निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
स्पॅथोडिया जॅकरंदाचे फोटो
स्पॅथोडिया जॅकरंदाचे फोटो मस्तच!
नुकताच "संहिता" पाहिला
नुकताच "संहिता" पाहिला त्यातल्या राजवाड्याच्या समोर जॅकरांदा दिसतो
ही काही झाडे मी इथे कधीही
ही काही झाडे मी इथे कधीही फुलताना पाहिलीत. कधीही म्हणजे त्यांचे ठराविक महिने नाहियेत, जसे गुलमोहर फक्त मे मध्येच दिसतो, तसे या हल्लीच दिसू लागलेल्या झाडांचे नाहीय.
समर्थांनी हेही लिहिलेय याची
समर्थांनी हेही लिहिलेय याची कल्पनाच नव्हती मला.
बीबीसी ची एक डॉक्यूमेंटरी आहे यावर. शिवाय " द शिप" नावाचा एक चित्रपट पण आहे, असे वाचले होते.
समर्थांनी हेही लिहिलेय याची
समर्थांनी हेही लिहिलेय याची कल्पनाच नव्हती मला. >>>>> आमच्या इथे मॅनेजमेंट संबंधी लेक्चर्स द्यायला जे कोणी मराठी तज्ज्ञ लोक्स येतात ते समर्थांना "मॅनेजमेंट आदिगुरु" म्हणून गौरवतात ..... याकरता दासबोध हा अतिशय उत्कृष्ट ग्रंथ आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
बांधकामाच्या विटा कशा करायच्या, बोरु - शाई कशी करायची इथपासून कणिक कशी मळायची, वेगवेगळे खाद्य - पदार्थ कसे करायचे असे विपुल लेखन समर्थांनी केलेले आहे. आपल्याला त्यांचे फक्त दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम एवढेच ग्रंथ माहित आहेत - पण या व्यतिरिक्त समर्थांना प्रचंड माहिती होती - त्यातली काही बाहीच त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेली आहे. (सगळी लिहून ठेवणे त्या शिष्यांनाही शक्य झाले नसेल)
मधे शांकली सांगत होती की - काही वेली या उजव्या वळणाच्या असतात तर काही डाव्या - आणि हेदेखील समर्थांना माहित होते - असे आपले आजचे वनस्पतीशास्त्रज्ञ मान्य करीत आहेत.
अनेक वनस्पती, त्यांचे औषधी गुण, अनेक नेहेमी करता लागणार्या गोष्टी - घरगुती तसेच शेतीची अवजारे, तलवारींसारख्या युद्ध साहित्याचे ज्ञान, घोडे - हत्ती सारख्या प्राण्यांचे ज्ञान अशा अनेक गोष्टींमधे समर्थांना जबरदस्त गति होती - याचे पुरावेही आहेत ....
त्यांच्या प्राणप्रिय मारुतीरायाची मूर्ति ते स्वहस्ते अगदी सहज करु शकत.
त्याकाळात त्यांनी भारतभ्रमण केले होते यावरुनच आपल्याला थोडी-फार कल्पना यावी. त्यांनी अवधी भाषेतही लिखाण केलेले आहे - (गोनिदांचे "दास डोंगरी रहातो" हे पुस्तक फारच सुंदर व वाचनीय आहे - यात या अशा अप्रचलित समर्थ वाङ्मयाचा काही बाही उल्लेख आहे - सर्व मराठी वाचकांनी जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.)
म्हणूनच की काय त्यांना "राष्ट्रगुरु" ही यथार्थ पदवी दिलेली आहे. असा महापुरुष आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला हे आपले महाभाग्यच....... जय जय रघुवीर समर्थ ......
शशांक , अतिशय सुंदर माहिती
शशांक , अतिशय सुंदर माहिती दिलीस..
वाचून भारावयाला झालं.. किती अगाध ज्ञानाचे चे भांडार आहेत समर्थ!!!!
जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ! _____________/\__________.
शशांकजी धन्यवाद!
किती अगाध ज्ञानाचे चे भांडार आहेत समर्थ!!!!>>>>>>>>>>>>+१
शशांक, असे साहित्य कदाचित
शशांक,
असे साहित्य कदाचित खाजगी संग्रहात असेलही. पण लोक सहजासहजी ते कोणाला देणार नाहीत. आणि त्यांनादेखील त्याचे महत्व कळलेले असेल, याची पण शक्यता कमीच आहे.
शशांक तुम्ही दिलेली माहिती
शशांक तुम्ही दिलेली माहिती खरेच ग्रेट आहे.
(मायबोलीवरच्या इतर बीबींवरच्या चर्चा वाचुन मनात विचार आला की कोणी तिथला इथे आला तर समर्थांनी कुठल्या प्रयोगशाळेत हे सगळे सिद्ध केले हा प्रश्न विचारेल अर्थात तिथले कोणीच इथे येऊ नये ही तीव्र इच्छा.. इथे जे चाललेय ते असेच शांतपणे चालु दे...)
असे साहित्य कदाचित खाजगी
असे साहित्य कदाचित खाजगी संग्रहात असेलही >>>> समर्थ सेवा मंडळाने समर्थांचे हे इतर वाङ्मय प्रकाशित केले आहे का हे मी सांगू शकत नाही - पण समर्थांचे अवांतर वाङ्मय म्हणून अनेक प्रकाशित गोष्टीही आहेत - मी जरा चौकशी करुन सांगतो/ लिहितो - पण हे समर्थ वाङ्मय (परमार्थ वाङ्मय सोडून) बर्यापैकी प्रकाशित असेच आहे.
समर्थांचे एकंदर चरित्र पहाता ते फारच चौकस बुद्धिचे, अनेक विषयात रस घेणारे, अति दुर्मिळ ग्रहणशक्ति असणारे, विविध भाषांवर प्रभुत्व असणारे, अतितरल साहित्यिक जाण असणारे, प्रचंड लोकसंग्रह करणारे व सर्वसामान्यांना कर्माला प्रवृत्त करणारे, तरिही विरक्त असणारे संसाराभिमुख असे संत व सद्गुरु होते. सगळे दुर्मिळ गुण त्यांच्या ठायी असल्यामुळे ते एकमेवाद्वितीय असे संत होते.
- फक्त त्यांच्याच साहित्याचा जरी अभ्यास केला (श्रवण, चिंतन, मनन व निदिध्यास - म्हणजेच त्यानुसार वर्तन) व तरी सुखाने संसार करीत करीत ती व्यक्ति नक्कीच उद्धरुन जाईल यात मला तरी अज्जिबात शंका नाही.
इतर कोणाही संतांना नावे ठेवण्याचा माझा बिल्कुल हेतू नाही - पण समाज धारणा लक्षात घेता ऐहिक गोष्टी साधता साधता परमार्थ कसा करावा हे समर्थांनीच सर्वात जास्त सुंदर उलगडून सांगितले आहे. ते फार प्रॅक्टिकल गोष्टी सांगतात - ज्यात कधीही कुठल्याच गोष्टीचा अतिरेक वाटत नाही व सर्वांना त्या सहज आचरता येतील अशाच गोष्टी ते सांगतात.
(या करता मी एक वेगळा लेख लिहीनच.... - नाहीतर हा धार्मिक धागा होऊन जाईल...)
मायबोलीवरच्या इतर बीबींवरच्या
मायबोलीवरच्या इतर बीबींवरच्या चर्चा वाचुन मनात विचार आला की कोणी तिथला इथे आला तर समर्थांनी कुठल्या प्रयोगशाळेत हे सगळे सिद्ध केले हा प्रश्न विचारेल >>> हे सगळे प्रकाशित वाङ्मयाचेच मी सांगत आहे. अप्रकाशित वाङ्मय तर कितीतरी असेल अजून...... व समर्थांसारख्याचे चरित्र समजावून घ्यायचे तर त्या व्यक्तिच्या बुद्धिची झेपही तेवढी ताकदवान हवी ना ???
समर्थांना जाणून घ्यायचा प्रयत्न परमार्थी मंडळींपेक्षा संसारी मंडळींनी करणे फार गरजेचे आहे. समाजाला त्यांच्या शिकवणुकीची गरज आहे.... - मी वेगळा धागाच काढतो ना - हे सगळे लिहिण्यापेक्षा .....
नक्कीच लिह्या. मला
नक्कीच लिह्या. मला समर्थांबद्दल खुपच आदर आहे. त्यांनी निरोगी शरीरातच निरोगी मन राहिल हे जाणले आणि त्याचा प्रचार केला. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भुमंडळी कोण आहे हा दरारा केवळ तेच निर्माण करु शकले.
(शाळेत पंपुशेटची कथा होती त्याची आठवण झाली )
- मी वेगळा धागाच काढतो ना -
- मी वेगळा धागाच काढतो ना - >>>>>>>नक्की काढा.
मी वेगळा धागाच काढतो ना - हे
मी वेगळा धागाच काढतो ना - हे सगळे लिहिण्यापेक्षा .....>>>
खरच काढा! अशा लढवय्या संताचे चरित्र समजावून घ्यायला आवडेल.
शशांक, असे प्रॅक्टीकल सल्ला
शशांक,
असे प्रॅक्टीकल सल्ला देणारे नेतेच आपल्याला लाभले नाहीत. हि लढायची वृत्ती आपल्यात असती तर परकिय
आक्रमण झालेच नसते. त्यांनी स्थापन केलेले मारुतीराय केवळ शेंदूर फासण्यापुरते राहिले.
आपला देश इतकी वर्षे इंग्रजाच्या अधिपत्याखाली राहिला त्याचे "श्रेय" आपल्याला पण मिळाले पाहिजे. मला
कधी कधी काही देशांतील लोकांकडून त्याबद्दल ऐकून घ्यावे लागले. खोटं वाटेल, असा स्वायत्त राहिलेला देश जसा थायलंडही होता तसाच इथिओपिया देखील. त्या देशांवर कधीही वसाहत झाली नाही.
असे प्रॅक्टीकल सल्ला देणारे
असे प्रॅक्टीकल सल्ला देणारे नेतेच आपल्याला लाभले नाहीत..+१.
शशांकजी धन्यवाद, खरंच वेगळा
शशांकजी धन्यवाद, खरंच वेगळा धागा काढा. 'जय जय रघुवीर समर्थ'.
आपण कायम फक्त इंग्रजी
आपण कायम फक्त इंग्रजी आधिपत्याचा उल्लेख आपले पारतंत्र्य दाखवण्यासाठी का करतो? इंग्रज येण्याआधी इथे काय परिस्थिती होती?
त्याआधी जर सर्व आलबेल होते तर मग शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि नंतर ते टिकवण्यासाठी आयुष्यभर इतकी धडपड का केली? त्यांच्या वंशजांनाही नंतर अगदी अटकेपार झेंडे नेऊन का गाडावे लागले, पानीपताची लढाई का करावी लागली?
शिवाजीराजांच्या आधी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती?
इंग्रज भारतात राज्यकर्ते झाले तेव्हाचा भारताचा नकाशा काय चित्र दाखवतो? त्यात इथल्या मुळ लोकांचे राज्य किती आणि इथे आधी आक्रमक म्हणुन आलेले, नंतर इथेच राहिलेले आणि इथल्या संस्कृतीलाच आमुलाग्र बदलणा-या लोकांचे राज्य किती होते? त्यांचे आधिपत्य पारतंत्य्र समजायचे नाही तर मग शिवाजीमहाराजांचा इतका जयजय कार कशासाठी करायचा?
शाळेत असताना फक्त महाराष्ट्राचा इतिहास खोलात जाऊन शिकलेय. बाकी उर्वरीत भारताचा फक्त वरवरचा. त्यामुळे शिवाजी महाराजांसारखे इतर कोणी वीर उर्वरीत भारतात झाले तरी त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. राणा प्रताप हे एक नाव ठळकपणे पुढे येते. यालाही आयुष्य रणांगणावर का काढावे लागले? अजुन असे कितीतरी असतील ज्यांचा इतिहास शोधला तर त्यांचे आयुष्य लढण्यातच गेले हे दिसुन येईल. हे सर्व वीरपुरूष काय स्वकियांविरुद्ध लढत होते?
मला तर इंग्रजी सत्ता ही एकप्रकारे blessing in disguise असे वाट्ते. डोळ्यांना झापडे लाऊन आयुष्य ढकलणा-या इथल्या समाजाला त्यांनी नियंत्रित करायचा प्रयत्न केला, त्यात थोडेफार यशही मिळवले. जरी त्यांनी हे सगळे त्यांचा कारभार नीट चालावा यासाठी केले तरी यातुन फायदा इथल्या भुमीचाही झाला.
याआधीच्या राज्यकर्त्यांनी असले विचार कधी केलेच नव्हते. कारण असले विचार त्यांच्या डोक्यात कधी आले नव्हते. इथला समाज जसा होता तो तसाच राहणे त्यांच्या फायद्याचे होते. ते स्वतः कधीही सिव्हिज्लाई़ड नव्हते, इंग्रज स्वतः सिविलाइज्ड होते आणि त्यांनी इथल्या समाजालाही ती शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
स्वतःच्या सोयी साठी त्यांनी इथल्या समाजाला शिक्षण द्यायला सुरवात केली. आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये शिक्षण ही संकल्पनाच नव्हती. या शिक्षणामुळॅ बाहेरच्या जगाची कवाडे उघडली गेली. आपण कुठे आहोत आणि जग कुठे चाललेय याचे भान आले आणि मग त्याचा परिणाम म्हणजे आपण स्व्तंत्र व्हायला पाहिजे ही भावना मनात आली.
प्रॅक्टीकल सल्ला देणारे लोक जरी थोडे असले तरी तो सल्ला मानुन त्यावर चालायचे काम समाजाने करायचे असते. इथे समाज कायम निद्रावस्थेत राहिला. सल्ले देणा-यांचे आयुष्य संपल्यावर ते सगळॅ सल्ले पुस्तकांमध्ये जाऊन बसले आणि लोक परत झोपले.
भारतात चांगले नेते का झाले नाहीत आणि झाले असते तर कय झाले असत ही चर्चा व्यर्थ आहे कारण आपली मानसिकता अशा नेत्याचा पुतळा उभारुन जयंतीमयंतीला फक्त हार चढवायचे ही आहे.
थायलंड येथील पटाया जवळील नाँग
थायलंड येथील पटाया जवळील नाँग नूच बाग खूपच प्रचंड आहे. त्यातील काही फोटो - त्याबाजूला जाणारे कोणी असेल तर जरुर या बागेला भेट देणे - फारच अप्रतिम मेंटेन केलेली व अतिविशाल अशी ही बाग आहे ......
वा कि ती सुंदर... तु म्ही
वा कि ती सुंदर... तु म्ही जाऊन अलात काय?
वा शशांक दा, खूप छान माहिती,
वा शशांक दा, खूप छान माहिती, पटाया ला जाऊन आले आहे पण हि बाग नाही पाहिली...
समर्थांबद्दल "भेदिले सूर्य्ंमंडळा" पण छान आहे.... नुकतेच वाचले.. सुरेश भटांचे ...
त्यात त्यांनी ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे कि समर्थांनी कशी सगळ्याबद्द्ल माहिती मिळवली...
. एक उदाहरण म्हणून सांगते ते मरण पावलेले गंगाधर पंत समर्थांनी जागे केले ही गोष्ट माहित आहे ... पण त्यात हा च्मत्कार नसून ते मेलेलेच नव्हते , कोमामध्ये होते आणि हे समर्थांना त्यांनी आयुर्वेदाचा आभ्यास केला असल्यामुळे सम्जले आणि त्यांनी योग्य उपचार करून त्यांना शुध्दीवर आणले असे उल्लेख आहेत ...
म्हणजे फक्त देवत्व न देता त्यांचा अभ्यास किती खोल होता ते दखवले आहे..मला त्यामुळे ते खूप भावले...
पहिल्यांदाच एवढा मोठा प्रतिसाद देत आहे ...
(हे सगळं इथे लोड केल्यावर
(हे सगळं इथे लोड केल्यावर लक्षात आले की शांकलीच्या सदस्यत्वातून मी (शशांक) हे लोड केले आहे - तेव्हा कृपया समजून घेणे ..... )
ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या कामाकरता मी बँकॉकला गेलो होतो - तेव्हा या बागेत जाण्याचा योग आला - ही फार म्हणजे फारच अप्रतिम बाग आहे - मी जो भाग पाहिला तो बहुतेक फक्त एक शतांश भाग असावा.
इतक्या नॉव्हेल पद्धतीने ही तयार केलीये की माझा तर त्या व्यक्तिला साष्टांग दंडवतच आहे - इतकी कलात्मकता, इतकी विविधता - तिथे मी असताना सर्व नि ग करांची मला प्रकर्षाने आठवण येत होती
http://www.nongnoochgarden.com/ या लिंकवरुन काही बाही कल्पना येईल - पण प्रत्यक्षात बघून अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटते ...... ज्याला कोणाला शक्य असेल त्याने मुद्दाम या बागेला भेट द्यावी - २-४ दिवस दिलेत तर काही बाही बघता येईल - (सगळी बाग अगदी नीट पहायला १ महिना लागेल बहुधा ... )
या बागेत एक थाई कल्चरल शो व एक एलिफंट शो देखील दाखवतात - एलिफंट शो पण केवळ अप्रतिम ...
(हे सगळं इथे लोड केल्यावर
(हे सगळं इथे लोड केल्यावर लक्षात आले की शांकलीच्या सदस्यत्वातून मी (शशांक) हे लोड केले आहे - तेव्हा कृपया समजून घेणे ..... )
नाँग नूच बाग - इथले किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते मला ... हे अगदीच मासले म्हणता येतील ....
नाँग नूच बाग ----
नाँग नूच बाग ----
शशांकजी, खूप अप्रतिम फोटो.
शशांकजी, खूप अप्रतिम फोटो.
फोटो, माहीती चर्चा सगळे छानच
फोटो, माहीती चर्चा सगळे छानच चालू आहे. मागच्या बुधवारपासुन ऑफिसला आले नव्हते. घरुन वेळ मिळत नव्हता कॉम्प्यु उघडायला.
आमच्या आंब्यांना खुंटी कलमे केली आहेत. दोन दिवसांत फोटो टाकते.
व्वा! शशांकजी अप्रतिम फोटो.
व्वा! शशांकजी अप्रतिम फोटो. धन्यवाद! (इथे दाखवल्याबद्दल)
पाऊस पडला नाही तरी कधी कधी
पाऊस पडला नाही तरी कधी कधी जमिनीतून अचानक भसाभस पाणी बाहेर यायला सुरवात होते.
पाणी बाहेर पडण्याची जादुच म्हणावी लागेल ! इकडे जमीनीखाली ४००-५०० फुट जाऊन देखील पाणी वर येत नाही.
दिनेशदा,
पावसाची माहिती, संगीताच्या गप्पा छान !
शशांकजी,
सध्या पुण्यात बरेच ठिकाणी स्पॅथोडिया फुललाय आणि काही ठिकाणी तर चक्क चुकार झकरंदाही ++१
फुलांचे आणि बागेचे फोटो आणि माहिती तर झक्कास
काल नवले कैम्पस मध्ये हा स्पॅथोडिया पाहिला, याची एकाच ठिकाणी ओळीने ३०-४० झाडं आणि तिही लालभडक फुललेली.
इकडे जमीनीखाली ४००-५०० फुट
इकडे जमीनीखाली ४००-५०० फुट जाऊन देखील पाणी वर येत नाही.
आपल्याकडे उपसायची कॅपॅसिटी भरपुर आहे, भूगर्भातील स्त्रोत उपसले गेलेत पुर्णपणे, त्यामुळे कितीही खाली गेले तरी आता पाणी सापडत नाही.
सुपभात. सामान्य आंब्याला
सुपभात.
सामान्य आंब्याला केलेले हापुसचे कलम.
बाकी हे कलम करण्याच्या पूर्ण प्रक्रियेचे फोटो एका वेगळ्या धाग्यात नंतर देते.
Pages