Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेंगदाणे कूट आणि खोबर्याचा
शेंगदाणे कूट आणि खोबर्याचा कीस या दोन्ही ऐवजी भाज्यांमध्ये काय वापरता येईल? पित्तामुळे डॉ.नी बरेच पथ्य सांगितले आहे.
काळजीवाहू, कांदा टोमॅटो
काळजीवाहू, कांदा टोमॅटो प्युरे.
भेंडीची भाजी बुळबुळीत होऊ नये म्हणून, भेंडी व्यवस्थित पुसून घ्यावी. आंबट पदार्थ तर टाकावाच.
ओहो हे आंबट काहीतरी टाकायच
ओहो हे आंबट काहीतरी टाकायच अजीबात माहीत नव्हत. धन्यवाद अल्पना, प्राची, येळेकर, स्वाती
धन्स, स्वाती
धन्स, स्वाती
अस्मिता भेंडीची भाजी बुळबुळित
अस्मिता
भेंडीची भाजी बुळबुळित होऊ नये म्हणून, फोडणीत एक चिंचेचे बुटुक टाकावे. टोमॅटो कांदा यासारखे पदार्थ घालणार असलीस तर नीट परतून त्यातले पाणी निघून गेल्यावर मगच भेंडी टाकून परतायची.
जनरली भेंडीवर झाकण ठेवत नाहीत, पण मी ठेवते. आणि भाजी शिजत आली की काढते. आणि मग लिंबू पिळते. आणि गॅस बंद करून मग मीठ आणि साखर घालून खाली उतरवून भांड्यातल्या भांड्यात परतते. भाजी अजिबात बुळबुळित होत नाही. तेल मात्र जरा किंचित जास्त लागतं या भाजीला.
दक्षिणा खूप आभार. ओके चिँच
दक्षिणा खूप आभार. ओके चिँच फोडणीत टाकेन. कांदा टोमटा नाही घालत मी आणि झाकण पण नाही ठेवत. तुझ्या पद्धतीने करुन पाहते
ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी
ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी अशा मिक्स पिठांची थालिपीठं करताना ती मऊ होण्यासाठी एखादी युक्ती सांगा ना. गरम असेल तोवर खायला काही वाटत नाही. गार झाले की वातड होतात.
@ नंदिनी थोडी आमटी असेल तर ती
@ नंदिनी थोडी आमटी असेल तर ती घाला.. आणि थालिपीठ उलटल्यावर परत झाकण ठेवा.. थालीपिठाची भाजणीपण थोडी सैल भिजवा.
कांदा किसून घाला. त्याने पण
कांदा किसून घाला. त्याने पण चव व पुरेसा ओलसरपणा मिळतो. भाजणीचा घट्ट गोळा नाही भिजवायचा किंचीत सैलसर भिजवायचा. तसेच थोडे दही पण घालायचे पिठ भिजवताना. मग हरवाळ तरी कुरकुरीत थालीपिठ होते.
पँट्रीमध्ये मक्याचे पीठ
पँट्रीमध्ये मक्याचे पीठ (मक्की फ्लार असे त्यावर लिहीले आहे) सापडले आहे. काय करता येइल? १ किलो तरी आहे. तळण शक्यतो करायचे नाहीये.
ताकात भिजवून मीठ मिरची आले
ताकात भिजवून मीठ मिरची आले कोथिंबीर घालून डोसे. धिरडी/ मक्के कि रोटी खरे तर पिठले पण बनवता येइल पण कधी केले नाही. मेक्सिकन डिशेस मध्ये वापरता येइल.
धन्यवाद स्न्हेहश्री आणि
धन्यवाद स्न्हेहश्री आणि सुमेधा. मी थोडंसं वरण घालते, आमटी कधी घातली नाही. आणि हो, पीठ जरा घट्टसर भिजवते. आता थोडं हलकं भिजवून बघेन.
माझ्या सासु बाई भेंडी कापुन
माझ्या सासु बाई भेंडी कापुन नुसती तव्यावर भाजुन घेतात (तेल न घालता...) जरा काळपट होईपर्यन्त..बाजुला काढुन ठेवतात ...मग त्याच तव्यावर तेल टाकुन कांदा फोडणीला देउन भेंडी अॅड करतात...त्यात मीरची खोबरं अमसुल घालुन भाजी बनवतात नेहेमी प्रमाणे...पण मस्त होते अगदी हिरवीगार नाही दिसत.. काळी दिसते जरा पण खमंग होते...जरा दाण्याचं कुट घालुन मस्त होते...
हो आणि तो तवा नंतर मन लावुन
हो आणि तो तवा नंतर मन लावुन घासावा लागतो....कारण तोही भयानक काळा होतो....म्हणुन लो़खंडाचा काळा तवा / कढई असतो ते वापरावे...
ही खास आयडिया आहे.
ही खास आयडिया आहे.
वत्सला, जागूने लिहिलेले कॉर्न
वत्सला, जागूने लिहिलेले कॉर्न बॉल्स, मक्की की रोटी.
राजस्थानी लोक मक्याच्या पिठाचा ढोकळा बनवतात. मक्याच्या पिठात आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर आणि हवे असलेले इतर मसाले (ओवा, जीए, धण्याची पुड, मीठ), खायचा सोडा घालून पीठ मळुन घ्यायचं भाकरीच्या पिठासारखं आणि मग त्याचे हाताने छोटे छोटे उंडे वळून वाफावयाचे.
थालपीठामध्ये पण घालता येईल थोडं पीठ.
नंदिनी थालिपिठात थोडा लाल
नंदिनी थालिपिठात थोडा लाल भोपळा किसून घातला तरी थालिपिठ मऊ राहते.
गौरीच्या नैवेद्यासाठी घावन
गौरीच्या नैवेद्यासाठी घावन घाटले करतात. त्यातले घावन आधी करून ठेवता येईल का (३/४ तास). मागच्या वेळेला केलीली घावने कडक झाली होती. (ऐनवेळी तांदूळ पेठी भिजवून धिरडी केली होती)
रावी, हो चालेल. पण घावन तयार
रावी, हो चालेल. पण घावन तयार झाला की केळीच्या पानावर किंवा ताटात पूर्ण गार करून मग डब्यात भर, नाहीतर वाफेचं पाणी जमा होऊन घावनांचा गिचका होईल.
घावन कडक झाले>> पीठ प्रमाणापेक्षा पातळ झाले होते का? तांदळाच्या पीठाबरोबर काय काय घातले होते?
मंजूडी, पीठ पातळ नव्हतं गं
मंजूडी, पीठ पातळ नव्हतं गं फार झालं. तांदळाच्या पीठात थोडं मीठ आणि थेंबभर तेल घातलं होतं.
हो आणि तो तवा नंतर मन लावुन
हो आणि तो तवा नंतर मन लावुन घासावा लागतो....कारण तोही भयानक काळा होतो....म्हणुन लो़खंडाचा काळा तवा / कढई असतो ते वापरावे...>>>>मी स्टिलची कढई वापरते. कढईत भेंडी (चिंच/आमसूल/लिंबू घालून) काळसर होईपर्यंत परतते. ती बाजूला काढून लगेच त्यात फोडणी करुन भेंडी टाकते अन मग ५ मि. झाकून १ वाफ आली कि गॅस बंद करते. नंतर भाजीच्या ओलसरपणा मुळे कढई काळी राहत नाही...स्वच्छ निघते.
@नंदिनी, मी थालीपिठात उकडलेला
@नंदिनी, मी थालीपिठात उकडलेला बटाटा, किसलेला कांदा घालते आणि थोडे दही. त्याने पण मऊपणा येतो आणि खमंग पण लागते.
अनिश्का. आणि sonalisl
अनिश्का. आणि sonalisl धन्यवाद. तुमच्या पद्धतीनेदेखील करुन पाहते भेँडी
घरी नुसता राजगिरा पडला आहे
घरी नुसता राजगिरा पडला आहे .
साबा उपवासाला त्यात साखर आणि ओलं खोबरं घालुन नुसताच खातात.
आणखी काही करता येईल का?
राजगिरा - लाडु आणि चिक्की..
राजगिरा - लाडु आणि चिक्की..
राजगिरा - लाडु आणि चिक्की..
राजगिरा - लाडु आणि चिक्की.. >> रेसिपी प्लीजच
http://www.google.co.in/url?s
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja...
राजगिरा लाडु / चिक्की
फोडणीवर थोडा परतायचा. थोडी
फोडणीवर थोडा परतायचा. थोडी मिरची घालून. खमंग. छान लागतो.
नताशा, फोडणीवर नुसताच परतून
नताशा, फोडणीवर नुसताच परतून खायचा की त्यात उपम्यासारखं पाणी घालून शिजवून खायचा?
स्वस्ती पिठ आहे की अख्खा
स्वस्ती पिठ आहे की अख्खा राजगिरा?
Pages