हि लाल गाडी अगदी थेट शिखरावर जात नाही. तशी १००० फुटभर खालीच थांबते. त्या शिखरावर त्यांची वेधशाळा आहे. पण जिथे ही गाडी थांबते तिथेही बघण्यासारखे खुपच आहे.
आजूबाजूला अनेक शिखरे दिसत असतात. ढगांचा खेळ चालूच असतो पण आम्ही होतो तोपर्यंत हवामान छानच होते. भटकायला भरपूर मोकळी जागा आहे.
अगदी खाली स्की करणार्यांची गर्दी दिसते. त्यातली माणसे अक्षरशः ठिपक्याएवढीच दिसतात.
ही जागा एका कड्यावर आहे. आजूबाजूला संरक्षक म्हणून खांब आहेत. त्यापलिकडे जाणे खरेच धोक्याचे आहे.
पण तरी तिथे लोक जातच असतात. ( त्यात आपल्या महान देशाचे आणि आपल्या पूर्वेकडील देशांतले लोकच असतात. )
बर्फावर चालताना फारसा त्रास होत नाही आणि तितकिशी थंडीदेखील वाजत नाही. डोळे मात्र शुभ्रता बघून दीपतात.
त्या ठिकाणी काही कावळे पण दिसतात पण अजिबात कचरा नसतो. ( तिथे होणारा कचरा एका खास रासायनिक प्रक्रियेने नष्ट केला जातो. )
तिथेच एक गुहा आहे आणि त्यात काही सुंदर शिल्पं आहेत ( दोन्ही मानवनिर्मित ) खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. भारतीय जेवण पण मिळते. पण ते जेवण स्विस हॉटेलमधे घेणे चांगले कारण तिथली सेवा तत्पर आहे. ( बॉलीवूड नावाच्या हॉटेलमधला कारभार भोंगळ आहे. पुढच्या भागात सविस्तर लिहितो. )
हॉटेलमधल्या खिडकीतूनदेखील उत्तम दृष्य दिसत राहते.
इथल्या गाड्या या खासच आहेत. साधारण पणे टूअर कंपनी एखादा डबा आरक्षित करते. सगळे बसल्यावर ती एक दोन डब्याची गाडी सोडतात. त्यामूळे सर्व डबे भरत बसायची वाट बघावी लागत नाही. याच डब्यात एखाद्या छोट्या गटाची पण स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते.
येतानाही परत एकदा गाडी बदलावी लागते. या गाडीचा परतीचा मार्ग मात्र वेगळा तरी तितकाच सुंदर आहे.
आम्ही येतानाही ढगांचा दंगा सुरूच होता. त्यामुळे एकाच जागेची एकापाठोपाट घेतलेली प्रकाशचित्रे
वेगवेगळी आली आहेत.
जाताना एक सुंदर बोगदा आणि सरोवर ( मानवनिर्मित ) दिसत राहते. हो ट्रेन जरी कॉगव्हील ट्रेन असली तरी
यापेक्षा तीव्र उताराची गाडी माऊंट फिलाटस वर जाते. तिचे डबेच उतरत्या रचनेचे आहेत.
जिथे ही गाडी संपते ते स्टेशनदेखील सुंदर आहे. सर्वच ठिकाणी पाण्याची / टॉयलेट्सची उत्तम व्यवस्था असते.
हे पुढचे फोटो...
27
28
29
30
31
32
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
मस्त फोटो. झक्कास वर्णन.
मस्त फोटो. झक्कास वर्णन.
व्वा!
व्वा!
बर्फाचे फोटोज सह्ही
बर्फाचे फोटोज सह्ही
वा छान, बर्फाच्या कलाकृती
वा छान, बर्फाच्या कलाकृती सुंदर.
दिनेशदा झक्कास.... माझा झब्बु
दिनेशदा
झक्कास.... माझा झब्बु घ्या
हा गाडीचा फोटो
हा गाडीचा फोटो
whoooooshhh!!!!!!!!! करून
whoooooshhh!!!!!!!!! करून घसरावसं वाटतंय आत्ताच्या आत्ता!!!!!!!!!!!
दिनेश.... अगोदर बॉलीवूड हे
दिनेश....
अगोदर बॉलीवूड हे नामच भोंगळ असल्याने त्या नावाने निर्माण झालेले हॉटेलही त्याच दर्जाचे असणार यात संदेह नाही....अर्थात तुम्ही नंतर त्यावर लिहितो म्हटले आहेच, पण मला खात्री आहेच की ते वर्णन या एरव्ही अत्यंत देखण्या ठरलेल्या सीरिजमध्ये शोभणारही नाही.
फोटोबद्दल काय लिहावे ? केवळ डोळे भरून पाहत राहिलो....विशेषतः रेल्वेज....अतिशय सुंदर. बर्फाची तर मांदियाळीच जणू.....बर्फही असा मोहित करणारा असून शकतो.
वाह!! सगळं कसं आखीव
वाह!! सगळं कसं आखीव रेखीव!!
सुंदर!!
कमाल सुंदर
कमाल सुंदर
अप्रतीम काय निसर्ग
अप्रतीम
काय निसर्ग आहे.....
मस्त फोटो ....
अ प्र ति म !!
अ प्र ति म !!
खरच अप्रतिम... stay behind
खरच अप्रतिम...
stay behind the ropes चा अर्थ behind हे त्या बाजुने असा घेतला की काय?
तो शिन्चानपण असच काहीस करतो ट्रेन प्लॅटफॉर्मवर.
मस्त फोटो...खरोखर स्वर्ग
मस्त फोटो...खरोखर स्वर्ग म्हणजे तरि दुसरे काय असणार..फोटो पाहुन जुन्या आठवणि जाग्या झाल्या...
मीरा, ट्रेनचा नव्हताच
मीरा, ट्रेनचा नव्हताच माझ्याकडे फोटो.
३३ मधे स्की करण्यासारखी आलेली माणसे दिसताहेत.
अशोक,
४९ मधे माझे जेवण. फ्लॉवर बटाटा रस्सा आणि भात. इथे डीशच्या वजनावर पैसे घेतात.
वर्षू, आपल्यासाठी घसरायची पण सोय आहे पण ती टीटलीसवर ( आपण जाणार आहोत तिथे )
००
या सर्वच ठिकाणी सुरक्षिततेची पुर्ण काळजी घेतलेली आहे, तरीपण काही जण मुद्दाम जीव धोक्यात घालतातच.
आणखी एक खास म्हणजे, केवळ अंगात डोंगर चढून जायची क्षमता नाही, म्हणून कुणाला इथे जाता येणार नाही, असे होत नाही. या रेल्वे वगैरे अलगद आपल्याला तिथे नेतात. तिथल्या सुखसोयी बघता मला तरी तिकिट वाजवीच वाटले.
या रेल्वेचा वेगही मर्यादेत असतो. ( गायींना रुळ ओलांडायचे असतील तर रेल्वे थांबते ) त्यामुळे भोवतालच्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.
त्या ग्लेशियरवर पडलेल्या
त्या ग्लेशियरवर पडलेल्या ढगांच्या सावल्या किती सुंदर दिसताहेत.
बाहेर बर्फावर जे उन दिसत आहे त्याऐवजी आम्ही गेलो त्यावेळी प्रचंड वारा आणि थंडी. त्या तसल्या थंडीतही एक शूरवीर शर्ट काढून उभा होता.
असल्या बर्फाळ थंडीत आम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये गरमागरम सूप आणि स्पॅगेटी खाल्ली - बाहेरचा बर्फ बघत. तुमच्या जेवणाचा फोटो बघून आठवण आली.
मामी, परत एकदा जाच. हे २/३
मामी, परत एकदा जाच. हे २/३ महिनेच असे हवामान असते.
अर्थात शेवटी आपण जाऊ त्या दिवशी कसे हवामान आहे त्यावर ठरणार सगळे.
दिनेशदा, वाह ! काय सुंदर
दिनेशदा,
वाह ! काय सुंदर निसर्ग आहे !
बर्फात घडवलेले प्राणी ..ही तर खास कल्पना !
आहाहा! काय सुरेख नजारा आहे
आहाहा! काय सुरेख नजारा आहे ....:)
मस्त. २९ नं चा फोटो वेंगेन
मस्त. २९ नं चा फोटो वेंगेन स्टेशनच्या जवळचा असावा. आम्ही तेथेच राहिलो होतो.
अप्रतिम...
अप्रतिम...
इथला नजारा काही औरच आणि
इथला नजारा काही औरच आणि तुम्ही तो टिपलायही मस्तच...
त्या ठिकाणी काही कावळे पण दिसतात >>> मला वाटतं हे कावळे नाहीयेत - त्यासारखेच काळे पण पिवळ्या चोचीचे व पिवळ्या पायाचे पक्षी आहेत ... (आठवलं की नाव देतो मग..)
शशांक दोन्ही असतात. कावळे
शशांक दोन्ही असतात.
कावळे आफ्रिकन टाईपचे असतात ( काळे पांढरे ) आणि ते पिवळ्या चोचीचे काळे पक्षी लेगॉसमधे पण फार दिसतात. शोभा बोंद्रेंच्या लेगॉसचे दिवस या पुस्तकांत त्यांचा मजेशीर उल्लेख आहे. त्या लिहायला बसल्या कि कागदावर नेमके शिटायचे ते.
मी पक्ष्यांचे फोटो काढलेत पण नाही टाकले इथे.
फारेंडा.. वेंगेन सोडल्यानंतर थोड्याच वेळात काढलाय. तिथपर्यंत पायी जायची इच्छा आहे फार पण मला अख्खा दिवस पुरणार नाही चढायला.
अप्रतीम सुंदर!
अप्रतीम सुंदर!
सगळेच फोटो आवडले.
सगळेच फोटो आवडले.
सगळे फोटो केवळ अप्रतिम!!!
सगळे फोटो केवळ अप्रतिम!!! त्या कावळ्यांना 'रेवन' म्हणतात का?
लय झ्याक
लय झ्याक
मस्त आहेत ४८,४९,५० खास
मस्त आहेत
४८,४९,५० खास
एकदम मस्त!!
एकदम मस्त!!
अप्रतिम.....
अप्रतिम.....
Pages