असं वऱ्हाड !! (विदर्भातले एक वेदानात्मक सत्य)

Submitted by मी मी on 6 October, 2013 - 01:33

विदर्भातले एक वेदनात्मक सत्य विदर्भाच्याच बोली भाषेत (वऱ्हाडी भाषेत) मांडायचा छोटासा प्रयत्न केलाय ....

सांजेला तीरावरी आले आकाश भरूनं
मन भरले भरले कधी जाईल ढळूनं

नदी मधाळ मधाळ वाहत असे निर्मळ
दिस वियोगाचे काहून नाही जातं भुर्कन

पिकं डोलत डोलत असे उभे वार्यावरी
वाट पाहून सयाची किती पाहू येड्यापरी ...

सूर्य गेला ढगापरी रंग केशरी केशरी
डोळ्यामंदे माह्या लाली जीव आला अधांतरी

शेतकरी माह्या गड्या ईश पिऊन मेलेला
मले रस्त्यावर आणून त्यो जीवानं गेलेला

पोर उघडी बोडकी मीबी बेवारसं झाली
जीवे मरण्याची आता आम्हावर पारी आली

कोणी आणा रं शोधून करा दया आम्हावरी
लेकराचा बापं त्याईले मले आधार पितुरी

कसे दिवस रेटून किती काढाचे अजून
अश्रू ढाळता ढाळता डोळे गेलेती सुजून

कधी येईन कोण सांगे आता आस बी सुटली
पोरं रस्त्यावर येतीन नायतं जीवानं विटली

आता जगनं कशिबी पोरं जगण्याले लावन
श्वास पुरे तो परंत घर दार चालवनं

बाप गेला जरी सोडून माय कशी पिलं सोडन
पिलं पंखाखाली घेऊन पुन्हा घरटं जोडनं ....

पिलं पंखाखाली घेऊन पुन्हा घरटं जोडनं ....!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप गेला जरी सोडून माय कशी पिलं सोडन
पिलं पंखाखाली घेऊन पुन्हा घरटं जोडनं ...>>>>>>>>>>>

होप की ही ताकद बापातही यावी....बाई करु शकते तं बाप्याले काय झालं. जीव देउन बाप पोट्याईचे हाल जास्त करुन रायला हे त्याले समजुन काउन नाही रायले, काय माहीत.
देवच त्याईले बुद्धी देवो.