कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.
तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.
चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.
शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.
श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.
एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.
मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.
एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html
च्यामारी अजुन चर्हाट चालुच
च्यामारी अजुन चर्हाट चालुच आहे का इथलं ?
>> महाराष्ट्रातली एकही
>> महाराष्ट्रातली एकही लायब्ररी नसेल की जिथे सुशिंचे पुस्तक नव्हते. <<
दुनियादारी (चित्रपट) येण्याच्या आधी मी हे पुस्तक शोधायचा औरंगाबादमध्ये प्रयत्न केला होता. तेव्हा ते पुस्तक कुठेही उपलब्ध नव्हतं. कारण, 'कुणी तरी घेऊन गेलं आहे' हे नव्ह्तं, तर ते त्या त्या ठिकाणी नव्हतंच मुळी !
>> कंत्राटी लग्नाच्या जमान्यात नारायण दाखवू म्हणल्यास दाखवता यायचा नाही <<
आमच्या घरचं (नात्यातलं) एखादं लग्न असेल, तर मी तुम्हाला आमंत्रण देऊ का ? तुम्हीच ओळखाल कोण 'नारायण' आहे. 'नारायण' अजूनही असतात, आहेत. किंबहुना, असायलाच लागतात. नाही तर काम होत नाही, किमान मध्यमवर्गीय लग्नांत तरी. कंत्राटी लग्नांचा जमाना अजून आमच्यापर्यंत तरी पोहोचलेला नाही.
Me Tumchya Sarvanshi Asahmat
Me Tumchya Sarvanshi Asahmat aahe...Karan Jevha aapan Ekhadya Vyaktiwar Jiwapad Prem Karto Tevhach Aplyala Ekhadya Love Story Chi Value Kalate...Karun Paha Ekda Asech Prem...
Jevha Tumchya Ayushyat Tumhala Bachhu..Wagaire mhananari Vyakti Asel tevhach tumhi Sreyash n Shirin Chya character la feel karu shakta...ithe Jaad N obad dhobad vyaktimatvacha prashna nahiye ulat ase asunahi tya vyakti aplya bhoomikancha thasa kasa uthawtata he mahatwache aahe....Ani Chitrapat Vyavastit pahav Ani Mag Sangave ki Sreyash la Donhi Muli Awadtat Ki Fakta Shirin???
Ani Minuchya Mage Tyala Baki Mitranni Lawlele Aste...Tyache Prem Fakta Shirin War Aste...
च्यामारी अजुन चर्हाट चालुच
च्यामारी अजुन चर्हाट चालुच आहे का इथलं ? >> +१
यामारी अजुन चर्हाट चालुच आहे
यामारी अजुन चर्हाट चालुच आहे का इथलं ? >> +२![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
च्यामारी अजुन चर्हाट चालुच
च्यामारी अजुन चर्हाट चालुच आहे का इथलं ? >> +३
@मुश्ताक,
तुम्ही रोज कट्ट्यावरच्या उड्या मारा बरं... अश्याने वैचारिक उंची वाढते म्हणतात.
रसप
रसप![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एक भाबडा प्रश्न दुनियादारी
एक भाबडा प्रश्न
दुनियादारी आणी नवीन दुनियादारीत काय फरक आहे. सध्या ते खुळ चालु आहे म्हणुन विचारतोय ?
एक नवीन माहित पडले,
किचन मधे झबा जेव्हा शिरीनची ओढणी चा/ला वास घेत, गंध घेत, हुंगत असतो व ती येते आणी त्याचे गुबगुबीत तोंड आपल्या कणखर आणी भारदस्त पंज्यात घेवुन "बच्चु आहेस बच्चु " असं जेव्हा म्हणते ना.....
तेव्हा असं वाटतं की भाजी बाजारात बामणोदच्या भरताच्या वांग्यांचा खालचा गोटाळा भाग कोणी भारदस्त महिला चाचपुन पहात आहे.
बॉन्ड भाऊ: खान्देशातले आहात
बॉन्ड भाऊ: खान्देशातले आहात काय तुम्ही?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरताच्या उल्लेखाने, त्याचा सुगंध दरवळू लागला.
हांव, तुमले कसं म्हाइत ?
हांव, तुमले कसं म्हाइत ?
भाजी बाजारात बामणोदच्या
भाजी बाजारात बामणोदच्या भरताच्या वांग्यांचा खालचा गोटाळा भाग कोणी भारदस्त महिला चाचपुन पहात आहे.<<<
दुनियादारी आणी नवीन
दुनियादारी आणी नवीन दुनियादारीत काय फरक आहे. सध्या ते खुळ चालु आहे म्हणुन विचारतोय
>>>
Story end is different.....
जुनी दुनियादारी म्हणजे पुस्तक आणि नवी म्हणजे सिनेमा![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
एक भाबडा प्रश्न दुनियादारी
एक भाबडा प्रश्न![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दुनियादारी आणी नवीन दुनियादारीत काय फरक आहे. सध्या ते खुळ चालु आहे म्हणुन विचारतोय ?>>
एक फेबुवर आलेलं उत्तर..
जुनी दुनियादारी : दुनियादारी ह्या पुस्तकाची मापात लावलेली वाट..
नवी दुनियादारी : दुनियादारी ह्या चित्रपटाची लावलेली संपुर्ण वाट..
एकंदरित नवी दुनियादारी ही पुस्तकाची १.५ पट लावलेली वाट होइल..
जुनी दुनियादारी : दुनियादारी
जुनी दुनियादारी : दुनियादारी ह्या पुस्तकाची मापात लावलेली वाट..
नवी दुनियादारी : दुनियादारी ह्या चित्रपटाची लावलेली संपुर्ण वाट..
>>>
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अग्निपंख, दुनियादारी दोनदा बनवलाय का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
की सिरिअल आणि सिनेमा अशी तुलना सुरू आहे?
बॉन्डभाउ
बॉन्डभाउ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अग्निपंख, दुनियादारी दोनदा
अग्निपंख, दुनियादारी दोनदा बनवलाय का? >>
नाही, मला कल्पना नाही, मला फक्त फेबुवर हा मेसेज आला होता, तो इथे टाकलाय. मी दुनियादारी सिनेमा पाहिलाय पण कादंबरी नाही वाचलेली आणि नविन दुनियादारीबद्द्ल काही माहिती नाहीए.
त्या चित्रपटात काही सीन्स
त्या चित्रपटात काही सीन्स नव्याने टाकलेत असे वाचले.
वर्षा उसगांवकर हिच काय ती त्या रोलसाठी पर्फेक्ट... बाकी कुणीही मला त्यात पटले नाही.
ताम्हणकर बाईदेखील .. मला फारशी आवडली नाही. ( हल्ली तिला घेतल्याशिवाय चित्रपट काढता येत नाहीत का ? पांगिरा मधे पण होती ती. )
दिनेशदा., ती मराठीतली मल्लीका
दिनेशदा., ती मराठीतली मल्लीका शेरावत आहे.
मल्लिका कशी हिंदीत काहीही सिन्स देऊ शकते तशी ही मराठीत काही सिन्स देऊ शकते त्यामुळे घेत असावेत तिला.
पुणे ५२ मध्ये बघितलं नाही का?
दिनेशदा., ती मराठीतली मल्लीका
दिनेशदा., ती मराठीतली मल्लीका शेरावत आहे.
माझ्यामते ती मराठीतील प्रियांका चोप्रा आहे.
अवांतर - हा धागा वर आल्याने आता पुन्हा एकदा दुनियादारी बघावा लागणार.. निदान गाणी तरी ऐकावी लागणार..
माझ्यामते ती मराठीतील किमी
माझ्यामते ती मराठीतील किमी काटकर आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
किमी काटकर ही हिंदीतील बो डेरेक आहे.
फ्यान क्ल्ब्ब काढाचा का
फ्यान क्ल्ब्ब काढाचा का ?
त्या त्या वयाला शोभतील अशी पात्रे निवडली तर अर्धी लढाई जिंकली जाते.. मी कालच बघितलेल्या MUNICH
बद्दल लिहितो, योग्य त्या जागी.
बो डेरेक हे एमराठीतली कोणेय
बो डेरेक हे एमराठीतली कोणेय आणि??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बो डेरेक हे एमराठीतली कोणेय
बो डेरेक हे एमराठीतली कोणेय आणि??>>>> रिया
गूगल महाराजांचा सहारा घे....
अनू, मेरी पोस्ट तुमको कळ्या
अनू, मेरी पोस्ट तुमको कळ्या नही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी आय नो हर
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"नवीन दुनियादारी" टि व्ही वर
"नवीन दुनियादारी" टि व्ही वर थोडा पाहिला. त्यात श्रेयसं भूत (आता भूत नाहीतर काय म्हणायचं!) मधे मधे येऊन कॉमेंट्स करत होतं. त्यामुळे अजूनच बोअर होत होतं.
त्यात श्रेयसं भूत >>> . .
त्यात श्रेयसं भूत >>>
.
. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनू, मेरी पोस्ट तुमको कळ्या
अनू, मेरी पोस्ट तुमको कळ्या नही>>>>>>>>>. अग उशीरा कळ्या...पण मग रिप्लाय देनेको कंटाळा किया...... ( माझी आवडती स्मायली असलेली बाहुली )
:आवडत्या स्मायलीला त्याच
:आवडत्या स्मायलीला त्याच स्मायलीने प्रतिसाद देणारी बाहुली:![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages