घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 05:11

बाप्पा मोरया!! Happy

सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!

घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या. Happy

मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.

image 289.jpg
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!!

आमचा जर्मनीतला बाप्पा बघा. यावर्षी सजावट करताना थर्माकोल वापरायचा नव्हता त्यामुळे कागदावर विविध डिझाईन्स काढून आणि मध्यभागी कॅनव्हास रंगवून सजावट केली आहे.

Ganpati_a.jpg

केवळ मागच्या सजावटीचा फोटो टाकतेय.

DSC_0105_c_0.jpg

mobilevar aadhi rangolicha photoch disala aani rangoli baghunach olakhale ki hi Himskool chi post asanar. Happy

mastch aahe sagali aras.

..DSC_0036.jpgDSC_0046_1.jpg

कामा निमीत्त मनीला, फिलीपिन्सला आलोय. ऑफिसच्या अगदी शेजारच्या ईमारतीत आठ दहा कुटुंबांनी मिळुन बाप्पांची स्थापना केल्याच कळल. मग काय बिन्धास्त हक्काने आरतीला हजेरी लावली. सात दिवस आहेत बाप्पा..
Manila_ganapati_2013.jpg

इथे पुना गणेश मंडळी चा गणेशोत्सव पण आहे सात दिवस.. महात्मा गांधी रस्त्यावरच्या मंदिरात.. Happy तिकडे हजेरी लावायची आहे अजुन..
मनीलात एव्हढे मराठी लोक भेटतील अस वाटल नव्हत..

चैतन्य, मूर्ती फारच सुंदर आहे. हातात कला आहे तुमच्या. अभिनंदन.
आणि बाकीचे पण सगळे बाप्पा मस्त. गणपती बाप्पा मोरया!!

चैतन्य, अप्रतिम देखणी मूर्ती घडवली आहे. सिंहासनपण देखणं आहे.

हिमस्कूलच्या आजोबांनी केलेलं सुलेखन दरवेळि आठवतं. सुंदर!

सगळ्यांनी केलेल्या आराशी आवडल्या.

चैतन्य, मूर्ती फारच सुंदर आहे. अजुनहि कोणि घरि केलेल्या मुर्ति असतिल तर त्याचे जरुर फोटो टाका. संपदा थर्मॉकॉल न वापरता कागदाची सजावट केल्याबद्दल तुमचे कौतुक!
मस्त आहेत सगळ्यांच्या घरचे बाप्पा.

सगळ्यांचे बाप्पा मस्त..
चैतन्य, घरी बनवलेली मूर्ती फारच सुंदर!!!

मी बनवलेल्या सजावटींमधले बाप्पा ईको फ्रेंडली आरास पुठ्ठा आणि हँडमेड पेपर आणि फुलं AMIT 1.jpgAmit 2.jpg
आणि हे आमचे घरचे बाप्पा ईको फ्रेंडली आरास पुठ्ठा आणि हँडमेड पेपर आणि फुलं omkar 1.jpgomkar 3.jpg

Pages