कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.
तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.
चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.
शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.
श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.
एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.
मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.
एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html
भांडायचं....स्पेशली
भांडायचं....स्पेशली तुझ्याशी....पण राहू दे. आता मूड गेला माझा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद! कारण मला तुझ्याशी
धन्यवाद! कारण मला तुझ्याशी भांडण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग कोणीतरी माझ्याशी भांडा
मग कोणीतरी माझ्याशी भांडा रे... मला दुनियादारी एवढा आवडला आहे की त्यासाठी मी कोणाशीही भांडायला तयार आहे.. (पुढे माझीही दात काढायची स्माईली
)
>>रसप, तुम्ही पुस्तक वाचल आहे
>>रसप,
तुम्ही पुस्तक वाचल आहे न? तुम्हाला खरंच ते आवडलंय? तुमचे रिव्हू जेव्हडे छान असतात तेव्हडे सुद्धा चांगले सु.शिंनी लिहिलेलं नाही त्या पुस्तकात. असो, ज्याचं त्याचं मत असत.<<
अजून वाचतो आहे. फार अफाट, अप्रतिम असे मला तरी गवसले नाहीये अजून आणि अगदीच नावडले, अश्यातलाही भाग नाही. माझी वाचनाची गती खूप कमी आहे. काही लोक पुस्तकं खाऊन टाकतात (उदा. - माझी बायडी..), तसं मला जमत नाही... त्यामुळे अजून काही दिवस लागतील पुस्तक पूर्ण व्हायला.
अभिषेक, मला पण आवडलेला आहे तो
अभिषेक,
शाहीर, भरत मयेकर आहेतच तुमच्याशी भांडायला. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला पण आवडलेला आहे तो चित्रपट. म्हणून आपण नाही भांडू शकत.
रिया,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तसंही बुद्धिवान लोकांना वाद घालण्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे तुझ्याकडून मी भांडणाची (वादाची) अपेक्षा करत होते, म्हणजे माझंच चुकत होत.
रसप,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामुळे अजून काही दिवस लागतील पुस्तक पूर्ण व्हायला.>>>>वाचून पूर्ण केलंत कि 'दुनियादारी' पुस्तकं परत हातात घेणार नाही, अशी मला खात्री आहे. (अर्थात तुमचे लिखाण वाचून तुम्हाला ते आवडणारं नाही, अस मला वाटत. )
तर काय मधुरा, स्वतःच स्वतःला
तर काय मधुरा, स्वतःच स्वतःला बुद्धीवादी/बुद्धिवान म्हणवणार्यांना काय म्हणतात माहितीये ना?
तेंव्हा तू जाऊन अशांशीच वाद घाल
या पेज वरचं हेमाशेपो
अभिषेक दादा, मी घालत होते ना वाद त्यादिवशी थोपूवर? तेंव्हा का पळालास :फिदी;
स्वतःच स्वतःला
स्वतःच स्वतःला बुद्धीवादी/बुद्धिवान म्हणवणार्यांना काय म्हणतात माहितीये ना?>>>>>काय म्हणतात???![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि मी तरी कुठे बुद्धीवादी/बुद्धिवान आहे???
तेंव्हा तू जाऊन अशांशीच वाद घाल
या पेज वरचं हेमाशेपो>>>>>>बघ, मला तुझ्या या वाक्याचा अर्थ पण नाही कळला. हे 'अशां' कोण आहे? आणि मला 'हेमाशेपो' पण 'न्हाई' कळले.
अभिषेक दादा, मी घालत होते ना
अभिषेक दादा, मी घालत होते ना वाद त्यादिवशी थोपूवर? तेंव्हा का पळालास :फिदी;
>>>>>>>>>>
अग्ग पळणार कुठे? माझ्याच वॉलवर तर वाद चालू होता.
तु अशी भांडत होतीस की तुझ्या पुस्तकात भावना अगदी आरपार गुंतल्या आहेत, अश्या संवेदनशील लोकांशी भांडायला मला खरेच भिती वाटते, कधी भांडता त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येईल नेम नाही.. म्हणून आवरते घेतले.. तिथे पळालोच असतो तर इथे उगवलो असतो का..
इथेही बघ ना वर एक डायलॉग मारलास की ," खुप काही लिहायची इच्छा होतेय पण एका प्रचंड लाडक्या आणि आदरणिय माणसामुळे मी शांत आहे"...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी इमोशनल होतेस मग कोण तुझ्याशी भांडणार..
रिया, हि लिंक खास तुझ्यासाठी
रिया, हि लिंक खास तुझ्यासाठी .. विकिभाऊंच्या मते दुनियादारीने ७५ करोडचा गल्ला कमवला आहे.. अजूनही हा चित्रपट लोकांना आवडला नाही असे बोलत असाल तर कमाल आहे..
http://en.wikipedia.org/wiki/Duniyadari
पुस्तकं पुर्ण वाचुन
पुस्तकं पुर्ण वाचुन झालं.
कथानक इन्टेरेस्टिन्ग आहे. (काही लुप होल्स असले तरीही)
ह्यावर उत्तम चित्रपट होउ शकतो.
आता चित्रपट बघायचा असल्यास मधुराजी स्पॉन्सर करणार आहेत का?
मी जाइन पहायला..
काल एकदाचा बघितला हा सिनेमा..
काल एकदाचा बघितला हा सिनेमा.. मला चांगला वाट्ला जास्ती बोअर नाही झाले
माझा मित्र ज्याला अॅक्शन्/हॉलीवूड/ लेस रोमाँटिक मुव्ही आवड्तात तो दुसर्यांदा आला होता बघायला!!
काल आर डेक्कनचे सगळे शोज हाऊसफुल्ल होते इतक्या दिवसानंतर ही
आता पुस्तक वाचेन.. कोणाकडे पुस्तक असेल पुण्यात तर देणे
अभिषेक....सिनेमा मला ही नाही
अभिषेक....सिनेमा मला ही नाही आवडला. पण अजून गर्दी ख्रेचतोय...आणि तो हाऊसफूल आहे, टिकीटे ब्लॅक ने विकली जात आहेत याचे खरोखर कौतुक ही वाटतेय.चांगलीच गोष्ट आहे.
काल माझ्या ताईचा शाळेचा ग्रूप (शाळा सोडून २५ वर्ष झाली आहेत) हा सिनेमा बघायला गेला होता. त्यांनी ही खूप एन्जॉय केला.
फ्रेश चेहरे असते तर कदाचीत चांगला वाटला असता असे सारखे वाटते.
तुमचा अभिषेक आता तळटीप -
तुमचा अभिषेक
आता तळटीप - पुस्तक मी वाचले नाही आणि त्या वादात मला पडायचे नाही
>>> तुमच्या पोस्ट्स आवडल्या. महेश मांजरेकरचा चित्रपट म्हणूनच पाहिला.
स्वप्निल जोशीला पाहणे नको वाटते म्हणून टाळत होते.त्याला ४०-४५ वर्ष्याच्या बाप्याला बघणे कंटा़ळ्वाणे
असले तरी एकंदरीत चित्रपट आवडला!
तुमचा अभिषेक , पिकचर तुफान
तुमचा अभिषेक ,
पिकचर तुफान चालतोय हे खर आहे . पण तो ७५ कोटीचा आकडा फसवा/खोडसाळ्/खोटा आहे .
५००० शो दर रोज हाऊसफुल धरले तरी ते अशक्य आहे .
मधुरा...प्लीज परस्परविरोधी
मधुरा...प्लीज परस्परविरोधी मते मांडु नका.
तुम्हाला चित्रपट आवडला म्हणुन इतरांना देखिल तो आवडलाच पहिजे हा अट्टहास का?
वैयक्तिकरित्या, मला पुस्तक आणि चित्रपट दोन्ही आवडले आहेत (फक्त चित्रपटतील casting पटले नाही....विशेषत: सई ताम्हणकर.)
चित्रपट आवडणे आणि कास्टिंग
चित्रपट आवडणे आणि कास्टिंग नावडणे.. - हेसुद्धा परस्परविरोधीच आहे.
रसप..... चित्रपट आवडण्यामागे
रसप..... चित्रपट आवडण्यामागे फक्त कास्टिंग हाच निकष असतो का? गाणी, दिग्दर्शन, लोकेशन्स इ. हे आवडणे अन चित्रपट न आवडणे याला काय म्हणाल तुम्ही?
'दिग्दर्शन' आवडलं आणि
'दिग्दर्शन' आवडलं आणि 'चित्रपट' आवडला नाही, असं कधी होत नाही.
तसेच, पडद्यावर दिसणारे चेहरे टोटली मिसमॅच वाटत असताना चित्रपट आवडला असेही म्हणता येत नाही.
- असे मला वाटते.
(तुम्हाला नावडायलाच पाहिजे - असे माझे म्हणणे नाही !)
हायला!!! तो संजय जाधव पण
हायला!!! तो संजय जाधव पण सिनेमा विसरला....
आपण इथे अजुन दळण दळतोय.....
असेल बुवा.... बाकी तुम्ही काय
असेल बुवा.... बाकी तुम्ही काय चित्रपट परिक्षण वगैरे लिहिता म्हणजे, तुम्हालाच जास्त समजत असणार त्यातलं. दिवे घ्या.
मी माझं मत सांगितलं... मला जे वाटतं तसंच तुम्हालाही वाटलंच पाहिजे..असा माझा आग्रह नाही.
केदार जाधव ___ @ ७५ कोटी __
केदार जाधव ___ @ ७५ कोटी __ सहमत आहे, आकडा गंडला असण्याची शक्यता आहे... किंबहुना आंतरजालावरच मला एकाने हा आकडा सांगितला तेव्हा माझी प्रतिक्रिया अशीच होती.. त्यानंतर त्यानेच जी विकीची लिंक दिली तिला मी इथे चिपकवली.. आकडेमोड करत न बसता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मात्र आकडे बाजूला ठेवले तरी नुकतेच बालक-पालक ने घवघवीत यश मिळवले होते, तेव्हा १५-१६ कोटींचे आकडे कानावर आले होते, आता तेही खरे खोटे देव जाणे, मात्र दुनियादारी तिकिट खिडकीवर त्यापेक्षा जास्त घवघवीत यश मिळवतोय एवढे नक्की..
बाकी माझ्या मागच्या काही चर्चेच्या पोस्ट पाहिल्या तर लक्षात येईल की मी हे आकडे दिलेत ते चित्रपट चांगला आहे हे सिद्ध करायला नाही तर तो लोकांना आवडतोय हे दाखवायला.. कारण काही जणांचे म्हणने असे आहे की बरेच लोकांना हा चित्रपट आवडत नाहिये.. आधीच मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मर्यादीत, त्यात लोकांना आवडत नसेल तर हे बॉक्स ऑफिस वरचे यश कसे शक्य आहे हाच माझा मुद्दा होता .
आधीच मराठी चित्रपटांचा
आधीच मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मर्यादीत, त्यात लोकांना आवडत नसेल तर हे बॉक्स ऑफिस वरचे यश कसे शक्य आहे हाच माझा मुद्दा होता . + १
मी काय परस्परविरोधी मत
मी काय परस्परविरोधी मत मांडली? मी केव्हापासून एकाचं मुद्द्यावर बोलतीये...पुस्तक आणि सिनेमा यांत मला सिनेमा आवडला. अजून काय? आणि मी मत लादतीये अस तुम्हाला वाटत असेल तर तसं समजा...मी एकसारखी सगळ्या सु.शी.पंख्यांना समजावत बसणार नाहीये......आणि मला सिनेमा आवडला, मी जाऊन पहा असं म्हणाले, तर सगळे काय आज्ञाधारक बनून पाहायला जाणार आहेत काय? उगाच आपलं काहीतरी....
दुनियादारी इथे यु एस ला
दुनियादारी इथे यु एस ला कसा/कुठे बघता येइल?
अदिती, काही सांगता येत
अदिती, काही सांगता येत नाही....कदाचित इंटरनेटवर पाहायला मिळेल.....पण खूप वेळ लागेल त्याला अजून.
दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये
दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते >>>> + १ ० ० ० ०
मलातर बोदलेबुवा स्वप्नील च्या ढेरपोटावर खच्चून बुक्के मारावेसे वाटत होते. अरे काय चाललय काय ? तो अतुल , तो आमिर स्वतःला एका सिनेमा साठी आमूलाग्र बदलतात आणि तुम्ही निर्लज्जासारखे लम्बोदर बनून येता ? आणि स्वप्नीलला नसेल वाटला पोटाचा घेर कमी करावासा, पण संजय जाधव काय झोपा काढत होता का काय ? (मलातर स्वप्नील चे पोट मुंबई पुणे मुंबई मध्ये पण सलत होते डोळ्यात (तिथे राजवाडे झोपले होते) )
स्वतंत्रपणे पहिले तर मला पूर्वार्ध आवडला पण नंतर नंतर पुस्तकाची पार आई माई करून टाकलीये … साई शिरीनचा नवरा ?? आवरा ! MK इतका वरवर ? हरहर !
सुखांत न केल्यामुळे पुस्तक जास्त चटका लावते आणि म्हणूनच यशस्वी होते. इकडे सिनेमा सुखांत करून सगळी हुरहूर मारूनच टाकलीये (म्हणूनच यशस्वी झालाय ?)
अर्थात एवढे असूनही सिनेमा
अर्थात एवढे असूनही सिनेमा दणकून चाललाय म्हणून मी खूप खुश आहे.
चेन्नई एक्स्प्रेस आल्यावरही एकही शो कमी झाला नाही उलट वाढलेच आहेत
मराठीच्या बाबतीत मी पक्षपाती आहे. दर्जा थुकरट असला तरी मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिस वर माज केला कि मला फार आनंद होतो (जसा की "मी शिवाजीराजे … ")
रावडी राठोड सारखा भयाणपट जर १ ३ ० कोटी कमवत असेल तर त्यापेक्षा दुनियादारी शंभर पटीने चांगलाय
मराठीच्या बाबतीत मी पक्षपाती
मराठीच्या बाबतीत मी पक्षपाती आहे. दर्जा थुकरट असला तरी मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिस वर माज केला कि मला फार आनंद होतो (जसा की "मी शिवाजीराजे … ")>> झंप्या, सहमत. बाकी बोदलेबुवाबद्दल धन्यवाद. बर्याच दिवसांनी ऐकला शब्द![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बा द वे, मी शिवाजीराजे चं
बा द वे, मी शिवाजीराजे चं कलेक्शन २२ कोटी होतं (सॅटेलाइट हक्कांसहीत की त्या विरहीत माहिती नाही) अस काल सकाळ मध्ये वाचलं. दुनियादारीच आता २० कोटीच्या आसपास आहे.
पुस्तक वाचून झालं. चित्रपटाने
पुस्तक वाचून झालं.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
चित्रपटाने पुस्तकाची वाट लावली आहे... पण इतकीसुद्धा नाही. पुस्तकसुद्धा फार ग्रेट-बिट वाटलं नाही.
मला आपलं उगाच असं वाटत होतं की एका अद्वितिय निर्मितीची माती केलीय जाधव अॅण्ड कंपनीने..
Pages