हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.
''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू शक्यतो ३ ओळींचा असावा.हायकू मुक्तःछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.
२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
''नववर्षाच्या नव्या पहाटे
नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला खिडकीमधला दिवा ''
३. वस्तूचा उल्लेख तिसर्या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.
४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.
तसेच हायकूसाठी नवी वस्तू नव्या धाग्यात दिली जाईल.
५. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.
६. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.
७. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.
http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem
जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.
चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!
आजचा विषय आहे :- घड्याळ
घोषणा पक्की यंदा निवृत्ती
घोषणा पक्की
यंदा निवृत्ती नक्की
घड्याळ.. (टिक्)टिकेल?
मार्क ट्वेन, आपलं म्हणणं
मार्क ट्वेन,
आपलं म्हणणं रास्तं आहे.
पण आजकाल हायकूत ही बंधने पाळली जात नाहीत.
अगदी जपानीत देखील.
मात्रं हे खरं की एक हायकू सर्वसाधारणपणे एका श्वासात म्हणता आले पाहिजे.
शिकू हो हळूहळू.
पहिला तीन ओळींचा नियम तर गिरवू.
मग अजून चार दिवस आहे स्पर्धा वेगवेगळे विषय घेऊन.
हळूहळू कठिण होत जाणार आहे.
तुम्ही आजच सगळी गुपितं उघड करायला लावताय राव.
स्वप्नांची माळ भल्या पहाटे
स्वप्नांची माळ
भल्या पहाटे तुटली
कर्कश्श घडयाळ
घड्याळावर लिहिलेले हायकू.
घड्याळावर लिहिलेले हायकू.
इब्लिस, भारीय.
इब्लिस, भारीय.
इब्लिस, मस्त आयडीयाची
इब्लिस, मस्त आयडीयाची कल्पना..
पहिला तीन ओळींचा नियम तर
पहिला तीन ओळींचा नियम तर गिरवू.>>>बरं.
********************
आरत्यांची लांबण लागली तेव्हा
त्याने सोंडेआडून हळूच जांभई दिली
भिंतीवरच्या घड्याळात पहात
तू येतच नाहीस नेमाने... आठवणी
तू येतच नाहीस नेमाने... आठवणी मात्र येती इमाने
वाट बघून मी म्हणतो... चला... बराच वेळ झाला
घड्याळ हसते... म्हणते... बरा वेळ गेला
इब्लिसांचा फोटो बघून
इब्लिसांचा फोटो बघून सुचलं:
सेकंद, मिनिटे आणि तास
तसेच उभे तासंतास
घड्याळ बंद पडलय !
एक तास - गुलकंद, एक सेकंद -
एक तास - गुलकंद, एक सेकंद - नकोसे प्रवचन
एक(जर्मनभाषीय)दगड
(एक) भलतेच (लांबलेले) घड्याळ
शूम्पी, लै भारी
शूम्पी, लै भारी
अणूतले वा वाळुचे वापरले कण
अणूतले वा वाळुचे
वापरले कण महतीचे
'सेट' करावे लागतेच.. घड्याळ
आमच्या घरात एक विचित्र फॅमिली
आमच्या घरात एक विचित्र फॅमिली पोट्रेट आहे
साठीची राणी, बाराचा राजा आणि छत्तीसशेचा राजपुत्र
बिग बेन त्याला राणीचं घड्याळ म्हणते.
चमन, मस्त (असं विचारणार होतो
चमन, मस्त
(असं विचारणार होतो की तुझी मोठी बहीण गुजराथी आहे का? :))
आठवणींची माळ न थांबलेला
आठवणींची माळ
न थांबलेला काळ
घड्याळाची टिक टिक चालूच
घटिका जाती, जाती
घटिका जाती, जाती पळे
भिंतीवरचे घड्याळ म्हणते
पळा पळा कोण पुढे पळे!
येतात क्षणभरच एकाठायी एका
येतात क्षणभरच एकाठायी एका वेळेला
अहोरात्र धावत्या घरातले तीन यंत्रमानव
जसे घड्याळाचे काटे, बाराच्या ठोक्याला
लावला भात, लावली डाळ पडला
लावला भात, लावली डाळ
पडला नवाचा टोल आणि झाली नुसती पळापळ
पाहून माझी धावपळ ,हसले लबाड घड्याळ
काळाची हो अविरत टिकटिक क्षण
काळाची हो अविरत टिकटिक
क्षण क्षण ओवीत माळ
कधी वाटते गोल गोल हे विश्वच एक घड्याळ!
मुग्धमानसी, आवडला हायकू!
मुग्धमानसी, आवडला हायकू!
मुग्धमानसी, छानच
मुग्धमानसी, छानच जमलय.
सगळ्यात मस्त इंन्द्रधनुचा, innovative.
'उजाडल्यावर जा निघून' म्हटलंय
'उजाडल्यावर जा निघून'
म्हटलंय खरं पण....
धावणार्या घड्याळासोबत मी हळूहळू मावळतेय!
मुग्धमानसी, दोन्ही हायकू
मुग्धमानसी, दोन्ही हायकू मस्तं आहेत.
आजचा विषय कधी देणार? ११ वाजून
आजचा विषय कधी देणार? ११ वाजून गेले..........
वेळेचे नियोजन काट्यांची
वेळेचे नियोजन
काट्यांची कसरत
वेळेच्या शिस्तीचे घड्याळ.
(कायच्या काय मध्ये मोडणार बहुतेक :हाहा:)
हा धागा आज बंद करत आहोत.
हा धागा आज बंद करत आहोत. पुढील हायकूसाठी http://www.maayboli.com/node/45098 हा धागा पहा.
Pages