नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लीना भागवत श्री ची लहान काकू आहे, पौर्णिमा भावे आत्या (बेबीआत्या), अत्यानंद महाराजवाली मावशी, सुप्रिया पाठारे मोठी काकु.

कालचा जान्हवी आणि तिच्या बाबांमधला प्रसंग अगदिच नॅचरल. तिचा अभिनय अकृत्रीम. Happy
श्रीच्या घरातल्या बायकांचा त्याच्याकडुन तिच्याबद्द्लची माहिती काढुन घेण्याचा प्रसंग नेहमीप्रमाणे कंटाळवाणा Sad

श्री आणि जान्हवी (तेजश्री आणि शशांक) दोघही तगडा अभिनय करतात..... खोट खोट अस काहीच वाटत नाही त्यांना बघताना. लीना भागवतने पण भोळसट स्वभावाची व्यक्तिरेखा छान वठवली आहे. एकुण मालिका खरच छान आहे.

त्या दोघांवर चित्रीत झालेल गाण 'तु मला मी तुला गुणगुणु लागलो' यातला 'गुणगुणु' हा शब्द आधी समजलाच नव्हता. मी तो 'गुडगुडु' असा ऐकला होता. Blush

<<<<<<त्या दोघांवर चित्रीत झालेल गाण 'तु मला मी तुला गुणगुणु लागलो' यातला 'गुणगुणु' हा शब्द आधी समजलाच नव्हता. मी तो 'गुडगुडु' असा ऐकला होता. >>>>>>>

मला सुद्धा तसच ऐकु येत होतं

टकाटक मला वाटल मीच एकटि आहे की काय. कारण एक तासाच्या विशेष भागानंतर या गाण्याबद्दल जास्त काही वाचायला मिळाल नाही इथे

प्रत्येक गोष्टीची ६ व्हर्जन्स बघायला लागतात तेवढंच बोरिंग आहे. नाहीतर श्री आणि जान्हवी गोडच .....आणि एकूणात सुसह्य मालिका!

प्रत्येक गोष्टीची ६ व्हर्जन्स बघायला लागतात तेवढंच बोरिंग आहे. नाहीतर श्री आणि जान्हवी गोडच .....आणि एकूणात सुसह्य मालिका!>>> +११११

अस्मिता, गाण्याच्या लिंकसाठी धन्स.. ह्या गाण्यात जाह्नवी वेगळीच दिसतेय. काही दृष्यात तर तिचा चेहरा ओळखू येणार नाही, इतका वेगळा दिसतोय. प्रपोज केल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले, तेंव्हाचा तिचा चेहराही वेगळाच वाटतोय. ती हसतांना जेवढी छान दिसते, तेवढीच आनंदाश्रू आल्यावर मजेशीर वाटतेय..

ज्याना हे गाणे हवे असेल त्यानी zee मराठीच्या साईट वर जा तिथे हे गाण MP3 फॉर्मेट मध्ये उपलब्ध आहे

ज्याना हे गाणे हवे असेल त्यानी zee मराठीच्या साईट वर जा तिथे हे गाण MP3 फॉर्मेट मध्ये उपलब्ध आहे>>>> जाई थांन्कु हां

कालचे अपडेट....चीकूसाठी

~ कालचा भाग अनिल आपटे यानीच खाल्ला. प्रथम जान्हवीची आई शशिकलाबाई याना त्याने जीवाची धमकी देवून गर्भगळीत केले तर थोड्यावेळाने त्याच स्वरात आणि जरबेत जान्हवीलाही लग्नास होकार देण्याबाबत टरकावले. दोघीही जाम घाबरल्या आहेत आणि वडिलांनी खोदूनखोदून 'काय घडले ?" असे विचारले असतानाही दोघीही चूप बसल्याचे दाखविले.

दुसरीकडे श्री ने बोरकर मॅनेजरना जान्हवीचे २ लाखाचे कर्ज मंजूर करायला सांगितले आणि प्रत्यक्षात ऑपरेशनचे बिल तो देणार आहे.....जान्हवीला अर्थातच त्या दोघांतील हा संवाद माहीत नसल्याने ती केवळ बोरकर यांचे मनापासून आभार मानते.

धन्यवाद अशोक Happy
त्या अनिल आपटेचे असे प्रकार पाहून तरी शशिकलाबाई शुद्धीवर येतील आणि जान्हवीच्या बाजूला ठामपणे उभ्या राहतील अशी अपेक्षा आहे. निदान पोलीसात तक्रार तरी करावी त्यांनी.

श्री घरी सगळ्यांना त्याच्या अन जान्हवीच्या(तिचे नाव न घेता) भेटी बद्दल सांगतो.....तर शरयू काकू(लीना भागवत्)ला प्रश्न पडतो कि तो तिला खरच नोकरी देणार होता कि काय?....रडली म्हणजे हो कि नाही? ..हा मोठ्या आईचा प्रश्न. नंतर लग्न कसे करायचे याची चर्चा होते. त्यात शरयू काकू सांगते कि लग्नात सगळ्यांना बोलवायचे...मगचे सगळे विसरून....(बहुतेक तिला तिच्या नवर्‍याला बोलावायचे असणार)
श्री लवकरच तिला घरी घेऊन येणार व सगळ्यांची भेट करून देणार असे सांगतो(यावेळी आम्ही तिलाभेटलो अहोत असे कोणी सांगितले नाही).
अनिल जानूच्या आईला(शशिकलाबाईंना) धमकावतो. श्री जान्हवीला ऑपरेशनसाठी मदत करु का ते विचारतो तर ती नको म्हणते........ते दोघे फोनवर गोडगप्पा मारत असताना तिथून जानूची आई पळत जाते(अनिलला घाबरुन) मागून अनिल येतो आणि जान्हवीला धमकावतो.....मी रानटी आहे पण तुझ्यावर प्रेम करतो.. तुझ्यापेक्षा चार(खरतर दुप्पट म्हणायला हवे) पावसाळे जास्त पाहिलेत मी म्हणून तुला समजावून सांगतो ...लग्न नाही केले तर वट्टोळं करेन मी तुझे.....वगैरे.

श्री जान्हवीच्या सरांना ऑफिसमधे बोलवून जान्हवीच्या बाबांच्या ऑपरेशनचा सगळा खर्च तो करणार ते सांगतो...त्याच्या दवाखान्यातल्या डॉ.करुन ऑपरेशन कसे करुन घ्यायचे..ते किती फी सांगणार..जान्हवीला लोन दिले हे फक्त भासवायचे पण लोन द्यायचे नाही...त्यावर सर बोलतात कि जान्हवी बँकेत काम करते तिला लोनबद्दल सगळे लवकर कळेल त्यावर तो बोलतो कि तिला कळेपर्यंत त्यांचे लग्न झालेले असेल ...मग तो तिची माफी मागेन.

सर जान्हवीला लोन सँक्श्न झाल्यचे सांगतात...व तिला डॉ.चा त्यांच्या ऑफिसजवळ्च्या क्लिनिकचा पत्ता देतात. ती सांगते तिला त्या डॉ ची फी परवडणार नाही...त्यावर ते सांगतात कि हे आपल्या साहेबांच्या ओळखीचे डॉक्टर आहेत....फीची काळजी करु नकोस...लोनची रक्कम परस्प्र डॉ.ना दिली जाईल तर लवकर ऑपरेशन करून टाक.

पुढच्या भागात ...जान्हवीने अनिलशी लग्न करावे म्हणून तिची आई खूप रडारड करणार.....इति.

कालच्या भागात लीना भागवत रंगवीत असलेल्या पात्राने श्रीच्या लग्नाला आपण सग्गळ्यांना बोलवायचं, मागचं सगळं विसरून असं पुन्हा पुन्हा सांगणं आणि त्यावर श्रीच्या आईची (सुहित थत्ते) अवघडलेली अवस्था हा क्षण छान होता.
असाच एक क्षण होता अनिल आपटेला जान्हवीच्या घरातून तिचा भाऊ हाकलून लावतो,तेव्हा त्याचे वडील आधारासाठी असे दाखवीत त्याच्या खांद्याला क्षणभर स्पर्श करतात. त्यावरची पिंट्याची मूक प्रतिक्रिया.

आजच्या भागात जान्हवी खूष होऊन अगदी वार्‍याच्या वेगाने पळत येऊन श्री ला हॉटेलमध्ये नायर हॉस्पिटलची बातमी सांगते....कर्जही मंजूर झाल्याचे ती आनंदाने सांगते....श्री आपल्याला ही बातमी अगदी नवीच असल्याचे भासवितो....जान्हवी हसणे काही थांबवित नाही, अन् त्याच आवेगात श्री चे हात पकडून ठेवते.... श्री राव कासाविस होतात....छानच दाखविला आहे हा प्रसंग. विशेष म्हणजे नेमका हा भाग हॉटेलच्या बाहेरून अनिल आपटे पाहताना दाखविले आहे. पण तो येडा आत येत नाही.

इकडे श्री च्या घरी लग्नावरून 'पत्रिका' पाहावी की नाही यावर दोन तट पडतात. श्री ठामपणे आपण पत्रिका आणि अती देवदेव कर्मकांडे याविरूद्ध असल्याचे सांगतो आणि जर आम्ही लग्न करायचेच ठरविले आहे तर मग तुम्ही पत्रिका पाहिल्या किंवा नाही त्यामुळे आमच्या निर्णयात काही फरक पडणार नाही असे सांगतो. त्याच्या भूमिकेला इंदूआत्या पाठिंबा देतात. मग तो आईची समजूत काढतो.

दुसरीकडे जान्हवीच्या घरी आई खोटेनाटे रडतभेकत जान्हवीच्या पाया पडून तिला अनिल आपटे याच्याशीच लग्न कर म्हणून शपथ घालते....जान्हवी तो प्रस्ताव धुडकावते आणि आईला 'माझे श्री वर प्रेम आहे' असे खुल्या मनाने सांगते. आई श्री विवाहित असल्याचे म्हटल्यावर जान्हवी तो अकांउंटंटचा गोंधळ पूर्णपणे दूर करते आणि श्री हा गोखले गृह उद्योगचा मालक असल्याचे प्रसन्न चेहर्‍याने आईला सांगते...... मग आईचा चेहरा अविश्वासाने भला मोठा होतो.

एकूण गाडी रुळावर येत आहे असे दिसत्ये.

जान्हवीने श्री हा तो अकाउंटंट नाही असे सांगितल्यावर आई मात्र पुढचा प्रश्न , म्हणजे मालक आहे की काय असाच विचारते. बघा मेंटॅलिटीतला फरक.

येस्स....भरत. पोरीने नाही किंवा बापाने नाही, तरी आईने मारलेला अंदाजी तीर अचूक बसला श्री च्या खर्‍या रुपाच्याबाबतीत.

अशोककाकांसह सगळ्यांचे खूप खूप आभार... दररोज मालिकेत काय घडतय ते इथे लिहिल्याबद्दल. मला बघता येत नाहीयेत भाग... पण हे ही नसे थोडके.. हे बहुत बहुत असे Happy

आता जानुचि आई सवताच्या हाताने अनिल आपटेला आपटणार धडा$$$$म
याहू$$$$$$$$$$ लै म्हंजी लईच मज्जा येनार है बगा आता........

तिने जरी आपटलं तरी, तिने त्यच्याकडून ७०, ००० घेतले आहेत ना ऑपेरेशन च्या नावाखाली? ते कोण फेड्णार आता, श्री?

श्रीच अजुन कोण? आणि या दोघांच लग्न झाल की मग तिची हावरट आई सारखी तिच्याकडे पैसे मागणार, मग ही वेड्यासारखी गुपचुप देणार, मग ते नेमकं कोणतरी बघणार आणि तिच्या माहेरचे धिंडवडे निघणार...... चाळीतली मुलगी केली म्हणुन.........

Pages