स्विस सहल - भाग ३/२ युंगफ्राऊ, Jungfrau
हि लाल गाडी अगदी थेट शिखरावर जात नाही. तशी १००० फुटभर खालीच थांबते. त्या शिखरावर त्यांची वेधशाळा आहे. पण जिथे ही गाडी थांबते तिथेही बघण्यासारखे खुपच आहे.
आजूबाजूला अनेक शिखरे दिसत असतात. ढगांचा खेळ चालूच असतो पण आम्ही होतो तोपर्यंत हवामान छानच होते. भटकायला भरपूर मोकळी जागा आहे.
अगदी खाली स्की करणार्यांची गर्दी दिसते. त्यातली माणसे अक्षरशः ठिपक्याएवढीच दिसतात.
ही जागा एका कड्यावर आहे. आजूबाजूला संरक्षक म्हणून खांब आहेत. त्यापलिकडे जाणे खरेच धोक्याचे आहे.
पण तरी तिथे लोक जातच असतात. ( त्यात आपल्या महान देशाचे आणि आपल्या पूर्वेकडील देशांतले लोकच असतात. )