नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वलय वलय.
पण प्राची, पॉझिटिव्हिटी? मग ती मूर्ख कशाला त्या अनिलशी लग्न करायला निघाली होती?

अशोकजी, तुम्हाला आत्ता मालिका आवडतेय ते चांगलं आहे. पण नंतर मालिकेत पाणी घातल्यावर तुम्हाला ते पटलं नाही, तर खुलेपणाने तसं मान्य कराल ना? Happy

काल का परवा अनिलच्या एका सीनमधे खाली लाईन फिरत होती - "ही मालिका स्त्रियांवरील अत्याचाराचे समर्थन करत नाही" अशी काहीतरी.

हां वलय. बरोब्बर.
अगं, मी 'जान्हवी'बद्दल नाही 'तेजश्री'बद्दल बोलत होते. मला तरी जाण्वलं तसं. Happy

तेजश्री'बद्दल >> हां... ओके ओके!

ऋजुता जोशीबद्दल धन्यवाद गं पूनम. कित्ती दिवसात ती कुठेच दिसली नाही, एक केसरीची जाहिरात करत होती तेवढंच.. म्हटलं गेली कुठे? ब्रेक बिक घेतला की काय.... तर असो! इकडे तिची चर्चा नको Wink

सहा आयांच्या छायेत वाढलेला, पुस्तकी किडा (मला मित्र मैत्रीणी नव्हते असा संवाद त्याच्या तोंडी होता), over protected असलेला मुलगा गोडमिट्ट, थोडासा बावळा असणारच! त्यामुळे श्रीची पात्रनिवड मला perfect वाटली.

शशांक केतकरने प्रामाणीक, पूर्णपणे प्रेमात पडल्याचे बेअरींग तरी मस्त घेतलय. जान्हवी इतक्या श्रीच्या पात्रात विविध छटा नाहीयेत त्यामुळे त्याला अभिनयाला वाव अजून मिळाला नाहीये. मला पण तो आधी नाही आवडायचा पण जेंव्हा बस स्टॉप वर तो अनिल आपटेला सुनावतो तेंव्हापासून मला तो आवडायला लागलाय. कसले सुसाट सुनावले होते त्याने! आणि नंतर जान्हवीने 'यांच्याशी माझे लग्न ठरले आहे' असे सांगितल्यावर फुग्यातली हवा गेल्याचा जो काय अभिनय होता तो भारीच होता त्याचा.

होय पौर्णिमा...... मालिकेतील ते "पाणी" घालून आमटी ढवळणे प्रकार माझ्या चांगल्याच परिचयाचा आहे. १९८३-८६ या कालावधीत दूरदर्शनवर ज्या मालिका झळकल्या त्यांची आयुष्यमर्यादा केवळ १३ आठवड्यांची असायची [एक भाग आठवड्यातून एकदाच प्रसारित व्हायचा]....म्हणजे जे काही कथानक आहे ते फक्त १३ भागातच संपवावे लागायचे. त्यामुळे पाणी ढवळणे हा प्रकार कुणालाच माहीत नव्हता. ती लागण झाली ते विविध चॅनेल्स अवतारायला लागल्यावरच....कारण प्रेक्षकांजा रोज काहीतरी द्यायलाच हवे ह्या हट्टापोटी.

आता तुम्ही म्हणता तशी वेळी आमच्या जान्हवी-श्री वर आली की चांगभलं म्हणायचे मग....!

ओके.

मला श्री आवडतो Happy
... आवडला... Happy
त्याचं एकुणात वावरणं सहज आहे... त्यात किंचितही अभिनयाचा अभिनिवेश जाणवत नाहीये. त्याचे क्लोजप्स अत्यंत बोलके आहेत. जान्हवीचंही.
अभिनय करीत नाही आहोत असं भासवत पात्राचं बेअरिंग ठेवणं... कमाल आहे. (ह्या भारतवारीत बघितली... अन एखाददिवशी बघायची चुकली तर चुकचुक लावणारी मालिका ठरली)

सहा आयांच्या छायेत वाढलेला, पुस्तकी किडा (मला मित्र मैत्रीणी नव्हते असा संवाद त्याच्या तोंडी होता), over protected असलेला मुलगा गोडमिट्ट, थोडासा बावळा असणारच! त्यामुळे श्रीची पात्रनिवड मला perfect वाटली.>>>>>>>> माधव .....१००% सहमत!
आणि ती ऋजुता देशमुख आता विम लिक्विडच्या जाहिरातीत आहे ना, त्या राम कपूरबरोबर.

मला वाटतंय श्री आणि जान्हवी दोघे ही खरंच प्रेमात पडले असावेत, त्याशिवाय का इतका नॅचरल अभिनय(?) होतो? Wink

अगं... दक्षे... तो राहुल डोंगरे मारेल त्या 'श्री' ला.....त्याने जर तुझी पोस्ट वाचली तर....

ओये दक्षे!! श्री आणि जान्हवी दोघे ही खरंच प्रेमात पडले आहेत... कथानकच तसंय.. तुला शशांक आणि तेजश्री म्हणायचं होतं का? तसं असेल, तर ते मनातून काढून टाक. त्या तेजश्रीचं लग्न ठरलंय. तिला आणि तिच्या नवर्‍याला वाईट वाटेल. Happy

बाय द वे जान्हवीचा वरच्या फोटोतला ड्रेस आणि त्यावर ती घेते ती पर्स अगदीच सो सो आहे बै Sad

कोण शशांक? Uhoh >>>
शशांक केतकर = श्री
तेजश्री प्रधान = जाह्नवी
राहूल डोंगरे = रिअललाईफ जाह्नवीचा म्हणजेच तेजश्रीचा होणारा नवरा.

राहूल डोंगरे = रिअललाईफ जाह्नवीचा म्हणजेच तेजश्रीचा होणारा नवरा..... येस्स.... आणि मंडळी हाही एक हिरोच आहे.....शशांकपेक्षा किंवा त्याच्या बरोबरीनेच. इथे त्याचा फोटो देणे बरोबर नाही अन्यथा तुलना करता आली असती म्हणा.

काल जान्हवी किती सुंदर दिसत होती ना! पण श्री ने लगेच पटकन कॉंम्प्लिमेंट कशाला द्यायची... जनरली प्रेम नवं नवं असताना कसं सांगू ? असं होतं. आणि जान्हवीही अगदी सहज हसते त्यावर. जरा 1 चमचा जास्त आनंदी हवी होती व्हायला.

काल सुरेख दिसत होती पण ती हिरव्या साडीत. Happy
राहुल डोंगरे अ‍ॅक्टर आहे??? मी तर वाचले होते की तो कुठल्या कंपनीचा (मिलान लॅबरोटरीज बहुतेक) जनरल मॅनेजर आहे.:अओ: असोच.

तेजश्री प्रधान चांगला अभिनय करतेय.

बाय द वे जान्हवीचा वरच्या फोटोतला ड्रेस आणि त्यावर ती घेते ती पर्स अगदीच सो सो आहे बै >>> तिच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची असल्याचे दाखवले आहे ना? मग त्याप्रमाणेच कपडे,पर्स दाखवणार की.
भारीतली पर्स, ड्रेस दाखवली असती तरीही तुम्ही म्हणाला असता 'गरीब नायिका म्हणायची आणि भारीतले कपडे घालायचे' Happy Light 1

चला.....एकदाचा "मी खरा कोण आहे ?" याचा रहस्यभेद श्रीरंग गोखले यानी जान्हवी सहस्त्रबुद्धे यांच्यासमोर केला. प्रत्यक्षात मला वाटले की ती दुर्गा होऊन त्याच्यावर चिडून तिथून निघून जाईल; पण [सुदैवाने] तसे काही घडले नाही. तिने धक्का पचवायला थोडा वेळ घेतला खरे; मग मात्र ती छानपैकी हसून त्याच्याबरोबरीने प्रवास होईल या विश्वासाने चालताना दाखविली आहे.

आज एक तासाचा विशेष भाग आहे.

गोखले साहेब कालच्या भागात एर्टिगावरुन जुनाट स्कॉर्र्पियोवर आले .... बहुतेक जागतिक मंदिचा परिणाम असावा..

Pages