कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.
तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.
चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.
शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.
श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.
एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.
मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.
एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html
उदयन नाकातून शेंबूड
उदयन
नाकातून शेंबूड आल्यासारखे रक्त>>>ईईईई..... आणि नेहमी तो ते हाताने पुसत असतो.....अरे..आपल्याला असे होते हे माहीत असल्यावर कोणीपण जवळ रुमाल नाही का ठेवणार...कॉमन सेन्स म्हणून नाही ह्या हिरोला!!!
मै... +१००००००००००
मै... +१००००००००००
(No subject)
खराब सिनेमा.. पुस्तकात जी
खराब सिनेमा..
पुस्तकात जी सगळी पात्र नीट रंगवली आहेत ती इथे मात्र उगाचच घेतल्यासरखी , पुस्तकात आहेत म्हणुन आणल्यासरखी वाटतात..
मान्य की ३ तासात लिमिटेशन्स येतात मग सिनेमा "inspired from दुनियादरी" असा घ्यायचा आणि बेसिक थीम पुस्तकाची आणि सिनेमाच्या मर्यादेमुळे हवे ते बदल लोकांनी स्विकारले असते..
तेवढच पुस्तकाच्य चाहत्यांना कमी त्रास..
पाहिला
पाहिला अजिबात्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त नाही आवडला
टुनटुनीत अन् गुब्बा >>>>>>
टुनटुनीत अन् गुब्बा >>>>>>
रीये तुला विपु केलेलं आण
रीये तुला विपु केलेलं आण इकडे. हे दळण अजुन सुरुचे
बेकार सिनेमा मै+१
बेकार सिनेमा
मै+१
http://www.loksatta.com/desh-
http://www.loksatta.com/desh-videsh-news/duniyadari-influences-makita-na...
सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार - दुनियादारी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय जाधव दुनियादारी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) - अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी (दुनियादारी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (दुनियादारी), सहाय्यक अभिनेता - हृषिकेश जोशी (आजचा दिवस माझा), सहाय्यक अभिनेत्री - सई (अनुमती)
तूच आण स्मिते
तूच आण स्मिते
अतिचशय बकवास चित्रपट. पब्लिक
अतिचशय बकवास चित्रपट. पब्लिक एवढं हाउसफुल काय करतंय काय माहित. कशाचा कशाला ताळ्मेळ नाही. ना त्यांची दोस्ती यारी मनाला भिडत ना शिरीन-श्रेयसचं प्रेम काळजाला भिडत. त्यांची काही केमिस्ट्रिच नाही वाटत. किंवा असं अगदी उत्कट प्रेमही दाखवलं नाहीये. म्हणजे प्रेमाची गहराई नाहीच्चे. तुला कळतय ना मला काय म्हणायचय
स्वप्निल अगदीच विचित्र. ढमाल्या. खुप राग आलाय मला त्याचा. अरे काय ते पोट, विग, ते स्वेटर आणि काय ते अभिनय्शुन्य बटबटीत डोळे. श्या अभिनय तर नावाला नाहीये. कुणीतरी म्हणल्याप्रमाणे तात्या विंचुचा भावलाच. सैबै डोक्यात गेल्या. काय ते ड्रेस्सेस, सिगारेट पिणं. त्या काळातल्या कॅरेक्टरशी अगदीच फाटा घेतलाय बाईंनी. पुन्हा इथेही नो अभिनय.
शेवटी तर कधी संपतोय (चित्रपट) असं झालेलं. असं काही नॉस्टेल्जिक वै झालंच नाही. कट्टा-यारी-दोस्ती-प्रेम बघुन.
आणि काय पब्लिक आपल्या लहान मुलांना घेउन आले होते. माझ्या शेजारची फॅमिलि तर दुसर्यांदा आली असावी. 'तुझी नी माझी यारी तर भोकात गेली दुनियादारी' हा डायलॉग ती ७-८ वर्षाची मुलं मोठ्याने म्हणुन एन्जोय करत होती.
एकुण चित्रपटात मला दिग्या - अन्कुश च बरा वाटला. बरा काय चांगलाच वाटला. त्या कॅरेक्टरला अभिनय थोडा तरी होता. अभिनयाचं म्हणशील तर एक अण्णा भाटे चा कायतो अभिनय चांगला होता.
आणि हो ते टिकटिक वाजते मधे लहान मुलांचा कोरस कशाला??? एकदम शाळेतल्या गाण्याचा फील आला त्यामुळे.
राहता राहीला साई. जि. जो. त्याच्याबद्दल तर काही बोलतच नाही मी.
आता पुस्तक वाचेन म्हणते.
२०० यायलाच हवे
२०० यायलाच हवे
>> आता पुस्तक वाचेन म्हणते
>> आता पुस्तक वाचेन म्हणते <<
@सस्मित,
पुस्तकसुद्धा मला चित्रपटाप्रमाणेच 'ओव्हररेटेड' वाटलं.
मला असं वाटलं पु. आणि चि. दोन्हींना समप्रमाणात 'ओव्हरहाईप' मिळाली आहे. त्यांची खरीखुरी उंची जितकी असावी त्याच्या काही पट.
उद्या मराठी सिनेमाला २००
उद्या मराठी सिनेमाला २०० कोटी?????
पोस्टरवर रजनीकांतचा फोटु लावायला पाहिजे मग...
अरे
अरे ए.......................... २०० पोस्टी बोलतोय..........
असल्या चित्रपटाला २०० कोटी.......कल्पनेत तरी शक्य आहे का
२०० पोस्टी
२०० पोस्टी बोलतोय.........>>>>>>>
दिलखेचक गाण्यांमुळे परिचित
दिलखेचक गाण्यांमुळे परिचित झालेला दुनियादारी कधी पाहिन, असं झालं होतं. परवाच आपलीमराठीवर पहायला मिळाला. पुस्तक आणि हा धागा वाचलेला नसल्याने पूर्वग्रहविरहित होते. काल पहिल्यांदा हा धागा वाचला. परिक्षणाशी बर्यापैकी सहमत...
एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठिकठाक आहे, मात्र त्यांच्यातलं कोणीही कॉलेजकुमार/कुमारी वाटत नाही. नवीन चेहरे घेऊन किंवा जे भूमिकेत शोभतील, अशा कलाकारांना घेऊन चित्रपट काढायला हवा होता.
शिवाय कथानक मनात झिरपावं म्हणूनही कष्ट घेतलेले जाणवत नाहीत. कथाबीजही आवडले नाही. हिरोला आजारात मारुन आणि फॅशबॅकमध्ये कथा हा जुना फॉर्म्युला हे पुस्तक आलं तेंव्हा नवीन असेल, म्हणून लोकांना आवडला असेल, मात्र आता दाखवावं असं काहीच नवीन त्यात नव्हतं.
इथली चर्चा वाचून पुस्तक वाचायची उत्सुकता वाटली, म्हणून गुगलून पाहिलं, तर रिव्ह्यू म्हणून पुस्तकाची सुरुवातीची काही पानं वाचायला मिळाली. लेखनही विशेष कॅची वाटलं नाही. तरीही, मिळालं की पुस्तकही एकदा वाचेन.
बाकी, ह्यावर मालिकाही निघाली होती का? कधी? कोणत्या चॅनेलवर लागायची?
सानी हिरोला आजारात मारुन आणि
सानी
हिरोला आजारात मारुन आणि फॅशबॅकमध्ये कथा हा जुना फॉर्म्युला हे पुस्तक आलं तेंव्हा नवीन असेल, म्हणू
>>>>>
असलं काही डबडं, मेंटल सारखं, इडियोटीक, बिनडोक... बेसलेस, लॉजिकलेस इत्यादी इत्यादी पुस्तकात नाहीच आहे
आता कळालं का त्रास होतोय आम्हा पुस्तक प्रेमींना इतका?
बादवे यातल्या लाल टिकल्या तुझ्यासाठी नाहीत
रिया, का ग इतकी सिरीयस
रिया, का ग इतकी सिरीयस होतेस??? सोड ना आता.....
२०० हुर्रे...................
२००
हुर्रे.....................!!! जितम जितम जितम जितम
उदय वेडा कुठला
उदय
वेडा कुठला
यात काय
यात काय वेडेपणा...........
मराठी चित्रपटावर परीक्षणच्या धाग्याने पहिल्यांदाच २०० पोस्टी बघितल्या...... आहेस कुठे.......;)
या शनिवारी बघितला चित्रपट.
या शनिवारी बघितला चित्रपट. ठिक वाटला. माझी एक शंका. चित्रपटात सुरुवातीला ती लहान मुले दाखवली आहेत, ती विचारतात की "श्रेयस पुण्यात राहतो?", मग सई म्हणते, "नाही, श्रेयस पुण्यात भेटतो." श्रेयस म्हणजे त्यांचे आजोबाच ना? मग असे काय संवाद?
मुळ पुस्तकात शिरिन मेडिकलची विद्यार्थिनी नाहीये?
स. प. महाविद्यालय म्हणुन घेतले आहे तो कोल्हापुरचा "new palace" आहे का?
सुरूवातीला ठरले नव्हते शिरीन
सुरूवातीला ठरले नव्हते
शिरीन कुणाबरोबर लग्न करणार,,, नंतर ठरले ना,,,
भंकस चित्रपट. पब्लिक एवढं
भंकस चित्रपट. पब्लिक एवढं हाउसफुल काय करतंय काय माहित!!
ढेरपोट्या स्वप्नील, थोराड सई दोन पात्रांनी माती केलीय. बाकीचे ठीक.
चांगल्या चित्रपटांनी यापासून बोध घ्यावा. प्रमोशन जोरदार करून हवा करून ठेवायची आधीच. मग चित्रपट चालतोच.
हिरोला आजारात मारुन आणि
हिरोला आजारात मारुन आणि फॅशबॅकमध्ये कथा हा जुना फॉर्म्युला हे पुस्तक आलं तेंव्हा नवीन असेल,>>> अहो हे असलं काही पुस्तकात नाहिये हो.
दुनियादारीचा अर्थ नेमका आहे पुस्तकात.
दुनियादारीचा अर्थ नेमका आहे
दुनियादारीचा अर्थ नेमका आहे पुस्तकात.>>> +१
काल काही कारणास्तव
काल काही कारणास्तव मित्रांबरोबर बाहेर जावे लागले व टीव्हीवर "दुनियादारी" लागलेला.परत आल्यानंतर जो काही भाग पहायला मिळाला त्यावरुन वाटले, नाही बघितला पुर्ण तेच चांगले झाले.
देवाआआआआआआआआआआअ.....
काय ते एक एक नमुने दिसलेत......कहर.
जितेंद्र जोशी कोणत्या कोनातुन साई वाटत होता देव जाणे. तळलेल्या पुरीसारखे चेहरे घेवुन तो आणी तो " झपाटलेला बाहुला" पिक्चर भर काय धुमाकुळ केला असेल देवा
"झबा" च्या शर्टाच्या कॉलरमुळे विगची मागची बाजु उचकुन जात होती मधे मधे.
सुशिंच्या मनातल्या दुनियादारीत असेल बलदंड, निब्बर आणी ढपोरे नायक नायिका असतील काय. म्हणुनच की काय काल पावसाची एक सर येवुन गेली.
सर्व म्हनतात ते बरोबरच आहे.
सर्व म्हनतात ते बरोबरच आहे. कोणीच कॉलेज कुमार कुमारिका वाट्त नाही. सईचे घट्ट फ्रॉक्स बघवत नाहीत. बळम्च तिला घालायला लावले आहेत आणि लूज पँट हील्स टॉप्स ही आत्ताची वेषभुषा तिला तेव्हा का दिली आहे माहीत नाही. शेवट श्रेयस मरतो का? मला तर बै अंकुशच आवडला. प्रेमभंग झाल्यवरील सीन खूप आवडला. आणि देवाच्या गाभार्यातील व टिक टिक गाणे सुरेख.
सई ला बघताना सारख असं वाटत
सई ला बघताना सारख असं वाटत की तिला जर मिशा लावल्या तर बोकाच (बोकी) वाटेल. तिचे डोळे पण गोलच आहेत.
Pages