वऱ्हाडी कविता

असं वऱ्हाड !! (विदर्भातले एक वेदानात्मक सत्य)

Submitted by मी मी on 6 October, 2013 - 01:33

विदर्भातले एक वेदनात्मक सत्य विदर्भाच्याच बोली भाषेत (वऱ्हाडी भाषेत) मांडायचा छोटासा प्रयत्न केलाय ....

सांजेला तीरावरी आले आकाश भरूनं
मन भरले भरले कधी जाईल ढळूनं

नदी मधाळ मधाळ वाहत असे निर्मळ
दिस वियोगाचे काहून नाही जातं भुर्कन

पिकं डोलत डोलत असे उभे वार्यावरी
वाट पाहून सयाची किती पाहू येड्यापरी ...

सूर्य गेला ढगापरी रंग केशरी केशरी
डोळ्यामंदे माह्या लाली जीव आला अधांतरी

शेतकरी माह्या गड्या ईश पिऊन मेलेला
मले रस्त्यावर आणून त्यो जीवानं गेलेला

पोर उघडी बोडकी मीबी बेवारसं झाली
जीवे मरण्याची आता आम्हावर पारी आली

कोणी आणा रं शोधून करा दया आम्हावरी

Subscribe to RSS - वऱ्हाडी कविता