Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वलय वलय. पण प्राची,
वलय वलय.
पण प्राची, पॉझिटिव्हिटी? मग ती मूर्ख कशाला त्या अनिलशी लग्न करायला निघाली होती?
प्राची ऑरो ला तेजोवलय शब्द
प्राची ऑरो ला तेजोवलय शब्द चालेल का
चुभुदेघे
अशोकजी, तुम्हाला आत्ता मालिका
अशोकजी, तुम्हाला आत्ता मालिका आवडतेय ते चांगलं आहे. पण नंतर मालिकेत पाणी घातल्यावर तुम्हाला ते पटलं नाही, तर खुलेपणाने तसं मान्य कराल ना?
काल का परवा अनिलच्या एका
काल का परवा अनिलच्या एका सीनमधे खाली लाईन फिरत होती - "ही मालिका स्त्रियांवरील अत्याचाराचे समर्थन करत नाही" अशी काहीतरी.
हां वलय. बरोब्बर. अगं, मी
हां वलय. बरोब्बर.
अगं, मी 'जान्हवी'बद्दल नाही 'तेजश्री'बद्दल बोलत होते. मला तरी जाण्वलं तसं.
तेजश्री'बद्दल >> हां... ओके
तेजश्री'बद्दल >> हां... ओके ओके!
ऋजुता जोशीबद्दल धन्यवाद गं पूनम. कित्ती दिवसात ती कुठेच दिसली नाही, एक केसरीची जाहिरात करत होती तेवढंच.. म्हटलं गेली कुठे? ब्रेक बिक घेतला की काय.... तर असो! इकडे तिची चर्चा नको
ऋजुता जोशी>>> देशमुख ना ती?
ऋजुता जोशी>>> देशमुख ना ती?
सहा आयांच्या छायेत वाढलेला,
सहा आयांच्या छायेत वाढलेला, पुस्तकी किडा (मला मित्र मैत्रीणी नव्हते असा संवाद त्याच्या तोंडी होता), over protected असलेला मुलगा गोडमिट्ट, थोडासा बावळा असणारच! त्यामुळे श्रीची पात्रनिवड मला perfect वाटली.
शशांक केतकरने प्रामाणीक, पूर्णपणे प्रेमात पडल्याचे बेअरींग तरी मस्त घेतलय. जान्हवी इतक्या श्रीच्या पात्रात विविध छटा नाहीयेत त्यामुळे त्याला अभिनयाला वाव अजून मिळाला नाहीये. मला पण तो आधी नाही आवडायचा पण जेंव्हा बस स्टॉप वर तो अनिल आपटेला सुनावतो तेंव्हापासून मला तो आवडायला लागलाय. कसले सुसाट सुनावले होते त्याने! आणि नंतर जान्हवीने 'यांच्याशी माझे लग्न ठरले आहे' असे सांगितल्यावर फुग्यातली हवा गेल्याचा जो काय अभिनय होता तो भारीच होता त्याचा.
हो प्राची, ऋजुता जोशी -
हो प्राची, ऋजुता जोशी - देशमुख.
होय पौर्णिमा...... मालिकेतील
होय पौर्णिमा...... मालिकेतील ते "पाणी" घालून आमटी ढवळणे प्रकार माझ्या चांगल्याच परिचयाचा आहे. १९८३-८६ या कालावधीत दूरदर्शनवर ज्या मालिका झळकल्या त्यांची आयुष्यमर्यादा केवळ १३ आठवड्यांची असायची [एक भाग आठवड्यातून एकदाच प्रसारित व्हायचा]....म्हणजे जे काही कथानक आहे ते फक्त १३ भागातच संपवावे लागायचे. त्यामुळे पाणी ढवळणे हा प्रकार कुणालाच माहीत नव्हता. ती लागण झाली ते विविध चॅनेल्स अवतारायला लागल्यावरच....कारण प्रेक्षकांजा रोज काहीतरी द्यायलाच हवे ह्या हट्टापोटी.
आता तुम्ही म्हणता तशी वेळी आमच्या जान्हवी-श्री वर आली की चांगभलं म्हणायचे मग....!
ओके.
ओके.
मला श्री आवडतो ... आवडला...
मला श्री आवडतो
... आवडला...
त्याचं एकुणात वावरणं सहज आहे... त्यात किंचितही अभिनयाचा अभिनिवेश जाणवत नाहीये. त्याचे क्लोजप्स अत्यंत बोलके आहेत. जान्हवीचंही.
अभिनय करीत नाही आहोत असं भासवत पात्राचं बेअरिंग ठेवणं... कमाल आहे. (ह्या भारतवारीत बघितली... अन एखाददिवशी बघायची चुकली तर चुकचुक लावणारी मालिका ठरली)
मस्त आहे ती मालिका!!! मी पण
मस्त आहे ती मालिका!!! मी पण पाहतिये रोज!!
सहा आयांच्या छायेत वाढलेला,
सहा आयांच्या छायेत वाढलेला, पुस्तकी किडा (मला मित्र मैत्रीणी नव्हते असा संवाद त्याच्या तोंडी होता), over protected असलेला मुलगा गोडमिट्ट, थोडासा बावळा असणारच! त्यामुळे श्रीची पात्रनिवड मला perfect वाटली.>>>>>>>> माधव .....१००% सहमत!
आणि ती ऋजुता देशमुख आता विम लिक्विडच्या जाहिरातीत आहे ना, त्या राम कपूरबरोबर.
मला वाटतंय श्री आणि जान्हवी
मला वाटतंय श्री आणि जान्हवी दोघे ही खरंच प्रेमात पडले असावेत, त्याशिवाय का इतका नॅचरल अभिनय(?) होतो?
अगं... दक्षे... तो राहुल
अगं... दक्षे... तो राहुल डोंगरे मारेल त्या 'श्री' ला.....त्याने जर तुझी पोस्ट वाचली तर....
ओये दक्षे!! श्री आणि जान्हवी
ओये दक्षे!! श्री आणि जान्हवी दोघे ही खरंच प्रेमात पडले आहेत... कथानकच तसंय.. तुला शशांक आणि तेजश्री म्हणायचं होतं का? तसं असेल, तर ते मनातून काढून टाक. त्या तेजश्रीचं लग्न ठरलंय. तिला आणि तिच्या नवर्याला वाईट वाटेल.
कोण शशांक?
कोण शशांक?
बाय द वे जान्हवीचा वरच्या
बाय द वे जान्हवीचा वरच्या फोटोतला ड्रेस आणि त्यावर ती घेते ती पर्स अगदीच सो सो आहे बै
कोण शशांक? >>> शशांक केतकर =
कोण शशांक? >>>
शशांक केतकर = श्री
तेजश्री प्रधान = जाह्नवी
राहूल डोंगरे = रिअललाईफ जाह्नवीचा म्हणजेच तेजश्रीचा होणारा नवरा.
राहूल डोंगरे = रिअललाईफ
राहूल डोंगरे = रिअललाईफ जाह्नवीचा म्हणजेच तेजश्रीचा होणारा नवरा..... येस्स.... आणि मंडळी हाही एक हिरोच आहे.....शशांकपेक्षा किंवा त्याच्या बरोबरीनेच. इथे त्याचा फोटो देणे बरोबर नाही अन्यथा तुलना करता आली असती म्हणा.
काल जान्हवी किती सुंदर दिसत
काल जान्हवी किती सुंदर दिसत होती ना! पण श्री ने लगेच पटकन कॉंम्प्लिमेंट कशाला द्यायची... जनरली प्रेम नवं नवं असताना कसं सांगू ? असं होतं. आणि जान्हवीही अगदी सहज हसते त्यावर. जरा 1 चमचा जास्त आनंदी हवी होती व्हायला.
तुलना कशासाठी? आणि तीही आपण
तुलना कशासाठी?
आणि तीही आपण का करावी??
होय....तुलना करणे बरोबरही
होय....तुलना करणे बरोबरही नाहीच म्हणा....सहज एक विषय निघाला म्हणून लिहिले.
काल सुरेख दिसत होती पण ती
काल सुरेख दिसत होती पण ती हिरव्या साडीत.
राहुल डोंगरे अॅक्टर आहे??? मी तर वाचले होते की तो कुठल्या कंपनीचा (मिलान लॅबरोटरीज बहुतेक) जनरल मॅनेजर आहे.:अओ: असोच.
तेजश्री प्रधान चांगला अभिनय करतेय.
बाय द वे जान्हवीचा वरच्या
बाय द वे जान्हवीचा वरच्या फोटोतला ड्रेस आणि त्यावर ती घेते ती पर्स अगदीच सो सो आहे बै >>> तिच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची असल्याचे दाखवले आहे ना? मग त्याप्रमाणेच कपडे,पर्स दाखवणार की.
भारीतली पर्स, ड्रेस दाखवली असती तरीही तुम्ही म्हणाला असता 'गरीब नायिका म्हणायची आणि भारीतले कपडे घालायचे'
https://www.facebook.com/phot
https://www.facebook.com/photo.php?fbid=10152159257679307&set=a.10151319...
सांगा बर हे काय असेल????
चला.....एकदाचा "मी खरा कोण
चला.....एकदाचा "मी खरा कोण आहे ?" याचा रहस्यभेद श्रीरंग गोखले यानी जान्हवी सहस्त्रबुद्धे यांच्यासमोर केला. प्रत्यक्षात मला वाटले की ती दुर्गा होऊन त्याच्यावर चिडून तिथून निघून जाईल; पण [सुदैवाने] तसे काही घडले नाही. तिने धक्का पचवायला थोडा वेळ घेतला खरे; मग मात्र ती छानपैकी हसून त्याच्याबरोबरीने प्रवास होईल या विश्वासाने चालताना दाखविली आहे.
आज एक तासाचा विशेष भाग आहे.
नेमका कालचा भाग मिसला
नेमका कालचा भाग मिसला
गोखले साहेब कालच्या भागात
गोखले साहेब कालच्या भागात एर्टिगावरुन जुनाट स्कॉर्र्पियोवर आले .... बहुतेक जागतिक मंदिचा परिणाम असावा..
Pages