निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
साधना,हो बरोबरेय पण ते
साधना,हो बरोबरेय
पण ते चावतात ते मला माहित नव्हतं ग 
शशांकदादा, आता मला वटवाघुळ (समजा) चावलच तर मी दवाखान्यात जाईनच
कारण आता मला माहित आहे की कदाचित रेबीजचा धोका असु शकतो.
या आधी माहित नव्हतं सो मी नसते गेले असं म्हणतेय मी
बहुतांश वटवाघुळे फळे खातात
बहुतांश वटवाघुळे फळे खातात … पण एक VAMPIRE BAT नावाचे वटवाघूळ फक्त रक्त पिउन जगते
national geography वरील हि लिंक पहा http://animals.nationalgeographic.co.in/animals/mammals/common-vampire-bat/
बहुतांश इंग्लिश सिनेमे ह्या
बहुतांश इंग्लिश सिनेमे ह्या vampire bat वरच निर्माण झाले आहेत
बापरे! काय भयानक दिसतय ते?
बापरे! काय भयानक दिसतय ते?
त्याच साईटवर ही माहिती दिली
त्याच साईटवर ही माहिती दिली आहे -
During the darkest part of the night, common vampire bats emerge to hunt. Sleeping cattle and horses are their usual victims, but they have been known to feed on people as well.
The common vampire bat is found in the tropics of Mexico, Central America, and South America.
त्यामुळे लोक्स अज्जिबात घाबरु नका - भारत - आफ्रिका - युरोप- आशिया, ऑस्ट्रेलिया वगैरे लोकांना तर काळजीचे कारणच नाही ..
आपल्या आसपास अतिशय घातक विषाणू (व्हायरस) व जिवाणू / बॅक्टेरिया ( हे तर कधी कधी आपल्याच शरीरात, शरीरावरही असतात) असतात - पण निसर्गाने आपल्याला उत्कृष्ट इम्युन सिस्टिम (संरक्षण संस्था) दिलेली आहे (ज्यामुळे आपण जिवंत आहोत) हे ही विसरु नका ...
मी मागील वर्षी
मी मागील वर्षी "मुन्शिपाल्टी"च्या तलावावर जात होते. तिथल्या आजूबाजूच्या झाडांवर फार वटवाघळे लटकलेली असायची.
आणि कधी कधी आमच्या कडुलिंबावरही असतात. तीही व. वाघळेच का?
संध्याकाळच्या वेळी अगदी खालून फडफडत जातात. आणि ते आपले केस धरतात असा लहानपणी समज होता.
दिनेश संगीताबद्दल ची पोस्ट..
दिनेश संगीताबद्दल ची पोस्ट.. +१००
)
खूपच आवडली..
शशांक,सुंदर आहे रे तुमच्या कंपनी ची बाग .. (एक शंका.. तू तिथे च तुझी वर्क खुर्ची-टेबल नाही ना मांडलंयस,,
साधना इज बॅक विथ हर नवीन मार्जार कहाणी..
मी जे.एम. रोडवर खूप वटवाघळं
मी जे.एम. रोडवर खूप वटवाघळं बघितली आहेत झाडांवर लटकताना...
एकदा माझ्या हॉस्टेलच्या रूममधे आलं होतं. रुममेटने घाबरुन धावत गॅलरीत जाऊन तिथलं दार बंद करुन घेतलं..आता रूममधे मी एकटीच त्या वटवाघळासोबत आणि ते तर अगदी दारात बसलेलं... मग एका दुसर्या मैत्रिणीने समोरुन जाताना बघितलं आणि त्याला उचलून बाहेर टाकलं... मला भीती वाटत होती ते मला घाबरुन माझ्याच अंगावर येईल अशी...
शशांक,सुंदर आहे रे तुमच्या
शशांक,सुंदर आहे रे तुमच्या कंपनी ची बाग .. (एक शंका.. तू तिथे च तुझी वर्क खुर्ची-टेबल नाही ना मांडलंयस,>>>> खरं तर माझ्या केबिनच्या काचेतून आत्ता मला वडाचे झाड, त्यावरील लालचुटुक वडांगळं, ते खायला येणारे विविध पक्षी, त्याशेजारील बॅडमिंटन बॉल ट्री, विलायती चिंच, नांद्रुक आणि चंदनही दिसताहेत...
बघ, किती मजा आहे का नाही !!
आमच्या सीप्झ मध्ये अक्षरक्षः
आमच्या सीप्झ मध्ये अक्षरक्षः शेकड्याने वटवाघळे आहेत्..एकदा सीप्ज्झ च फोटोसेशन केलच पाहिजे..जिप्सी असता इथे तर मस्त फोटो मिळाले असते..
उंच उंच झाडांना संध्याकाळी लटकलेली ववा बघितली की भिती वाटतेच..
पेशवे पार्कमधे पण झाडाला
पेशवे पार्कमधे पण झाडाला लटकलेली असतात - तळ्याच्या वर. ती बघताना नवर्याला नेमकी जक्कल आणि सुतार ह्यांची आठवण झाली. आणि सगळे वातावरणच गूढ आणि भीतीदायक झाले
घुबडांवर हि लिंक पहा
घुबडांवर हि लिंक पहा http://www.misalpav.com/node/25888 >>> ज्ञानेश राऊतने काल दिलेली ही लिंक - त्यातील घुबड अशा प्रकारचे असते - (फोटो आंतरजालावरुन साभार....)
आपली लहानपणीची आजीबाईच्या
आपली लहानपणीची आजीबाईच्या घड्याळाची कविता आठवतेय ? तसेच घड्याळ इथल्या गोरखचिंचेच्या
झाडांकडे आहे बहुतेक.
ऑगस्ट पासून पाऊस सुरु व्हायला हवा होता पण दोनचारदा केवळ शिंतोडे पडले. म्हणावा तसा पाऊस काही
पडला नाही. पण या गोरखचिंचेच्या झाडांना मात्र नवी पालवी आली आहे. पुढच्या महिन्यात फुलेही धरतील.
आम्ही राहतो तो भाग काही या देशाचा शेतीखालचा भाग नाही. ( अंगोलाच्या इतर भागात छान शेती होते, बटाट्यापासून सफरचंदापर्यंत सर्व होते ) त्यामूळे इथे पाऊस पडला नाही तरी चिंतेचे कारण नसते. आतल्या
भागात मात्र पडतोय.
पाऊस पडला नाही तरी कधी कधी जमिनीतून अचानक भसाभस पाणी बाहेर यायला सुरवात होते. अगदी रस्त्यावर पाणी साचण्याएवढे पाणी असते हे. आणि बाहेर आलेले पाणी परत जमिनीत मुरत नाही. तसेच साचून राहते. माझ्या घराजवळच असे उथळ सरोवर आहे. बगळ्यांची चंगळ असते मग.
माझ्या वाटेवरच्या एका आमराईत असेच पाणी भरले. मग ट्रक भरभरून आणून त्यात वाळू टाकली.
सध्या इथे सगळ्या झाडांवर बाळकैर्या आहेत. इथे कैर्यांना गिर्हाईक नाही. कच्चे फळ खाणे या लोकांच्या
संस्कृतीमधे बसत नाही.
पण आंबट चव मात्र खुप आवडते. एक केशरी रंगाचे फळ मिळते. साल आपल्याकडच्या कवठासारखी कठीण
असते. आत तपकिरी रंगाचा मऊसर गर असतो. आंबट असतो. तो कुसकरून त्यात तिखट मीठ घालून
छान सार होते. ( फोटो काढलाय, मग टाकतो. )
आता नवा स्वाद म्हणून गोरखचिंचेच्या स्वादाचे पेय पण बाटल्यातून मिळायला लागले आहे. चिंचेच्या
स्वादाचे तर आधीपासूनच मिळत होते. सुपरमार्केटमधे गोरखचिंचेचा गर विकायला असतो. त्याचा उपयोग
इथे दूधाला विरजण लावण्यासाठी करतात.
पाऊस पडला नाही तरी कधी कधी
पाऊस पडला नाही तरी कधी कधी जमिनीतून अचानक भसाभस पाणी बाहेर यायला सुरवात होते. >>>> एकेक नवलच म्हणायचे की..... पण हे कसे काय होते ???
एकेक नवलच म्हणायचे की..... पण
एकेक नवलच म्हणायचे की..... पण हे कसे काय होते ???>>>>>>>>> + १
दिनेशदा, सविस्तर माहिती द्या.
आपल्याकडच्या राजापूरच्या
आपल्याकडच्या राजापूरच्या गंगेसारखेच आहे हे. सहारा वाळवंटातही असे प्रकार होत असतात. सौदी मधेही असे प्रकार होतात.
कधी हे जमिनीखालून वाहत येणारे पाणी असते तर कधी अनेक वर्षांपूर्वी जमिनीखाली खडकात अडकलेले फॉसिल वॉटर असते.
सौदीमधे अशा पाण्यावर गव्हाची शेती करण्याचे प्रयोग झाले. हिरवीगार गोलाकार शेती अजूनही दिसते. पण
सौदीमधल्या खनिज तेलाप्रमाणेच हे साठेही मर्यादीत आहेत. त्यांचे पुनर्भरण होत नाही. ते पाणी संपले कि
शेती करता येत नाही. ही वर्तुळाकार शेते, विमानातूनही दिसतात.
जमिनीखाली जे पाणी वहात असते त्यासाठी वाळवंटाच अरुंद अशा विहिरी हाताने खणून तिथल्या शेतकर्यांनी
ते पाणी वळवायचे यशस्वी प्रयोग केले आहेत. यासाठी अगदी प्राथमिक अवजारे वापरली गेली. मला वाटतं
ह्यूमन प्लॅनेट मधे एक भाग आहे यावर.
http://www.boston.com/yourlif
http://www.boston.com/yourlife/health/aging/articles/2007/07/25/feline_i...
- या बातमीनुसार Steere House Nursing and Rehabilitation Center in Providence येथे एक "ऑस्कर" नावाचा चमत्कारिक बोका आहे. चमत्कारिक अशाकरता की एखाद्या व्यक्तिचा मृत्यू जवळ आलेला (२-३ तास) असेल तर तो या बोक्याला कळतो व तो अशा व्यक्तिच्या जवळ जाऊन बसतो. बाकी सगळी माहिती त्या बातमीत आहेच.
अमेरिकेलील र्होड आयलंड येतील संगोपन आणि पुनर्वसन केंद्रात हा ऑस्कर बोका रहातो.
http://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMp078108?siteid=nejm&keytype=ref... दि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननेही या "ऑस्कर"ची नोंद घेतलेली आहे.
दिनेशदा अंगोलात कच्च्या
दिनेशदा अंगोलात कच्च्या कैऱ्या खात नाहीत, किती मोठया आनंदाला मुकतात हि लोकं. तुम्ही तिकडच्या ओळखीच्या लोकांना दाखवा कच्च्या कैरीचे लोणचे, पन्हे, आंबा-डाळ, नुसते तिखटमीठ लावून खाणे, सार. तुमच्यावर फिदा होऊन हे सर्वजण खायला लागतील.
अन्जू अगदी अगदी!!! दिनेश
अन्जू
अगदी अगदी!!!
दिनेश च्या ब्रँड नेम ची लोणची, पन्हे अंगोलात मिळू सुद्धा लागतील ,काय सांगावे, वॉव, साउण्ड्स ग्रेट!!
शशांक लक्कीयेस, सीमेंट जंगलात बसून तुला इतका निसर्ग बसल्या जागी पाहायला मिळतोय..
बाहेर आलेले पाणी परत जमिनीत मुरत नाही.. किती आश्चर्यकारक आहे!!!
ववा, घुबड फक्त भुतांच्या सिनेमांची आठवण करून देतात बिच्चारे!!
अन्जू, खरं तर त्यांची भावना
अन्जू, खरं तर त्यांची भावना खुपच छान आहे. पक्ष्यांनी चोच मारल्याशिवाय फळ खाण्याजोगे होत नाही असे ते मानतात. कधी कधी वारा आला तर झाडाखाली बर्याच कैर्या पडलेल्या असतात, पण मुलेसुद्धा त्या उचलत
नाहीत.
वर्षू, दोन्ही डोळे समोरच्या बाजूला असलेला, घुबड हा एकमेव पक्षी आहे. त्यामूळे त्याला भक्ष्य व्यवस्थित
दिसते. पण त्याची मान जवळजवळ ३६० अंशात फिरते.
ब्रिटनमधल्या एका शेतकर्याने केवळ घुबडांना पाळून, शेतातील उंदरांचा नायनाट केला होता अशी क्लीप बघितली होती मी. बार्न ऑल हा शब्द उगाच नाही.
आणि ते पाण्याचे असे असते.
आणि ते पाण्याचे असे असते. समजा आपण भांड्यात तांदूळ घेऊन त्यावर पाणी टाकत राहिलो तर आधी पाणी तांदळात मुरेल पण मग मात्र वर राहिल. तसेच वाळू पुर्ण भिजल्यावरच पाणी वर येते मग ते परत वाळूत मुरायला वावच नसतो. आणि इथल्या जमिनीला चढ उतारच नसल्याने वाहणार तरी कुठे ?
सध्या पुण्यात बरेच ठिकाणी
सध्या पुण्यात बरेच ठिकाणी स्पॅथोडिया फुललाय आणि काही ठिकाणी तर चक्क चुकार झकरंदाही/ जॅकरंदा ......
जॅकरंदा --
कसलं सुंदर दिसतंय ते घुबड! ही
कसलं सुंदर दिसतंय ते घुबड! ही दोन मला हेमलकश्याला भेटली होती:


त्याच्या 'तिसर्या पापणी'चा फोटो काढायचा प्रयत्न केलाय.
कर्वे रस्त्यावर मृत्युंजयेश्वर मंदिराच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये मोठ्ठी कॉलनी आहे वटवाघळांची.
शशांक, सगळीच फुलं मस्त!
कदंबावर अपडेट : त्यांनी सगळ्या फांद्या छाटल्यात - एकही पान शिल्लक नाही, पण बुंधा (साधारण २० फूट उंच) तसाच ठेवलाय. येईल ना तो पुन्हा तरारून?
कदंबावर अपडेट : त्यांनी
कदंबावर अपडेट : त्यांनी सगळ्या फांद्या छाटल्यात - एकही पान शिल्लक नाही, पण बुंधा (साधारण २० फूट उंच) तसाच ठेवलाय. येईल ना तो पुन्हा तरारून? >>>>> येईल, येईल - नक्कीच तरारेल तो..... लक्ष ठेव व नवी पालवी फुटली की फोटो काढून टाक इथे .....
झाडांची सर्वायवल क्षमता प्रचंड असते .....
शशांक्,सुरेख फुलं.. सर्वायवल
शशांक्,सुरेख फुलं..
सर्वायवल ऑफ द सिकेस्ट हे पुस्तक इथे काही महिन्यांपूर्वी मेंशन केलं होतं.
तसच पूर्वी कधी घेतलेलं ,' ह्यूमन वाईल्डलाईफ ' द लाईफ दॅट लिव्ज ऑन अस - लेखक ,' डॉ. रॉबर्ट बकमॅन चं पुस्तक घेतलं होतं ते आता वाचायचा प्रयत्न करतेय.. पर ये सायंटिफिक फॅक्ट हजम करायला फारच विलपॉवर लागतीये..
आपल्या शरिरात कितीतरी मिलियन कोण कोण ते जंतू ,कसे कसे को एक्झिस्ट करताहेत याबद्दल सविस्तर , फोटोंसकट वर्णन आहे..
मला बहुतेक पूर्ण पुस्तक वाचण्याची हिम्मत नाहीच होणारे...

मिलिंद चा विद्यार्थी असल्याने शशा़ंक बहुतेक ही हिम्मत नक्कीच करू शकतो..
आपल्या शरिरात कितीतरी मिलियन
आपल्या शरिरात कितीतरी मिलियन कोण कोण ते जंतू ,कसे कसे को एक्झिस्ट करताहेत याबद्दल सविस्तर , फोटोंसकट वर्णन आहे.. >>>>> हे शास्त्रीय सत्य आहे - त्या जंतूंशिवाय आपण जगूच शकणार नाही. त्यातले काही काही ऑपरच्युनिस्टिक (संधीसाधू) पॅथोजेन्स असतात - जरा आपल्या शरीरात गडबड झाली के लगेच डाव साधतात व इकडे आपण आजारी....
ते तुकोबा म्हणतात ना - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... तसेच आपल्या शरीराचे आहे - शरीर, त्यातील संरक्षण संस्था कायम अशा जंतू, विषाणू, बुरशी, अॅलर्जेन - यांच्याशी लढा देत आपल्याला तंदुरुस्त ठेवत असते. जरा "त्या" मंडळींनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली की आपण काही काळ का होईना धारातीर्थी (बेडवर) - मग परत आपली संरक्षण संस्था त्यांच्याशी युद्ध करुन त्यांना मागे हटवते/ काबूत ठेवते (इथे डॉ. लोक आपल्याला अनेक औषधे देऊन मदत करतात- पण आपणही सुरुवातीला शरीराला थोडा वेळ देणे आवश्यक आहे - माझे फॅमिली डॉ. कायमच सुरुवातीचे १-२ दिवस क्रोसिन वगैरे किरकोळ औषधे देऊन बघतात (ताप, सर्दी, इ. लक्षणात..) - उगाचच खूप पॉवरफुल्ल अँटिबायोटिक्स देत नाहीत ....
मला बहुतेक पूर्ण पुस्तक वाचण्याची हिम्मत नाहीच होणारे... >>> आपले शरीर एवढे तंदुरुस्त असते की आपण काही खाल्ले, प्यायले तरी ते लगेच हार मानत नाही - काहीही औषध योजना न करताही आपण दुरुस्त होऊ शकतो -प्रोव्हायडेड आपला शरीरावर तेवढा विश्वास पाहिजे आणि त्या शरीराला जरा वेळ देणे आवश्यक आहे - इतकी वर्षे माणूस पृथ्वीतलावर जगून आहे याचे कारणच आपली संरक्षण संस्था (इम्यून सिस्टिम) - नाहीतर आपण केव्हाच संपून गेलो असतो - त्यामुळे बिन्धास्त वाच, बिन्धास्त रहा .....
हे सगळे माहित असलेले लोक्स आयदर फार बिन्धास्त असतात किंवा फार म्हणजे अति काळजी घेतात - सारखे हात धू, तोंड धू... आणखीही बरेच ...

श्री समर्थांसारख्या संतांनाही
श्री समर्थांसारख्या संतांनाही हे पूर्ण माहित होते -
...)
- दासबोधात (दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||३||समास पहिला : जन्मदुःख निरूपण) त्यांनी याचे कसे प्रत्ययकारी वर्णन केले आहे जरुर वाचणे - (कितीही किळस आली तरी हे आपलेच वर्णन आहे हे ध्यानी घेणे... : )
वरी वरी दिसे वैभवाचें | अंतरीं पोतडें नर्काचें |
जैसें झांकणें चर्मकुंडाचें | उघडितांच नये ||१४||
कुंड धुतां शुद्ध होतें | यास प्रत्यईं धुईजेतें |
तरी दुर्गंधी देहातें | शुद्धता न ये ||१५||
अस्तीपंजर उभविला | सीरानाडीं गुंडाळिला |
मेदमांसें सरसाविला | सांदोसांदीं भरूनी ||१६||
अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं | तेंहि भरलें असे देहीं |
नाना व्याधी दुःखें तेंहि | अभ्यांतरी वसती ||१७||
नर्काचें कोठार भरलें | आंतबाहेरी लिडीबिडिलें |
मूत्रपोतडें जमलें | दुर्गंधीचें ||१८||
जंत किडे आणी आंतडी | नाना दुर्गंधीची पोतडी |
अमुप लवथविती कातडी | कांटाळवाणी ||१९||
सर्वांगास सिर प्रमाण | तेथें बळसें वाहे घ्राण |
उठे घाणी फुटतां श्रवण | ते दुर्गंधी नेघवे ||२०||
डोळां निघती चिपडें | नाकीं दाटतीं मेकडें |
प्रातःकाळीं घाणी पडे | मुखीं मळासारिखी ||२१||
लाळ थुंका आणी मळ | पीत श्लेष्मा प्रबळ |
तयास म्हणती मुखकमळ | चंद्रासारिखें ||२२||
मुख ऐसें कुश्चीळ दिसे | पोटीं विष्ठा भरली असे |
प्रत्यक्षास प्रमाण नसे | भूमंडळीं ||२३||
पोटीं घालितां दिव्यान्न | कांहीं विष्ठा कांहीं वमन |
भागीरथीचें घेतां जीवन | त्याची होये लघुशंका ||२४||
एवं मळ मूत्र आणी वमन | हेंचि देहाचें जीवन |
येणेंचि देह वाढे जाण | यदर्थीं संशय नाहीं ||२५||
पोटीं नस्तां मळ मूत्र वोक | मरोन जाती सकळ लोक |
जाला राव अथवा रंक | पोटीं विष्ठा चुकेना ||२६||
निर्मळपणें काढूं जातां | तरी देह पडेल तत्वतां |
एवं देहाची वेवस्था | ऐसी असे ||२७||
ही सर्वात शेवटची ओवी आहे ती फार महत्वाची आणि प्रॅक्टिकल आहे - फार (म्हणजे अति) स्वच्छता करु गेलात तर देह संपूनच जाईल (देह पडेल सर्वथा) - तेव्हा बी कॉशस ...
दासबोध ग्रंथ हा केवळ महान ग्रंथ आहे - यात काय काय सांगितले आहे हे जरुर जाणू घ्या - एवढे विरक्त समर्थ पण संसारातल्या किती तरी गोष्टी सहज सांगून गेलेत....
हो हो.. मला पण,'ती' दुसरी
हो हो.. मला पण,'ती' दुसरी काळजीये..
लहानपणी आमच्या ओळखीच्या एक बंगाली आज्जी होत्या शेवटी शेवटी त्या ,'स्वच्छ स्वच्छ च्या पायी अक्षरशः वेड्यासारख्या वागू लागलेल्या.. कुणी त्यांच्या फाटकातून आले तरी त्यांच्यावर येता जाता पाणी उडवायच्या शुद्धीकरणाकरता..
obsessive-compulsive disorder की शिकार!!!!!!!!!!
समर्थ रामदासांना __/\___
समर्थ रामदासांना __/\___ कोणत्या काळात त्यांनी एव्हढं स्टडी करून लिहून ठेवलेलंय..
)
इथे दिल्याबद्दल धन्स शशांक
(पण तरीमी मी नाही वाचणारे पुस्तक...
__/|\__ जय जय रघुवीर समर्थ!
__/|\__ जय जय रघुवीर समर्थ! आख्खा दासबोध समजाउन घ्यायचा म्हणजे आयुष्य अपुरं पडेल.
समर्थांनी 'त्या' काळात लिहुन ठेवलेलं हे सगळं अद्भुत आहे.
शशांकजी, जॅकरांदा कुठे मिळाला तुम्हाला?
जॅकरांदा, कदंब आणि कैलाशपती ही माझ्या लिस्टीत आहेत. पुण्यात कुठे कुठे सापडतील ते सांगा.
गौरी, ती घुबडं किती सुंदर दिसतायत!
Pages