Submitted by तृप्ती आवटी on 31 October, 2013 - 19:50
तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!
गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-
माझ्या सारखे कुणी लेमन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
* पहिल्या प्रकाशचित्रात आहेत त्यापैकी एक मोठी आणि इतर पाच मी केल्यात. बाकी पणत्यांना एक मैत्रिण, तिचा नवरा, माझा नवरा यांचे हात लागलेत. दुसर्या चित्रातल्या स-ग-ळ्या मी रंगवल्यात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच दिसतायत.
मस्तच दिसतायत.
छान आहेत
छान आहेत
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
खूप सुरेख. ती मोर वाली फार
खूप सुरेख. ती मोर वाली फार आवडली.
मस्तच
मस्तच
हायला!!! सह्हीच झाल्यात की.
हायला!!! सह्हीच झाल्यात की. सिंडीबाय तुम्हीपण कलाकारांच्या कळपात गेल्या म्हणायच्या!
>>>>
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
>>>>>
वॉव..सिंडरेला.. सह्हीच
वॉव..सिंडरेला.. सह्हीच झाल्यात पणत्या.. इतक्या सुर्रेख पणतींमधे तेल ,वात लावाविशी वाटेल का???? ऊप्स!!
सूचना, लई म्हंजे लईच्च आवडल्या
मस्त दिसतायत.. सुचना.. लई
मस्त दिसतायत..
सुचना.. लई भारी!!
सूचनांसकट आवडल्या या पणत्याही
सूचनांसकट आवडल्या या पणत्याही ........
सुरेखच सूचना एकदम आवडेश
सुरेखच

सूचना एकदम आवडेश
wow ....खुपच सुन्दर... कोणता
wow ....खुपच सुन्दर... कोणता रंग वापरला आहे?
सुरेखच मी लेमनी कॅटेगरी
सुरेखच
मी लेमनी कॅटेगरी वालीच आहे. दहा वेळा करुन बघायचा झटका येऊन आवरतं घेतलय कारण स्वतःच्या रंग कौशल्यावर फारच गाढा विश्वास आहे
तरी एकदा तरी हे प्रक्रण हाताळायचा मोह होतोय. रंग कोणते वापरलेस? आणि वर काही वॉर्निश टाईपचं लावावं लागतं का?
असच ह्यावेळी सिडी क्राफ्ट रांगोळी करायचा प्ल्यान होता (नुसताच डोक्यात) सिडी घरात आहेतच. ग्लास पेंटींग कलर चालतील असं वाचलय नेटवर एका ठिकाणी. बघू त्यालाही मुहूर्त कधी लागतोय. तू त्याचेही प्रयोग केले आहेस का? असशील तर त्याबाबतीतही ह्या लेमनीला टिप दे
सिंडी एकदम सुर्रेख काम आहे
सिंडी एकदम सुर्रेख काम आहे
सूचना निव्वळ भारी !!
जबरीच !! सही झाल्यात सिंडे !!
जबरीच !! सही झाल्यात सिंडे !!
स्वस्तिकवाली पणती सर्वात
स्वस्तिकवाली पणती सर्वात जास्त आवडली. पण इतक्या शोभिवंत पणत्यांमध्ये खरंच तेल ओतवणार नाही!
मस्त !
मस्त !
मस्त झाल्या आहेत. नुस्त बघून
मस्त झाल्या आहेत. नुस्त बघून दिवाळीचा फील आला. रंग कुठले वापरले, ते सांगणार का प्लीज?
खरोखर एकापेक्षा एक झाल्यायत
खरोखर एकापेक्षा एक झाल्यायत पणत्या…. मोराची तर All Time Favorite…
ंसुचनांसहित पणत्या आवडल्या..
ंसुचनांसहित पणत्या आवडल्या.. मस्त!!!!
छानच.
छानच.
वॉव, खूपच सुंदर. मला रंगाचा
वॉव, खूपच सुंदर. मला रंगाचा एखादा फराटातरी नीट जमेल का? याची शंकाच आहे.
वॉव सिंडी . मस्तच
वॉव सिंडी . मस्तच
मस्त! सुचना-विशेषकरून तिसरी
मस्त! सुचना-विशेषकरून तिसरी भारी आहे
>> म्हाराज गडावर पोचल्याचा
>> म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.

मस्त झाल्यात पणत्या.
मस्त झाल्यात पणत्या. सुचना
मस्त झाल्यात पणत्या. सुचना आवडल्या.
सुरेख !!!
सुरेख !!!
धन्यवाद सगळ्यांना वर्षु, सई-
धन्यवाद सगळ्यांना
वर्षु, सई- अशा पणत्यांमध्ये तेल आणि वात मी तरी घालत नाही. टी लाइट्स लावायचे.
कविता, अनया- लाल आणि कॉपर रंग ग्लास पेंट आहे. बाकीचे अॅक्रिलिक आउटडोअर पेंट्स आहेत. वरून काही कोटिंग केलेले नाही. दुसर्या प्रचिमधल्या गडद निळ्या आणि हिरव्या रंगासाठी ऑइल पेंट बेस्ड पेन्स वापरले आहेत. या पेनांना निब आहे आणि शाईपेन सारखे चालतात. त्यामुळे काम खूप सोपं होतं. पण एक तर हे पेन्स लगेच बंद पडले. दुसरे महत्वाचे म्हणजे त्यात xylene असतं असं त्यावर लिहिलं आहे. त्यामुळे वापरायचे की नाही तुम्ही ठरवा. ब्रश ईशानच्या बॉक्समध्ये सापडले ते घेतले.
कविता, सिडी क्राफ्ट रांगोळी
कविता, सिडी क्राफ्ट रांगोळी गेल्या वर्षी केली होती. त्यासाठीच तो लाल ग्लास पेंट आणला होता
रांगोळीत रंगकाम कमी आणि रेडीमेड खडे वगैरे वापरले तर पटकन होते आणि जास्त चांगली दिसते.
सिंडे, शेवटी आहेत त्या
सिंडे, शेवटी आहेत त्या डिझायनर पणत्या प्लेन कुठे मिळाल्या? इथे मिळणार्या सगळ्या रंगवलेल्याच बघितल्या आहेत.
सुचना मस्त. छानच झाल्यात
छानच झाल्यात सिंडी!
Pages