नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर त्या आजी इतक्या अनुभवी आणि सुज्ञ ... जान्हवीची आई ज्याप्रकारे बोलते त्यावरुन तिच्या स्वभावात गडबड आहे हे कुणालाही सहज कळेल. शिवाय आता ती तिची सावत्र आई आहे हे ही कळलेले आहे ! जान्हवीविषयी अढी असली तरी ह्या दोन गोष्टींवरुन आजींनी थोडे अंतर्मुख होणे अपेक्षित होते.
असो. सध्या बघतेय. अति व्हायला लागले की बघणं थांबवायचं. हाकानाका Happy

शुक्रवार १८ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ आज सर्वार्थाने गोखले आणि सहस्त्रबुद्धे या दोन्ही घरांकडे लग्नाची तयारी सुरू झाली. गोखले घरी गुरुजींच्या उपस्थितीत लग्नापूर्वीच्या सार्‍या घडामोडी पार पडल्या....२० आक्टोबरचा मुहूर्त निश्चित केला गेला आणि देवाणघेवाण, मानपान, पत्रिका आदी सार्‍या बाबींना फाटा देण्यात आला.....[ ही एक चांगली बाजू दिग्दर्शकानी दाखविली....जी समाजकल्याण शिक्षण सदरात येऊ शकते]. सहस्त्रबुद्धे आपल्या घरी आले; आणि लग्नाच्या खरेदीबाबत, घर सजावटीबाबत बोलू लागले..... शशीकलाबाईच्या त्या लबाड भावाने तेवढ्या गडबडीत गोखल्यांकडील शरयूचा मोबाईल ढापला....पण त्या स्त्रियां आता लग्नाच्या घाईत आहेत आणि शरयूचा स्वभाव मुळातच विसराळू असल्याने तिच्या मोबाईलचा प्रश्न कुणी गांभीर्याने घेत नाहीत.

जान्हवीची बँकेतील मैत्रिण गीता आली आहे जी तिच्याकडे राहाणार आहे.....चाळीतील मित्र मनिष आणि भाऊ पिंट्या घराची सजावट करतील तर सदाशिवराव फोनवरून सर्वांना निमंत्रण देण्यात गर्क झाले आहेत. तशात मामा आणि आई लग्नासाठी दागिने आणि कपडे खरेदी करायला बाहेर पडत असताना जान्हवी त्याना त्यासाठी "पैसे कुठून आणणार ?" असा योग्य प्रश्न विचारते, पण मामा तिला "तू नको करू काळजी, मी आहे,' असे बढाईखोर उत्तर देऊन निघतो. ज्या ठिकाणाहून मामा आणि आई दागिने खरेदी करतात तेथील काऊंटरवरील विक्रेती 'बिल कसे देणार ?" हा प्रश्न विचारते, तर त्याला उत्तर म्हणून मामा, "याचे बिल तुम्ही गोखले यांच्या घरी पाठवून द्या" असे सांगतो..... [हे कसे होईल वा होते, हे उद्याच्या भागात समजेल असे वाटते]

तयारी सुरू असताना श्री जान्हवीला फोन करतो....जान्हवी मैत्रिणीपासून अलग होऊन गॅलरीत येऊन हसतमुखाने आनंदाने फोन घेते....श्री ला चिडविते..."अरे, मला फोन करू नकोस, माझे लग्न ठरले....आता कशाला फोन करतोस ?".... यावर श्री देखील 'तुझा नवरा वेडा आहे...हे तुला सांगतो...परत सांगितले नाही असे म्हणशील..." म्हणत हसत सावध करतो....त्यावर जान्हवी उत्तरते : "आता माझा निर्णय झाला आहे... लग्न होईल ते त्याच्याशीच....आता जगणे त्याच्यासमवेतच आणि मरणेही त्याच्याबरोबरीनेच....आधीही नाही नंतरही नाही...." ~ दोघेही हळवे होतात.

श्री जान्हवीला सांगतो...."आपल्या लग्नात आपण तीन 'अ' गोष्टीला टाळायचे..." त्या कुठल्या हे तो सांगत असतानाच आपली हुशार जान्हवी उत्तरते, "हो मला माहीत आहेत.... आहेर...आहाराचा आग्रह आणि अक्षता" यावर श्री आनंदाने उदगारतो, "जान्हवी.....खर्‍या अर्थाने तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस, फक्त दुसर्‍या शरीरात राहतो आहे....मी याच तीन गोष्टी सांगणार होतो...."

आता सारे काही जमून आले आहे....उद्याचा एकच भाग आहे...लग्न तारखेपूर्वी....त्यामुळे उद्याच्या भागात काही डोकेदुखी दिग्दर्शकाने दाखवू नये, इतकीच अपेक्षा आहे.

धन्यवाद काका, आजच्या अपडेटची मी वाटच पाहत होते,आज बघता आले नाही, पाहुणे आले होते.
त्या मामाने शरयूचा मोबाईल ढापला, आता शरयूच्या नवऱ्याचे फोन येतात त्याला कळणार आणि तो ब्लॅकमेल करणार असे वाटते.

त्या मामाने शरयूचा मोबाईल ढापला, आता शरयूच्या नवऱ्याचे फोन येतात त्याला कळणार आणि तो ब्लाक्मेल करणार असे वाटते.>>>> हो काहीही करू शकतो तो वेडा मामा :रागः
बादवे सोनुली ने दिलेल्या लिंक मधे जानूची आई अ‍ॅवॉर्ड घेतल्यावर बोलत होती केवढी वेगळी दिसते ती प्रत्यक्षात. Happy

शशीकलाबाईच्या त्या लबाड भावाने तेवढ्या गडबडीत गोखल्यांकडील शरयूचा मोबाईल ढापला...>>>आता त्याला शरयूची भानगड कळेल आणि तोंड बंद ठेवण्यासाठी तो पैसे मागेल.

२० आक्टोबरचा मुहूर्त निश्चित केला गेला आणि देवाणघेवाण, मानपान, पत्रिका आदी सार्‍या बाबींना फाटा देण्यात आला.....[ ही एक चांगली बाजू दिग्दर्शकानी दाखविली....जी समाजकल्याण शिक्षण सदरात येऊ शकते]. >>> या मालिकेतुन खरोखर आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येकाने कस वागल पाहिजे याचे धडे दिले आहेत. या मालिकेकडुन विशेषतः आजच्या तरुण पिढीच प्रतिनिधित्व करणार्‍या श्री आणि जान्हवी या दोघांकडुन खूप काही शिकण्यासारख आहे आमच्यासारख्यांनी

शशीकलाबाईच्या त्या लबाड भावाने तेवढ्या गडबडीत गोखल्यांकडील शरयूचा मोबाईल ढापला...>>>आता त्याला शरयूची भानगड कळेल आणि तोंड बंद ठेवण्यासाठी तो पैसे मागेल.
सोनाली................काल मीही अगदी हेच भविष्य वर्तवलं होतं.
आणि दागिने घेऊन बिल गोखल्यांकडे? काहीही?
पण एकंदरीत लग्न ठरल्यानंतरची घरातली गडबड .........मनीष पिंट्या जान्हवी आणि मैत्रीण यांच्यातलं अगदी गोडच दाखवलं आहे.

आणि दागिने घेऊन बिल गोखल्यांकडे? काहीही?>>>>> आता आपला मामा काय धन्यवाद माणुस आहे हे माहित असुनही हे दोघच खरेदीला गेले कपडे आणि दागिन्यांच्या, कमीत कमी पिंट्याला तरी बरोबर पाठवायच होत म्हणजे बिल गोखल्यांकडे गेली नसती.

मनीष पिंट्या जान्हवी आणि मैत्रीण यांच्यातलं अगदी गोडच दाखवलं आहे. Happy

ती मैत्रीण मला आवडते. जान्हवीला मस्त चिडवत असते.

या मालिकेकडुन विशेषतः आजच्या तरुण पिढीच प्रतिनिधित्व करणार्‍या श्री आणि जान्हवी या दोघांकडुन खूप काही शिकण्यासारख आहे आमच्यासारख्यांनी..

>> काल श्री म्हणतो कि मी का नाही पाया पडायच्या? फक्त मुलगा आहे म्हणुन? इ.इ.

मला टि.व्ही समोर लोटांगण घालावेसे वाटले पटकन !!!

>> काल श्री म्हणतो कि मी का नाही पाया पडायच्या? फक्त मुलगा आहे म्हणुन? इ.इ.

मला टि.व्ही समोर लोटांगण घालावेसे वाटले पटकन !!!>>> अगदी Happy समस्त सासवांनी हे लक्षात घेतल पाहिजे.
ए पियु मी काल झी मराठी अ‍ॅवॉर्डचे काही फोटो टाकले होते इथे बघितलेस का?

हो.पाहिले कि मुग्धे.. तेच फोटो आपल्या जान्हवीने (तेजश्री प्रधान) तिच्या फेबुवर टाकलेत.
तिथे पण पुन्हा एकदा पाहुन घेतले Happy

शनिवार १९ आक्टोबर २०१२ - अपडेट

~ आजच्या भागात काही नाट्यपूर्ण घडण्याची अपेक्षा नव्हतीच...आणि झालेही तसेच. दोन्ही घरात लग्नाची पूर्वतयारी आणि हास्यविनोद. जान्हवीकडे मामा आणि आई दागिने कपडे खरेदीला बाहेर पडलेत. ह्या मामाने आपल्या बहिणीला शहरातील एका मोठ्या सराफपेढीवर नेले आणि तिला महागातील महाग दागिने दाखवून "कर खरेदी" असा बिनधास्त हुकूम सोडला. हे घे, ते घे, करत करत एकूण किंमत झाली जवळपास अकरा लाख....हा आकडा ऐकूणही ह्या नीळकंठरावाच्या चेहर्‍यावरील रेघही हलत नाही. काऊंटरवरची सेल्सगर्ल "तुम्ही रक्कम कशी भरणार ? चेकने कॅश की कार्ड ?" या प्रश्नाला मामा उत्तर देतात, "तुम्हाला गोखले गृहउद्योगाचे श्रीरंग गोखले माहीत आहेत ना?" ती म्हणते "होय, त्यांच्या लग्नाच्या दागिने आमच्याकडूनच पुरविले गेले..." यावर मामा उत्तरतात, "बरोबर, मग ह्या दागिन्याचे बिलही गोखलेंच्याकडेच पाठवा....". खरे तर यावर त्या सेल्सगर्लची जबाबदारी होती की मॅनेजरना बोलावून हा प्रकार सांगणे, पण नाही, शेवटी मालिकाच.... ती फक्त थेट भागीरथीबाईना फोन करते आणि त्याना सांगते मुलीकडील लोकांनी तुमच्यानावे इतक्याइतक्या रकमेचे दागिने खरेदी केले आहेत. त्यावर आईआजी शांतपणे..."हो, करू देत...बिल आमच्याकडे द्या पाठवून !" व्वा ! असो...

दागिने आणि कपडे घरी आल्यावर जान्हवी, पिंट्या आणि सदाशिवराव त्या ढिगाकडे पाहतात, जान्हवी अविश्वासाने 'मामा, कुठून आणलेस इतके पैसे ?" हा प्रश्न विचारतेही....ज्या माणसाजवळ अर्धा डझन केळी घेण्यासाठीही पैसे नाही तो माणून १२ लाखाची खरेदी कशी काय करेल ? याचा खुलासा विचारायची याना गरज भासत नाही, हे आश्चर्यच खरे तर.

घरी गीता आणि जान्हवी मेंदीचा खेळ करीत आहेत...तर तिचे बाबा तिच्या कै. आईच्या फोटोसमोर उभे राहून मुलीला कसा गुणी मुलगा मिळाला आहे हे सांगत आहेत.... गोखल्यांकडेही दागिने कपडे पाहणे चालले आहे तर मेंदी रंगविता रंगविता हास्यविनोदही....पण मध्येच बेबीआत्या "मला मेंदी लावू नका....आई या लग्नामुळे खुष नाहीत, त्या फक्त श्री च्या खुषीसाठी ह्या लग्नात सामील होणार असतील तर मग मीही त्यांच्यासारखेच वागेन..." असे म्हणते आणि हॉलमधून निघून जाते.

आजीला त्या विचारापासून परावृत्त करावे म्हणून मोठी आणि धाकटी आई आजीच्या खोलीत जातात, तिला समजाविण्याच्या प्रयत्न करतात.... पण आजीचा तो हट्ट "जान्हवी माप ओलांडून आत आल्याबरोबर मी उंबरठा ओलांडून बाहेर पडणार...." कायम आहेच.

अशोककाका सुंदर लिहिलेय. मी वाट बघत होते कारण आजचा भाग पण बघितला नव्हता, तुमच्या अपडेट्समुळे भाग न बघितल्याची खंत वाटत नाही. धन्यवाद.

अशोककाका सुंदर लिहिलेय. मी वाट बघत होते कारण आजचा भाग पण बघितला नव्हता, तुमच्या अपडेट्समुळे भाग न बघितल्याची खंत वाटत नाही. धन्यवाद.>>>+१
अशोक मामा मी पण तुमच्या अपडेट्स ची वाट बघत असते! मात्र उद्याचा भाग मी नक्की बघणार! लग्न आहे ना!

आजचा भाग मी अजून पाहिला नाही. पण अपडेट्स वाचले. धन्यवाद मामा.

शरयू काकू 'मागचे सगळे विसरून अगदी सर्वांना बोलवायचे' असे काही म्हणाली होती ना..... त्याचे पुढे काय झाले?

ती बेबी म्हणजे, 'मी आई सारखी वागणार' आहे अगदी.. स्वताचं व्यक्तीमत्वच नाही या मालिकेतल्या बर्याच जणांना.. आणि असलं तर अगदी ओढून ताणून. डायलॉग्स ऐकले की ठेऊन द्याविशी वाटते एकेकीच्या. श्री आणि जान्हवीचे प्रसंग मात्र खूप गोड आहेत.
लग्नाचं हे सगळं साग्रसंगीत दाखवणं जरा अती होतय. अशोक मामांची अपडेट च वाचेन आज. पुर्ण एपिसोड पहाण्याचं धारिष्ट्य नाही माझ्यात.

आपला मामा काय धन्यवाद माणुस >>>>>>>>>>>:खोखो:
आणि इतके दागिने साड्या तो मामा घरी घेऊन जातो...........जान्हवीचे वडील काहीच बोलत नाहीत>
आणि अक्षता आहेर इ.इ. ३ अ नकोत म्हणणारी जान्हवीही काहीच बोलत नाही? आपला मामा काये हे माहिती असूनही .........हे नाहीच पटलं..........मामांनी काय भाजी आण्लीये का बाजारातून?

मानुषी...... मामांनी भाजी आणली असती बाजारातून तरी आश्चर्य वाटायला हवे होते ! ज्या माणसाकडे चहा घ्यायचा म्हटले तरी खिशात पाच रुपये नाही....तो काय भाजी आणेल ? भंगार आहे तो सर्वार्थाने.

Pages