हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स

Submitted by शूम्पी on 23 August, 2013 - 12:44

फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १ च्या शेवटी अ‍ॅडमिन यांची सब कॅटेगरी करायची सूचना वाचली म्हणून हा वेगळा धागा काढते आहे. तिथे लिहिल्याप्रमाणे शोधायला सोपे जाइल कदाचित.

हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स बाबतच्या गप्पा इथे मारुया (का?) . वेगळा धागा ऑलरेडी असेल तर आंगा म्हणजे हा उडवते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वतःला हल्ली कुठेही जाताना स्लिंग/ क्रॉसबॉडी बॅग्जच परफेक्ट वाटतात. त्यांना कप्पे भरपूर असावे लागतात मात्र. माझे पर्सगणिक वस्तूंचे कप्पे ठरलेले असतात. आणि शक्यतो पर्स/ बॅग मधे कॅश, किल्ल्या, मोबाइल, चॅपस्टिक, हॅण्ड सॅनिटायझर सगळे ज्या त्या कप्प्यातच जाते.
खरेदी करत फिरताना स्लिंग/ क्रॉसबॉडी बॅग इतकं परफेक्ट काही नाही. सगळी कॅश (भारतात अजूनही मेजर खरेदी कॅशनेच होते!) त्या एका बॅगमधे तुमच्या पोटाजवळ असते. गर्दीत कुणी मारण्याबिरण्याचा प्रश्नच येत नाही.
मी सध्या कामाच्या संदर्भाने तर अक्षरशः लाखालाखाची कॅश खरेदीसाठी बरोबर वागवलीये. स्लिंग बॅगच्या इतकं काहीच सोयीचं पडत नाही यात.
हल्ली स्लिंग किंवा क्रॉसबॉडी बॅग्ज पण एकदम मस्त डिझाइन्समधे येतात त्यामुळे उगाच सतत ट्रेकिंगला जातायत असा फील नसतो.
पुण्यात ल रो वर पीएनजी च्या शेजारी दिनशा म्हणून आहे ज्याच्याकडे चेक इन लगेज, केबिन लगेज पासून स्लिंग बॅग्ज, जेण्टससाठी कॉइन पाऊच पर्यंत सगळे असते. उत्तम क्वालिटी, किमती पण एकदम योग्य आणि काही झालं तर लगेच दुरूस्तीही करून देतात.

क्वालिटी, डिझाइन, स्टाइल वगैरे सगळे धरुन मत दिले तर माझं मत हायडिझाइनला. ऑफिससाठी परफेक्ट.
फारशी चांगली क्वालिटी नाही पण स्टाइल कोशंट हाय अन शिवाय महाग असलेल्या बॅग्ज म्हणजे Esbeda. मोहात पडून घेतली खरी पण त्याचं अस्तर ६ महिन्यात फाटलं. Sad चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असल्याने आधीच कळायला हवं होतं.

नीधप, क्रॉसबॉडी बॅग्जच म्हणून सर्च केलं तर नेहमी वापरतो तश्याच पर्स दिसत आहेत.त्यालाच क्रॉसबॉडी म्हणतात का? प्लिज लिंक देणार का?

मी Dune च्या वापरते. पण त्यांच्या किंमती खूप असतात. वजन पण जास्त असते. दिनशामध्ये ट्राय करेन आता.

तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.

Miss Bennett हा ब्रॅड कुणी वापरला आहे का? त्यांच्या हॅन्ड बॅग्स आवडल्या आहेत घ्यायचा विचार करतेय.

सामी मला फ्रेंड ने सांगितलय की तिथे बॅग्ज ची क्वालिटी बंडल असते....कोणी ऑर्डर केलीय का अजुन इथे?? मला पण एक बॅग आवडलीय तिथे...

तिथे बॅग्ज ची क्वालिटी बंडल असते.>>> कुठे??? जबाँगवर???
नाही हो. चांगल्या असतात बॅग्ज. मी ३-४ वेळा मागवल्या आहेत.
एकदा मी मागवलेले कॉम्बीनेशन उपलब्ध नव्हते (त्यांच्याकडचा पीस डिफेक्टीव्ह होता) तर त्यांनी मला फोन करून दुसरे कॉम्बो चालेल का ते विचारून घेतले आणि मग पर्स पाठवली.

अनिश्का, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. वेलनोन ब्रॅण्ड साठीच चांगले आहे जबोन्ग . मला बॅगिट ची हॅन्ड्बॅग ३०% डिस्काऊंट ने मिळाली, पण अजुन एक बॅग मागवलेली 'Miss Bennett' ब्रॅंड ची, एकदम बेकार होती, परत केली.
प्राची, बॅगिटची बॅग ओरिजिनल आहे आणि डिस्काऊंट पण चांगले मिळाले.

मुलींनो/बायांनो,
आज हाय डिझाइन च्या साइट वर पाहिले, सेल आहे. नेहमीच्या रंगाच्या बॅग ना ३०% आणि लाल पिवळ्या वगैरे रंगाना ५०% पर्यंत ऑफर आहे.
अगदी पिवळी वगैरे घेतली नाही तरी लाल रंगाची बॅग ५०% ऑफ मध्ये चालू शकेल.

Pages