डॅफो................मस्त आणि
डॅफो................मस्त आणि खरंच सोप्पा आकाशकंदिल!
मस्त आकाशकंदील.
मस्त आकाशकंदील.
खूपच सुंदर.. घरी बनवलेला
खूपच सुंदर..
घरी बनवलेला आकाशकंदिल केव्हाही जास्त आनंद देईल.तो करताना आणि लावल्या नंतर जो आनंद मिळतो तो शब्दात नाही व्यक्त करता येत.
मस्त आकाशकंदिल. मी आधी बघितला
मस्त आकाशकंदिल.
मी आधी बघितला असता तर पोरांकडून दिवाळीत बनवून घेतला असता.
खुप सुंदर, दुरंगी झिरमिळ्या
खुप सुंदर, दुरंगी झिरमिळ्या तर खासच.
वा! सुरेखच.
वा! सुरेखच.
सुंदर.
सुंदर.
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त आहे गं कंदिल. तू तो मधे
मस्त आहे गं कंदिल. तू तो मधे वापरलेला जाड कागद कुठून आणलास (आणि त्याला काय म्हणतात ते पण सांग) पुढच्या वर्षी कामी येईल (बहुतेक )
वेका तो येल्लो चार्ट पेपर
वेका तो येल्लो चार्ट पेपर आहे. मायकल्स किंवा वॉलमार्ट ला सहज मिळेल.