एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघितलस????? म्हणून म्हणलं बर झालं तू नव्हतीस Proud

पण असं नसावं मधुरा.... तुझी मत तुझ्यापाशी... ती दुसर्‍यांवर लादू नयेत.... उगाच आकांडतांडव करू नये....

असो! मला काय!

तुझी पण कमाल आहे रिया.....एकाच कॉमेंट मध्ये जोडून आणि तोडून बोलतेस.

अग मी मजा करत होते ग!!! थोडा तो समझा करो यार!!! Wink

मधुरा..... तुम्ही तर आधीच काढलाय धागा...

स्पृहा परत येणार म्हणून म्हटलं आपणही यावं परत Wink
धागा काढून पण आपण आढीच धागा काढलाय.....

चला आता १४ ऑक्टो आला रे आला की स्पृहा येणार...... आणि मी पण Proud

प्रिया बापट काय....... प्लीज ती कितीही मोठी झाली तरी आताच शाळेतून आल्यासारखी वाटते....

मी शिवाजीराजे मधलं "मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे Wink

१.इथे भांडत बसू नये.
२.धागा मालिका सुरु होण्या आधी का काढला? ; वगैरे गोष्टी करणे टाळावे.
३.नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे पहिले 'ए.ल.दु.गो.' साठी काढलेल्या धाग्यांवर २००० पोस्टची मर्यादा ओलांडली आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. प्रचंड आवडले.

पण "भांडू नये" यावरुनच भांडणं होणार हे नक्की. Happy

सिरिअल बघितलि नाही तरी हा धागा बघणारच, उगाच ५ मिनिटांच्या कथानकासाठी ३० मिनिटे वाया जायला नको. आवडला तर आहेत ऑनलाईन बघायला Happy

.

>>एलतिगो च्या प्रोमोज वरुन वाटतय की उकाचं कॅरेक्टर अनाथ दाखवतील बहुदा
बरोबर रिया, आणि तो इंप्रेशन पाडायला खोटं कुटुंब उभं करेल!! सबवर एक सुमित राघ्वन ची मालिका होती तश्या टाईप काहीतरी!!!! Sad

तसे नसावे.
एकेक करून प्रोमोज मधून एकेका नातेवाईकाची ओळख करवतील. हा जाहिरातीचाच एक भाग असावा.
किंवा प्रोमोज मध्ये न दाखवता एकदम १ल्या भागात सगळ्यांचा परिचय करवतील.

"मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे >> हसून हसून गडबडा लोळण

ईथे कुटंबच नसणार वगरे काहीतरी असावं. असो. काहीही असलं तरी स्प्रूहा साठी बघणार नक्की

दाखवलं एकदाची उ.का. चं कुटुंब. शुभा खोटे, शुभांगी गोखले आहेत.
सिरियलचं टायटल साँग सचिन पिळगावकर ने म्हंटलं आहे.

सिरियलचं टायटल साँग सचिन पिळगावकर ने म्हंटलं आहे.>>>>>पण त्याचा आवाज उमेश कामत ला सुट नाही होत.

Pages