स्विस सहल - भाग ३/२ युंगफ्राऊ, Jungfrau

Submitted by दिनेश. on 23 September, 2013 - 11:26

हि लाल गाडी अगदी थेट शिखरावर जात नाही. तशी १००० फुटभर खालीच थांबते. त्या शिखरावर त्यांची वेधशाळा आहे. पण जिथे ही गाडी थांबते तिथेही बघण्यासारखे खुपच आहे.

आजूबाजूला अनेक शिखरे दिसत असतात. ढगांचा खेळ चालूच असतो पण आम्ही होतो तोपर्यंत हवामान छानच होते. भटकायला भरपूर मोकळी जागा आहे.

अगदी खाली स्की करणार्‍यांची गर्दी दिसते. त्यातली माणसे अक्षरशः ठिपक्याएवढीच दिसतात.
ही जागा एका कड्यावर आहे. आजूबाजूला संरक्षक म्हणून खांब आहेत. त्यापलिकडे जाणे खरेच धोक्याचे आहे.
पण तरी तिथे लोक जातच असतात. ( त्यात आपल्या महान देशाचे आणि आपल्या पूर्वेकडील देशांतले लोकच असतात. )

बर्फावर चालताना फारसा त्रास होत नाही आणि तितकिशी थंडीदेखील वाजत नाही. डोळे मात्र शुभ्रता बघून दीपतात.
त्या ठिकाणी काही कावळे पण दिसतात पण अजिबात कचरा नसतो. ( तिथे होणारा कचरा एका खास रासायनिक प्रक्रियेने नष्ट केला जातो. )
तिथेच एक गुहा आहे आणि त्यात काही सुंदर शिल्पं आहेत ( दोन्ही मानवनिर्मित ) खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. भारतीय जेवण पण मिळते. पण ते जेवण स्विस हॉटेलमधे घेणे चांगले कारण तिथली सेवा तत्पर आहे. ( बॉलीवूड नावाच्या हॉटेलमधला कारभार भोंगळ आहे. पुढच्या भागात सविस्तर लिहितो. )

हॉटेलमधल्या खिडकीतूनदेखील उत्तम दृष्य दिसत राहते.

इथल्या गाड्या या खासच आहेत. साधारण पणे टूअर कंपनी एखादा डबा आरक्षित करते. सगळे बसल्यावर ती एक दोन डब्याची गाडी सोडतात. त्यामूळे सर्व डबे भरत बसायची वाट बघावी लागत नाही. याच डब्यात एखाद्या छोट्या गटाची पण स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते.

येतानाही परत एकदा गाडी बदलावी लागते. या गाडीचा परतीचा मार्ग मात्र वेगळा तरी तितकाच सुंदर आहे.
आम्ही येतानाही ढगांचा दंगा सुरूच होता. त्यामुळे एकाच जागेची एकापाठोपाट घेतलेली प्रकाशचित्रे
वेगवेगळी आली आहेत.

जाताना एक सुंदर बोगदा आणि सरोवर ( मानवनिर्मित ) दिसत राहते. हो ट्रेन जरी कॉगव्हील ट्रेन असली तरी
यापेक्षा तीव्र उताराची गाडी माऊंट फिलाटस वर जाते. तिचे डबेच उतरत्या रचनेचे आहेत.

जिथे ही गाडी संपते ते स्टेशनदेखील सुंदर आहे. सर्वच ठिकाणी पाण्याची / टॉयलेट्सची उत्तम व्यवस्था असते.

हे पुढचे फोटो...

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

54

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो आणि वर्णन. दिनेशदा धन्यवाद! तुमच्यामुळं आम्ही इथे बसून जग फिरतो. Happy
सगळीकडे बर्फाची गादीच अंथरलेय असं वाटतय. Happy
३९ ते ४१ आणि मीराचा झब्बू सुंदरच. Happy

निळा , काळा , पांढरा , पाणेरी .
कितीही सुंदर असले फोटो तरी हिरवा रंग दिसल्यावर हुश्श झालं Happy
मस्त प्रचि बर्फाच्या जगातली.

Pages