घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 05:11

बाप्पा मोरया!! Happy

सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!

घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या. Happy

मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.

image 289.jpg
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमचा बाप्पा. यावेळेस इको-फ्रेंडली सजावट केली. फक्त कार्ड बोर्ड , ओरिगॅमी पेपर्स आणि फुले.
DSC_1050.JPGDSC_1056.JPG

आणि हा नैवेद्य. काजु पेढे (लाजोच्या रेसिपीने)
IMG_0532.JPG

व्वा! सुंदर बाप्पा आहेत सगळ्यांचे Happy सजावट पण एक से एक Happy

बॅले करणारा बाप्पा जामच क्युट Happy

चंचल Happy

चंचल मस्त झाले आहे डेकोरेशन.
वरच्या फोटोतल्या गौरी सुद्धा एकदम मस्त. त्यांच्या पुढचा प्रसाद कधि मिळेल?

सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद!

हा आमच्या घरचा गणपती.

Ganpati.jpg

व्वा! सगळ्यांचे बाप्पा आणि गौरी, आणि आरास मस्तच. Happy
आदिती छान बाप्पा, गौरी आणि सजावट. Happy
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद! >>>>>>>>>>खूप खूप कौतुक. Happy

हो शोभातै, मीच बनवली आहे.>>>>>>>>>>शाब्बास! आता मला, तुझ्याकडे शिकायला, यायला पाहिजे. Happy

अहा!! कसली सुंदर दिसतेय प्लायउडची रांगोळी! Happy
हे असे खास ठोकळे कापुन घेतलेस का आदे त्यासाठी?

चैतन्य, मूर्ती अप्रतिम बनली आहे.

घारुअण्णा, सजावटीत ते छोटे छोटे घुमट वापरले आहेत ते कागद / पुठ्ठा यापासून कसे बनवायचे?

पल्लवी, मस्त दिसतेय आरास.

Pages