बरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग २

Submitted by रोहित ..एक मावळा on 2 October, 2013 - 10:53

बरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग १

कोंबड आरवायच्या आधी पोटात आरवायला लागल.सकाळचा तातडीचा कॉल आला ..मग काय दोन-चार समस टाकुन आलो.रात्रभर पडत असलेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.पण पहाट अजुनही धुक्क्यात भिजलेली होती.सुर्यदर्शन होणार नव्हतच.
आम्ही ज्या घरात थांबलो होतो ते घर ...

सुधिर,विकास अन अधिक सकाळची आन्हिक उरकण्याकरता परत ओढयावर गेले.काल संध्याकाळी तर अंघोळ केली होती अन दिवसभर पावसात भिजणार होतोच म्हणुन आम्ही(मी,गिरी अन इंद्राने) अंघोळीसाठी जाणे टाळले.तसही हवेत गारवा होताच. मग ते घर अन आजुबाजुचा परिसर न्याहाळु लागलो.पाच-सहा घरांचा छोटा पाडा आता कुठे जागा झाला होता.कोंबडी अन तिच्या पिलांचा चिवचिवाट सुरु झाला.घराजवळच्या गोठयात गुरांच हंबरण सुरु झाल होत.आम्ही पण ट्रेकनियमाप्रमाणे उडया-उडयांची कसरत करण्यात दंग झालो.पण मनासारख्या उडया पडत नव्हत्या.

चहा अन बिस्किटाचा कार्यक्रम उरकुन घेतला.दुपारच्यासाठी शिदोरी बांधुन घेतली.घरातल्या लोकांचा निरोप घेतला.

आता एकच लक्ष्य... भिमाशंकर गाठायच

पावसाची भुरभुर परत सुरु झाली होती.आता कुठेही चढ-उतार नव्हते.फकस्त सरळ चालायच होत.

चालत असताना वाटेवर एक वळवळ बिळात शिरताना दिसली.

थोडा वेळ चालल्यानंतर अजुन एक मंदिर दृष्टी़क्षेपास पडल.

पावसाच्या रिमझिम संगिताबरोबर मोठा खळाखळाट कानी पडु लागला.एखादया मोठया ओढ्याची भेट पुढे होणार होती.अन झालही तसच..

ओढा कसला ... हि तर भिमा नदी .. भिमाशंकरच्या माथ्यावरुन वाहात आलेली..

पाण्याचा जोर चांगलाच होता.कमरेएतक्या पाण्यात साखळी करुन ती नदी पार केली.

भिमेच्या तीराने आमचा प्रवास सुरु झाला.नदीच्या स्पर्शाने ताजेतनाने झाल्यावर पायात तरतरी आली.
अन काय जादु झाली सकाळपासुन ज्या उड्या बरोबर येत नव्हत्या त्या ....

पावसामुळे काहि झाडांवर शेवाळाने बाळस धरल होत.अस म्हणतात की,भिमाशंकरच्या जंगलात अशा वनस्पती आहेत की त्या रात्रीच्या अंधारात चमकतात.

पंधरा ते वीस मिनिटांच्या सरळ चालीनंतर आम्ही पुढे एका चढणीवर आलो.वर मान करुन बघितले तर झाडांची आसमंताला भेटण्याची ओढ लागलेली दिसली.आता दाट उंच अशा वनराईतुन आमची पायवाट आगेकुच करत होती.बाजुला भिमा जोरात हासत-खिदळत चालली होती.येथुन एक वाट सरळ वरती भिमाशंकरच्या माथ्यावर जाणार होती अन एक गुप्त भिमाशंकराकडे..

सह्याद्रिच्या रांगड्या काळ्या कातळातुन दुधाळ गंगा वाहात होती.

नदी ओलांडुन आम्ही माथ्यावर जाण्यासाठी सरसावलो.पण या वाटेने जात असताना आजुबाजुची घाण बघुन चीड आली.जिथे भीमा नदी उगम पावते त्याच्या आजुबाजुचा कचरा पाहुन मन विषन्न झाले.आज सोमवार असल्याने चिक्कार गर्दी होती.दर्शनासाठी खुप मोठी रांग लागलेली होती.आम्ही मात्र लांबुनच नमस्कार केला.

बैल घाटाने उतरायला वेळ लागणार होता म्हणुन नागफणीला जायच टाळल.तसही वरती पावसामूळे दाट धुक पसरलेल होत.त्यामूळे नागफणीहुन दिसणारा नजारा दिसणार नव्हता.नागफणी हे भिमाशंकरचे सर्वात उंच ठिकाण आहे.

भिमाशंकरच्या माथ्यावर बघण्यासाठी एक तळसुद्धा आहे.येथे खवा छान मिळतो.माथ्यावरची माणसांची जत्रा पाहुन येथुन कधी बाहेर पडतोय असे झाले होते.
बैल घाटाला जायची वाट एस.टी स्टँडच्या मागुन जाते.तुम्ही थकलेले असाल तर येथुन एस.टी पकडुन घरीही जाऊ शकता.आता आम्ही घाट उतराया सुरुवात केली.या वाटेनेसुद्धा भविक दर्शनासाठी वरती येताना भेटत होते.पाऊस सोबतीला होताच अन वाटेन डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे जलप्रपात मन मोहुन घेत होते.

बैलघाटाच्या या वाटेने जाताना पाणीच पाणी होते.पावसामुळे वाटेवर पाणी साचलेले होते.माचीवजा जागेवरुन खाली उतरल्यानंतर एक वाट सरळ पुढे जाते अन आम्हाला मात्र डावीकडच्या पाण्याच्या वाटेने खाली नांदगावात उतरायचे होते.येथे वाट चुकायला होते.आमच्या ग्रुपमधलेसुद्धा काही लोक त्या वाटेने पुढे गेले होते.मग परत त्यांना टिमलिडरने शोधुन आणले.

या वाटेला बैल घाट कशाला म्हनत असतीय याचा प्रत्यय उतरताना आला.वाट सरळ उताराची होती अन एखादा बैल मुसंडी मारत धावत यावा तसे पाणी जोशात वाटेवरुन वाहात होते.

पाणाळलेली वाट...

जसजस खाली येत होतो तसतस पावसाच धुक मध्येच बाजुला व्हायच अन निसर्गाची खिडकी डोळ्यासमोर
उघडायची.

मोठया धबधब्यांच दर्शन असे होत असताना छोटे-छोटे धबधबे वाटेत भेटत होते.
अशाच एका धबधब्यात चिंब भिजुन घेतले.

धबधब्यात मनोसोक्त भिजल्यानंतर चांगलीच भुक लागली.बांधुन आणलेल्या शिदोरीवर ताव मारला.त्या पिठल-भाकरीची चव अजुनही जिभेवर रेंगाळतेय.

या वाटेवरसुद्धा उंचच झाडे लक्ष्य वेधुन घेत होत होती.

जवळजवळ अडीच ते तीन तासांच्या या रोमहर्षक घौडदौडिनंतर आम्ही पायथ्याशी आलो.पायथ्याच्या नांदगावाच्या वाटेवर पोहोचलो तेव्हा मागे वळुन बघितले तर अफलातुन नजारा डोळ्यासमोर आला.
कॅमेराच्या बॅटरीने संप पुकारला होता.पण डोळ्यात तो नजारा साठवुन घेतला.
डावीकडे सिद्धगड,धमधम्या डोंगर ते भिमाशंकर अन उजवीकडे पदरगड ते पेठपर्यंतची सह्याद्रीची अफलातुन रांग डोळ्याच्या कॅमेरात कैद झाली होती.
आहाहा.. दोन दिवस ट्रेक केल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.पाऊस थांबला होता.तरी भिमाशंकरच्या माथ्यावर ढगांचा मुकुट दिसत होता.वरती भिमाशंकरचे दर्शन झाले नव्हते .पण निसर्गाच्या या रुपाने आम्हाला शंकर भेटले होते.भेटले काय ते तर आम्ही अनुभवले होते.

पाऊस अन सह्याद्रीच कस अतुट नात आहे ना....सह्याद्रीचे रंग पावसाळ्यातच खुलुन येतात.पावसाळ्यातला हिरवा शालु परिधान केलेला..नटलेला सह्याद्री नेहमीच जिवाला ओढ लावतो.

मग पुन्हा भेटुया....
अशाच ओल्याचिंब सफरीवर...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहित छान लिहिलंय. फोटोहि झक्कास.
जरा वेळेवर लिहित जा Wink मी पहिला भाग विसरून गेलो होतो, त्यामुळे पटकन लिंक लागली नाही. Sad

धन्यवाद ..

दिनेशदा धन्यवाद ...>> दोर घेतला होता तेव्हा... Happy

जिप्स्या... कसय भाकरी शिळी झाली की अजुन खरपुस लागते म्हणुन... Happy

इंद्रा Lol ...

दोन्ही भाग अफलातून… या ट्रेकचे तुझे आणि इंद्राचे फोटोज आणि योचे अहुप्याचे फोटोज म्हणजे कळस आहे.

रो.मा.:
सुंदर प्र.चि.
बैल घाटाला ‘रानशीळ’ असं मोठ्ठं काव्यात्मक नाव आहे. भीमाशंकरच्या घनदाट जंगलाच्या दर्शनासाठी उत्तम निवांत वाट आहे.