स्विस सहल - भाग ३/१ युंगफ्राऊ, Jungfrau

Submitted by दिनेश. on 23 September, 2013 - 09:11

आज आपण टॉप ऑफ युरप, युंगफ्राऊ / यंगफ्राऊ ला जाऊ.

बहुतेक सहली झुरीक रेल्वे स्टेशनजवळच्या एका मैदानातूनच सुटतात. युरपमधील इतर देशांतून येणार्‍या / जाणार्‍या बसेसही इथेच येतात.
आधी बूक केले असेल तर प्रश्नच नाही पण आयत्यावेळीही जागा असल्यास टुअर घेता येते. वेळेआधी १० मिनिटे बसमधे बसावे अशी अपेक्षा असते. त्या वेळात गाईडची ओळख होते. दिवसभराचा कार्यक्रम कळतो.

पण हवी ती सीट मिळवायची असेल तर मात्र अर्धा तास तिथे जाणे उत्तम.

आमची ही बस मस्तपैकी डबलडेकर होती. मी अर्थातच पहिल्यांदा जाऊन वरची फ्रंट सीट पकडली होती.
झुरीक सोडल्याबरोबर मस्त दृष्यांची मालिका नजरेसमोर सरकत राहते. जुंगफ्राऊला जाण्याआधी १५/२० मिनिटे, इंटरलाकेन ला बस थांबते. तिथे तर गुलाबांचे ताटवेच आहेत. तिथेच हँगग्लायडर्स बर्‍यापैकी दिसतात. ( गाईडने सांगितल्याप्रमाणे त्यात बरेच अपघातही होत असतात. )

जुंगफ्राऊला जाण्यासाठी आपल्याला कॉग व्हील ट्रेनने जावे लागते. या रेल्वेला दोन रुळांच्या मधे आणखी एक
दातेरी रुळ असतो. या हिरव्या पिवळ्या रेल्वेचा प्रवास अविस्मरणीयच ठरतो.
या डब्यांना मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्यातून बाहेर झुकून फोटो काढायला अजिबात हरकत नसते.
या प्रवासाची सुरवातच एका मोठ्या धबधब्याच्या दर्शनाने होते. आणि बघता बघता आपण उंची गाठत
राहतो.
ट्रॅकच्या आजूबाजूला तर रानफुलांची पखरणच असते. दूरवर युंगफ्राऊ दिसत राहतो. पण अशा ठिकाणी असतो तसा ढगांचा दंगाही असतोच. त्यामूळे ही शिखरे लपंडाव खेळत राहतात.
याच वाटेवर खुप सुंदर घरे दिसतात. रेल्वेट्रॅकला समांतर असा पायी चालत जाण्याचा रस्ताही आहे. त्या रस्त्यावर बरीच माणसे चालताना दिसतात. ( मी कधी जाणार ? ) आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात असतो.

पण हि गाडी थेट वर जात नाही. मधे एका स्टेशनावर गाडी बदलावी लागते. हि दुसरी गाडी आहे लाल रंगाची
ही मात्र थोड्याचा वेळात एका लंबलचक बोगद्यात शिरते. ( मग मात्र काचा बंद कराव्या लागतात.)

हिमालयाच्याच काय लेहलडाखच्या तुलनेतही जुंगफ्राऊची ऊंची ४,१५८ मिटर्स नगण्य आहे पण एकदम एवढ्या ऊंचीवर जाणे, आपल्याला त्रासदायक ठरु शकते. म्हणून वाटेत ही गाडी दोनदा थांबते आणि सर्वांनी तिथे उतरून जरा हालचाल करावी अशी अपेक्षा असते.
या दोन्ही जागाही खुप सुंदर आहेत. तिथल्या खिडक्यांतून खुप सुंदर दृष्य दिसते. या गाडीचे शेवटचे स्टेशनही बोगद्यातच आहे.

आता बाकीचे पुढच्या भागात. सध्या हे फोटो बघा Happy

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त रसीले वर्णन आणी दृष्ये...
आणी (नेहमीप्रमाणे) टूरिस्ट्स मधे चायनीज लोकांची आधिकता दिसत आहे Happy

दिनेशदा, अतिशयच सुरेख प्रचि. तुम्ही बसनं बरंच फिरलेला दिसताय. आम्ही सगळंच ट्रेननं फिरलो. आम्ही गेलो त्यावेळी युंगफ्राऊला जाणार्‍या ट्रेनच्या काचा उघडून प्रवास करण्याची परिस्थिती नव्हती. Happy

युंगफ्राऊला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेलो होतो पण आस्मादिकांना नेमका त्यादिवशी ताप होता. त्यामुळे खूप मस्त एंजॉय करता आलं नाही.
Sad

ते पॅराग्लायडिंग नवर्‍यानं ल्युसर्नला केलं.

१६ वा फोटो अप्रतिम आलाय. ढगातून बाहेर पडत असलेली किरणंही दिसत आहेत.

वर्षू, चायनीज तर होतेच पण कॅनडा आणि न्यू झीलंड वरून आलेले पण बरेच जण होते. ( हे दोन्ही देश तितकेच सुंदर आहेत. )

पण सर्वात जास्त ब्रिटीश असतात. थॉमस कूकने त्यांची पहिली टूअर माऊंट रिगी वर नेली होती आणि अजूनही क्वीन एलिहाबेथय तिथे नियमित जाते.

दिनेश, मामी:

युंगफ्राउला तुम्हाला दिसले त्याला पॅराग्लायडींग म्हणतात (जे प्रचि१३ मध्ये आहे आणि मामींच्या नवर्‍याने बहुतेक टँडम पॅराग्लायडींग केले असावे). हँगग्लायडींग वेगळा प्रकार आहे व त्यात अपघातांची शक्यता बरीच जास्त असते. त्यामुळे हँगग्लायडिंग फारसे लोकप्रिय नाही. पॅराग्लायडिंग सर्वत्र (भारतातसुद्धा) लोकप्रिय आहे - युरोपमध्ये बहुतेक सर्व देशात (फ्रान्स अग्रेसर) त्याच्यासाठी रितसर परिक्षा देवून लायसेन्स मिळवावा लागतो. पॅराग्लायडिंगमध्ये अपघाताचे प्रमाण नगण्य आहे.

टण्या ... हो हो बरोबर. पॅराग्लायडिंग केलं. हँगग्लायडिंग वेगळं असतं. धन्यवाद. वर बदल करते.

पण त्या मैदानातच २/३ क्रॅश लँडीग होताना मी बघितली. तिथेही लायसन्स लागतेच म्हणा. >>> हे खरंच सेफ असतं दिनेशदा. क्रॅश लँडिंग म्हणजे फक्त दोन पायांवर लँड न होता अडखळतात किंवा पडतात. एकतर वार्‍याचा जोर त्या पॅरॅशूटला (पॅरॅशूटच म्हणतात का त्या छत्रीला?) खेचत असतो. जमिनीवर उतरून लगेच तसंच पुढे थोडं धावावं लागतं. आणि लगेच पॅरॅशूट जमिनीवर बंद अवस्थेत पडावं अशी धडपड करावी लागते. नाहीतर खेचलं जातो.

अजूनही क्वीन व्हिक्टोरिया तिथे नियमित जाते. << दिनेश, तुम्ही कोणत्या राणीबद्दल बोलताय ते कळले नाही. सध्याच्या राणीचं नाव एलिझाबेथ आहे आणि गेली ६० वर्षे तीच राज्य करते आहे. तेव्हा तुम्हांला एलिझाबेथ म्हणायचे आहे का ?

तसेच, जर्मन भाषेत युंग = तरुण आणि फ्राऊ = मुलगी. या जागेचं नाव युंगफ्राऊ आहे. जुंगफ्राऊ नव्हे.

वरती ज्या रिगीचा उल्लेख केलेला आहे त्याला ही क्वीन ऑफ माउंटन्स म्हणतात. मी तशी जाहिरात वाचली होती. तो रिगी माउंटन मस्त आहे हायकिंगला. एक डब्याच्या ट्रेन्स आहेत, पण ट्रॅकच्या बाजूनेच ट्रेल्स आहेत.

http://www.myswitzerland.com/en-us/rigi-the-queen-of-the-mountains.html

दिनेश - फोटो छान आहेत. वर्णनही. मात्र काही भाग टूर घेऊन गेलात तर लागू होतात. स्वित्झर्लंड मधे फिरायला ट्रेन सर्वात चांगल्या असे माझे मत आहे. आम्ही ४-५ दिवस पूर्ण ट्रेन्सनेच फिरलो.

तेथे भारतीय दिसले तर बहुधा एकदम गठ्ठ्याने दिसतात. केसरी वाले वगैरे Happy मराठीही चिकार भेटतात.

विक्टोरिया :). मिलिंदा - युंगफ्राउ चा उल्लेख पुलंच्या पुस्तकात (बहुधा अपूर्वाई) तेथील कन्याकुमारी म्हणून त्यांनी (त्याच अर्थाने) केलेला वाचला होता.

युंगफ्राउ चा उल्लेख पुलंच्या पुस्तकात (बहुधा अपूर्वाई) तेथील कन्याकुमारी म्हणून >>>
माझ्या आठवणीप्रमाणे 'जावे त्यांच्या देशा' मध्ये उल्लेख आहे. पुलंनी पण जुंगफ्राऊच लिहिल्यासारखं का वाटतय? नक्की आठवत नाहीये.

दिनेशदा, मस्त! तुम्ही खूप भाग्यवान आहात Happy
रानफुले, रस्ते, वाटा, घरं, ढग..... सुंदर!!

मागच्यावेळेस जमले नाही पण आता नक्की जाणार.

मिलिंदा धन्स, सुधारले ( खरे तर मला मोटी बा, म्हणायचे होते Happy )
तो उच्चार मी ज आणि य असा दोन्ही ऐकला. ( जसवंत / यशवंत - जमुना / यमुना..... !!! ) म्हणून रोमन लिपीत पण लिहिलेय.

फारेंडा, ट्रेन्स मस्तच असतात. पुर्वी भटकलो आहे पण मला बसचे गाईडस फार आवडतात. आणि तसा बसचाही प्रवास आरामदायीच असतो तिथे.

मराठी लोक आणि त्यांचा टिपीकल सावळा गोंधळ होताच. पण मी त्या ग्रुपमधे नव्हतो.
कॅथे पॅसिफिकच्या एका फ्लाईटमधे ( मी हाँगकाँग - मुंबई होतो, तो ग्रुप बँकॉक ला चढला ) तर हैदोस घातला होता, अशा एका ग्रुपने.

तसेच, जर्मन भाषेत युंग = तरुण आणि फ्राऊ = मुलगी. या जागेचं नाव युंगफ्राऊ आहे. जुंगफ्राऊ नव्हे.>>> अगदी बरोबर मिलिंदा आणि गंमतीची गोष्ट म्हणजे याचा वेगवेगळा अर्थ जरी हा असला, तरी एकत्रित अर्थ मात्र virgin असा आहे. Happy

आणि

दिनेशदा, तुम्हाला तो उच्चार जरी ज आणि य असा दोन्ही ऐकू आला असला तरी तो य असाच आहे. त्यामुळे शीर्षकात योग्य ते बदल कराल का? Happy

Pages